Sheila Dikshit passes away Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Sun, 21 Jul 2019 15:42:03 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 Sheila Dikshit passes away Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 शीला दीक्षित यांच्या बद्दल या गोष्टी तुम्हाला कदाचित माहिती नसतील… https://dailymarathinews.com/sheila-dikshit-passes-away/ https://dailymarathinews.com/sheila-dikshit-passes-away/#respond Sun, 21 Jul 2019 15:39:10 +0000 https://dailymarathinews.com/?p=532 दिल्ली च्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या ८१ वर्षाच्या होत्या. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असणाऱ्या शीला दीक्षित यांचा ...

Read moreशीला दीक्षित यांच्या बद्दल या गोष्टी तुम्हाला कदाचित माहिती नसतील…

The post शीला दीक्षित यांच्या बद्दल या गोष्टी तुम्हाला कदाचित माहिती नसतील… appeared first on Daily Marathi News.

]]>
दिल्ली च्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या ८१ वर्षाच्या होत्या. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असणाऱ्या शीला दीक्षित यांचा जीवन प्रवास थक्क करणारा होता. त्यांचे सामाजिक,राजकीय क्षेत्रातील काम उल्लेखनीय होते. त्यांच्या या कार्याला आमचा सलाम व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

१) शीला दीक्षित यांचा जन्म ३१ मार्च १९३८ रोजी पंजाब राज्यातील कापूरथाला का पंजाबी खत्री या
समाजात झाला. त्यांचे शालेय शिक्षण जेजस आणि मेरी कॉन्व्हेन्ट स्कूल, दिल्ली व उच्च शिक्षण दिल्ली
युनिव्हर्सिटी च्या मिरिंडा हाऊस मध्ये मास्टर ऑफ आर्ट्स झाला असून त्यांनी इतिहास या विषयांमध्ये
पदवी घेतली आहे.

२) शीला दीक्षित यांचे मूळ नाव शीला कपूर असा होता. त्यांचा विवाह प्रशासकीय अधिकारी विनोद दीक्षित
यांच्याशी झाला. विनोद दीक्षित हे माजी मंत्री व पश्चिम बंगाल चे माजी राज्यपाल उमा शंकर दीक्षित यांचे
पुत्र होते. शीला दीक्षित यांचा राजकारणात प्रवेश त्यांचे सासरे उमा शंकर दीक्षित यांच्या मुळे झाला.

३) सन १९८४ मध्ये जेव्हा राजीव गांधी पहिल्यांदा पंतप्रधान बनले तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान
मिळाले. त्या उत्तर प्रदेश मधून खासदार म्हणून पहिल्यांदा निवडून आल्या होत्या व त्यांनी पंतप्रधान
कार्यालयाचे मंत्री म्हणून काम पाहिले.

४) सन १९९८ मध्ये त्यांनी पहिल्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती व सलग ३ वेळा
म्हणजेच १५ वर्ष त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. शीला दीक्षित या दिल्लीच्या सर्वात
जास्त काळ मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या मुख्यमंत्री आहेत.

५) दिल्ली की दीदी या नावाने प्रसिद्ध असलेल्या शीला दीक्षित यांना आधुनिक दिल्लीच्या शिल्पकार
म्हंटल तर वावग ठरणार नाही. दिल्लीचे प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी त्यांनी केलेलं पर्यंत तसेच शिक्षण,
आरोग्य, वाहतूक व्यवस्था त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

६) शीला दीक्षित या सोनिया गांधी यांच्या जवळच्या सहकारी होत्या. त्यांच्या जाण्याने काँग्रेस चा भला
मोठा आघात बसलेला असून त्यांचे मोठे नुकसान झालं आहे.

दोन झाडे लावलीत तरच होईल घराची नोंदणी, केरळ मधील नगरपालिकेचा एक स्तुत्त्य उपक्रम.

The post शीला दीक्षित यांच्या बद्दल या गोष्टी तुम्हाला कदाचित माहिती नसतील… appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/sheila-dikshit-passes-away/feed/ 0 532