ukhane Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Fri, 13 May 2022 07:24:30 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 ukhane Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 Latest 30+ Best Marathi Ukhane | लग्नासाठी नवीन मराठी उखाणे. https://dailymarathinews.com/marathi-ukhane/ https://dailymarathinews.com/marathi-ukhane/#respond Tue, 07 Jan 2020 12:08:48 +0000 https://dailymarathinews.com/?p=1154 मराठी संस्कृती खूप सारे ऋणानुबंध जपून आहे. लग्न असो किंवा कुठलाही सामाजिक कार्यक्रम, स्त्रीला आणि पुरुषाला नाव/मराठी उखाणे (Marathi Ukhane) घ्यायला लावणे हे आपल्या संस्कृतीचे ...

Read moreLatest 30+ Best Marathi Ukhane | लग्नासाठी नवीन मराठी उखाणे.

The post Latest 30+ Best Marathi Ukhane | लग्नासाठी नवीन मराठी उखाणे. appeared first on Daily Marathi News.

]]>
मराठी संस्कृती खूप सारे ऋणानुबंध जपून आहे. लग्न असो किंवा कुठलाही सामाजिक कार्यक्रम, स्त्रीला आणि पुरुषाला नाव/मराठी उखाणे (Marathi Ukhane) घ्यायला लावणे हे आपल्या संस्कृतीचे द्योतक आहे.

लग्नात घेतला जाणारा उखाणा तर कायम लक्षात राहतो तोच उखाणा मग पुन्हा आयुष्यभर घेतला जातो. उखाणा घ्या किंवा नाव घ्या या स्वरूपात असणारा हट्ट दाम्पत्य पूर्ण करतेच. खालील सर्व उखाणे नवीनच आहेत. तुम्हीही त्यातला एखादा पाठ करू शकता. 

लग्नातले मराठी उखाणे – वधूसाठी

१. लग्नाचे दोन क्षण होत आहेत पूर्ण…..रावांचे नाव घेते जीवन झाले आता संपूर्ण.

२. असते जणू कर्तव्य नातेवाईकांचा आदर करणे…रावांसोबत एक नवा प्रवास आता सुखकर करणे.

३. माहेर आणि सासर दोन्ही घरे असतील मोठ्या मानाची आणि मनाची…..रावांसोबत माझे लग्न म्हणजे गोष्ट आहे सन्मानाची.

४. लग्नातील अक्षता असतात सर्वांचे आशीर्वाद…राव आणि माझी जोडी आहेच निर्विवाद.

५. फुलांचे सडे, पक्ष्यांचे थवे, निखळ हसणे.. माझा संसार, यांचा जिव्हाळा, असले सौख्य कोणास लाभणे..

६. या लग्नात समजले..चिल्लरचा जमाना आणि खर्च मात्र नोटांचा मला तर करावाच लागेल पण…..राव करतील का संसार नेटाचा….

७. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी..माझे काम असेलच एक कर्तव्य..परंतु लाभेल का त्यांची साथ माझ्या पाठी..

८. आई – वडिलांचे आशिर्वाद लाभले जे इतके सुंदर जीवन झाले..नशीबाची साथ आणि समाजाचे देणे जे ..रावांचे आगमन माझ्या आयुष्यात झाले.

९. खूप शुभेच्छा मिळाल्या आज या मंगलदिनी…रावांची साथ मला labho जन्मोजन्मी..

१०. हा फुलांचा वास आणि ..रावांचा सहवास माझ्या आयुष्यात असेल असिमीत सुगंध..दोन जीवांचे नाही तर दोन कुटुंबाचे असतील आयुष्यभर ऋणानुबंध..

लग्नातील मराठी उखाणे – वरासाठी

१. खूप सारा स्ट्रगल..स्ट्रगल नंतर नोकरीस्ट्रगल आता थांबला..मिळाली मला छानशी छोकरी..

२. हे तुझं कामचं आहे तू केलंच पाहिजे..असा जाच असतो बॉसचा..बाहेर फिरायला चला ना..मला शॉपिंग करायला न्या ना..इथून पुढे असा हट्ट असेल मिसेसचा..

३. मला सांगा सुख नक्की मला कधी मिळेलया वाक्याचा अर्थ आणि …….चा स्वभाव मला लग्न झाल्यावरच कळेल.

४. मिळाला चांगला सहवास तर निर्माण होईल गोडी,…….सोबत संसार म्हणजे आयुष्याची चव थोडी थोडी

५. मनमोहक फुलणारे शब्द, हा पाया असावा संसाराचा,……..शी माझा  संवाद असावा आयुष्यभराचा.

६. जुळले रे क्षण प्रितीचे या भावनांच्या संगी,मिळाले रे मन …….शी आज या मंगलप्रसंगी.

७. ऐटीत चालावे परी नसावा अहंकार, …….सोबत आयुष्याचा संसार, नसावा कोणता विकार..

८. आज लग्न होताना भेट आहे अंतरीची,    साथ ……..ची आणि माझी    जन्म – जन्मांतरीची.

९. रुसवा फुगवा जाणून घ्या, नका धरू अबोला………शी आयुष्यभर नाते, दरवाजे मनाचे खोला.

१०. पावसाचे नाव ऐकताच का होते मोराची चाहूल,…….सह होईल संसाराची सुरुवात, ठेवुनी एक एक पाऊल.

लग्नानंतरचे मराठी उखाणे – बायकोसाठी

१. काही जुन्या आठवणी मनात घर करून राहतात..लग्नापासून आजपर्यंत…आमचे हेच भाजी आणतात.

२. खूप स्वप्ने दाखवून झाली की वास्तवात उतरायचं असतं,मी तुझ्यावर प्रेम करतो फक्त एवढंच बोलायचं असतं..

३. माहेरची साडी आणि माहेरची भांडीकधीच जुनी होत नाहीत,आमचा प्रत्येक दिवसच नवा असतो,…..रावांसोबत माझी कधीच भांडणं होत नाहीत.

४. अखेर तो दिवस उगवला ज्या दिवसाची स्वप्ने मला पडायची, …..राव चहा घेऊन आले आणि म्हणाले, ” झोप ग , तुला काय गरज आहे आज काम करायची! “

५.कधी कधी सीरियल आणि क्रिकेट मॅचचा दिवस एकच असतो.मग ……राव आणि मी दोघे पिक्चर बघायला जात असतो.

६. असेल जरी नदी वाहती, सर्व सुखदुःख उरात ठेऊन…….राव माझ्या सोबतच आहेत शॉपिंग मॉल मध्ये , माझ्या सर्व बॅगा धरून…

लग्नानंतरचे मराठी उखाणे – नवऱ्यासाठी

१. एकदा मी म्हणालो, जाणीव आहे मला माझ्या जबाबदारीची !…….ने मला झाडू हातात दिला आणि म्हणाली, सफाई करून घ्या मग घरादाराची!

२. लग्नाची वर्षे तिच्या लक्षात आहेत…माझ्या लक्षात आहेत लग्नाअगोदरचीम्हणून लग्नाचा वाढदिवस ती घालते आणि मी वाढदिवस घालतो तिचा…

३. कैवल्य जीवन आणि मनाची गुंतवणूक एकत्र नसतेशांत आयुष्य आणि …….सह आयुष्य देखील एकत्र नसते…

४. मला …..शी केलेल्या लग्नानंतर कळाले की, लहानपणी आईला मदत का करावी लागायची.ती तर पूर्वतयारी होती लग्नाअगोदरची.

५. संयमी व्यक्ती सगळ्यांचा राखत असतो मान.. …….ने माझ्या आयुष्यात दिले संसाराचे दान.

तर हे marathi ukhane तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा. तसेच तुमच्याकडे असेच काही ठसकेबाज उखाणे असतील तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की पाठवा. त्यांना पब्लिश करण्याची जबाबदारी आमची…

Ganpati Atharvashirsha in Marathi PDF Download for free । गणपती अथर्वशीर्ष मराठी संकलन

The post Latest 30+ Best Marathi Ukhane | लग्नासाठी नवीन मराठी उखाणे. appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/marathi-ukhane/feed/ 0 1154