कृषी व व्यवसाय - Daily Marathi News https://dailymarathinews.com Sat, 25 Mar 2023 09:19:13 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 कृषी व व्यवसाय - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 शेतातील तण व्यवस्थापन _ https://dailymarathinews.com/in-situ-management-_/ https://dailymarathinews.com/in-situ-management-_/#respond Sat, 25 Mar 2023 08:34:23 +0000 https://dailymarathinews.com/?p=5665 तण म्हणजे अशी कोणतीही वनस्पती जी अनावश्यकरित्या उगवत असते. तणाची वाढ ही नेहमीच जोमदार होत असते.

The post शेतातील तण व्यवस्थापन _ appeared first on Daily Marathi News.

]]>
• शेती ही आपल्याला अत्यंत काळजीपूर्वक करावी लागते. शेतीतील सर्व कामे ही आपल्या समजुतीने आणि स्वकष्टाने करावी लागतात. त्यामधील तण व्यवस्थापन हा प्रश्न शेतकऱ्यांना नेहमीच भेडसावत असतो.

• तण म्हणजे अशी कोणतीही वनस्पती जी अनावश्यकरित्या उगवत असते. तणाची वाढ ही नेहमीच जोमदार होत असते. शेतातील पिकासोबत आणि शेताच्या भोवती तण वाढीस लागत असते.

• तणाची वाढ झाल्याने पिकांना मात्र नुकसान होत असते. पिकांची वाढ हवी तशी होत नाही. शेतातील पोषकतत्त्वे तणांना देखील प्राप्त होतात आणि तण वाढीस लागते. आता तण व्यवस्थापन कसे करायचे हा मुद्दा शेतकऱ्यांसमोर उभा राहतो.

• तण वाढल्यास पिकांना कीड लागण्याची शक्यता वाढते. शिवाय, जेव्हा तुमचे पीक तणांनी वेढलेले असते, तेव्हा त्यांची कापणी करणे खरोखर कठीण असते.

तण व्यवस्थापन – गरज

शेतकरी बियाणे पेरण्यापूर्वी आणि शेतात रोपे लावण्यापूर्वी बरीच खबरदारी घेतात. यापैकी काही तंत्रांमध्ये सहसा शेतात पालापाचोळा घालणे, तण काढून टाकल्यानंतर जमीन योग्यरित्या नांगरणे आणि मशागत करणे आणि तणांच्या वाढीस अडथळा आणणारी तणनाशके शिंपडणे यांचा समावेश होतो.

अशी खबरदारी घेतल्यानंतरही तण वाढणे शक्य आहे. मात्र, तणनाशक किंवा तणांच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तणनाशक काळजीपूर्वक लागू न केल्यास पिकाचे किंवा झाडाचे नुकसान होऊ शकते.

बर्‍याच रसायनांप्रमाणे, तणनाशके जेव्हा निष्काळजीपणाने वापरली जातात तेव्हा ते हवा, पाणी आणि माती प्रदूषणात योगदान देतात. श्वास घेतल्यास किंवा खाल्ल्यास ते मानव आणि पाळीव प्राणी दोघांच्याही आरोग्यास धोका निर्माण करतात.

तण व्यवस्थापनाचे नैसर्गिक आणि सेंद्रिय मार्ग

१) मल्चिंग – पालापाचोळा हा तणांची वाढ कमी करण्यासाठी, जमिनीची सुपीकता सुधारण्यासाठी आणि जमिनीतील ओलावा संवर्धनासाठी जमिनीच्या पृष्ठभागावर लावलेल्या सामग्रीचा एक थर आहे. पालापाचोळा असल्याने तणाची वाढ होत नाही.

२) हाताने तण काढणे – जर तुम्हाला लहान जमिनीत किंवा तुमच्या मागच्या बागेत तणांची वाढ दिसली आणि तणांची वाढ आणि तुमची रोपे यांच्यात फरक कसा करायचा हे तुम्हाला माहीत असेल, तर हाताने खेचून तण काढून टाका. तण तुमच्या बागेत परत येणार नाही याची खात्री करण्यासाठी ते मुळांद्वारे बाहेर काढा.

३) कॉर्नमील किंवा पोलेंटाचा थर लावा – तण बियांचा प्रसार आणि उगवण थांबवण्यासाठी तुमच्या रोपाच्या पायावर कॉर्नमील किंवा पोलेंटाचा उदार थर लावा.

४) सोलरिंग – उन्हाळ्यात तुमच्या बागेत तणांची जोमदार वाढ होत असेल तर तुम्ही ती नियंत्रित करू शकता तेही तणवाढ सौरीकरण प्रक्रियेद्वारे. उन्हाळ्याच्या वाढीच्या काळात, प्रभावित भागात एक स्पष्ट पातळ प्लास्टिकची शीट ठेवा.

प्लॅस्टिक 4 ते 6 आठवडे जागेवर ठेवा. या वेळी, सूर्य माती गरम करेल आणि तणांची मुळे आणि बिया नष्ट करेल. रोग आणि कीटकांपासून मुक्त होण्यासाठी सौरीकरण प्रक्रियेचा वापर केला जातो. तथापि, ते मातीमध्ये उपस्थित असलेल्या फायदेशीर जीवांना देखील नष्ट करू शकते.

५) व्हिनेगर – एक स्प्रे बाटली घ्या आणि त्यात एक चतुर्थांश व्हिनेगर आणि उर्वरित बाटली पाण्याने भरा. फवारणीच्या बाटलीचे नोझल तणाच्या दिशेने निर्देशित करा, त्याच वेळी जवळच्या रोपाचे संरक्षण करा. व्हिनेगर लावा आणि त्याची जादू करू द्या. विशेषत: वारे वाहत असल्यास, जवळच्या झाडांना दूषित होऊ नये म्हणून स्प्रे बाटलीऐवजी ब्रश वापरा.

तुम्हाला शेतातील तण व्यवस्थापन हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post शेतातील तण व्यवस्थापन _ appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/in-situ-management-_/feed/ 0 5665
प्रधानमंत्री मुद्रा योजना – मराठी माहिती | PMMY Information in Marathi https://dailymarathinews.com/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%a8/ https://dailymarathinews.com/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%a8/#respond Fri, 10 Dec 2021 06:59:16 +0000 https://dailymarathinews.com/?p=2931 प्रस्तुत लेख हा प्रधानमंत्री मुद्रा योजनेबद्दल मराठी माहिती देणारा लेख आहे. या लेखात मुद्रा योजेनेचे फायदे, पात्रता आणि मुद्रा कर्ज देणाऱ्या बँका यांबद्दल

The post प्रधानमंत्री मुद्रा योजना – मराठी माहिती | PMMY Information in Marathi appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा प्रधानमंत्री मुद्रा योजनेबद्दल मराठी माहिती (PMMY Mudra Loan Information in Marathi) देणारा लेख आहे. या लेखात मुद्रा योजेनेचे फायदे, पात्रता आणि मुद्रा कर्ज देणाऱ्या बँका या बाबींची माहिती देण्यात आलेली आहे.

प्रधानमंत्री मुद्रा योजना म्हणजे काय – What is Mudra Yojana in Marathi

भारतात उद्योग व्यवसाय वाढवण्यासाठी आणि स्वयंरोजगार निर्मिती होण्यासाठी केंद्र सरकारकडून लघु आणि मध्यम प्रकारच्या उद्योगांसाठी प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत कर्ज दिले जाते.

मुद्रा कर्ज देताना व्यवसायाचा प्रकार आणि त्याची भविष्यातील संधी पाहिली जाते. कमीत कमी पन्नास हजार ते १० लाख रुपये पर्यंत या कर्जाचा लाभ होऊ शकतो. मुद्रा योजनेचे विस्तृत नाव मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट रिफायनान्स एजन्सी असे आहे.

Mudra – Micro Units Development Refinance Agency

मुद्रा कर्ज योजना भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाद्वारे चालवली जाते. ही योजना एप्रिल 2015 मध्ये सुरू करण्यात आली. यामध्ये लघु आणि मध्यम प्रकारच्या व्यवसायांच्या विस्तारासाठी किंवा नवीन उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाते.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा उद्देश –

• जास्तीत जास्त स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे.

• ज्या व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी जास्त रक्कमेची गरज असेल त्यांना ते कर्जस्वरुपात उपलब्ध करून देणे.

मुद्रा योजनेचे फायदे – Benefits of Mudra Yojana in Marathi

मुद्रा कर्ज मिळवण्यासाठी फार कमी कागदपत्रांची आवश्यकता असते. म्हणजेच कर्जासाठी आवश्यक असलेली पात्रता अगदी प्राथमिक स्वरूपाची आहे.

व्यावसायिक स्वतःचा व्यवसाय वाढवू शकतात.

व्यवसायाची सुरुवात करणाऱ्या नवीन व्यावसायिकांना कर्ज मिळाल्याने ते स्वतःच्या कौशल्यात वाढ करून स्वयंरोजगार निर्मिती करू शकतात.

कोणतेही तारण न ठेवता नवीन अथवा जुन्या व्यावसायिकांना 50 हजार ते दहा लाख रुपये पर्यंत कर्ज मिळू शकते. कर्जमंजुरी झाल्यानंतर कोणतेही प्रक्रिया शुल्क भरावे लागत नाही.

मुद्रा कर्ज योजनेची पात्रता –

लाभार्थी हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.

व्यवसाय सुरू करायचा आहे की अगोदरचा व्यवसाय वाढवायचा आहे, हे नमूद असणे आवश्यक आहे.

तुमचा व्यवसाय शेती संबंधित नसावा.

व्यवसायासाठी मिळणारी रक्कम 10 लाख रुपये पर्यंत आहे.

कर्ज लाभार्थी ही कॉर्पोरेट संस्था नसली पाहिजे.

मुद्रा योजनेसाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील सर्व उद्योग पात्र ठरतात.

मुद्रा योजने अंतर्गत मिळालेली रक्कम ही
व्यावसायिक गरजांसाठीच वापरावी लागेल.

मुद्रा कर्ज देणाऱ्या बँका –

ICICI बँक
बँक ऑफ महाराष्ट्र
स्टेट बँक ऑफ इंडिया
कोटक महिंद्रा बँक
बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ बडोदा
आय डी बी आय बँक
एचडीएफसी बँक
कॉर्पोरेशन बँक
युनियन बँक ऑफ इंडिया
j&k बँक
पंजाब आणि सिंध बँक
आंध्र बँक
देना बँक
सिंडिकेट बँक
पंजाब नॅशनल बँक
तमिळनाडू मर्सेटाइल बँक
ऍक्सिस बँक
कॅनरा बँक
इंडियन ओव्हरसीज बँक
ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
फेडरल बँक
कर्नाटक बँक
भारतीय बँक
अलाहाबाद बँक
सारस्वत बँक
UCO बँक
सेंट्रल बँक ऑफ इंडिया

तुम्हाला प्रधानमंत्री मुद्रा योजनेबद्दल मराठी माहिती (PMMY Mudra Loan Information in Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post प्रधानमंत्री मुद्रा योजना – मराठी माहिती | PMMY Information in Marathi appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%a8/feed/ 0 2931
काजू – संपूर्ण माहिती | Cashew Information in Marathi https://dailymarathinews.com/cashew-information-in-marathi/ https://dailymarathinews.com/cashew-information-in-marathi/#respond Sat, 31 Jul 2021 00:09:18 +0000 https://dailymarathinews.com/?p=2415 “काजू – बदाम खा.. काहीतरी अक्कल येईल!” असे वाक्य आपण सतत ऐकत आलेलो आहोत. त्यामधील काजू बी हा अत्यंत पौष्टिक असा सुका मेवा आहे. प्रस्तुत ...

Read moreकाजू – संपूर्ण माहिती | Cashew Information in Marathi

The post काजू – संपूर्ण माहिती | Cashew Information in Marathi appeared first on Daily Marathi News.

]]>
“काजू – बदाम खा.. काहीतरी अक्कल येईल!” असे वाक्य आपण सतत ऐकत आलेलो आहोत. त्यामधील काजू बी हा अत्यंत पौष्टिक असा सुका मेवा आहे. प्रस्तुत लेखात काजू झाड आणि काजू फळाविषयी संपूर्ण माहिती (Cashew Information in Marathi) देण्यात आलेली आहे.

काजू फळ – मराठी माहिती | Kaju Marathi Mahiti |

काजूच्या फळाचा उपयोग सर्व प्रचलित आहे. काजूचे फळ (बोंडू किंवा जांबू) आणि काजू बी अशा दोन प्रकारे आपण काजू ग्रहण करू शकतो. काजू हे एक फळझाड आहे. काजू फळाला “विलायती मॅंगो” असे देखील संबोधले जाते.

महाराष्ट्रात कोकणात काजूचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. काजू हे निर्याती फळ आहे. काजूला भारतात आणि परदेशात खूप मागणी आहे.

संपूर्ण जगभरात भारत जवळजवळ ६० टक्के काजू निर्यात करतो. काजूचे उपयोग आणि महत्त्व ओळखता भविष्यात काजूची निर्यात वाढणार आहे.

काजू फळाला हिंदीमध्ये “हिज्जली बदाम”, कन्नडमध्ये “गेरू”, मल्याळममध्ये “कचुमाक” आणि तेलुगूमध्ये “जीडिमा मिडि” असे संबोधले जाते.

काजूच्या फळापासून विविध प्रकारचे मद्य आणि रस तयार करता येतात. ज्यामध्ये गोव्यातील “काजू फेणी” अत्यंत प्रसिद्ध आहे. गोवा देखील काजू उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.

काजूगरांना उष्णता दिल्याने कवच वेगळे होते आणि आपल्याला काजू बी मिळते. काजूचे बी भाजून साल वेगळी केल्यास आपल्याला खाण्यायोग्य काजू मिळतो.

काजूचे अन्य उपयोग – Other Uses Of Cashew Nuts

काजूपासून काजू-तेल सुद्धा मिळते. सौंदर्यप्रसाधनांत हे तेल उपयुक्त आहे. काजूतेल देखील भारतातून निर्यात केले जाते.

काजू हा सुका मेवा म्हणून ग्रहण करत असल्याने त्याचा लाडू, शिरा, पुलाव इत्यादी पाककृतींमध्ये समावेश असतो तसेच “काजूकरी” ही हॉटेल अथवा धाबा यामध्ये एक उत्तम डिश आहे.

सर्व मिठाई प्रकारांत आपण काजूचा वापर करू शकतो. विशेषकरून काजूचे काजूबर्फी आणि काजूकतली हे अन्य मिठाई प्रकार आहेत तसेच खारे काजू देखील अत्यंत आवडीने खाल्ले जातात.

काजू खाण्याचे फायदे – Benefits of Cashew In Marathi |

• कॅल्शिअम, स्निग्ध पदार्थ, खनिजे, फॉस्फरस, कर्बोदके आणि प्रोटीन्सचा उत्तम स्रोत म्हणून काजुला ओळखले जाते.

• बोंडूमध्ये (काजु फळ) फायबर विपुल प्रमाणात असते. बोंडूमुळे पोट साफ होण्यास मदत होते.

• काजू हृदयरोग आणि मधुमेह टाळण्यासाठी सहाय्यक आहे.

• काजू नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

• काजू हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे.

• काजूच्या प्रति १०० ग्रॅमला ५९० कॅलरीज एवढी ऊर्जा मिळते.

काजू झाड माहिती | Cashew Tree Information In Marathi |

काजू हे आम्र कुलातील झाड असून त्याचे शास्त्रीय नाव अ‍ॅनाकार्डियम ऑक्सिडेंटेल आहे.

काजूचे झाड मूलतः अमेरिकेतील आहे, अशी मान्यता आहे. पोर्तुगिज लोकांनी ते भारतात आणले. तसेच काजू हा शब्द देखील पोर्तुगिज आहे आणि सध्या तेच नाव मराठीत सुद्धा आरूढ झाल्याचे पाहायला मिळते.

काजूचे झाड आखूड आणि जाड असते. या झाडाचा विस्तार जास्त असतो. पाने मोठी आणि अंडाकृती असतात.

काजूच्या फळाचे बोंडू आणि काजूगर असे दोन भाग असतात. बोंडू हे पिवळ्या रंगाचे फुगीर आणि रसाळ फळ असते.

काजू फळाबद्दल संपूर्ण माहिती (Cashew Information in Marathi) वाचल्यानंतर नक्कीच तुमची काजूविषयी आणखी जिज्ञासा वाढली असेल. तर नक्कीच काजू विकत घ्या, सुके आहेत तसे खा किंवा त्याच्या विविध रेसिपीज बनवा… धन्यवाद!

The post काजू – संपूर्ण माहिती | Cashew Information in Marathi appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/cashew-information-in-marathi/feed/ 0 2415
कोळपणी म्हणजे काय? Kolapani Information In Marathi | https://dailymarathinews.com/kolapani-information-in-marathi/ https://dailymarathinews.com/kolapani-information-in-marathi/#comments Tue, 06 Jul 2021 16:22:00 +0000 https://dailymarathinews.com/?p=2375 प्रस्तुत लेखात कोळपणी या शेती निगडित कामाविषयी माहिती (Kolapani Information In Marathi) देण्यात आलेली आहे. तसेच कोळपणी कशी केली जाते आणि त्यासाठी वापरण्यात येणारे कोळपे ...

Read moreकोळपणी म्हणजे काय? Kolapani Information In Marathi |

The post कोळपणी म्हणजे काय? Kolapani Information In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेखात कोळपणी या शेती निगडित कामाविषयी माहिती (Kolapani Information In Marathi) देण्यात आलेली आहे. तसेच कोळपणी कशी केली जाते आणि त्यासाठी वापरण्यात येणारे कोळपे या अवजाराविषयी सांगण्यात आलेले आहे.

कोळपणी – मराठी माहिती | Kolapani Marathi Mahiti |

• कोळपणी हे काम शेतीतील तण नियंत्रणासाठी केले जाते. शेतातील तण नियंत्रण जर झाले तर पीक उत्पन्नात वाढ होते.

• कोळपणी करण्यासाठी कोळपे हे यंत्र (अवजार) अत्यावश्यक आहे. कोळप्याचा वापर करून तुम्ही शेतातील तण लहान असतानाच काढू शकता.

• पेरणी केल्यानंतर तीन, सहा आणि नऊ आठवड्यांनी शेतात कोळपणी केली जाते. तण वाढ ही पिकांपेक्षा जास्त असते. त्यामुळे त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांना मुळासकट शेतातून दूर करणे आवश्यक असते.

• कोळपणी केल्याने पिकांची वाढ अत्यंत जोमात होते. त्यामुळे नांगरणी, पेरणी प्रमाणेच कोळपणीला देखील शेतीत अत्यंत महत्त्वाचे काम मानले गेले आहे.

• पेरणी झाल्यानंतर काही दिवसांत पावसाचे वातावरण नियंत्रणात आले की कोळपणी सुरू केली जाते. बैलांच्या साहाय्याने कोळपणी शक्य नसल्यास हात कोळपे वापरून कोळपणी केली जाते.

• कोळपणी ही एक प्रकारची आंतर मशागत आहे ज्याद्वारे अत्यंत कलापूर्ण पद्धतीत शेतातील तण काढले जाते.

• ग्रामीण भागात पेरणी झाल्यानंतर कोळपणीचे काम अत्यंत लगबगीने केले जाते कारण पाऊस उघडला की अत्यंत कमी वेळात हे काम उरकून घ्यावे लागते.

कोळपे मराठी माहिती | Kolape Information In Marathi |

पिकांतील आंतर मशागतीसाठी एक चाक आणि त्यासोबत मजबूत धारदार पाते अशी संरचना असलेले यंत्र म्हणजे कोळपे. कोळप्याच्या नियंत्रणासाठी आणि चालवण्यासाठी त्याला धरायला दोन दांडे असतात.

दोन्ही दांड्यांना धरून स्वतःच्या ताकतीवर त्याला शेतात चालवायचे असते जेणेकरून गवत आणि तण मुळासकट उपटून बाहेर येऊ शकेल.

कोळपणीसाठी आपण बैलांचा उपयोग देखील करू शकतो. बैलांना आपण कोळपणी अवजारे जोडून कोळपणी पूर्ण करू शकतो.

ग्रामीण भागातील लोक कोळपणी खूप व्यवस्थितरित्या पार पाडतात. पिके लहान असल्याने काळजीपूर्वक कोळपणी करावी लागते.

कोळप्याचे प्रकार – Kolapyache Prakar

ग्रामीण भागात कोळप्याचे अनेक प्रकार पाहायला मिळतात ते खालीलप्रमाणे…..
• मोगी एकचाकी कोळपे
• अखंड फासेचे कोळपे.
• फटीचे कोळपे
• अकोला कोळपे

शेतातील पिकांच्या रचनेनुसार आणि पेरणी प्रकारानुसार कोळपणीसाठी योग्य प्रकारचे कोळपे वापरले जाते ज्यानुसार सर्वात उपयुक्त कोळपणी होऊ शकेल.

तुम्हाला कोळपणी मराठी माहिती (Kolapani Information In Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post कोळपणी म्हणजे काय? Kolapani Information In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/kolapani-information-in-marathi/feed/ 1 2375
सेंद्रिय शेती संपूर्ण माहिती | Organic Farming Information in Marathi | https://dailymarathinews.com/organic-farming-information-in-marathi/ https://dailymarathinews.com/organic-farming-information-in-marathi/#respond Fri, 04 Jun 2021 16:05:25 +0000 https://dailymarathinews.com/?p=2309 प्रस्तुत लेखात सेंद्रिय शेती संपूर्ण माहिती (Organic Farming Information in Marathi) देण्यात आलेली आहे. त्यामध्ये सेंद्रिय शेती कशी करावी, तिची वैशिष्ट्ये, सेंद्रिय खत प्रकार अशा ...

Read moreसेंद्रिय शेती संपूर्ण माहिती | Organic Farming Information in Marathi |

The post सेंद्रिय शेती संपूर्ण माहिती | Organic Farming Information in Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेखात सेंद्रिय शेती संपूर्ण माहिती (Organic Farming Information in Marathi) देण्यात आलेली आहे. त्यामध्ये सेंद्रिय शेती कशी करावी, तिची वैशिष्ट्ये, सेंद्रिय खत प्रकार अशा विविध निगडित मुद्द्यांची आणि प्रश्नांची चर्चा करण्यात आलेली आहे.

भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतात पारंपारिक आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारची शेती केली जाते. शेतीला सहाय्यक असे कृषी तंत्रज्ञान देखील सध्या विकसित झालेले आहे. विविध अवजारे आणि शेती कामांच्या निगडित यंत्रे तयार करण्यात आलेली आहेत.

अशा सर्व तंत्रज्ञान विकासामुळे शेतीला आता आधुनिक महत्त्व प्राप्त झाले आहे. परंतु झालेल्या विकासात आपल्याला फायदे आणि तोटे पाहिले पाहिजेत ज्याद्वारे शेत जमिनीचा कस कमी होणार नाही.

भारतात सध्या कृषी विद्यापीठे उभारण्यात आलेली आहेत. शेतीचे योग्य व्यवस्थापन करून शेती उद्योग अगदी सोयीस्कर करण्यात आला आहे. खत – बियाणे निर्मिती आणि पोषक बियाणांचा दर्जा सुधारून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जात आहेत.

बियाणांना पोषक आणि योग्य अशी खत निर्मिती प्रकल्प देखील उभारले जात आहेत. खतनिर्मिती प्रक्रियेत रासायनिक आणि सेंद्रिय असे प्रकार उपलब्ध आहेत.

दोन्हीं पैकी शेतीसाठी योग्य खत कोणते? सध्या शेतकरी बांधव कोणत्या खतांना जास्त प्राधान्य देतात? तसेच भविष्यातील खत वापराचे निकष कसे असू शकतील? याचा सारासार विचार करून सेंद्रिय शेती सध्या कशी काय फायदेशीर ठरू शकते, याचे संपूर्ण विश्लेषण देखील करण्यात आलेले आहे.

सेंद्रिय शेती संपूर्ण माहिती | Organic Farming Marathi Mahiti |

या संपूर्ण लेखात आपल्याला विविध प्रश्नांची चर्चा करावी लागेल ज्याद्वारे आपल्याला सेंद्रिय शेतीबद्दल सर्व माहिती मिळू शकेल.

सेंद्रिय शेती का करावी?

आजच्या लोकसंख्या वाढीमुळे मानवाला प्राथमिक गरजा भागवण्यासाठी निसर्गावर आक्रमण करावे लागले आहे. नैसर्गिक संपत्तीचा नाश करून सर्वत्र काँक्रिट आणि औद्योगीकरण करण्यात आलेले आहे.

त्यामुळे प्रामुख्याने प्रदूषण, जमिनीची धूप, जागतिक तापमानवाढ अशा भीषण समस्या जाणवू लागल्या आहेत. शेतीवरही त्याचा परिणाम जाणवू लागला आहे.

जमिनीचा कस व पोषणमूल्ये वृक्षतोडीमुळे कमी झालेली आहेत. झाडांची पाने आणि मुळे यांचे नैसर्गिकरित्या जमिनीला मिळणारे सानिध्य व पोषण वृक्षतोडीमुळे कमी झाले आहे.

मागील काही दशकांत शेतीतून भरपूर उत्पन्नासाठी रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. त्यामुळे उत्पन्न तर वाढले परंतु धान्याचे अन्नघटक कमी होऊ लागले. शेत पिकांची, भाज्यांची, फळांची चव बदलू लागली आहे.

अन्नातील अशा पोषणमूल्यांच्या कमतरतेमुळे मानवी आरोग्य देखील धोक्यात येऊ लागले आहे. शरीराची रोग प्रतिकारक शक्ती कमी होऊ लागली आहे.

वरील सर्व परिणामांचा विचार करता सध्या पारंपारिक शेती व्यवस्थेकडे कल दाखवणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे योग्य सेंद्रिय खतांचा वापर करून शेती करणे हेच आपले उद्दिष्ट असले पाहिजे तरच आपण परंपरागत शेतीव्यवस्था आणि पर्यावरण टिकवू शकू.

सेंद्रीय शेतीची मुख्य वैशिष्‍ट्ये कोणती?

• मातीचे संवर्धन –

आपल्याला जगण्यासाठी मिळणारे अन्न हे जमिनीतून मिळत असते. त्यासाठी जमिनीची माती सुपीक असणे गरजेचे ठरते. भारतात पूर्वीपासून जमीन सुपीक आणि संवर्धित आहे कारण येथे पारंपारिक पद्धतीची शेती केली जात आहे.

जर आपण सेंद्रिय शेती करत असू तर मातीचे संवर्धन पूर्वी प्रमाणेच यापुढेही होत राहील आणि जमिनीतील सर्व अन्नद्रव्ये तशीच टिकून राहतील. त्यामुळे मातीचे संवर्धन हे सेंद्रिय शेतीचे सर्वात प्रमुख वैशिष्ट्य म्हणता येईल.

• नैसर्गिक अनुकूलता –

सेंद्रिय शेतीमुळे निसर्गात अनुकूलता निर्माण होते. जल आणि माती संवर्धन होते. नैसर्गिक समतोल टिकून राहतो. जैव विविधतेचा विनाश होत नाही. गुरे – जनावरे यांची संख्या वाढते. तसेच त्यांचे पोषण केल्याने आपल्याला जमिनीस खत देखील मिळते.

• पिकाची पोषकता –

रासायनिक शेतीने पिकाच्या वजनात फरक पडतो पण पोषणमूल्ये मात्र कमी होत जातात. अशा पद्धतीचे शेतीचे होणारे नुकसान सेंद्रिय शेतीने होत नाही. पिकांची पोषकता आणि जमिनीची गुणवत्ता टिकून राहते. त्यामुळे पोषक अन्न निर्मिती तर होतेच शिवाय मानवी आरोग्य टिकून राहण्यास मदत होते.

सेंद्रिय शेती कशी करावी? How to do an Organic Farming

• तापमानाचे व्यवस्थापन –

जमीन सतत नांगरणे टाळावे. जमीन हिरव्या गवताखाली असणे आवश्यक आहे. नैसर्गिक विपुलता जसे की झाडे, पाणी असणे गरजेचे आहे. असे केल्याने जमिनीचे तापमान व्यवस्थित राखले जाते. जमीन जास्त कसावी लागत नाही आणि उत्पन्न ही भरघोस मिळते.

• माती आणि जल संवर्धन –

मातीचे होणारे नुकसान थांबवण्यासाठी तिचे संवर्धन करणे आवश्यक आहे. त्यासाठी बांधावरून छोट्या उंचीची झाडे लावणे आणि जमीन वर्षातून ४ महिने तरी विनापीक ठेवणे गरजेचे आहे.

जलसंवर्धन म्हणजे पाऊसाचे पाणी साठवून ठेवणे, त्या पाण्याला जमिनीत मुरवणे आणि पाण्याचा उपयोग योग्यरीतीने करणे. त्यासाठी बांध-तलाव बांधणे. शेतालगत शेततळी निर्माण करणे आवश्यक ठरते.

• सेंद्रिय खतनिर्मिती आणि वापर –

सेंद्रिय खतनिर्मिती करून त्या खताचा योग्य वापर करणे आणि शेती उत्पन्न वाढवणे असे मुख्य उद्दिष्ट सेंद्रिय शेतीत असते. तसेच रासायनिक खतांचा वापर टाळणे, वर्षभर केवळ उत्पन्नासाठी शेती न करता जमिनीची सुपीकता वर्षानुवर्षे टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील असणे, अशी धोरणे देखील सेंद्रिय शेतीत ठरवावी लागतात.

• जैव विविधता –

शेतात विविध स्वरूपाचे जीव – कीटक असणे गरजेचे असते. त्यांचा वावर मात्र अति होऊ न देणे. त्यासाठी शेताची व्यवस्थित निगराणी करणे. शेत परिसरात प्राणी, पक्षी, कीटक, अशी जैव विविधता असणे खूप आवश्यक आहे. तसेच गांडूळ पैदास वाढवणे देखील शेतीसाठी अनेकवेळा फायदेशीर ठरते.

• जनावरे एकत्रीकरण –

गुरे – पाळीव जनावरे यांचा शेतातील वावर फायदेशीर ठरतो. त्यांचे मलमुत्र जमिनीसाठी पोषक ठरत असते. तसेच ते शेतातील गवत आणि इतर पालापाचोळा चारा म्हणून ग्रहण करत असतात. त्यामुळे गवताची आणि इतर अनावश्यक कीटक जीवांची वाढ होत नाही.

सेंद्रिय खत म्हणजे काय? What is Organic Manure/Fertiliser

सेंद्रिय शेतीसाठी सेंद्रिय खत असणे अत्यावश्यक आहे. त्याची संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे –

वनस्पती व प्राणी यांच्या अवशेषापासून, मलमुत्रापासून जे खत तयार होते त्याला सेंद्रिय खत म्हणतात. प्रामुख्याने शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, हिरवळीची खते, माशांचे खत, खाटीक खान्याचे खत, इत्यादी खतांचा सेंद्रिय खतांमध्ये समावेश होतो.

सेंद्रिय खताचे प्रकार | Types Of Organic Manure/Fertiliser

१) शेणखत –

जनावरांचे शेण, मुत्र, चारा यांपासून तयार होणाऱ्या खताला शेणखत असे म्हणतात. शेणखत हे शेतीसाठी प्राचीन काळापासून वापरले जाते. अजूनही ग्रामीण भागात शेतीसाठी शेणखताचा वापर केला जातो.

शेणखतामुळे जमिनीचा पोत चांगलाच सुधारतो. जमीन सुपीक बनते. त्यामध्ये नत्र, स्फूरद व पालाश असते. बायोगॅस निर्मितीसाठी शेणखताचा वापर केला जातो.

२) कंपोस्ट खत –

शेतातील गवत, कापलेल्या पिकांचे अवशेष, भुसा, पाचट, झाडांचा पालापाचोळा अशा घटकांचे कुजवून म्हणजेच सूक्ष्मजंतूंनी विघटन करून जे खत तयार केले जाते त्याला कंपोस्ट खत असे म्हणतात. या खतामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश भरपूर प्रमाणात असते.

३) गांडूळ खत –

गांडूळ हे शेतकऱ्यांचे मित्र असतात कारण ते जमीन भुसभुशीत करतात. त्यांची विष्ठा आणि त्यांचा संचार हा जमिनीच्या आतच असल्याने जमिनीची पोषकमूल्ये वाढतात.

गांडूळ आणून आपण जर शेण, पालापाचोळा, जनावरांचे मलमुत्र यामध्ये टाकले तर गांडूळ खत तयार होत असते. त्यामध्ये गांडूळाची विष्ठा देखील मिसळत असते त्यामुळे अत्यंत उत्तम दर्जाचे सेंद्रिय खत तयार होते.

४) हिरवळीची खते –

जमिनीत लवकर येणाऱ्या पिकांची दाट पेरणी केली जाते. पीक थोडे वर आल्यावर नांगराच्या साहाय्याने ते जमिनीत तसेच गाडले जाते. गाडलेली पिके कुजण्यासाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी पुरेसा असतो. अशा प्रकारे तयार होणाऱ्या खतांना हिरवळीची खते असे म्हणतात.

प्रामुख्याने ताग, मूग, धैच्या, चवळी, शेवरी, बरसीम, गवार अशा प्रकारची पिके हिरवळीच्या खतासाठी वापरली जातात. त्यापासून जमिनीला भरपूर प्रमाणात नत्र मिळते.

५ – खाटीकखान्याचे खत –

खाटीकखान्यात जनावरांच्या अवशेषापासून जे खत बनवले जाते त्याला खाटीकखान्याचे खत म्हणतात. या खताचा वापर शेतीसाठी केला जातो. जनावरांच्या रक्तापासून आणि इतर अवशेषापासून तयार केलेल्या या खतात नत्र आणि स्फुरद भरपूर प्रमाणात असते. त्यापासून जमिनीचा पोत सुधारतो.

६ – माशाचे खत –
समुद्रकिनारी विविध प्रकारचे मासे जे मेल्यानंतर वाया जातात, किंवा कापल्यानंतर त्यांचे अवशेष शिल्लक राहतात त्यांचे जे खत बनवले जाते त्याला माशाचे खत असे म्हणतात. या खतामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश यांचे प्रमाण विपुल असते.

रासायनिक खते आणि सेंद्रिय खते यामधील फरक –

रासायनिक खते कमी वेळात जास्त उत्पन्न मिळवून देतात खरी पण जमिनीचा पोत आणि कस हळूहळू कमी होऊ लागतो.

बियाणांची वाढ योग्यरित्या कशी होऊ शकेल यासाठी रासायनिक आणि सेंद्रिय खत चाचणी केली जाते. यामध्ये रासायनिक खतांची योग्यता सरस ठरते पण सेंद्रिय खतांनी जमीन वर्षानुवर्षे कसदार बनून राहते.

सेंद्रिय खतांचा वापर करून उगवल्या जाणाऱ्या पिकांची पोषकता तुलनेने जास्त असते. सेंद्रिय खतांमुळे मातीची सुपीकता टिकवली जाते आणि जमिनीचे संवर्धन होते.

संपूर्ण लेख वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला सेंद्रिय शेती संपूर्ण माहिती (Organic Farming Information in Marathi) हा लेख कसा वाटला, त्याबद्दल तुमचा अभिप्राय नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post सेंद्रिय शेती संपूर्ण माहिती | Organic Farming Information in Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/organic-farming-information-in-marathi/feed/ 0 2309
एफआरपी संपूर्ण माहिती, ऊसाचा एफआरपी दर | FRP Rate for Sugarcane | https://dailymarathinews.com/%e0%a4%8f%e0%a4%ab%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80/ https://dailymarathinews.com/%e0%a4%8f%e0%a4%ab%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80/#respond Fri, 18 Dec 2020 03:02:20 +0000 https://dailymarathinews.com/?p=1873 ऊस उत्पादक आणि साखर कारखाने यांच्याशी सरळसरळ संबंधित असलेला एफआरपी (FRP) दर म्हणजे काय? असा प्रश्न सर्व स्तरांतून विचारला जातो. एफआरपी दर कसा ठरवतात आणि ...

Read moreएफआरपी संपूर्ण माहिती, ऊसाचा एफआरपी दर | FRP Rate for Sugarcane |

The post एफआरपी संपूर्ण माहिती, ऊसाचा एफआरपी दर | FRP Rate for Sugarcane | appeared first on Daily Marathi News.

]]>
ऊस उत्पादक आणि साखर कारखाने यांच्याशी सरळसरळ संबंधित असलेला एफआरपी (FRP) दर म्हणजे काय? असा प्रश्न सर्व स्तरांतून विचारला जातो. एफआरपी दर कसा ठरवतात आणि तो दर ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? अशा आणखी काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखात मिळतील.

एफआरपी म्हणजे काय? What is FRP

साखर कारखान्यांसाठी ऊस जेवढा आवश्यक आहे, तसेच ऊस उत्पादकांना कारखाने गरजेचे आहेत. ऊसाचा दर एका निर्धारित नियमावलीत ठरवला जातो. त्यामध्ये ऊस उत्पादकांपासून ते कारखानदार या सर्वांचाच फायदा बघितला जातो. प्रतिटन ऊसामागे उत्पादकांना मिळणारा दर म्हणजे एफआरपी!

एफआरपी विस्तृत अर्थ – FRP long form

एफआरपीचा विस्तृत अर्थ म्हणजे फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राईस म्हणजेच रास्त आणि किफायतशीर दर!

एफआरपी ठरवण्याबाबतचे नियम व कायदे | Laws Regarding FRP Rate

• वैधानिक किमान भाव (Minimum Support Price)

साखर उत्पादनासाठी आणि तो विकत घेण्यासाठी प्रत्येक हंगाम असतो. त्या हंगामासाठी २००९ पूर्वी ऊसदर नियंत्रण कायदा, १९९६च्या खंड ३ मधील तरतुदीनुसार केंद्र सरकार ऊसाचा वैधानिक किमान भाव (MSP) निश्चित करत असे. नंतर सरकारने २२ ऑक्टोबर २००९ रोजी ऊसदर नियंत्रण कायद्यात फेरबदल केले. या कायद्यात ऊस उत्पादकांचा खर्च लक्षात घेण्यात आला. त्यांना प्रत्येक हंगामासाठी माफक नफा मिळण्याची तरतूद करण्यात आली.

• रास्त आणि किफायतशीर दर (Fair and Remunerative Price)

उत्पादकांसाठी माफक दर मिळावा यासाठी २००९ नंतर साखरेच्या हंगामांचा रास्त आणि किफायशीर भाव (एफआरपी) निश्चित करण्यात येऊ लागला. तो निश्चित करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. केंद्र सरकारचा कृषी आयोग एफआरपी ठरवत असते.

साखर कारखाने एफआरपी दरापेक्षा कमी दर देऊ शकत नाहीत. परंतु जर कधी साखर कारखाने आणि राज्य सरकारला जास्त एफआरपी द्यायचा असल्यास तशी तरतूद करावी लागते.

साखर कारखाने ऊस उत्पादकांना प्रतिटन भाव देत असतात त्यामध्ये ऊसाचा एकूण उत्पादन खर्च व साधारण १५ टक्के नफा गृहित धरुन एफआरपी ठरवतात.

• वाचकांसाठी थोडेसे –

तुम्हाला एफआरपी बद्दल सर्व माहिती ऑनलाइन मिळू शकते. त्यासाठी सर्च इंजिनवर पुढील प्रश्न टाईप करा….

What is FRP for sugarcane?

Who recommended MSP and issue price?

What is MSP sugar?

Who decides on MSP?

Sugarcane FRP Maharashtra

FRP sugarcane full form

FRP for sugarcane UPSC

sugarcane frp for this year

तुम्हाला एफआरपी म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर मिळाले असल्यास आणि त्या व्यतिरिक्त एफआरपीबद्दल अधिक माहिती असल्यास आम्हाला नक्की कळवू शकता.

The post एफआरपी संपूर्ण माहिती, ऊसाचा एफआरपी दर | FRP Rate for Sugarcane | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%8f%e0%a4%ab%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80/feed/ 0 1873
शुभ मंगल सामूहिक विवाह योजना – गरीब शेतकऱ्यांसाठी लाभ ! https://dailymarathinews.com/shubh-mangal-vivah-yojana/ https://dailymarathinews.com/shubh-mangal-vivah-yojana/#respond Fri, 31 Jan 2020 15:33:00 +0000 https://dailymarathinews.com/?p=1365 महाराष्ट्र शासनाचे महिला व बाल विकास कार्यालय विविध उपक्रम राबवत आहेत. जिल्ह्यातील शेतकरी किंवा शेतमजूर यांच्या मुलींच्या सामूहिक विवाहासाठी शुभ मंगल सामूहिक विवाह योजना राबविण्यात ...

Read moreशुभ मंगल सामूहिक विवाह योजना – गरीब शेतकऱ्यांसाठी लाभ !

The post शुभ मंगल सामूहिक विवाह योजना – गरीब शेतकऱ्यांसाठी लाभ ! appeared first on Daily Marathi News.

]]>
महाराष्ट्र शासनाचे महिला व बाल विकास कार्यालय विविध उपक्रम राबवत आहेत. जिल्ह्यातील शेतकरी किंवा शेतमजूर यांच्या मुलींच्या सामूहिक विवाहासाठी शुभ मंगल सामूहिक विवाह योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील गरीब शेतकरी मुलीच्या लग्नामुळे अतिरिक्त कर्जात बुडू नये असा उद्देश या योजने मागचा आहे. या योजने संदर्भात अधिक माहिती या लेखात दिलेली आहे.

योजनेत देण्यात येणारी रक्कम –

१ – शुभ मंगल सामूहिक विवाह या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी किंवा शेतमजूर याचे वार्षिक उत्पन्न १ लाखापर्यंत असावे.

२ – अनुदान : मुलीच्या विवाहासाठी आवश्यक असलेले मंगळसूत्र व इतर वस्तूंच्या खरेदीसाठी जोडप्यासाठी दहा हजार रुपये अनुदान देण्यात येते. हे अनुदान आईच्या नावाने आणि आई हयात नसल्यास वडिलांच्या नावाने देण्यात येते. आई – वडील दोघेही हयात नसल्यास वधूच्या नावाने देण्यात येते.

तसेच सामूहिक विवाह आयोजित करणाऱ्या संस्थेस दोन हजार रुपये देण्यात येतात. विवाह आयोजन आणि समारंभाचा खर्च भागवण्यासाठी ही रक्कम देण्यात येते.

अटी व नियम :

१ – वधू ही महाराष्ट्रातील संबंधित जिल्ह्याची स्थानिक असावी. त्याबाबत ग्रामसेवक / तलाठी यांचा दाखला असावा.

२ – विवाह सोहळ्याच्या दिनांकास वराचे वय २१ वर्षे व वधूचे वय १८ वर्षे यापेक्षा कमी असू नये. याबाबत जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शालांत परीक्षा प्रमाणपत्र किंवा जन्माच्या स्थानिक प्राधिकाऱ्याने दिलेला दाखला किंवा वैद्यकीय अधिकाऱ्याचे वयाबाबतचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.

३ – वधू – वरांना प्रथम विवाहासाठीचे हे अनुदान पुनर्विवाहाकरिता देण्यात येणार नाही. तथापि वधू विधवा किंवा घटस्फोटीत असल्यास तिच्या पुनर्विवाहासाठी देण्यात येईल.

४ – तलाठी किंवा तहसिलदार यांनी दिलेला १ लाखाच्या आतील उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे.

५ – नवीन सुधारित योजने अंतर्गत जे जोडपे विवाह सोहळ्यात सामील न होता विवाह नोंदणी कार्यालयामध्ये जाऊन विवाह करतील त्यांनाही १० हजार रुपये अनुदान प्राप्त होईल. सामूहिक विवाह संस्था या कार्यासाठी विशिष्ट दिवस ठरवतात तसा वेळ एखाद्याकडे नसल्यास सरळ विवाह नोंदणी कार्यालयात लग्न करू शकतात. अतिरिक्त खर्च आणि वेळ वाचतो.

६ – या योजनेतील लाभार्थ्यांना बँकेची सर्व माहिती जसे बँक शाखा, खाता क्रमांक, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयात अर्जात नमूद करून द्यावी लागेल. सामूहिक विवाह सोहळा ज्या दिवशी असेल त्याच्या एक महिना अगोदर सर्व कागदपत्रे, अर्ज कार्यालयात सादर करावे लागतील.

७ – विवाह नोंदणी प्रमाणपत्र व विवाहित जोडप्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग स्वयंसेवी संस्थेने सादर करणे बंधनकारक आहे. त्यानंतरच प्रति जोडप्यामागे दोन हजार रूपये अनुदान प्राप्त होईल.

सुधारीत शुभ मंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजना संपूर्णपणे जिल्हा नियोजन विकास समितीमार्फत राबविण्यात येते, तर या योजनेची अंमलबजावणी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येते. तरी गरीब शेतकरी आणि शेतमजूर यांनी मुलीच्या विवाहाकरिता या योजनेचा लाभ घ्यावा. अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ व्हावा आणि अतिरिक्त कर्जाचा बोजा शेतकऱ्यावर पडू नये असा उद्देश या योजने मागील आहे.

The post शुभ मंगल सामूहिक विवाह योजना – गरीब शेतकऱ्यांसाठी लाभ ! appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/shubh-mangal-vivah-yojana/feed/ 0 1365
Best Small businesses in Marathi | सर्वोत्तम ११ व्यवसाय ! कमवा लाखो रुपये ! https://dailymarathinews.com/best-small-businesses-in-marathi/ https://dailymarathinews.com/best-small-businesses-in-marathi/#respond Sat, 25 Jan 2020 10:01:29 +0000 https://dailymarathinews.com/?p=1336 व्यवसाय पैसे कमावण्यासाठी अनेक संधी उपलब्ध करून देत आहे. आजच्या इंटरनेटच्या जगात तुम्ही एखादे कौशल्य आत्मसात केले कि घरबसल्या किंवा छोट्याशा भांडवलातून एक चांगला उद्योग ...

Read moreBest Small businesses in Marathi | सर्वोत्तम ११ व्यवसाय ! कमवा लाखो रुपये !

The post Best Small businesses in Marathi | सर्वोत्तम ११ व्यवसाय ! कमवा लाखो रुपये ! appeared first on Daily Marathi News.

]]>
व्यवसाय पैसे कमावण्यासाठी अनेक संधी उपलब्ध करून देत आहे. आजच्या इंटरनेटच्या जगात तुम्ही एखादे कौशल्य आत्मसात केले कि घरबसल्या किंवा छोट्याशा भांडवलातून एक चांगला उद्योग उभा करू शकता.

१. कार्यक्रम नियोजन

कोणताही घरगुती अथवा सामाजिक कार्यक्रम असल्यास सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांची व लोकांची जमवाजमव करावी लागते. लग्न, वाढदिवस, कंपनी प्रमोशन, जाहिरात लावणे, सभा आयोजन असे मोठे कार्यक्रम कोणी एक कुटुंब करू शकत नाही आणि केलेच तर होणारी धावपळ आणि खर्च खूप असतो. अशा विविध कार्यक्रमांचे नियोजन जर तुम्ही केले तर एक उत्तम व्यवसायाची संधी तुम्हाला मिळेल. यालाच इंग्लिशमध्ये इव्हेंट मॅनेजमेंट देखील म्हणतात. यासाठी तुम्हाला विविध लोक , कलाकार, संस्था यांचा संपर्क वाढवावा लागेल. थोड्याशा मनुष्यबळात तुम्ही इव्हेंट मॅनेजर बनू शकता.

२. मोबाईल रिपेअर

स्मार्टफोन आज कोणाकडे नाही. त्याची दुरुस्ती व विक्री आणि साहित्य तुम्ही विकायला ठेऊ शकता. एखादी छोटी जागा भाड्याने घेऊन हा व्यवसाय सुरू करू शकता. स्मार्टफोन बरोबर लागणारे साहित्य, मोबाईल रिचार्ज देखील तुम्ही ठेऊ शकता. मोबाईल रिपेअरिंग चा कोर्स करून लगेच कामाला सुरुवात करा. इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात आवड असली की झाले. तुम्हाला मग हा व्यवसाय भरपूर कमाई करून देईल.

३. ई – सेवा

फक्त ऑनलाईन रिचार्ज आणि ई – सेवा देऊन तुम्ही हजारो रुपये कमवू शकता. विविध डीटीएच, गॅस, लाईट बिल, तसेच ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करणे अशी विविध नेटवर्क आणि इंटरनेट संबंधित कामे तुम्ही सुरू करून व्यवसाय उभारू शकता. शालेय, कॉलेज विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणे, त्यांचे फोटो काढणे, प्रिंट, झेरॉक्स काढणे अशा नानाविध सेवा तुम्ही स्वतः देऊ शकता. छोट्याशा जागेत हा व्यवसाय सुरू करून भरघोस कमाई करा.

४. ट्रॅव्हल एजन्सी

एखादा लॅपटॉप असेल तर तुम्ही हा उद्योग घरच्या घरी सुरू करू शकता. अनेक मोठ्या ट्रॅव्हल एजन्सी यावर तुम्हाला कमिशन मिळवून देतात. तुमच्या भागात जर तुम्ही अशी सब – एजन्सी सुरू केली आणि बुकिंग सुरू केले तर प्रतिसाद कसा मिळतो यावर तुम्ही पुढचे पाऊल उचलू शकता. थोडेसे इंटरनेटचे ज्ञान असले की झाले. ऑनलाईन बुकींग करवून तुम्ही अनेक जणांना फिरायला पाठवू शकता.

५. जेवणाचे डब्बे पुरवणे / खानावळ

शहरी किंवा निमशहरी भागात नोकरदार वर्ग खूप असतो. अशांना दुपारी किंवा रात्री डबा पोचवणे हा उत्तम उद्योग पर्याय ठरू शकतो. तुम्ही एखादी खानावळ संपर्कात ठेऊन किंवा स्वतःच्या घरी डबे बनवून विविध ठिकाणी डबे पोचवण्याचे काम करू शकता. कॉलेज हॉस्टेल किंवा शालेय परिसर विभागात जर हे काम सुरू केले तर कमाईला सीमा उरणार नाही.

सकाळी उठून डबा बनवणे व धुणे अनेक जणांना जमत नाही किंवा तर काम कंटाळवाणे वाटते. जर तुम्ही अशी खानावळ उघडली तर अनेक लोकांना तुम्ही त्यांची गरज पूर्ण करून द्याल.

६. शिकवणी ( क्लासेस )

भांडवल काहीच नसल्याने तुम्ही हे क्षेत्र व्यवसाय म्हणून बघू शकता. शिकवण्याची आवड, आणि प्रत्येक विषयातले ज्ञान असणे आवश्यक आहे. मग कोणत्याही शैक्षणिक वर्गाला तुम्ही शिकवणी देऊ शकता. लहान मुले किंवा शालेय, कॉलेजचे विद्यार्थी यांपैकी कोणतीही मुले तुम्ही शिकवणीसाठी घेऊ शकता. तुमचे ज्ञान आणि समज चांगली असेल तर शिक्षण दानाचे चांगले काम तुम्ही करू शकता शिवाय तुमची कमाई देखील होईल.

७. फॅशन डिझायनिंग आणि टेलरिंग

टेलरचे दुकान म्हटले की आपल्याला ते गल्लीबोळातील दुकान आठवते. पण आज तसे राहिले नाही. तुम्ही एखादा टेलरिंगचा कोर्स करून त्यामध्ये विविध फॅशन घेऊन येऊ शकता. फॅशन डिझायनिंग आणि टेलरिंग जर शिकला तर तुम्ही तुमचे कपडे ऑनलाईन / ऑफलाईन देखील विकू शकता. कामात सातत्य राखण्याचा कल असेल तर तुम्ही हे करिअर नक्की निवडा. घरबसल्या तुम्ही लाखो रुपये कमवू शकता.

८. फोटोग्राफर

अनेक जणांनी पार्ट टाईम फोटोग्राफी करता करता प्रोफेशनल फोटोग्राफी करायला सुरुवात केली आहे. प्रत्येक कार्यक्रमाला फोटोग्राफरची आवश्यकता असते. अशा वेळी तुम्ही एखादा छोटासा फोटोग्राफी कोर्स करून या क्षेत्राकडे वळू शकता. खूप संयम आणि शिकण्याची इच्छा जर तुमच्याकडे असेल तर या क्षेत्राला आज मरण नाही. एखादा व्यवस्थित कॅमेरा, लॅपटॉप घेऊन घरच्या घरी हा व्यवसाय सुरू करा.

९. ब्लॉगिंग

डिजिटल मार्केटिंग आणि इंटरनेट क्षेत्रात ब्लॉगिंग हे करिअर खूपच प्रसिद्ध आहे. तुम्ही जर चांगले लिखाण करत असाल आणि इंटरनेट वेबसाईटबद्दल तुम्हाला ज्ञान असेल तर तुम्ही एखादा विषय घेऊन माहिती लिहायला सुरू करू शकता. इंटरनेटवर माहिती मिळवणे खूपच सोपे झाले आहे ते ब्लॉगिंग मुळेच ! अनेक ब्लॉगर्स आपले लेख , माहिती दररोज अपलोड करत असतात. हे क्षेत्र संपूर्ण डिजिटल असल्याने, लॅपटॉप व मोबाईल ची आवश्यकता भासेल. परंतु अत्यंत कमी खर्चात फक्त वेळेची गुंतवणूक करून भरघोस कमाईची संधी सोडू नका.

१०. युट्युब चॅनेल

आज प्रोफेशनल युट्यूबचा वापर करणारे खूपच प्रसिद्ध आहेत. दिवसातून एकदा तरी प्रत्येक जण युट्यूब उघडतोच याचाच फायदा तुम्ही देखील घ्या. तुमचा युट्यूब चॅनल सुरू करून घरबसल्या प्रसिद्ध व्हा. तुमच्यात असलेले कलागुण जर तुम्ही व्हिडिओच्या स्वरूपात युट्यूबवर टाकले आणि जर प्रसिध्द झाले तर तुम्ही त्याद्वारे पैसेही मिळवाल.

११. स्क्रिप्ट लेखन

मोबाईल, टीव्ही आणि युट्यूबसारख्या माध्यमांमुळे अनेक कथांना लेखकाची गरज असते. तुम्ही लेखक म्हणून काम करू शकता. स्वतंत्र विचारशैली, लेखनाची आवड आणि काल्पनिक विस्तार यासारखे गुण जर तुमच्यात असतील तर तुम्ही नक्कीच स्क्रिप्ट लेखन करू शकता. आताच्या युगात अनेक
जण प्रोडक्शन हाऊस उघडून बसलेत. फक्त सर्व कलाकारांची जमवाजमव करून एखादी शॉर्ट फिल्म, व्हिडिओज बनवले जातात. अशा प्रोडक्शन हाऊसशी तुम्ही संलग्न होऊन स्वतःचे काम सुरू करू शकता.

The post Best Small businesses in Marathi | सर्वोत्तम ११ व्यवसाय ! कमवा लाखो रुपये ! appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/best-small-businesses-in-marathi/feed/ 0 1336
हेच शेतीपूरक व्यवसाय आहेत ते अत्यंत कमी खर्चाचे ! https://dailymarathinews.com/shetipurak-vyavsay-margdarshan/ https://dailymarathinews.com/shetipurak-vyavsay-margdarshan/#respond Thu, 23 Jan 2020 10:33:48 +0000 https://dailymarathinews.com/?p=1228 शेतीपूरक व्यवसाय ग्रामीण महाराष्ट्रात किंवा निमशहरी भागात आपण उभारू शकतो. या प्रकल्पांसाठी लागणारा खर्च जास्त नसल्याने तो पैसा तुम्ही कर्ज किंवा स्वतः भांडवल वापरून उभारू ...

Read moreहेच शेतीपूरक व्यवसाय आहेत ते अत्यंत कमी खर्चाचे !

The post हेच शेतीपूरक व्यवसाय आहेत ते अत्यंत कमी खर्चाचे ! appeared first on Daily Marathi News.

]]>
शेतीपूरक व्यवसाय ग्रामीण महाराष्ट्रात किंवा निमशहरी भागात आपण उभारू शकतो. या प्रकल्पांसाठी लागणारा खर्च जास्त नसल्याने तो पैसा तुम्ही कर्ज किंवा स्वतः भांडवल वापरून उभारू शकता. आज महाराष्ट्रात किंवा भारतात बेरोजगारीचे वाढते प्रमाण युवकाला उद्योग करण्यास भाग पाडत आहे. अशातच कोणता उद्योग करावा याबद्दल पुरेपूर माहिती नसल्याने आम्ही घेऊन येत आहोत अशी माहिती जी तुम्हाला उद्योग करण्याबद्दल मार्गदर्शक ठरेल.

फक्त शेती करून शेतकरी उपजीविका भागवू शकतो परंतु आजची महागाई आणि तंत्रज्ञान पाहता त्याला शेतीसाठी जोडव्यवसाय आज ना उद्या करावा लागणारच आहे. शेतीमधून उत्पन्नाची हमी मुबलक पाणी असल्याने देऊ शकतात. परंतु काही भागात फक्त पावसावर शेती अवलंबून असते अशा ठिकाणी शेतीपूरक व्यवसाय खूप फायदेशीर ठरतील.

शेतीपूरक व्यवसाय यादी खाली दिलेली आहे. या लेखामध्ये अशा व्यवसायांची फक्त प्राथमिक माहिती देण्यात आलेली आहे.

१. कुक्कुटपालन –

कमी खर्चात आणि थोड्याशा जागेत हा व्यवसाय तुम्ही करू शकता. कोणत्या जातीचे कोंबडा – कोंबडी तुम्ही पाळणार आहात यावर तुमचा व्यवसाय तुलनात्मक ठरेल. आज कुक्कुटपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर होत आहे. ब्रॉयलर , इंग्लिश , देशी, डी.पी. इत्यादी अशा अनेक जाती कमी जास्त प्रमाणावर तुम्ही सांभाळू शकता. फक्त वेळोवेळी लसीकरण, जागेची स्वच्छता, एवढी काळजी घ्यावी लागते. कमी कष्टात जास्त उत्पन्न तुम्ही या व्यवसायातून मिळवू शकता.

२. शेळी पालन –

शेळीचा प्रजनन काळ हा लगेच येत असल्याने वर्षभरात तुम्ही शेळींची संख्या वाढवू शकता. जर शेळी बांधायला शेड उभे केले तर हमखास उत्पन्न मिळवून देणारा हा व्यवसाय आहे. फक्त शेळीच्या चाऱ्याची व्यवस्था करावी लागते.

३. दुग्ध व्यवसाय –

ग्रामीण भागात मुबलक चारा असल्याने गाई – म्हैशी – शेळ्या तुम्ही दुग्ध उत्पादनासाठी पाळू शकता. आता दूध प्रक्रिया आणि दूध उत्पादन उद्योग वाढल्याने दुधाची मागणी देखील वाढत आहे. तुमच्याकडे शेड किंवा एखादा गोठा असल्यास तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.

४. मशरुम शेती –

मशरूम मोठमोठ्या हॉटेल्समध्ये मागवले जाते. त्याची डिश खूप महाग आहे. त्याची पौष्टिक मूल्ये आणि जीवनसत्वे उच्च प्रमाणात आहेत. ग्रामीण भागात पोषक वातावरण असल्याने एखादया बंदिस्त शेड मध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. शेडमधील तापमान नियंत्रित ठेवणे एवढी एकच अट या व्यवसायात आहे.

५. रेशीम शेती –

भारत आणि चीन हे दोन देश रेशीम उत्पादनात अव्वल आहेत. रेशीमची वाढणारी मागणी हीच रेशीम उद्योगाची खरी चालना आहे. रेशीम कच्चा माल तयार करण्यापासून पूर्ण प्रक्रियेपर्यंत चांगला भाव मिळत असल्याने कमी उत्पन्नाच्या जमिनीत तुती लागवड करून हा उद्योग तुम्ही वाढवू शकता.

६. मधमाशी पालन –

अनेक आजारांवर गुणकारी आणि मानवी शरीराला आरोग्यदायी असा मध तयार करणे म्हणजे तुमच्या उत्पन्नात नक्कीच वृद्धी होणार. मध तुम्ही स्वतः देखील विकू शकता किंवा योग्य बाजार बघून जास्त मध एकदम विकू शकता. एखादी पडीक जमीन असेल तर लाकडाचे खोके/पेटी तयार करून तुम्ही हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर देखील सुरू करू शकता.

७. मत्स्य पालन –

एक छोटे तळे किंवा विहीर असेल तर माशाची अंडी किंवा छोटी पिल्ले आणून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. पाण्याचे शुद्धीकरण आणि माशांचे योग्य खाद्यप्रमाण यांचे नियोजन केल्यास कमी वेळेत चांगले उत्पन्न तुम्हाला मिळू शकेल.

८. गांडूळ खत –

एखादी चौकोनी किंवा गोलाकार टाकी बांधून त्यामध्ये ओला कचरा, भाजीपाला, गुरांचे शेण वारंवार टाकत राहून त्यामध्ये गांडूळ सोडावीत. गांडूळ खत खूप पोषक असून शेतीसाठी त्याचा उपयोग होतो. तुम्ही वेगवेगळ्या रास्त भावात गांडूळ खत विकू शकता.

९. औषधी वनस्पती लागवड –

नर्सरीसारखे योग्य आच्छादन तयार करून थोड्याशा जमिनीत देखील तुम्ही सर्व औषधी वनस्पती लागवड करू शकता. औषधी वनस्पती पुढे शहरी भागात औषध प्रक्रिया उद्योगात, विविध साैंदर्य प्रसाधनात वापरल्या जातात. याची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

१०. परसबाग –

योग्य पाणी नियोजन आणि उपलब्धता असल्यास तुम्ही परसबाग निर्मिती करू शकता. असे नियोजन करून तुम्ही वेगवेगळ्या
काळात कोणत्या भाज्या , फळे येतात त्याची लागवड करू शकता. स्थानिक किंवा बाजारभाव विक्री देखील करू शकता. हा व्यवसाय एक नियमित आणि हमखास उत्पन्न मिळवून देणारा आहे.

अशा प्रकारचे शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यास राज्य सरकारकडून अनुदान मिळते तसेच अत्यंत छोट्या पातळीवर देखील वरील सर्व व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता.

The post हेच शेतीपूरक व्यवसाय आहेत ते अत्यंत कमी खर्चाचे ! appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/shetipurak-vyavsay-margdarshan/feed/ 0 1228
Biogas Information in Marathi । बायोगॅस प्रकल्प माहिती – निर्मिती https://dailymarathinews.com/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a5%85%e0%a4%b8-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%aa-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80/ https://dailymarathinews.com/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a5%85%e0%a4%b8-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%aa-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80/#respond Thu, 23 Jan 2020 09:08:43 +0000 https://dailymarathinews.com/?p=1221 बायोगॅस हा प्रकल्प एकदम छोट्या गुंतवणुकीत उभा केला जाऊ शकतो. राज्य सरकार यासाठी अनुदान देखील उपलब्ध करून देते. आजकालचे एल पी जी गॅस येण्याअगोदर बायोगॅस ...

Read moreBiogas Information in Marathi । बायोगॅस प्रकल्प माहिती – निर्मिती

The post Biogas Information in Marathi । बायोगॅस प्रकल्प माहिती – निर्मिती appeared first on Daily Marathi News.

]]>
बायोगॅस हा प्रकल्प एकदम छोट्या गुंतवणुकीत उभा केला जाऊ शकतो. राज्य सरकार यासाठी अनुदान देखील उपलब्ध करून देते. आजकालचे एल पी जी गॅस येण्याअगोदर बायोगॅस खूप ठिकाणी उभे केले जात होते. आज गॅस सिलिंडरची किंमत पाहता बायोगॅस प्रकल्प पुन्हा उभे केले जाऊ शकतात.

बायोगॅस हा एक प्रकारचा अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत आहे. नैसर्गिक घटक, गुरांची विष्ठा, पालापाचोळा, ओला कचरा कुजवल्याने बायोगॅस तयार होतो. निमशहरी किंवा ग्रामीण भागात अजून देखील असे बायोगॅसचे प्रकल्प आहेत. एकदाच गुंतवलेल्या पैशातून हा प्रकल्प उभारून तुम्ही वर्षभर मोफत इंधन वापरू शकता.

• संक्षिप्त माहिती –

सांडपाणी गाळ जर व्यवस्थित एका ठिकाणी कुजवला तर त्याचा उपयोग बायोगॅस म्हणून करतात. यातून खूप मोठ्या प्रमाणात मिथेनची निर्मिती होते. गुरांचे शेण आणि ओला कचरा कुजवला तर त्यापासून गोबरगॅस निर्मिती करतात. मिथेनची निर्मिती होत असल्याने त्यालाही बायोगॅस म्हटले जाते. कचरा निर्मूलन आणि सांडपाणी शुद्धीकरणासाठी उभारला गेलेला प्रकल्प हा बायोगॅस निर्मितीसाठी सहाय्यक आहे. बायोगॅसवर चालणाऱ्या गाड्या, उपकरणे, इंजिन आणि शेगड्या यांवर मोठ्या प्रमाणावर संशोधन चालू आहे. कचरा व्यवस्थापन आणि बायोगॅस निर्मिती असे दोन्हीही उद्देश पूर्ण होत असल्याने भविष्यात इंधन म्हणून एक प्रभावी माध्यम बायोगॅस प्रकल्पांकडे पाहिले जात आहे.

• बायोगॅस निर्मिती –

  • बायोगॅसची निर्मिती करण्यासाठी एका जैविक प्रक्रियेची आवश्यकता असते. ऑक्सिजन विरहित वातावरणात जैविक प्रक्रिया करावी लागते. मिथेन हा बायोगॅसचा प्रमुख घटक असतो. त्याचे प्रमाण ६० टक्के असते. उरलेला गॅस हा कार्बन डाय-ऑक्साइड असतो.
  • शुद्ध मिथेन हा ज्वलनशील पदार्थ आहे परंतु कार्बन डाय-ऑक्साइड या अज्वलनशील घटकामुळे बायोगॅसची ज्वलन उष्णता कमी होते आणि तो घरगुती वापरासाठी आपण वापरू शकतो.
  • बायोगॅस निर्मितीसाठी ॲनारोबिक जिवाणूंची गरज असते. हे जिवाणू गायी म्हशींच्या मोठ्या आतड्यात सहज आढळतात त्यामुळे त्यांचे शेण हे बायोगॅस निर्मितीसाठी उत्तम मानले जाते. या जिवाणूंचे विविध प्रकार आहेत. हे प्रकार वेगवेगळ्या तापमानात बायोगॅस तयार करण्यास सक्षम असतात.
  • बायोगॅस तयार होताना एकूण तीन टप्प्यात प्रक्रिया पूर्ण होते.

१. पहिला टप्पा – रेणुंमध्ये विघटन

जैविक मालाचे प्रथमतः मोठमोठ्या रेणूंमध्ये विघटन केले जाते. यामध्ये जिवाणू खूप मोठ्या प्रमाणावर कार्यरत असतात. पुढे सर्व जैविक मालाचे साखर, स्टार्च, प्रोटीन्स व अन्य छोटे रेणू इ. घटकांमध्ये रुपांतर होते. काही काळाने सर्व पदार्थ एकत्र छोट्या रेणूंमध्ये विभागले जातात. त्या सर्वांचे विघटन होते.

२. दुसरा टप्पा – आम्लीकरण

दुसऱ्या टप्प्यात सर्व लहान रेणुंचे कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये रूपांतर होते. या प्रक्रियेला ॲसिडिफिकेशन म्हणजेच आम्लीकरण असे म्हणतात.

३. तिसरा टप्पा – मिथेनायझेशन

या टप्प्यात कार्बोक्झिलिक ॲसिडचे रुपांतर मिथेन आणि कार्बन डायऑक्साइडमध्ये होते. या प्रक्रियेला मिथेनायझेशन असे म्हणतात. या टप्प्यात बायोगॅसची निर्मिती होते.

The post Biogas Information in Marathi । बायोगॅस प्रकल्प माहिती – निर्मिती appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a5%85%e0%a4%b8-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%aa-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80/feed/ 0 1221