कोल्हा – मराठी माहिती | Fox Information in Marathi |

प्रस्तुत लेख हा कोल्हा प्राण्याची मराठी माहिती (Fox Information in Marathi) आहे. या लेखात कोल्ह्याची शरीररचना, त्याचे राहणीमान आणि इतर सामान्य स्वरूपाची माहिती दिलेली आहे.

कोल्हा प्राणी माहिती | Kolha Marathi Mahiti |

आपल्या सर्वांना कोल्हा माहीतच आहे. आपण कोल्ह्याच्या अनेक कथा वाचलेल्या आहेत. त्या कथांमध्ये कोल्हा हा लबाड, धूर्त आणि चतुर म्हणून सर्वांना परिचित आहे.

कोल्हा कॅनिडी कुळामधील प्राणी आहे. कुत्रे, लांडगे, खोकड इ. प्राणी कॅनिडी कुळामध्ये येतात. कोल्ह्याचे शास्त्रीय नाव कॅनिस ऑरियस असे आहे तर इंग्रजीमध्ये त्याला Fox (फॉक्स) असे म्हणतात.

कोल्हा हा कुत्र्यासारखा दिसतो आणि त्याची अंगकाठी देखील तशीच असते. परंतु त्याचे तोंड कुत्र्यापेक्षा बारीक असते. हा शाकाहारी व मांसाहारी प्राणी आहे.

उत्तर आफ्रिकेत आणि पूर्व आफ्रिकेत आढळणार्‍या कोल्ह्याची पाठ ही काळी असते.  कोल्ह्याची कॅनिस अडस्टस ही जात आफ्रिकेत आढळते. यूरोप, आफ्रिका व आशिया खंडांत कोल्हे आढळतात.

भारतामध्ये सर्वत्र कोल्हे आढळतात. हिमालयातील कोल्ह्याचा रंग जास्त पिवळसर असतो. इतरत्र आढळणारे कोल्हे लालसर तांबूस रंगाचे असतात.

कानांवर व पायांवर गडद पिवळा आणि काळपट रंग असतो. त्यांचे लांब पाय आणि तोंडात वळलेले सुळे छोटे दात असतात. तोंडातील सुळ्या दातामुळे सस्तन प्राणी, पक्षी व सरपटणारे प्राणी यांची शिकार करणे सोपे होते.

मोठी पावले आणि पायांतील जुळलेली हाडे   यांच्या साहाय्याने कोल्हा १६ किमी. प्रतितास इतक्या वेगाने धावू शकतो.

कोल्ह्याची शरीररचना –

कोल्ह्याच्या शरीरावर बारीक तांबूस लाल केस असतात. त्याच्या चारही पायांवर नख्या असतात. त्याची शेपटी झुपकेदार, केसाळ आणि आकाराने मोठी असते. त्याचे कान उभे असतात.

कोल्ह्याचे खाद्य –

तो मोठ्या प्राण्यांनी खाल्लेले कुजके मांस  खातो. त्याला शेतातील काकडी, टरबूज, ऊस, द्राक्षे हे देखील खायला आवडते. कोंबड्या व
बदके हे कोल्ह्याचे आवडीचे खाद्य आहे.

कोल्हा खेकड्याची शिकार खूप चतुरपणे करतो. त्याची शेपटी तो खेकड्याच्या बिळात घालतो, आत असलेल्या खेकड्यांना वाटते की हे खाद्य आहे व ते खेकडे त्याची शेपटी पकडतात आणि कोल्हा त्यांची शिकार करतो.

कोल्ह्याचे राहण्याचे ठिकाण –

मोठी बिळे अथवा मोठ्या झाडाच्या ढोलीमध्ये तो राहतो. गावाजवळच्या टेकड्या, माळरान तसेच नदीकाठी राहणे देखील तो पसंत करतो. म्हणजेच शिकार करणे किंवा मोठ्या प्राण्यांपासून वाचण्यासाठी तो अशा विविध ठिकाणी राहत असतो.

कोल्ह्याची विशेषता –

कोल्ह्याची नजर ही तीक्ष्ण असते. तो स्वभावाने चतुर, धूर्त असतो असे म्हटले जाते. तो दिवसा मोठ्या प्राण्यांपासून लपून राहतो व रात्री अन्नाच्या शोधत बाहेर पडतो. तो शोधलेले अन्न नंतर खाण्यासाठी लपवून ठेवतो.

कोल्हा जास्तीत जास्त ३५ ते ३६ मीटर पर्यंतचा आवाज ऐकू शकतो. कोल्हा जंगलात सुमारे तीन वर्षे जगू शकतो, तर काही कोल्हे दहा वर्ष सुद्धा जगतात.

लेखन सौजन्य – प्रिती पवार

तुम्हाला कोल्हा मराठी माहिती (Fox Information in Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment