इंट्राडे ट्रेडिंग मार्जिन Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Mon, 29 May 2023 04:09:07 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 इंट्राडे ट्रेडिंग मार्जिन Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 इंट्राडे ट्रेडिंग कसे करावे – महत्त्वाच्या टिप्स | Intraday Trading Tips in Marathi | https://dailymarathinews.com/intraday-trading-tips-in-marathi/ https://dailymarathinews.com/intraday-trading-tips-in-marathi/#respond Mon, 09 Aug 2021 02:37:11 +0000 https://dailymarathinews.com/?p=2438 प्रस्तुत लेखात इंट्राडे ट्रेडिंग करताना घ्यावयाची काळजी अथवा इंट्राडे ट्रेडिंग कसे करावे, याबद्दल सर्व माहिती देण्यात आलेली आहे.

The post इंट्राडे ट्रेडिंग कसे करावे – महत्त्वाच्या टिप्स | Intraday Trading Tips in Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेखात इंट्राडे ट्रेडिंग करताना घ्यावयाची काळजी अथवा इंट्राडे ट्रेडिंग कसे करावे? (Intraday Trading Tips in Marathi) याबद्दल सर्व माहिती देण्यात आलेली आहे.

इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे एकाच दिवसात शेअर्स खरेदी अथवा विक्री करून व्यापार करणे. त्यातून फायदा आणि तोटा दोन्ही संभव आहे.

इंट्राडे ट्रेडिंगसाठी शेअर्स कसे निवडावेत? (Intraday Trading Tips in Marathi)

१. गुंतवणूक रक्कम –

सर्वप्रथम तुमची गुंतवणूक रक्कम किती असणार आहे हे पडताळून पाहा. कारण ट्रेंडनुसार फायदा – तोटा होणार असला तरी तुमची शेअर्सची संख्या ही तुमच्याकडे असणाऱ्या गुंतवणुकीच्या रक्कमेवर अवलंबून असते. त्यानुसारच फायदा होत असतो.

२. मार्जिन –

इंट्राडे ट्रेडिंगसाठी ब्रोकर तुम्हाला मार्जिन देत असतो. समजा 2000 रुपयांचा शेअर असेल तर तो तुम्हाला कमी किंमतीत मिळतो. त्यामुळे कमी रक्कमेत सुद्धा तुम्ही जास्त शेअर्स घेऊ शकता.

ब्रोकर किती मार्जिन देत आहे ते पडताळून पाहावे कारण कमी मार्जिन असल्यास जास्त शेअर्स विकत घेता येत नाहीत परिणामी होणारा लाभ कमी असतो. 2000 रुपयांच्या शेअर वर 5x मार्जिन असेल तर तो तुम्हाला 400 रुपयांना मिळतो.

३. ट्रेडिंग करणाऱ्यांची संख्या (High Volume Shares) –

ट्रेडिंग करणाऱ्यांची संख्या जास्त असल्यास ट्रेंड सतत बदलत राहतो. त्यामुळे नफा होवो अथवा तोटा, ते तुमच्या निरीक्षण आणि हुशारीवर अवलंबून असेल पण नक्कीच तो शेअर खरेदी किंवा विक्री करावा.

High volume शेअर्स नसतील तर मात्र दिवसभर पैसे गुंतवून ठेवून हवा तसा नफा प्राप्त करता येत नाही.

४. शेअर्सची अस्थिरता (Volatility) –

शेअर्सची अस्थिरता (Volatility) जास्त असल्यास तो शेअर  निवडावा कारण अस्थिर पोझिशनवर तुम्ही निर्णय घेऊ शकता की शेअर खरेदी करायचा की विक्री करायचा.

५. स्टॉप लॉस आणि सेलिंग लिमिटचा वापर –

स्टॉप लॉस (Stop Loss) म्हणजे तुम्हाला होणाऱ्या तोट्याची रक्कम फिक्स करून ठेवणे आणि ट्रेडिंग करणे. त्यामुळे त्या रक्कमेपर्यंत तोटा झाला की आपोआप पोझिशन क्लोज होते. शेअर्सची अस्थिरता जास्त असल्यास नक्कीच स्टॉप लॉसचा वापर करावा.

सेलिंग लिमिट (Selling Limit) म्हणजे होणाऱ्या फायद्याची रक्कम फिक्स करून ठेवणे. काहीवेळा आपल्याला सतत ट्रेंड पाहणे शक्य नसल्यास या पद्धतीचा वापर करू शकता.

• महत्त्वाची टीप – Important Note

ट्रेडिंग करणे ही एक प्रकारची रिस्कच आहे. नफा होणे किंवा तोटा होणे हे सर्वस्वी तुमच्या नियंत्रणात नसते. ट्रेंडमधील निरीक्षण आणि शेअर्सबद्दल माहिती तुम्हाला नफा मिळवून देते तर निष्काळजीपणे आणि अंदाजे ट्रेडिंग केल्याने तोटा होतच असतो.

ट्रेडिंगमधील गुंतवणूक ही सर्वस्वी वैयक्तिक जबाबदारी असल्याने रिस्क फ्री ट्रेडिंग करणे हेच तुमच्या हातात आहे. संपूर्ण लेख हा फक्त माहिती स्वरूप आहे. कोणालाही आर्थिक तोट्यात घेऊन जाणे असा उद्देश्य नसल्याने तुम्ही या सर्व माहितीचा अंदाज आणि अनुभव घेऊन ट्रेडिंग करावी, ही विनंती!

तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग कशी करावी? (Intraday Trading Tips in Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post इंट्राडे ट्रेडिंग कसे करावे – महत्त्वाच्या टिप्स | Intraday Trading Tips in Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/intraday-trading-tips-in-marathi/feed/ 0 2438
इंट्राडे ट्रेडिंग – संपूर्ण माहिती । Intraday Trading in Marathi | https://dailymarathinews.com/intraday-trading-in-marathi/ https://dailymarathinews.com/intraday-trading-in-marathi/#comments Sat, 10 Jul 2021 13:53:00 +0000 https://dailymarathinews.com/?p=2389 शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या लोकांना शेअर मार्केटबद्दल प्राथमिक स्वरूपाची माहिती असणे अत्यावश्यक आहे. शेअर मार्केटमधीलच एक गुंतवणूक पर्याय म्हणून इंट्राडे ट्रेडिंग केले जाते. इंट्राडे ...

Read moreइंट्राडे ट्रेडिंग – संपूर्ण माहिती । Intraday Trading in Marathi |

The post इंट्राडे ट्रेडिंग – संपूर्ण माहिती । Intraday Trading in Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या लोकांना शेअर मार्केटबद्दल प्राथमिक स्वरूपाची माहिती असणे अत्यावश्यक आहे. शेअर मार्केटमधीलच एक गुंतवणूक पर्याय म्हणून इंट्राडे ट्रेडिंग केले जाते. इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय? हे जाणून घेण्यासाठी इंट्राडे ट्रेडिंग – संपूर्ण माहिती (Intraday Trading in Marathi) हा लेख तुम्हाला उपयुक्त ठरेल.

What is Intraday Trading in Marathi | इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय?

इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे शेअर मार्केटमधील ट्रेडिंगचा एक प्रकार आहे. यामध्ये एका दिवसामध्ये शेअर विकत (Buy) घेऊ शकतो आणि विकू (Sell) शकतो. यासाठी तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट खोलवे लागेल (Open trading account)

सकाळी घेतलेला शेअर सायंकाळपर्यंत विकावा लागतो. इंट्राडे ट्रेडिंगची वेळ सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 पर्यंत असते. या वेळेदरम्यानच तुम्ही ट्रेडिंग करू शकता. त्यामध्ये व्यक्तीने 3:10 अथवा 3:20 पर्यंत शेअर पोझिशन एक्झिट करायची असते.

तुम्ही घेतलेला शेअर जर विकला नाही तर आपोआप दुपारी 3:30 वाजता तो शेअर आहे त्या पोझिशनला विकला जातो. ज्यामध्ये तो शेअर नफा अथवा तोट्यात असू शकतो.

तुम्ही वेळेत शेअर न विकल्याने ब्रोकर तो शेअर विकून टाकतो आणि त्याचा दंड म्हणून काही रक्कम (Penalty) वजा होते.

त्यामुळे शेअर्स विकत घेतल्यानंतर ज्यावेळी तुम्हाला असे वाटेल की best Price ला विकला जाईल त्या वेळीच तो विकून टाकावा कारण सतत चढ-उतार होत असल्याने तुम्ही तोट्यात पण जाऊ शकता.

• इंट्राडे ट्रेडिंग मार्जिन (Intraday Trading Margin) –

इंट्राडे ट्रेडिंग मार्जिन हे इंट्राडे ट्रेडिंगचे वैशिष्ट्य आहे. म्हणजे तुम्ही कमी किमतीमध्ये जास्त शेअर खरेदी करू शकता. तुमचा ब्रोकर त्यासाठी मार्जिन देत असतो. त्यामध्ये शेअर्सची संख्या देखील महत्त्वपूर्ण ठरते.

समजा शेअरची किंमत 200 रुपये असेल. त्यावर ब्रोकर समजा 10× मार्जिन देत असेल तर तुम्हाला तो शेअर एकूण 20 रुपये किंमतीला विकत घेता येतो (10 × 20 = 200). म्हणजेच होणारा नफा आणि तोटा त्याच प्रमाणात असतो.

एक शेअर 20 रुपयेला मिळत असल्याने तुम्ही शेअर्सची संख्या (Number of Shares) वाढवू शकता आणि त्याच प्रमाणात फायदा देखील मिळवू शकता. जेवढी शेअर्सची संख्या जास्त तेवढा फायदा जास्त असतो.

समजा 20 रुपये किमतीचे तुम्ही 100 शेअर्स घेतले तर शेअर एका अंकाने वर गेला किंवा खाली आला तर फायदा आणि तोटा 100 रुपयेच होत असतो. म्हणजे त्यासाठी 200 रुपयांचा शेअर 201 किंवा 199 रुपये असा चढला पाहिजे किंवा उतरला पाहिजे.

शेअर खरेदी केला असेल तर शेअरची किंमत वाढल्यावर फायदा होतो आणि शेअर विकला असेल तर शेअरची किंमत खाली आल्यावर फायदा होतो.

आता समजा ट्रेडिंग करताना त्या कंपनीच्या शेअरमध्ये वाढ झाली आणि तुम्ही तो शेअर विकलात तर तुम्हाला मिळणारी रक्कम ही मार्जिनच्या प्रमाणात असते.

शेअर खरेदी केला असेल तर पोझिशन एक्झिट करताना त्याला विकावे लागते आणि शेअर विकला असेल तर पोझिशन एक्झिट करताना त्याला विकत घ्यावे लागते.

• इंट्राडे ट्रेडिंग फायदे – (Benefits of Intraday Trading In Marathi)

इंट्राडे ट्रेडिंगमध्ये कमी किमतीमध्ये जास्त शेअर खरेदी करू शकता.

कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त पैसे कमावण्याची संधी असते.

शेअर मार्केटमध्ये जास्त काळ गुंतवणूक असली तरी तुम्ही प्रत्येक दिवशी देखील इंट्राडे ट्रेडिंगमध्ये पैसे कमवू शकता.

सध्या मोबाईलमध्ये ट्रेडिंगचे ऑनलाईन ऍप्लिकेशन्स उपलब्ध असल्याने तुम्ही त्यांचा वापर करून घरबसल्या ट्रेडिंगचा अनुभव घेऊ शकता.

तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग – संपूर्ण माहिती (Intraday Trading in Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post इंट्राडे ट्रेडिंग – संपूर्ण माहिती । Intraday Trading in Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/intraday-trading-in-marathi/feed/ 1 2389