प्राणी Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Tue, 16 Nov 2021 04:15:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 प्राणी Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 गेंडा मराठी माहिती | Rhino Information in Marathi | https://dailymarathinews.com/%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80/ https://dailymarathinews.com/%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80/#respond Mon, 15 Nov 2021 04:23:21 +0000 https://dailymarathinews.com/?p=2862 प्रस्तुत लेख हा गेंडा या प्राण्याविषयी मराठी माहिती आहे. गेंड्याची शरीररचना, त्याचे राहणीमान, आणि त्याचे वास्तव्य अशा बाबींची चर्चा या लेखात

The post गेंडा मराठी माहिती | Rhino Information in Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा गेंडा या प्राण्याविषयी मराठी माहिती (Rhino Information in Marathi) आहे. गेंड्याची शरीररचना, त्याचे राहणीमान, आणि त्याचे वास्तव्य अशा बाबींची चर्चा या लेखात करण्यात आलेली आहे.

गेंडा माहिती मराठी | Genda Marathi Mahiti |

गेंड्याचे शास्त्रीय नाव ऱ्हाईनोसेरॉस युनिकॉर्नी असे आहे. गेंडा हा शाकाहारी प्राणी आहे. त्याच्या पायाला तीन खुरे असतात. तो आकाराने बराच मोठा प्राणी आहे.

गेंडा हा गवताळ प्रदेश, घनदाट जंगले अशा ठिकाणी राहणे पसंत करतो. तो आकाराने जरी मोठा असला, त्यामधे कितीही ताकद असली तरी सुध्दा तो कोणत्याही प्राण्यांची शिकार करत नाही.

शरीररचना –

गेंड्याची त्वचा ही जाड असते. शरीरावर केस नसतात, त्वचेवर घड्या पडलेल्या दिसतात. त्याचे शरीर मजबूत, डोके आकाराने मोठे, त्यावर एकच शिंग, आखूड पाय, पायाला तीन बोटे, शेपटीच्या टोकाला दाट केस, डोळे लहान अशी त्याची शरीररचना असते.

राहणीमान –

झाडाची पाने, गवत, डहाळ्या हे त्याचे खाद्य असते. शरीराने मजबूत, त्वचा जाड असल्यामुळे  कोणताही अन्य प्राणी त्याची शिकार करू शकत नाही. हा प्राणी आफ्रिका, आशिया किनाऱ्याच्या बेटांवर आढळतो.

गेंड्याचे विविध प्रकार आहेत. ते म्हणजे काळा गेंडा, पांढरा गेंडा, भारतीय गेंडा. काळा गेंडा व पांढरा गेंडा हे दोन प्रकार आफ्रिकेत आढळून येतात. काळा गेंडा हा गवताळ प्रदेशात राहणे पसंत करतो. गेंडा या प्रजातीमधील पांढरा गेंडा हा आकाराने मोठा असतो. काही प्रजातीच्या गेंड्यांना दोन शिंगे असतात.

गेंड्यामध्ये गंध घेण्याची व ऐकण्याची कला विकसित आहे परंतु त्याच्याकडे पाहण्याची कला विकसित नाही. त्याला स्पष्ट दिसत नाही. त्याच्यावर जर कोणी हल्ला केला तर तो शिंगाने त्या हल्ल्याचा प्रतिकार करतो. भूतलावर हत्तीनंतर गेंडा हा सर्वात जाड प्राणी आहे. त्याचे आयुर्मान ४० ते ५० वर्ष इतके असते.

लेखन सौजन्य – प्रिती पवार

तुम्हाला गेंडा मराठी माहिती (Rhino Information in Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचे मत आम्हाला कळवा…

The post गेंडा मराठी माहिती | Rhino Information in Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80/feed/ 0 2862
चित्ता – मराठी माहिती | Leopard Information In Marathi | https://dailymarathinews.com/%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be/ https://dailymarathinews.com/%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be/#respond Tue, 09 Nov 2021 05:21:47 +0000 https://dailymarathinews.com/?p=2831 प्रस्तुत लेख हा चित्ता या प्राण्याविषयी मराठी माहिती आहे. चित्ता प्राण्याचे जीवन, राहणीमान आणि त्याची वैशिष्ट्ये अशा बाबींची चर्चा या

The post चित्ता – मराठी माहिती | Leopard Information In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा चित्ता या प्राण्याविषयी मराठी माहिती (Leopard Information In Marathi) आहे. चित्ता प्राण्याचे जीवन, राहणीमान आणि त्याची वैशिष्ट्ये अशा बाबींची चर्चा या लेखात करण्यात आलेली आहे.

चित्ता माहिती मराठी | Leopard (Cheetah) Marathi Mahiti | Panther Information in Marathi |

चित्ता हा मार्जार कुळातील सस्तन प्राणी आहे. सर्वात वेगाने धावणारा प्राणी म्हणून चित्ता या प्राण्याची ओळख आहे. सर्वसाधारणपणे तो मानवाच्या किमान तिप्पट गतीने पळू शकतो. चित्त्याचे शास्त्रीय नाव ॲकिनोनिक्स जुबेटस (Acinonyx jubatus) असे आहे.

सध्याच्या काळात भारतात चित्ता जास्त संख्येने अस्तित्वात नाही. राजेमहाराजे यांच्या शिकारीच्या छंदामुळे भारतातील चित्ते नामशेष होत गेले. भारतीय चित्त्याला आशियाई चित्ता असे म्हटले जाते.

शरीररचना –

चित्त्याच्या संपूर्ण शरीरावर भरीव काळे ठिपके असतात. त्याच्या फक्त पोटावर आणि पायावर असे भरीव काळे ठिपके आढळत नाहीत. त्याच्या चेहऱ्यावर डोळ्यांच्या खाली रेषा असतात त्या अश्रुसारख्या दिसून येतात. त्याचे शरीर हे लांब सडक असते. त्याची छाती खोल, पाय लवचिक आणि डोके लहान असते.

चित्ता हा मांजरासारखा दिसतो. त्याचा आवाज देखील मांजरासारखाच असतो. त्याचे आयुर्मान १४ ते १५ वर्षे इतके असते. चित्ता हा सर्व जगभरात वेगाचे प्रतिक मानला जात असल्याने ज्या गतिशिल वस्तू किंवा यंत्रे असतील त्यांना चित्त्याची उपमा दिली जाते.

राहणीमान –

चित्ता हा मांसाहारी प्राणी आहे. तो सर्वाधिक हरीण, ससा व झेब्रा या प्राण्यांची शिकार करतो. शिकार करत असताना त्याला वेगाने धावणे गरजेचे असते. त्यावेळी तो ताशी १२० किमी वेगाने धावत असतो. सावज पकडण्यासाठी आणि दिशा बदलण्यासाठी तो शेपटीचा उपयोग करत असतो.

चित्ता गवताळ प्रदेशात किंवा झुडुपात राहणे पसंत करतो. तो उष्ण वातावरणात राहू शकतो. चित्ता हा झाडावर देखील राहू शकतो. नर चित्ता हा एकटा शिकार करत नाही परंतु मादी चित्ता ही एकटी शिकार करते.

चित्ता हा सकाळी लवकर किंवा सायंकाळी शिकार करतो. तो कितीही वेगाने धावत असला तरी देखील तो त्याच्या शिकारीचा एक ते दीड मिनिट पाठलाग करतो आणि शिकार शक्य नसल्यास तो त्या शिकारीचा पाठलाग करत नाही.

तुम्हाला चित्ता प्राण्याविषयी मराठी माहिती (Leopard Information In Marathi) आवडली असल्यास नक्की तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post चित्ता – मराठी माहिती | Leopard Information In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be/feed/ 0 2831
घोडा – मराठी माहिती | Horse Information in Marathi | https://dailymarathinews.com/%e0%a4%98%e0%a5%8b%e0%a4%a1%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80/ https://dailymarathinews.com/%e0%a4%98%e0%a5%8b%e0%a4%a1%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80/#respond Mon, 25 Oct 2021 03:03:30 +0000 https://dailymarathinews.com/?p=2753 प्रस्तुत लेख हा घोडा या प्राण्याविषयी मराठी माहिती आहे. घोड्याची शरीररचना, त्याचे राहणीमान अशा मूलभूत स्वरूपाची माहिती

The post घोडा – मराठी माहिती | Horse Information in Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा घोडा या प्राण्याविषयी मराठी माहिती (Horse Information in Marathi) आहे. घोड्याची शरीररचना, त्याचे राहणीमान अशा मूलभूत स्वरूपाची माहिती या लेखात देण्यात आलेली आहे.

घोडा प्राणी माहिती | Ghoda Marathi Mahiti |

आपण आत्तापर्यंत घोड्यांच्या अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत. प्राचीन इतिहासात त्याची वर्णने वाचलेली आहेत. चित्रपट, मालिका यांमधून सुध्दा घोडा हा प्राणी पाहायला मिळतो.

लहान मुलांना घोडा खूप आवडतो. त्यांच्याकडे घोडा हे खेळणे असतेच. जिवंत घोडा पाहण्यासाठी लहान मुले नेहमीच आतुर असतात. घोड्याची सवारी करणे सर्वजण पसंद करतात. लग्न समारंभ, मिरवणूक अशा प्रसंगी घोड्याचा उपयोग होत असतो.

घोडा हा ईक्विडी कुळातील सस्तन प्राणी आहे. त्याचे शास्त्रीय नाव ईक्वस फेरस कॅबॅलस असे आहे तर इंग्रजीमध्ये त्याला horse (हॉर्स) असे म्हटले जाते.

वाहतूक, पूर्वीच्या काळातील युद्ध, विविध खेळ यासाठी घोड्यांचा वापर केला जात असे. सर्व प्रगत देशांमध्ये फक्त शर्यतीसाठी त्याचा उपयोग करतात. घोडा हा ८ तासात १४०० किमी अंतर धावू शकतो. पूर्वी धावत्या इंजिनवर चालणाऱ्या गाड्या नसताना “घोडागाडी” हा प्रवासासाठी उत्तम प्रकार आपल्याला पाहायला मिळायचा.

घोड्याची शरीररचना –

घोड्यांच्या शरीराची लांबी ही सुमारे ३०० सेमी इतकी असते. त्याचे शेपूट ९० सेमी इतके लांब असते. घोड्याचे वजन सरासरी ३५० कि.ग्रॅ. असते. शरीराच्या मानाने त्याचे डोके हे आकाराने मोठे असते व ते त्याच्या रंगाहून गडद असते. घोड्याचे कान मात्र लहान असतात.

काही घोड्यांचा रंग पांढरा असतो तर काही घोड्यांचा रंग काळा असतो. काही घोडे तपकिरी रंगाचे सुद्धा असतात. त्याच्या अंगावर हिवाळ्यात दाट केस येतात आणि उन्हाळ्यात विरळ होतात. परंतु शेपूट आणि आयाळीतील केस कधीच दाट किंवा विरळ होत नाहीत ते तेवढेच राहतात.

घोडयामध्ये ऐकण्याची व गंध घेण्याची क्षमता चांगली असते. घोडे हे जंगलात असल्यावर कळपाने राहतात. घोडा हा सतर्क प्राणी आहे, त्याचे सतत आजूबाजूला लक्ष असते. त्याच्या कळपातील नर घोडा हा त्या सर्वांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतो.

घोड्याचे राहणीमान –

घोडा हा शाकाहारी प्राणी आहे. तो गवत खातो. घोड्याला हरभरा खायला जास्त आवडतो. घोड्याच्या पिल्लाला शिंगरू असे म्हणतात. दोन वर्ष झाली की शिंगरू त्याच्या आईपासून वेगळे होते. घोडा हा २०‒३० वर्षे जगू शकतो.

घोडा हा प्राणी कष्टाळू स्वभावाचा आहे तसाच तो चपळही आहे. जगातील वेगवेगळ्या हवामानात तो राहू शकतो व गवतात चरून जगू शकतो. त्यामुळे त्याचा उपयोग मानवाला प्राचीन काळापासूनच होत आलेला आहे. अंधारात देखील त्याला दिसते म्हणून कदाचित राजे महाराजे युध्दात आणि प्रवासासाठी घोड्यांचा वापर करत होते.

आधुनिक काळात व्यापारी घोड्यांच्या सहाय्याने मालाची ने – आण करणे, युध्दात घोड्यांचा वापर करणे, मनोरंजनासाठी घोड्यांच्या शर्यतींचे आयोजन करणे यासाठी घोड्यांचा वापर होत असतो.

घोडा का बसत नाही?

प्रत्येक सजीवाकडे एक प्रकारची शरीररचना असते.या रचनेप्रमाणेच प्रत्येक सजीव काम करत असतो. आपण इतर प्राणी म्हणजे कुत्रा, बैल यांना बसताना पाहिले आहे. परंतु घोड्याला कधीही बसताना पाहिलेले नाही, असे का?

त्याचे कारण असे की कुत्रा, बैल हे त्यांचे गुडघे दुमडू शकतात परंतु घोड्याचे पाय दुमडू शकत
नाहीत. त्याला कुत्रा व बैलासारखे पायात दुमडणारे सांधेच नसतात.

लेखन सौजन्य – प्रिती पवार

तुम्हाला घोडा मराठी माहिती (Horse Information in Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post घोडा – मराठी माहिती | Horse Information in Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%98%e0%a5%8b%e0%a4%a1%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80/feed/ 0 2753
कोल्हा – मराठी माहिती | Fox Information in Marathi | https://dailymarathinews.com/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80/ https://dailymarathinews.com/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80/#respond Tue, 19 Oct 2021 07:25:26 +0000 https://dailymarathinews.com/?p=2707 प्रस्तुत लेख हा कोल्हा प्राण्याची मराठी माहिती आहे. या लेखात कोल्ह्याची शरीररचना, त्याचे राहणीमान आणि इतर सामान्य स्वरूपाची माहिती

The post कोल्हा – मराठी माहिती | Fox Information in Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा कोल्हा प्राण्याची मराठी माहिती (Fox Information in Marathi) आहे. या लेखात कोल्ह्याची शरीररचना, त्याचे राहणीमान आणि इतर सामान्य स्वरूपाची माहिती दिलेली आहे.

कोल्हा प्राणी माहिती | Kolha Marathi Mahiti |

आपल्या सर्वांना कोल्हा माहीतच आहे. आपण कोल्ह्याच्या अनेक कथा वाचलेल्या आहेत. त्या कथांमध्ये कोल्हा हा लबाड, धूर्त आणि चतुर म्हणून सर्वांना परिचित आहे.

कोल्हा कॅनिडी कुळामधील प्राणी आहे. कुत्रे, लांडगे, खोकड इ. प्राणी कॅनिडी कुळामध्ये येतात. कोल्ह्याचे शास्त्रीय नाव कॅनिस ऑरियस असे आहे तर इंग्रजीमध्ये त्याला Fox (फॉक्स) असे म्हणतात.

कोल्हा हा कुत्र्यासारखा दिसतो आणि त्याची अंगकाठी देखील तशीच असते. परंतु त्याचे तोंड कुत्र्यापेक्षा बारीक असते. हा शाकाहारी व मांसाहारी प्राणी आहे.

उत्तर आफ्रिकेत आणि पूर्व आफ्रिकेत आढळणार्‍या कोल्ह्याची पाठ ही काळी असते.  कोल्ह्याची कॅनिस अडस्टस ही जात आफ्रिकेत आढळते. यूरोप, आफ्रिका व आशिया खंडांत कोल्हे आढळतात.

भारतामध्ये सर्वत्र कोल्हे आढळतात. हिमालयातील कोल्ह्याचा रंग जास्त पिवळसर असतो. इतरत्र आढळणारे कोल्हे लालसर तांबूस रंगाचे असतात.

कानांवर व पायांवर गडद पिवळा आणि काळपट रंग असतो. त्यांचे लांब पाय आणि तोंडात वळलेले सुळे छोटे दात असतात. तोंडातील सुळ्या दातामुळे सस्तन प्राणी, पक्षी व सरपटणारे प्राणी यांची शिकार करणे सोपे होते.

मोठी पावले आणि पायांतील जुळलेली हाडे   यांच्या साहाय्याने कोल्हा १६ किमी. प्रतितास इतक्या वेगाने धावू शकतो.

कोल्ह्याची शरीररचना –

कोल्ह्याच्या शरीरावर बारीक तांबूस लाल केस असतात. त्याच्या चारही पायांवर नख्या असतात. त्याची शेपटी झुपकेदार, केसाळ आणि आकाराने मोठी असते. त्याचे कान उभे असतात.

कोल्ह्याचे खाद्य –

तो मोठ्या प्राण्यांनी खाल्लेले कुजके मांस  खातो. त्याला शेतातील काकडी, टरबूज, ऊस, द्राक्षे हे देखील खायला आवडते. कोंबड्या व
बदके हे कोल्ह्याचे आवडीचे खाद्य आहे.

कोल्हा खेकड्याची शिकार खूप चतुरपणे करतो. त्याची शेपटी तो खेकड्याच्या बिळात घालतो, आत असलेल्या खेकड्यांना वाटते की हे खाद्य आहे व ते खेकडे त्याची शेपटी पकडतात आणि कोल्हा त्यांची शिकार करतो.

कोल्ह्याचे राहण्याचे ठिकाण –

मोठी बिळे अथवा मोठ्या झाडाच्या ढोलीमध्ये तो राहतो. गावाजवळच्या टेकड्या, माळरान तसेच नदीकाठी राहणे देखील तो पसंत करतो. म्हणजेच शिकार करणे किंवा मोठ्या प्राण्यांपासून वाचण्यासाठी तो अशा विविध ठिकाणी राहत असतो.

कोल्ह्याची विशेषता –

कोल्ह्याची नजर ही तीक्ष्ण असते. तो स्वभावाने चतुर, धूर्त असतो असे म्हटले जाते. तो दिवसा मोठ्या प्राण्यांपासून लपून राहतो व रात्री अन्नाच्या शोधत बाहेर पडतो. तो शोधलेले अन्न नंतर खाण्यासाठी लपवून ठेवतो.

कोल्हा जास्तीत जास्त ३५ ते ३६ मीटर पर्यंतचा आवाज ऐकू शकतो. कोल्हा जंगलात सुमारे तीन वर्षे जगू शकतो, तर काही कोल्हे दहा वर्ष सुद्धा जगतात.

लेखन सौजन्य – प्रिती पवार

तुम्हाला कोल्हा मराठी माहिती (Fox Information in Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post कोल्हा – मराठी माहिती | Fox Information in Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80/feed/ 0 2707
वाघ – मराठी माहिती | Tiger Information In Marathi | https://dailymarathinews.com/tiger-information-in-marathi/ https://dailymarathinews.com/tiger-information-in-marathi/#respond Wed, 13 Oct 2021 10:36:00 +0000 https://dailymarathinews.com/?p=2677 वाघ हा प्राणी अत्यंत क्रूर, शूर आणि धूर्त प्राणी आहे. प्रस्तुत लेखात वाघाबद्दल मराठी माहिती देण्यात आलेली आहे.

The post वाघ – मराठी माहिती | Tiger Information In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
वाघ हा प्राणी अत्यंत क्रूर, शूर आणि धूर्त प्राणी आहे. तो काहीजणांना फक्त दिसण्यावरून आवडतो कारण वाघाचा प्रत्यक्ष सहवास करायला कुठलाच व्यक्ती धजवणार नाही. प्रस्तुत लेखात वाघाबद्दल मराठी माहिती (Tiger Information in Marathi) देण्यात आलेली आहे.

वाघ माहिती मराठीमध्ये | Wagh Marathi Mahiti |

वाघ हा वेगवान, शूर, आकर्षक आणि मांसाहारी वन्य प्राणी आहे. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी म्हणून याची गणना होते.

भारत, बांगलादेश, थायलंड, रशिया, इंडोनेशिया, आणि नेपाळमध्ये बहुतेक वाघ आढळतात. वाघ हा व्याघ्र या संस्कृत शब्दापासून तयार झाला आहे. वाघाचे वैज्ञानिक नाव पँथेरा टायग्रीस तर इंग्रजीमध्ये त्याला Tiger (टायगर) असे म्हणतात.

वाघाच्या एकूण 9 प्रजाती होत्या. त्यापैकी 3 प्रजाती आता पूर्णपणे नामशेष झालेल्या  आहेत. भारतात आढळणार्‍या वाघाची प्रमुख प्रजाती म्हणजे ‘रॉयल ​​बंगाल टायगर’ आहे.

वाघाला ‘धोकादायक’ प्रजाती म्हणून 1986 पासून वर्गीकृत केले गेले आहे. सध्या जगभरात जास्तीत जास्त 3950 वाघ आहेत, त्यापैकी 75% पेक्षा जास्त वाघ फक्त भारतात आढळतात.

पूर्वी वाघाची शिकार करणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जायचे. त्यामुळे सध्या शिकार व वाढती मानवी वसाहत यांमुळे वाघांची संख्या फारच कमी झाली आहे. प्राचीन काळापासून वाघाला ऐतिहासिक महत्त्व आहे. विविध धर्म आणि पंथांमध्ये वाघाचे चिन्ह प्रदर्शित केलेले असते.

जगभरातील विविध देशांत सांस्कृतिक, कला – क्रीडा व धार्मिक कार्यक्रमात वाघाची प्रतिमा प्रतिकात्मक स्वरूपात वापरलेली असते. अनेक संघटनांच्या ध्वजांमध्ये वा चिन्हांमध्ये वाघाचा प्रामुख्याने समावेश असतो.

वाघाची शरीर रचना :

वाघाच्या शरीरावर काळे पट्टे असतात. झुडूपांमध्ये लपून राहण्यास हे काळे पट्टे उपयोगी पडतात, ज्यामुळे शिकार करताना वाघांना मदत होते. त्याचे दात आणि पंजे हे तीक्ष्ण असतात ज्यामुळे शिकार पकडण्यास आणि मांस खाण्यास त्याला मदत होते.

वाघाच्या शरीराचे अंतर्गत भाग जसे की वक्ष आणि पाय पांढऱ्या रंगाचे असतात. वाघ एक रुंद, उंच आणि वजनी प्राणी आहे. वाघाचे वजन 300 किलोग्रॅम पर्यंत असू शकते आणि त्याची उंची 6 – 7 फूट लांब वाढू शकते.

वाघाची जीवनपद्धत –

वाघ हा गवताळ प्रदेशात, ओलसर, ओलांडलेल्या जंगलांमध्ये राहणे पसंत करतात. ते जास्त प्रमाणात तृणभक्षक प्राण्याची शिकार करतात. म्हणून वाघ गवताळ प्रदेशात राहणे पसंत करतो. 

वाघ हा एक पूर्ण मांसाहारी प्राणी आहे व तो सिंहाप्रमाणे इतर शाकाहारी प्राण्यांची शिकार करतो. वाघाची दृष्टी आणि गंध घेण्याची क्षमता चांगली असते. त्यामुळे त्याला शिकार करताना अडचण येत नाही.

वाघ विशेषत: वेग, चपळता, आणि शिकार करण्याची क्षमता यासाठी ओळखला जातो. वाघ हा कितीही वेगाने धावत असला तरी तो फार लांब पळण्यास सक्षम नसतो. म्हणूनच तो अचानक छापे टाकून किंवा चोरी करून  शिकार करतो.

२१व्या शतकात वाघांची संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे वाघांच्या संरक्षणासाठी सरकारी योजना आणि धोरणे तयार केली जातात.

लेखन सौजन्य – प्रिती पवार

तुम्हाला वाघ मराठी माहिती (Tiger Information In Marathi) हा लेख आवडल्यास तुमचे मत नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवा.

The post वाघ – मराठी माहिती | Tiger Information In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/tiger-information-in-marathi/feed/ 0 2677
सिंह मराठी माहिती | Lion Information In Marathi | https://dailymarathinews.com/%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%b9-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80/ https://dailymarathinews.com/%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%b9-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80/#respond Wed, 06 Oct 2021 03:39:53 +0000 https://dailymarathinews.com/?p=2627 प्रस्तुत लेखात सिंहाविषयी मराठी माहिती देण्यात आलेली आहे. सिंहाचे अस्तित्व आणि सिंहाचे राहणीमान अशा सर्व मुद्द्यांची चर्चा

The post सिंह मराठी माहिती | Lion Information In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेखात सिंहाविषयी मराठी माहिती (Lion Information In Marathi) देण्यात आलेली आहे. सिंहाचे अस्तित्व, सिंहाचे वर्णन, आणि सिंहाचे राहणीमान अशा सर्व मुद्द्यांची चर्चा या लेखात करण्यात आलेली आहे.

जंगलाचा राजा – सिंह | Sinh Marathi Mahiti |

लहानपणापासून आपण विविध प्राण्यांच्या कथा वाचत आलेलो आहोत. त्यामध्ये सर्वात भीतीदायक प्राणी कोणता वाटला असेल तर तो म्हणजे सिंह!

स्वतःला वाटेल तेव्हा शिकार करणे, कोणालाही न घाबरणे, ऐटीत चालणे, आणि स्वतःच्या वनक्षेत्रात परकीय प्राण्याचे आक्रमण होऊ न देणे, अशा काही गुणांमुळे त्याला जंगलाचा राजा म्हटले जाते.

सिंह हा जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो.  सिंहाचे अस्तित्त्व पूर्वीपासूनच आहे. सिंहाचे शास्त्रीय नाव पँथेरा लिओ असे आहे. इंग्लिशमध्ये त्याला Lion (लायन) असे म्हटले जाते.

सिंहाला पोहता सुध्दा येते. सिंह हा मांसाहारी प्राणी आहे. तो शाकाहारी प्राण्याची शिकार करतो. विशेष म्हणजे सिंह हा रात्रीच्या अंधारात शिकार करतो. विशेष म्हणजे जास्तीत जास्त शिकार सिंहिनी करतात.

सिंहाचे एकूण चार प्रकार पडतात. आफ्रिकी सिंह, आशियाई सिंह, युरोपियन सिंह आणि बरबेरी सिंह!

सिंहाची शरीररचना –

• सिंहाचा रंग करडा – तांबडा असतो. नर सिंहाला आयाळ असते तर मादी सिंहाला आयाळ नसते. सिंह हा १५० ते २५० किलो वजनाचा असतो.

• सिंहाला चार पाय, आयाळ, अणकुचीदार दात, आणि एक शेपटी असते.

• सिंहाच्या तोंडात अणकुचीदर दात असतात आणि पायाच्या पंजालासुद्धा तीक्ष्ण नखे असतात, ज्यामुळे केलेली शिकार त्यांना घट्ट पकडता येते.

• सिंहाच्या आवाजाला गुरगुरणे म्हणतात तर त्याच्या आक्रोशपूर्ण आवाजाला डरकाळी असे म्हणतात.

तुम्हाला सिंह मराठी माहिती (Lion Information In Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा…

लेखन सौजन्य – प्रीती पवार (सातारा)

The post सिंह मराठी माहिती | Lion Information In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%b9-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80/feed/ 0 2627