झाड मराठी निबंध Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Sat, 09 Oct 2021 23:41:09 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 झाड मराठी निबंध Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 झाड – १० ओळी मराठी निबंध | 10 Lines Essay On Tree in Marathi | https://dailymarathinews.com/%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%a1-%e0%a5%a7%e0%a5%a6-%e0%a4%93%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7/ https://dailymarathinews.com/%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%a1-%e0%a5%a7%e0%a5%a6-%e0%a4%93%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7/#respond Tue, 28 Sep 2021 06:12:16 +0000 https://dailymarathinews.com/?p=2572 प्रस्तुत लेख हा झाड - १० ओळी मराठी निबंध आहे. झाडाविषयी सर्व महत्त्वपूर्ण माहिती या निबंधात दिलेली आहे.

The post झाड – १० ओळी मराठी निबंध | 10 Lines Essay On Tree in Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा झाड – १० ओळी मराठी निबंध (10 Lines Essay On Tree in Marathi) आहे. झाडाविषयी सर्व महत्त्वपूर्ण माहिती या निबंधात दिलेली आहे.

झाड – १० ओळी मराठी निबंध | Tree Essay In Marathi 10 Lines |

१. झाड हा मानवाच्या जीवनातील आणि निसर्गातील अविभाज्य व महत्त्वपूर्ण घटक आहे.

२. झाड आपल्याला ऑक्सिजन देते आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेते.

३. झाडांपासून आपल्याला फळे – फुले तसेच सावली मिळते.

४. झाडांच्या लाकडांचा उपयोग इमारती व घरे बांधण्यासाठी होतो.

५. आपल्याला शुद्ध व निरोगी वातावरण हवे असेल तर झाडे लावणे खूपच गरजेचे आहे.

६. झाडाची निर्मिती ही फळांमधील बियांपासून होत असते. योग्य प्रकारची जमीन आणि पाणी मिळाल्यास झाडांची वाढ चांगली होते.

७. झाडे मोठी होण्यासाठी खूप वर्षाचा कालावधी जात असतो त्यासाठी त्यांना तोडणे हे अत्यंत चुकीचे कृत्य आहे.

८. सध्या वृक्षतोड वाढलेली आहे त्यामुळे प्रदूषण, मातीची धूप, पाऊसाची अनियमितता आणि तापमानवाढ अशा समस्या डोके वर काढत आहेत.

९. झाडे म्हणजे मानवासाठी आणि इतर सजीवांसाठी निसर्गाचे वरदानच आहे.

१०. मानवाला होणारे झाडाचे फायदे जाणून घेऊन त्यांच्याप्रती कृतज्ञतापूर्वक वागणे सध्याची गरज बनलेली आहे.

तुम्हाला झाड १० ओळी मराठी निबंध (10 Lines Essay On Tree in Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post झाड – १० ओळी मराठी निबंध | 10 Lines Essay On Tree in Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%a1-%e0%a5%a7%e0%a5%a6-%e0%a4%93%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7/feed/ 0 2572
झाड मराठी निबंध | Tree Essay In Marathi | इयत्ता ५ वी ते ७ वी| https://dailymarathinews.com/%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%a1-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7/ https://dailymarathinews.com/%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%a1-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7/#comments Tue, 21 Sep 2021 08:09:00 +0000 https://dailymarathinews.com/?p=2528 प्रस्तुत लेख हा झाडाविषयी मराठी निबंध आहे. अत्यंत मुद्देसूद आणि सोप्या भाषेत हा निबंध मांडण्यात आलेला आहे.

The post झाड मराठी निबंध | Tree Essay In Marathi | इयत्ता ५ वी ते ७ वी| appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा झाडाविषयी मराठी निबंध (Tree Essay In Marathi) आहे. अत्यंत मुद्देसूद आणि सोप्या भाषेत हा निबंध मांडण्यात आलेला आहे.

झाड मराठी निबंध | Tree Marathi Essay | Tree Marathi Nibandh |

झाड हा मानवाच्या जीवनातील आणि निसर्गातील अविभाज्य व महत्त्वपूर्ण घटक आहे. झाड आपल्याला ऑक्सिजन देते आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेते. त्यामुळे वातावरण शुद्ध राहण्यास मदत होते.

झाड आपल्याला फळे-फुले तसेच सावली देते. झाडापासून मिळणाऱ्या लाकडांचा उपयोग इमारती, घरे बांधण्यासाठी होतो आणि झाडांच्या लाकडांचा उपयोग वेगवेगळ्या वस्तू, कागद तसेच फर्निचर तयार करण्यासाठी होतो.

सध्या जगामध्ये जास्त प्रमाणात झाडे तोडली जात आहेत. लोकसंख्या आणि औद्योगिकीकरण वाढल्याने जंगलाचे प्रमाण कमी होत चाललेले आहे. त्याचा विपरीत परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे.

आपल्याला शुद्ध व निरोगी वातावरण हवे असेल तर झाडे लावणे खूपच गरजेचे आहे. झाडे दूषित वायू शोषून घेऊन त्याचे रूपांतर ऑक्सिजनमध्ये करतात आणि आपल्याला शुद्ध वायू देतात. म्हणून आपल्या आजूबाजूला झाडांची हिरवळ असणे गरजेचे आहे.

झाडाचे कार्य हे निसर्गनियमानुसार होत असते. त्याची निर्मिती आणि वाढ होण्यामागे निसर्गाचे खूप मोठे योगदान असते. झाडाची निर्मिती ही फळांमधील बियांपासून होत असते. योग्य प्रकारची जमीन आणि पाणी मिळाल्यास झाडांची वाढ चांगली होते.

झाडे मोठी होण्यासाठी खूप वर्षाचा कालावधी जात असतो त्यासाठी त्यांना तोडणे हे अत्यंत चुकीचे कृत्य आहे. झाडे ही नेहमीच मानवी जीवनासाठी उपयोगी आहेत. मानवाला होणारे झाडाचे फायदे जाणून घेऊन त्यांच्याप्रती कृतज्ञतापूर्वक वागणे सध्याची गरज बनलेली आहे.

तुम्हाला झाड – मराठी निबंध (Tree Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

लेखन सौजन्य – निकिता पवार (सातारा)

The post झाड मराठी निबंध | Tree Essay In Marathi | इयत्ता ५ वी ते ७ वी| appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%a1-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7/feed/ 1 2528
झाड मराठी निबंध – इयत्ता ८वी ते १० वी| Tree Essay In Marathi | https://dailymarathinews.com/tree-essay-in-marathi/ https://dailymarathinews.com/tree-essay-in-marathi/#respond Tue, 06 Apr 2021 23:38:31 +0000 https://dailymarathinews.com/?p=2137 आपल्या परिसरात सर्वत्र झाडेच झाडे असतात. झाडाचे उपयोग, फायदे आणि उपयुक्तता माहीत होण्यासाठी विद्यार्थ्यांना झाड या विषयावर निबंध लिहायला लावतात. अतिशयोक्ती न करता अगदी मापक ...

Read moreझाड मराठी निबंध – इयत्ता ८वी ते १० वी| Tree Essay In Marathi |

The post झाड मराठी निबंध – इयत्ता ८वी ते १० वी| Tree Essay In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
आपल्या परिसरात सर्वत्र झाडेच झाडे असतात. झाडाचे उपयोग, फायदे आणि उपयुक्तता माहीत होण्यासाठी विद्यार्थ्यांना झाड या विषयावर निबंध लिहायला लावतात. अतिशयोक्ती न करता अगदी मापक शब्दात स्पष्ट वर्णन करून झाड हा मराठी निबंध (Tree Essay In Marathi) लिहायचा असतो.

झाड मराठी निबंध | Tree Marathi Nibandh

झाड आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते. जेवढे सजीव अस्तित्व या पृथ्वीवर आहे त्यासाठी झाड अतिशय उपयुक्त आहे. झाडे ही निसर्गाचाच भाग आहेत. पृथ्वीवर पर्यावरण संतुलित ठेवण्याचे काम झाडे करत असतात. झाडे नसतीच तर आपण निसर्गाची कल्पनाच करू शकत नाही.

आपल्या आसपास झाडांचे विविध प्रकार पाहायला मिळतात. त्यामध्ये झुडुपे, फळझाडे, फुलझाडे, काटेरी, उंच, शोभेची असे विविध प्रकार आहेत. आपण जी शेती करतो ती पिकेसुद्धा झाडांचाच प्रकार आहे. झाडाच्या खोडाचा आणि फांद्यांचा रंग मातकट तर पानांचा रंग हिरवा असतो.

झाडाचे कार्य हे निसर्ग नियमानुसार होत असते परंतु मानवी संज्ञेनुसार झाडाचे कार्य ऑक्सिजन निर्मितीचे असते. हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेणे आणि ऑक्सिजन बाहेर सोडणे तसेच सूर्यप्रकाशाच्या मदतीने अन्न निर्मिती करणे हे मुख्य काम झाडे करत असतात.

झाडांचे सर्व अवयव मानवी जीवनात जगण्यासाठी उपयोगी पडतात. झाडाची फळे आपण खाऊ शकतो. फुलांचा उपयोग आपण वातावरण सुगंधित करण्यासाठी आणि देवाला अर्पण करण्यासाठी करतो. झाडाचे खोड लाकडाच्या वस्तू बनवण्यासाठी आणि फांद्या आणि सुकी पाने आपण जळणासाठी वापरतो.

झाड निर्मिती ही फळामधील बियांपासून होत असते. काही झाडे ही त्यांच्या फांद्यांपासून पुन्हा निर्माण होत असतात. झाडे पूर्ण मोठी होण्यासाठी खूप वर्षांचा कालावधी जात असतो. त्यासाठी त्यांना तोडणे हे अत्यंत चुकीचे कृत्य आहे.

पर्यावरण संतुलन आणि पाऊस नियमित होणे यामध्ये झाडांचे कार्य अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणजे पूर्ण जलचक्रच झाडांवर अवलंबून आहे. त्यासाठी झाडे न तोडणे, वृक्षलागवड करणे अशा मोहीमा सरकार वारंवार राबवत असते.

मुळे, खोड, फांद्या, पाने, फुले, फळे, अशा विविध अवयवांनी तयार झालेलं झाड हे खरे म्हणजे निसर्गाचा चमत्कारच आहे. झाडाच्या सावलीत जे सुख आणि शांती जाणवते तशी शांती कोणत्याही प्रकारच्या घरात जाणवणार नाही.

संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला झाड हा निबंध (Tree Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post झाड मराठी निबंध – इयत्ता ८वी ते १० वी| Tree Essay In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/tree-essay-in-marathi/feed/ 0 2137