RTO rule Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Mon, 16 Sep 2019 11:03:22 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 RTO rule Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 आरटीओचे लक्ष; नियमांवर की लोकांच्या खिशावर! https://dailymarathinews.com/rto-new-rule/ https://dailymarathinews.com/rto-new-rule/#respond Mon, 02 Sep 2019 12:06:51 +0000 https://dailymarathinews.com/?p=919 मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज, या डिपार्टमेंट अंतर्गत नितीन गडकरी यांनी आरटीओच्या काही नवीन अटी व त्याबाबतचा मसुदा लोकसभेत सादर केला. स्पीकर ओम बिर्ला ...

Read moreआरटीओचे लक्ष; नियमांवर की लोकांच्या खिशावर!

The post आरटीओचे लक्ष; नियमांवर की लोकांच्या खिशावर! appeared first on Daily Marathi News.

]]>
मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज, या डिपार्टमेंट अंतर्गत नितीन गडकरी यांनी आरटीओच्या काही नवीन अटी व त्याबाबतचा मसुदा लोकसभेत सादर केला. स्पीकर ओम बिर्ला यांनी तो लागू केला. खूप सार्‍या नियमात म्हणजे वसूल करण्यात येणाऱ्या दंडात फेरबदल करण्यात आले आहेत. हे फेरबदल खूपच आर्थिक नुकसान करणारे आहेत.
मोटर वेहिकल अॅक्ट, १९८८ नुसार करण्यात येणारे बदल पुढीलप्रमाणे असतील. सर्वसाधारणपणे सर्वांनाच समजतील असेच काही नियम व त्याचे दंड याबाबत माहिती दिलेली आहे.

१. सीट बेल्ट
जर आपण फोर व्हीलर कार वापरत असाल तर आपल्यासाठी सीट बेल्ट लावणे सक्तीचे झाले आहे, असेच समजावे. कारण याचा दंड सेक्शन १९४(ब) नुसार तब्बल ₹ १००० एवढा आकारण्यात येईल.

२. टू व्हीलर ओवरलोडिंग-
टू व्हीलर वर जर तीन किंवा त्यापेक्षा जास्त जण प्रवास करत असतील तर त्याला टू व्हीलर ओवरलोडींग नामक सेक्शन १९४ (क) याअंतर्गत तब्बल ₹२००० दंड आकारण्यात आला आहे. तसेच आपले ड्रायव्हर लायसन्स तीन महिन्यांसाठी रद्द होऊ शकते.

३. स्पीडिंग किंवा रेसिंग-
जर आपण स्पीडमध्ये गाडी चालवत असाल तर सावधान! जर ट्राफिक हवालदाराने आपल्याला पकडल्यास सेक्शन १८९ अंतर्गत ₹ ५००० एवढा दंड आकारला जाऊ शकतो. स्पीड मध्ये गाडी चालवणे किंवा रेसिंग करणे हे जास्त ट्राफिक एरिया मध्ये टाळावे.

४. दारू पिऊन गाडी चालवणे-
दारूचा एवढा खर्च होणार नाही, एवढा दंड आरटीओ आपल्याकडून वसूल करू शकते. यामुळे जर आपण दारू पिऊन गाडी चालवत असाल तर सावधान! कारण सेक्शन १८५, ड्रंक न ड्रायव्हिंग नामक या कायद्यांतर्गत आपल्याकडून तब्बल ₹१०००० दंड म्हणून वसूल केले जाऊ शकतात.

५. लायसन्स शिवाय गाडी चालवणे-
१८ वर्षे पूर्ण असतील आणि जर लायसन्स नसेल तर त्वरित लायसन्स काढून घ्या. कारण यापुढे जेवढा लायसन्स काढण्यासाठी खर्च येत नाही तेवढा लायसन्स नसल्यावर दंड भरावा लागू शकतो. विदाऊट लायसन्स, सेक्शन १८१ या कायद्याअंतर्गत तब्बल ₹५००० एवढा दंड आपल्याकडून वसूल केला जाऊ शकतो.

६. इन्शुरन्स नसणे-
जर गाडीचा इन्शुरन्स नसेल ड्रायव्हिंग विदाऊट इन्शुरन्स,सेक्शन १९६ अंतर्गत तब्बल ₹२००० दंड भरावा लागू शकतो.

लायसन्स नसल्याचा दंड म्हणजे एखादी नवीन गाडी डाऊन पेमेंट वर घेणे असेच होऊन बसले आहे. ट्राफिक हवालदार व आरटीओचे टार्गेट यांचा समन्वय पाहता इतकी रक्कम वसूल करणे शक्य होईल की नाही हे त्यांनाच माहीत कारण काही लोकांच्या पगाराएवढी रक्कम या दंडात वसूल करण्यात येणार आहे.

जास्त टीव्ही बघत असाल तर तयार व्हा या परिणामांना सामोरे जायला…

The post आरटीओचे लक्ष; नियमांवर की लोकांच्या खिशावर! appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/rto-new-rule/feed/ 0 919