Swami Vivekanand Speech Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Mon, 11 Jan 2021 22:59:33 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 Swami Vivekanand Speech Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 स्वामी विवेकानंद मराठी भाषण ! Swami Vivekanand Speech in Marathi । https://dailymarathinews.com/swami-vivekanand-speech-in-marathi/ https://dailymarathinews.com/swami-vivekanand-speech-in-marathi/#comments Sat, 25 Jan 2020 06:36:19 +0000 https://dailymarathinews.com/?p=1287 भारतीय इतिहासाला आपल्या कर्तुत्वाने गाजवून सोडणारे तसेच पूर्णपणे अध्यात्म क्षेत्रात प्रगती साधणारे देदीप्यमान व ज्वलंत व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद! त्यांचे जीवन खूपच प्रेरणादायी आहे. त्यांनी ...

Read moreस्वामी विवेकानंद मराठी भाषण ! Swami Vivekanand Speech in Marathi ।

The post स्वामी विवेकानंद मराठी भाषण ! Swami Vivekanand Speech in Marathi । appeared first on Daily Marathi News.

]]>
भारतीय इतिहासाला आपल्या कर्तुत्वाने गाजवून सोडणारे तसेच पूर्णपणे अध्यात्म क्षेत्रात प्रगती साधणारे देदीप्यमान व ज्वलंत व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद! त्यांचे जीवन खूपच प्रेरणादायी आहे. त्यांनी सांगितलेले विचार आणि जीवनातील मार्ग आजच्या पिढीला खूप मौल्यवान आहेत. प्रस्तुत लेखात आम्ही स्वामी विवेकानंद मराठी भाषण (Swami Vivekanand Speech in Marathi) दिलेले आहे. या भाषणाचा विद्यार्थ्यांना खूपच फायदा होईल.

Swami Vivekanand Speech । स्वामी विवेकानंद भाषण

मनुष्य जीवनात जेवढे उन्नत होता येऊ शकेल तेवढे होण्याचा प्रयत्न तेवढे उन्नत होण्याचा प्रयत्न करणारे, हिंदू धर्माची निष्ठा शेवटपर्यंत पाळणारे, हिंदू धर्माचा प्रचार पूर्ण विश्वात करणारे असे हे स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी झाला. स्वामी विवेकांनद यांचा खरं नाव होतं नरेंद्र विश्वनाथ दत्त. लहानपणापासून विवेकानंदांना सद्सद्विवेकबुद्धी आणि अध्यात्माचे संस्कार मिळाले होते.

प्रत्येक गोष्टीला सहजासहजी न मानता त्याच्यावर सारासार विचार करून, बुद्धीला पटेल असेच कर्म स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत होते. रामकृष्ण परमहंस यांचे परमशिष्य होते. सत्याच्या शोधात असताना विवेकानंदांना अनेक प्रश्न पडायचे. या सर्व प्रश्नांचे उत्तर स्वतःमध्ये शोधण्याचा सल्ला रामकृष्ण परमहंस यांनी विवेकानंदांना दिला. यानंतर खरी त्यांची अध्यात्मक प्रगती झाली.

रामकृष्ण परमहंस परमोच्च शिखरावर असले तरी त्यांना ज्ञात असलेले सत्य आणि हिंदूधर्म जगापर्यंत पोहोचवायचा होता, याचे खरे काम विवेकानंदांनी केले. ” रामकृष्ण मिशन ” स्थापन करून पूर्ण भारतात आणि विश्वात सत्याचा व धर्माचा प्रचार केला. योग आणि वेदांचा प्रचार खऱ्या अर्थाने पूर्ण जगात खूपच कमी वेळेत स्वामी विवेकानंदांनी केला. हिंदूधर्म म्हणजे नुसते पारंपारिक ग्रंथ नसून अखिल मानव जातीने अनुभवलेले अध्यात्मातील परमोच्च शिखर आहे असे विवेकानंदांचे म्हणणे होते.

विवेकानंदांचे वक्तृत्वावर बऱ्यापैकी प्रभुत्व होते त्यांची भाषणे ऐकणे म्हणजे एक अपूर्व अनुभव असे. शिकागो मध्ये आयोजित केलेल्या जागतिक धर्म परिषद परिषदेत हिंदू धर्माची नव्याने व्याख्या देऊन स्वतःची व भारताचे पूर्ण जगावर छाप उमटवली. हिंदू धर्माचा प्रचार करण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी कोलकाता येथे बेलूर मठाची स्थापना केली.

स्वामी विवेकांनद यांचे भारतासाठी व विश्वासाठी अतुल्य योगदान सर्वांनाच श्रुत आहे. त्यांचा तरुणांवरील प्रभाव दांडगा होता. त्यांचा जन्मदिवस हा भारतामध्ये ” राष्ट्रीय युवा दिवस ” म्हणून साजरा केला जातो. भारतीय संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचवण्यात स्वामी विवेकानंद यांचा मोलाचा सहभाग आहे. त्यांना भारताचे राष्ट्रभक्त संत म्हणून ओळखले जायचे. त्यांची धर्मावरची पकड एवढी मजबूत होती की जीवन जगण्यातच त्यांनी धर्म दाखवून दिला.

तरुणांना विशेष मार्गदर्शन ते करत असत. भारतातील व परदेशातील तरुण वर्ग हा त्यांनी दाखवलेल्या समाज उभारणीच्या आणि राष्ट्रहिताच्या कार्यासाठी प्रेरित झाला होता. त्यांच्या अध्यात्मिक आणि जीवन सत्कर्मी लावण्याच्या कार्यावर सर्व भारतीय विश्वास ठेवून होते.

स्वामी विवेकानंद आपले कार्य करत असताना अविश्रांत परिश्रम घेतले. त्यांना चहाविषयी प्रचंड प्रेम होते. त्यांनी आपल्या आश्रमामध्ये चहा सुरूच ठेवला होता. वयाच्या ३९ व्या वर्षी त्यांना अनेक व्याधी आणि आजारांनी ग्रासले व अखेर ते ४ जुलै १९०२ रोजी अनंतात विलीन झाले. असा हा युगपुरुष, कर्मयोगी, धर्मयोगी, प्रखर हिंदुत्ववादी स्वामी विवेकानंद या महान व्यक्तीला त्रिवार अभिवादन !

स्वामी विवेकानंद भाषण (Swami Vivekanand Speech in Marathi) तुम्हाला कसे वाटले त्याचा अभिप्राय नक्की कळवा…..

स्वामी विवेकानंद निबंध .

The post स्वामी विवेकानंद मराठी भाषण ! Swami Vivekanand Speech in Marathi । appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/swami-vivekanand-speech-in-marathi/feed/ 1 1287