teachers day Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Sun, 29 Aug 2021 05:04:32 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 teachers day Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 शिक्षक दिन – १० ओळी मराठी निबंध | 10 lines Essay On Teachers Day | https://dailymarathinews.com/10-lines-marathi-essay-on-teachers-day/ https://dailymarathinews.com/10-lines-marathi-essay-on-teachers-day/#respond Wed, 25 Aug 2021 00:05:20 +0000 https://dailymarathinews.com/?p=2452 प्रस्तुत लेख हा शिक्षक दिन १० ओळींचा मराठी निबंध आहे. अत्यंत मुद्देसूद स्वरूपात हा निबंध मांडण्यात आलेला आहे.

The post शिक्षक दिन – १० ओळी मराठी निबंध | 10 lines Essay On Teachers Day | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा शिक्षक दिन – १० ओळींचा मराठी निबंध (10 lines Essay on Teachers Day in Marathi) आहे. अत्यंत मुद्देसूद स्वरूपात हा निबंध मांडण्यात आलेला आहे. लहान मुलांसाठी अत्यंत उपयुक्त असा हा निबंध आहे.

शिक्षक दिन – १० ओळी मराठी निबंध | 10 lines Essay on Teachers Day in Marathi |

1. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त म्हणजे ५ सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो.

2. भारतात सर्व शाळांमध्ये आणि इतरही शैक्षणिक क्षेत्रांमध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो.

3. आई वडीलांनंतर शिक्षकच हे विद्यार्थ्यांचे दुसरे पालक असतात.

4. मुलांचे व्यक्तिगत आणि सामाजिक भवितव्य निर्माण करण्यामध्ये शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो.

5. शिक्षक दिनी शिक्षकांच्या कर्तुत्वाचा योग्य सन्मान केला जातो.

6. अक्षर ओळखीपासून ते उदात्त जीवन जगण्याची प्रेरणा मिळेपर्यंत शिक्षक आपल्याला सहाय्यक ठरतात.

7. शिक्षकदिनी भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच विविध सांस्कृतिक उपक्रम सुद्धा आयोजित केले जातात.

8. शाळेत विद्यार्थीच शिक्षक बनून तासिका घेतात आणि दिवसाच्या शेवटी त्यांच्या शिकवणीचे मूल्यांकन केले जाते.

9. शिक्षक दिनी सर्व प्रकारे विविध उपक्रमांतून शिक्षकांप्रती आभार व्यक्त केले जातात.

10. शिक्षक आपल्याला ज्ञानदानाचे सर्वोत्तम कार्य करत असतात.

तुम्हाला शिक्षक दिन १० ओळींचा मराठी निबंध (10 lines Essay on Teachers Day in Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post शिक्षक दिन – १० ओळी मराठी निबंध | 10 lines Essay On Teachers Day | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/10-lines-marathi-essay-on-teachers-day/feed/ 0 2452
जागतिक शिक्षक दिन | Teacher’s Day Information in Marathi | https://dailymarathinews.com/teachers-day-information-in-marathi/ https://dailymarathinews.com/teachers-day-information-in-marathi/#respond Thu, 05 Sep 2019 10:30:36 +0000 https://dailymarathinews.com/?p=926 प्रस्तुत लेखात शिक्षक दिनानिमित्त माहिती देण्यात आलेली आहे. शिक्षकांचे कर्तव्य आणि विद्यार्थ्यांची जडणघडण विस्तारपूर्वक

The post जागतिक शिक्षक दिन | Teacher’s Day Information in Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेखात शिक्षक दिनानिमित्त (Teacher’s Day Information In Marathi) माहिती देण्यात आलेली आहे. शिक्षकांचे कर्तव्य आणि विद्यार्थ्यांची जडणघडण विस्तारपूर्वक मांडण्यात आलेली आहे.

जागतिक शिक्षक दिन – एका शिक्षकाच्या दृष्टीने…

शिक्षक-विद्यार्थी हा नातेसंबंध कुटुंबाव्यतिरिक्त असतो. त्यासंबंधात समोरच्या विद्यार्थ्याला पूर्णपणे समजून घेऊन त्याच्या बुद्धीला पटेल असे शिक्षण देणे आणि अशातच त्या विद्यार्थ्याकडून असलेली अपेक्षा नकळत पूर्ण करून घेणे असे कर्तव्य शिक्षकाचे असते.

आई-वडिलांव्यतिरिक्त विद्यार्थ्यांचा जर कोणावर विश्वास असेल तर ती व्यक्ती म्हणजे शिक्षक असते. विद्यार्थ्याला घडवणे म्हणजे, किती हळुवारपणे व पूर्ण अस्तित्वानिशी प्रयत्न करावे लागतात याचे मर्म शिक्षकच जाणू शकतो.

असा शिक्षक हा आपल्या आयुष्यात दोन पिढ्यातरी नक्कीच घडवत असतो. अशा एका जबाबदार व कर्तृत्ववान सामाजिक व्यक्तिमत्त्वाचा सन्मान आणि पुरस्कार करण्यासाठी ५ सप्टेंबर हा “जागतिक शिक्षक दिन” म्हणून साजरा केला जातो.   

आजच्या शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थी हा शिकण्यापेक्षा, त्याची उपस्थिती, त्याचा गणवेश व त्याचे लिखाण याकडेच जास्त लक्ष दिले जाते. प्रतिदिनी व प्रत्येक वर्षी तो एक चांगला माणूस म्हणून आणि आदर्श व्यक्ती म्हणून कसा घडत जाईल याचा कोणीही विचार करत नाही.    

लहान असताना विद्यार्थ्याच्या अजाणतेपणामुळे त्याचे वागणे अनाकलनीय असते. त्याची उपजतच असलेली सर्वकाही जाणून घेण्याची भूक व फक्त निरागस आनंद मिळवणे हे त्याच्या जीवनाचे केंद्रबिंदू असतात. हे तथ्य समजून घेऊन, भविष्यातील सामाजिक गरज व शिक्षण व्यवस्थेने राबवलेले उपक्रम विद्यार्थ्यात रुजवण्यासाठी एका वेगळ्याच प्रकारच्या शिस्तीची आवश्यकता असते.

ती शिस्त अगोदर शिक्षकाच्या अंगी बाणवली खूप महत्त्वाचे आहे. जर एखाद्याने शिक्षकी पेशा निवडला असेल तर त्याचे शिक्षण हे पूर्णपणे विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घेण्यात असले पाहिजे. लहान मुलांची मानसिकता ही त्या त्या क्षणी निर्माण होत असते आणि बदलतही असते.

मुलं फक्त झालेल्या घटना लक्षात ठेवतात आणि उपदेश, मूल्ये, संस्कार हे फक्त भाषेतच असल्याचे त्यांना जाणवते. संस्कारांचा खराखुरा अनुभव जाणण्यासाठी त्यांना जीवनाबद्दल खूप खोल दृष्टी द्यावी लागेल.       

लहानपणापासून विद्यार्थ्यांना समाजात, कुटुंबात व शाळेत जाणवत असलेले फरक व त्यांचा प्रभाव हा नकळतपणे त्यांचे व्यक्तिमत्त्व तयार करत असतो. शाळेत शिकवली जाणारी मूल्ये आणि समाजात लोकांच्या वागण्यात असलेला विरोध हा मुलांना लगेच जाणवतो. तो कटूपणा, नकारात्मकता ते लगेच अजाणतेपणाने आत्मसात करतात.

थोडे मोठे होऊ लागल्यावर हीच नकारात्मकता त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून जाणवू लागते. हा बदल शिक्षकाने अगोदरच हेरला तर खूप अमुलाग्र बदल हा तो त्याच्या स्वभावातून व शिक्षणातून विद्यार्थ्यांकडून घडून आणेल.     

आजचे विद्यार्थी हेच उद्याचे पालक असणार आहेत. त्यामुळे पुढची पिढी घडवण्यासाठी शिक्षक हा केंद्रबिंदू असतो. फक्त भाषिक मूल्ये व संस्कार न शिकवता जीवनातील खरेखुरे अनुभव, खेळाची व  स्वकष्टाची तयारी, बुद्धीची धार व भाषेचा परखडपणा हे सर्वांगीण विकास घडवून आणणारे गुण देखील शिकवले गेले पाहिजेत. शिक्षक दिनी शिक्षक हाच खरा प्रौढत्व प्राप्त करून गेला पाहिजे, असे प्रत्येक शिक्षकाने जाणले पाहिजे.    

शिक्षक दिनी विद्यार्थी हेच शिक्षक बनत असतात, शिक्षकांना विविध भेटवस्तू आणतात. शिक्षक दिन हा यापुरताच मर्यादित न ठेवता जीवनाच्या काही विविध दिशांना व आकांक्षांना स्पर्श करता येईल का? याचा सारासार विचार करून शिक्षकांनीच या दिवशी काही उदात्त पद्धतीचे उपक्रम राबवले पाहिजेत. शिक्षकाची घडवण्याची एक वेगळी दृष्टी ही समाजाला एक पाऊल पुढेच नेऊन ठेवेल.

तुम्हाला जागतिक शिक्षक दिन (Teacher’s Day Information In Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

हे नक्की वाचा-देव सगळ्यांच्या जोड्या वरच बनवतो” सगळ्यात मोठी अफवा!

The post जागतिक शिक्षक दिन | Teacher’s Day Information in Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/teachers-day-information-in-marathi/feed/ 0 926