Swami Vivekanand Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Mon, 11 Jan 2021 22:59:33 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 Swami Vivekanand Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 स्वामी विवेकानंद मराठी माहिती | Swami Vivekananda Information In Marathi | https://dailymarathinews.com/swami-vivekanand-information-in-marathi/ https://dailymarathinews.com/swami-vivekanand-information-in-marathi/#comments Mon, 11 Jan 2021 00:34:24 +0000 https://dailymarathinews.com/?p=1922 प्रस्तुत लेखात स्वामी विवेकानंद मराठी माहिती (Swami Vivekanand Information in Marathi) देण्यात आलेली आहे. माहितीचा आधार हा आपले ज्ञान वाढवण्यासाठी असतो. त्याप्रमाणे स्वामी विवेकानंद यांचे ...

Read moreस्वामी विवेकानंद मराठी माहिती | Swami Vivekananda Information In Marathi |

The post स्वामी विवेकानंद मराठी माहिती | Swami Vivekananda Information In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेखात स्वामी विवेकानंद मराठी माहिती (Swami Vivekanand Information in Marathi) देण्यात आलेली आहे. माहितीचा आधार हा आपले ज्ञान वाढवण्यासाठी असतो. त्याप्रमाणे स्वामी विवेकानंद यांचे जीवन माहीत करून घेणे आपल्या ज्ञानात आणि आयुष्याच्या वाटचालीत उपयुक्त ठरेल अशी आशा करूया…

स्वामी विवेकानंद यांचे जीवन (Swami Vivekanand Life) आपण फक्त त्यांनी केलेल्या कर्तृत्वावर जाणू शकतो. अशा कर्तुत्वाची झेप घेण्याची ऊर्मी सर्व मानव जातीत येण्यासाठी सर्वांना स्वामी विवेकानंद यांचा जीवनपट (Swami Vivekanand Biography) माहिती असणे आवश्यक आहे.

स्वामी विवेकानंद – माहिती | Swami Vivekanand Information In Marathi |

स्वामी विवेकानंद यांचे शिक्षण, कार्य आणि अध्यात्मिक उन्नती अशा काही पैलुंमध्ये त्यांचे जीवन विस्तारित करता येईल. संपूर्ण जीवनपट मांडताना काही महत्त्वपूर्ण घटनांचा आणि कर्तुत्वाचा उल्लेख करण्यात आलेला आहे.

स्वामी विवेकानंद जीवनपट संक्षिप्त (Swami Vivekanand Biography In Marathi)

स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त असे होते. त्यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी झाला त्यांचे निधन ४ जुलै १९०२ रोजी झाले. स्वामी विवेकानंद हे मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी होते.

साहित्य, संगीत कला आणि तत्त्वज्ञान या क्षेत्रांत विशेष रस असणारे विवेकानंद हे पाश्चात्य आणि भारतीय धर्मांशी जोडले गेले होते. त्यांचा सर्व धर्मीय अभ्यास होता. सर्व धर्मांचे सार तत्व एकच आहे अशी त्यांची मान्यता होती.

रामकृष्ण परमहंस यांच्या भेटीनंतर त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने दिशा मिळाली. गुरु रामकृष्ण परमहंस आणि हिंदू सनातन धर्मीय संदेश प्रसारित करण्यासाठी “रामकृष्ण मिशन” स्थापित करण्यात आली. रामकृष्ण मिशनतर्फे त्यांनी धर्मप्रसार केला आणि अध्यात्मिक शिकवण शेवटच्या श्वासापर्यंत देण्यात ते यशस्वी झाले.

स्वामी विवेकानंद यांचे बालपण | Swami Vivekanand Early Life |

विवेकानंदांचा जन्म कोलकातामध्ये सिमलापल्ली येथे १२ जानेवारी १८६३ रोजी, सोमवारी (पौष कृष्ण सप्तमी) झाला. वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात अ‍ॅटर्नी (वकील) होते. त्यांचा साहित्य, धर्म, तत्त्वज्ञान अशा विषयांशी संबंध असल्याने छोट्या नरेंद्रवर देखील तार्किक आणि धार्मिक संस्कार झाले होते. आई भुवनेश्वरी देवी यादेखील धार्मिक वृत्तीच्या होत्या.

स्वामी विवेकानंद हे संगीतात देखील विशेष रस घेत असत. त्यांनी बेनी गुप्ता आणि अहमद खान यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे शिकले होते. त्यामध्ये गायन आणि वादन या दोन्हींचा समावेश होता. त्याव्यतिरिक्त शारीरिक सुदृढतेकडे त्यांचे विशेष लक्ष असे. व्यायाम, लाठी चालवणे, पोहणे, कुस्ती या सर्व क्षेत्रांत ते पारंगत होते.

तर्कसंगत विचार आणि कृती यावर त्यांचा लहानपणापासून विशेष भर होता. अंधश्रध्दा, जातीव्यवस्था, धर्मांध प्रथा यांच्या विरोधात नेहमी त्यांचे प्रश्न उपस्थित असत. लहान वयातच ते लिखाण आणि वाचन शिकले होते. त्यांची वाचनाची गती खूपच अफाट होती.

स्वामी विवेकानंद यांचे शिक्षण ( Swami Vivekanand Education )

स्वामी विवेकानंद यांचे प्राथमिक शिक्षण ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये झाले.

त्यांनी १८७९ मध्ये प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रेसिडेन्सी कॉलेजला प्रवेश घेतला.

त्या शिक्षणानंतर त्यांनी जनरल असेम्ब्लीज इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी तेथे तर्कशास्त्र, इतिहास, पाश्चात्त्य तत्त्वज्ञान इ. विषय हाताळले.

त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे १८८१ साली फाइन आर्टची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी बी.ए. चे शिक्षण १८८४ साली पूर्ण केले.

स्वामी विवेकानंद यांचे तत्त्वज्ञान | Swami Vivekanand Philosophy |

स्वामी विवेकानंद हे बुद्धिमान तर होतेच परंतु प्रत्येक गोष्ट अनुभवाच्या पातळीवर कसून बघण्याची त्यांना सवय होती. त्यांचे शिक्षण पूर्ण होताना आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देखील त्यांनी अनेक तत्त्वज्ञानी अभ्यासले.

यामध्ये बारूच स्पिनोझा, इमॅन्युएल कान्ट, डेव्हिड ह्यूम, गोत्तिलेब फित्शे, जॉर्ज हेगेल, आर्थर शोपेनहायर, ऑगस्ट कोम्ट, जॉन स्टुअर्ट मिल, चार्ल्स डार्विन, स्पेन्सर इ. विचारवंत आणि तत्वज्ञानी यांचा समावेश होता.

पाश्चात्य तत्त्वज्ञानी अभ्यासताना त्यांना ज्ञानाची जी भूक लागली होती ती आत्मिक होती. सर्व तत्वज्ञान फक्त बौद्धिक विश्लेषण होते. त्यानंतर त्यांनी बंगाली आणि प्राचीन संस्कृत साहित्य अभ्यासायला सुरुवात केली.

शिक्षण आणि ज्ञानाची आस पाहून त्यांना सर्वजण बुद्धिमान म्हणून ओळखत होतेच शिवाय त्यांना अफाट स्मरणशक्ती लाभलेला व्यक्ती म्हणजेच “शृतिधर” म्हणून देखील ओळखू लागले.

तार्किक आणि बौद्धिक ज्ञानाने जीवनाच्या अनुभवात काही फरक पडत नाहीये अशी मनोधारणा झाल्याने त्यांनी आत्मिक आणि अध्यात्मिक प्रवास सुरू केला तो म्हणजे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या मदतीने! स्वामी विवेकानंद यांचे तत्त्वज्ञान आणि विचार हे सर्व त्यांच्या आत्मिक अनुभवातून प्रकट झालेले आहेत.

स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस | Swami Vivekanand and Ramkrushna Paramhans |

स्वामी विवेकानंद हे सर्व प्रकारच्या ज्ञानाने व्यापलेले होते. त्यांना आता आत्मिक अनुभवाची ओढ लागली होती. “देव आहे का?” या एका प्रश्नाने त्यांना एवढे ग्रसित केले होते की त्याचे उत्तर देणारा समर्पक व्यक्ती किंवा गुरु त्यांना सापडत नव्हता.

ब्रह्मा समाजाचे नेते महर्षि देवेंद्रनाथ ठाकूर यांच्या संपर्कात विवेकानंद काही काळ होते. त्यांना कदाचित उत्तर माहीत असेल म्हणून त्यांच्याकडे विवेकानंद गेले परंतु महर्षि देवेंद्रनाथ ठाकूर हे देखील विवेकानंदांना आत्मिक अनुभव प्राप्ती मिळवून देण्यात असमर्थ होते.

प्रश्नाच्या शंकेने आणि गुरूच्या शोधात असताना विवेकानंद हे एक दिवस रामकृष्ण परमहंस यांना भेटले. सर्वप्रथम विवेकानंद यांनी वाटले की आपण प्रश्न विचारू आणि परमहंस गुरु काहीतरी उत्तर देतील पण तसे झालेच नाही.

विवेकानंद म्हटले, “देव आहे का?”, रामकृष्ण उठले आणि सरळ विवेकानंद यांना म्हटले “आत्ताच जाणून घेणार का?” आणि असा साक्षात्कार दिला की विवेकानंद सफल झाल्यासारखे अनुभवू लागले.

त्यानंतर खऱ्या आत्म साक्षात्कारी प्रवासाला सुरुवात झाली. रामकृष्ण परमहंस यांनादेखील ज्ञान आणि धर्म प्रसार करण्यासाठी विवेकानंदांसारखा एक बुद्धिमान, अद्भुत आणि धाडसी व्यक्ती हवा होता, तो त्यांना मिळाला होता. इथून पुढे अध्यात्मिक साधना सुरू झाली होती. परमहंस देव यांनी स्वामी विवेकानंद यांचा शिष्य म्हणून स्वीकार केला होता.

परमहंस यांच्या अध्यात्मिक सहवासामुळे विवेकानंद उन्नत होत होते. त्यांच्यासह अन्य तरुण साधकांनी गुरु रामकृष्ण यांच्या समवेत काशीपूरच्या उद्यानात साधना केली आणि आत्मिक अनुभव प्राप्त केला.

स्वामी विवेकानंद यांचे आध्यात्मिक कार्य | Swami Vivekanand Spiritual Work |

गुरु रामकृष्ण परमहंस उत्तर आयुष्यात कर्करोगाने ग्रस्त होते. अशा बिकट परिस्थितीत विवेकानंदांनी त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालू ठेवला. रामकृष्ण यांच्या महासमाधीनंतर विवेकानंदांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली.

कोलकात्याजवळ वराहनगर भागात गुरुबंधू तारकनाथ यांच्या मदतीने या मठाची स्थापना सुरुवातीला एका पडक्या इमारतीत झाली. विवेकानंदांनी रामकृष्ण गुरूंनी वापरलेल्या वस्तू आणि त्यांच्या भस्म व अस्थी – कलश त्या मठात नेऊन ठेवल्या. गुरु रामकृष्ण यांचे अनुयायी व भक्‍त तेथे राहू लागले.

स्वामी विवेकानंद यांचे भारतभ्रमण | Swami Vivekanand Bharat Bhraman |

रामकृष्ण मिशनचे कार्य आणि धर्मप्रसार हा उद्देश्य ठेवून विवेकानंद हे भारतभ्रमण करण्यासाठी बाहेर पडले. भारताची धार्मिक उदासीनता पाहून त्यांचे मन खिन्न झाले. त्यानंतर भारतीय तरुण जर अध्यात्मिक बनू शकला तर संपूर्ण परिस्थिती बदलू शकते असा त्यांना विश्वास होता.

तरुणांना मार्गदर्शन, देशसेवा, धर्म जागृती अशी अनेक कार्ये त्यांनी स्वीकारली. अत्यंत कमी वयात आत्मज्ञान झाल्याने शारीरिक साथ त्यांना मिळत नव्हती. त्यांनी त्वरित भारताबाहेर देखील जगभरात प्रवास सुरू केला. अद्वैत ब्रम्हज्ञान हेच मानवी जीवनाचे अत्युच्च शिखर आहे असा संदेश सर्वत्र पोहचवणे हे एकच उद्दिष्ट स्वामी विवेकानंद यांच्यासमोर होते.

शिकागो येथील सर्वधर्म परिषद आणि जगभरात धर्मप्रसार |

शिकागो आर्ट इन्स्टिट्यूट, शिकागो येथे ११ सप्टेंबर १८९३ रोजी सर्व धर्मीय परिषद भरली होती. त्या सभेला विवेकानंद उपस्थित होते आणि हिंदू वेदिक धर्माचे ते प्रतिनिधित्व करीत होते.

स्वामीजींनी “अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो” अशी भाषणाची सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या लोकांनी जवळजवळ दोन मिनिटे टाळ्यांचा कडकडाट केला.

या परिषदेत विवेकानंदांनी सनातन वेदान्तावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले. सत्याला जाणण्याचे मार्ग आणि धर्म वेगवेगळे आहेत पण जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे असे त्यांनी सांगितले.

त्यानंतर काही काळ अमेरिकेतील वास्तव्यात आपल्या विचारांनी आणि व्याख्यानांनी त्यांनी अमेरिकेतील पत्रकार आणि जाणकार यांचे लक्ष वेधून घेतले. तेथील वृत्तपत्रांनी स्वामीजींच वर्णन “भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी”(Cyclonic Monk From India) असे केले होते.

वेदान्त आणि योग यांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इतर युरोपीय देशांमध्येसुद्धा व्याख्याने दिली. १८९५ मध्ये अतिव्यस्ततेमुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला. त्यांनी त्यानंतर योग वर्ग देण्यास सुरुवात केली. यावेळी भगिनी निवेदिता ही त्यांची शिष्य बनली.

स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू | Swami Vivekananda Death |

स्वामी विवेकानंद यांनी अत्यंत कमी वयात अध्यात्मिक शिखर गाठले होते. मानसिक आणि आत्मिक दिशेने जीवन गती झाल्याने शारीरिक स्वास्थ्य मात्र त्यांनी गमावले.

४ जुलै १९०२ रोजी रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी त्यांनी समाधी घेतली. ते अत्यंत अल्प म्हणजे फक्त ३९ वर्षे जगले. इतक्या कमी काळात त्यांनी अफाट धर्म कार्य केले. त्यांचे कार्य हे येणाऱ्या सर्व पिढ्या सदैव लक्षात ठेवतील. कन्याकुमारी येथे समुद्रात स्वामी विवेकानंद यांचे स्मारक उभे आहे.

धार्मिक वास्तू आणि आश्रम – Swami Vivekanand Ashram |

स्वामी विवेकानंद यांनी आपल्या धर्मकार्यात अनेक आश्रमांची स्थापना केली ज्याद्वारे त्यांना रामकृष्ण मिशनचे कार्य पूर्ण करता येईल. त्यामध्ये रामकृष्ण मठ, बेलूर मठ, सॅन फ्रान्सिस्को आणि न्यूयॉर्कमधील वेदांत सोसायटी, कॅलिफोर्निया मधील शांती आश्रम आणि भारतातील अद्वैत आश्रम यांचा समावेश होतो.

स्वामी विवेकानंद – मराठी माहिती थोडक्यात !
Swami Vivekanand Information in Marathi in short |

स्वामी विवेकानंद आयुष्य सार – Life of Swami Vivekanand in short

लहानपणापासून प्रखर आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्व म्हणून स्वामीजींची ओळख होती.

स्वामीजींच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त तर आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते.

शिक्षण, तर्क, संगीत अशा क्षेत्रांत पारंगत असलेला नरेंद्र हा विवेकानंद म्हणून ओळखला जाऊ लागला.

आयुष्याच्या एका टप्प्यावर परमहंस देव यांच्याशी भेट प्रसंग घडून आल्यानंतर खऱ्या आणि उदात्त जीवनाची अनुभूती स्वामीजींना आली.

स्वामी विवेकानंद हे आध्यात्मिक उन्नती साधल्यानंतर पूर्ण भारतभर आणि त्यानंतर विश्वभर धर्म आणि आध्यात्मिकतेचा प्रसार करण्यात यशस्वी ठरले.

जन्म – 12 जानेवारी 1863
समाधी – 04 जुलै 1902

स्वामी विवेकानंद यांचे अद्भुत विचार / संदेश –
Swami Vivekanand Quotes in Marathi

स्वामी विवेकानंद यांचे विचार सर्व मानवजातीला प्रेरक असे आहेत. प्रस्तुत ५ सर्वोत्तम स्वामी विवेकानंद यांचे संदेश (Top 5 Quotes by Swami Vivekanand) तुमच्या जीवनाची दिशा आणि गती बदलण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील.

१ – “उठा, जागे व्हा, ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.”

२ – “एखादा मूर्ख जगातील सर्व पुस्तके विकत घेऊ शकतो आणि ती त्याच्या लायब्ररीत देखील असतील; परंतु तो तीच पुस्तके वाचेल जी पुस्तके वाचण्यास तो सक्षम असेल.”

३ – “प्रत्येक काम या टप्प्यांमधून जावे लागते – उपहास, विरोध आणि नंतर स्वीकृती. जे लोक आपल्या वेळेच्या पुढचा विचार करतात त्यांच्याबद्दल आत्ता गैरसमज होणे नक्कीच आहे.”

४ – “आपण आत्ता जे आहोत त्यासाठी आपण स्वतः जबाबदार आहोत आणि आपण जे काही बनू इच्छितो ते बनण्याची शक्ती आपल्यात असते. जर आपण आत्ता जसे आहोत ते आपल्या स्वतःच्या भूतकाळातील क्रियांचा परिणाम झाला असेल तर भविष्यात आपल्याला जे काही हवे आहे ते आपल्या सध्याच्या कृतीतून तयार केले जाऊ शकते. त्यामुळे आपल्याला माहीत असायला हवे की आपली कृती कशी असावी.”

५ – “एका वेळी एक गोष्ट करा आणि ते करत असताना इतर सर्व गोष्टी वगळून आपले सर्व अस्तित्व त्या गोष्टीत ओतून द्या.”

राष्ट्रीय युवक दिवस / स्वामी विवेकानंद जयंती – १२ जानेवारी | National Youth Day / Swami Vivekanand Jayanti |

भारतात १२ जानेवारी या दिवशी म्हणजेच स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनी त्यांच्या स्मरणार्थ प्रत्येक वर्षी “राष्ट्रीय युवक दिवस” म्हणून साजरा केला जातो.

संयुक्त राष्ट्र संघाने १९८४ या वर्षाला “आंतरराष्ट्रीय युवा वर्ष” घोषित केले त्यानुसार मग त्याचे महत्त्व जाणून भारत सरकारने त्याच वर्षीपासून १२ जानेवारी या दिवशी राष्ट्रीय युवक दिवस साजरा करण्यात येईल, अशी घोषणा केली.

स्वामी विवेकानंद यांचे कार्य हे सर्व युवकांना प्रेरक असल्याने भारतीय युवाशक्ती धर्म, देश, अध्यात्म, अशा उदात्त दिशांनी प्रवाहित होण्यासाठी त्यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय युवक दिवस साजरा करण्यात येतो.

खालील लेखामध्ये राष्ट्रीय युवक दिवस – १२ जानेवारी (National Youth Day) कसा साजरा केला जातो याबद्दल अधिक माहिती देण्यात आलेली आहे.

वाचकांसाठी थोडेसे –

तुम्हाला स्वामी विवेकानंद मराठी माहिती (Swami Vivekanand Information In Marathi) कशी वाटली? त्याबद्दल तुमचा अभिप्राय नक्की कळवा. या लेखाबद्दल काही सूचना असल्यास नक्की कळवा… धन्यवाद!

स्वामी विवेकानंद हे थोर पुरुष होते. त्यांनी मानवी गुण जपत जी अध्यात्मिक प्रगती साधली त्यामुळे आपण सर्वजण त्यांना पुजतो. समाजातील सर्व घटकांना त्यांच्याबद्दल आदर आहे. स्वामी विवेकानंद माहिती हा लेख संदर्भ लेखन आहे आणि ते प्रकाशित (publish) करताना आम्हाला आनंद आहेच परंतु ही माहिती चुकीची आढळल्यास आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.

The post स्वामी विवेकानंद मराठी माहिती | Swami Vivekananda Information In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/swami-vivekanand-information-in-marathi/feed/ 1 1922
स्वामी विवेकानंद मराठी भाषण ! Swami Vivekanand Speech in Marathi । https://dailymarathinews.com/swami-vivekanand-speech-in-marathi/ https://dailymarathinews.com/swami-vivekanand-speech-in-marathi/#comments Sat, 25 Jan 2020 06:36:19 +0000 https://dailymarathinews.com/?p=1287 भारतीय इतिहासाला आपल्या कर्तुत्वाने गाजवून सोडणारे तसेच पूर्णपणे अध्यात्म क्षेत्रात प्रगती साधणारे देदीप्यमान व ज्वलंत व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद! त्यांचे जीवन खूपच प्रेरणादायी आहे. त्यांनी ...

Read moreस्वामी विवेकानंद मराठी भाषण ! Swami Vivekanand Speech in Marathi ।

The post स्वामी विवेकानंद मराठी भाषण ! Swami Vivekanand Speech in Marathi । appeared first on Daily Marathi News.

]]>
भारतीय इतिहासाला आपल्या कर्तुत्वाने गाजवून सोडणारे तसेच पूर्णपणे अध्यात्म क्षेत्रात प्रगती साधणारे देदीप्यमान व ज्वलंत व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद! त्यांचे जीवन खूपच प्रेरणादायी आहे. त्यांनी सांगितलेले विचार आणि जीवनातील मार्ग आजच्या पिढीला खूप मौल्यवान आहेत. प्रस्तुत लेखात आम्ही स्वामी विवेकानंद मराठी भाषण (Swami Vivekanand Speech in Marathi) दिलेले आहे. या भाषणाचा विद्यार्थ्यांना खूपच फायदा होईल.

Swami Vivekanand Speech । स्वामी विवेकानंद भाषण

मनुष्य जीवनात जेवढे उन्नत होता येऊ शकेल तेवढे होण्याचा प्रयत्न तेवढे उन्नत होण्याचा प्रयत्न करणारे, हिंदू धर्माची निष्ठा शेवटपर्यंत पाळणारे, हिंदू धर्माचा प्रचार पूर्ण विश्वात करणारे असे हे स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी झाला. स्वामी विवेकांनद यांचा खरं नाव होतं नरेंद्र विश्वनाथ दत्त. लहानपणापासून विवेकानंदांना सद्सद्विवेकबुद्धी आणि अध्यात्माचे संस्कार मिळाले होते.

प्रत्येक गोष्टीला सहजासहजी न मानता त्याच्यावर सारासार विचार करून, बुद्धीला पटेल असेच कर्म स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत होते. रामकृष्ण परमहंस यांचे परमशिष्य होते. सत्याच्या शोधात असताना विवेकानंदांना अनेक प्रश्न पडायचे. या सर्व प्रश्नांचे उत्तर स्वतःमध्ये शोधण्याचा सल्ला रामकृष्ण परमहंस यांनी विवेकानंदांना दिला. यानंतर खरी त्यांची अध्यात्मक प्रगती झाली.

रामकृष्ण परमहंस परमोच्च शिखरावर असले तरी त्यांना ज्ञात असलेले सत्य आणि हिंदूधर्म जगापर्यंत पोहोचवायचा होता, याचे खरे काम विवेकानंदांनी केले. ” रामकृष्ण मिशन ” स्थापन करून पूर्ण भारतात आणि विश्वात सत्याचा व धर्माचा प्रचार केला. योग आणि वेदांचा प्रचार खऱ्या अर्थाने पूर्ण जगात खूपच कमी वेळेत स्वामी विवेकानंदांनी केला. हिंदूधर्म म्हणजे नुसते पारंपारिक ग्रंथ नसून अखिल मानव जातीने अनुभवलेले अध्यात्मातील परमोच्च शिखर आहे असे विवेकानंदांचे म्हणणे होते.

विवेकानंदांचे वक्तृत्वावर बऱ्यापैकी प्रभुत्व होते त्यांची भाषणे ऐकणे म्हणजे एक अपूर्व अनुभव असे. शिकागो मध्ये आयोजित केलेल्या जागतिक धर्म परिषद परिषदेत हिंदू धर्माची नव्याने व्याख्या देऊन स्वतःची व भारताचे पूर्ण जगावर छाप उमटवली. हिंदू धर्माचा प्रचार करण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी कोलकाता येथे बेलूर मठाची स्थापना केली.

स्वामी विवेकांनद यांचे भारतासाठी व विश्वासाठी अतुल्य योगदान सर्वांनाच श्रुत आहे. त्यांचा तरुणांवरील प्रभाव दांडगा होता. त्यांचा जन्मदिवस हा भारतामध्ये ” राष्ट्रीय युवा दिवस ” म्हणून साजरा केला जातो. भारतीय संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचवण्यात स्वामी विवेकानंद यांचा मोलाचा सहभाग आहे. त्यांना भारताचे राष्ट्रभक्त संत म्हणून ओळखले जायचे. त्यांची धर्मावरची पकड एवढी मजबूत होती की जीवन जगण्यातच त्यांनी धर्म दाखवून दिला.

तरुणांना विशेष मार्गदर्शन ते करत असत. भारतातील व परदेशातील तरुण वर्ग हा त्यांनी दाखवलेल्या समाज उभारणीच्या आणि राष्ट्रहिताच्या कार्यासाठी प्रेरित झाला होता. त्यांच्या अध्यात्मिक आणि जीवन सत्कर्मी लावण्याच्या कार्यावर सर्व भारतीय विश्वास ठेवून होते.

स्वामी विवेकानंद आपले कार्य करत असताना अविश्रांत परिश्रम घेतले. त्यांना चहाविषयी प्रचंड प्रेम होते. त्यांनी आपल्या आश्रमामध्ये चहा सुरूच ठेवला होता. वयाच्या ३९ व्या वर्षी त्यांना अनेक व्याधी आणि आजारांनी ग्रासले व अखेर ते ४ जुलै १९०२ रोजी अनंतात विलीन झाले. असा हा युगपुरुष, कर्मयोगी, धर्मयोगी, प्रखर हिंदुत्ववादी स्वामी विवेकानंद या महान व्यक्तीला त्रिवार अभिवादन !

स्वामी विवेकानंद भाषण (Swami Vivekanand Speech in Marathi) तुम्हाला कसे वाटले त्याचा अभिप्राय नक्की कळवा…..

स्वामी विवेकानंद निबंध .

The post स्वामी विवेकानंद मराठी भाषण ! Swami Vivekanand Speech in Marathi । appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/swami-vivekanand-speech-in-marathi/feed/ 1 1287