names shortlisted for Indian team coach Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Tue, 13 Aug 2019 13:57:07 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 names shortlisted for Indian team coach Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 ही सहा नावे आहेत टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत… https://dailymarathinews.com/names-shortlisted-for-indian-team-coach/ https://dailymarathinews.com/names-shortlisted-for-indian-team-coach/#comments Tue, 13 Aug 2019 04:43:46 +0000 https://dailymarathinews.com/?p=797 भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी 16 ऑगस्ट (शुक्रवार) रोजी मुलाखती घेण्यात येणार आहेत. या मुलाखती मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात होणार आहेत. यासाठी उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. ...

Read moreही सहा नावे आहेत टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत…

The post ही सहा नावे आहेत टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत… appeared first on Daily Marathi News.

]]>
भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी 16 ऑगस्ट (शुक्रवार) रोजी मुलाखती घेण्यात येणार आहेत. या मुलाखती मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात होणार आहेत. यासाठी उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. या शर्यतीत सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री, न्यूझीलंडचे माईक हेसन, ऑस्ट्रेलियाचे टॉम मूडी, रॉबिन सिंग, लालचंद राजपूत आणि वेस्ट इंडिजचे फिल सिमन्स यांचा समावेश आहे. या सर्वांना मुलाखतीची तारीख आणि वेळ सांगितली गेलीे आहे.

‘द हिंदू’ ने दिलेल्या अहवालानुसार, काही परदेशी उमेदवार वैयक्तिकरित्या बैठकीस उपस्थित राहू शकणार नाहीत. अशा स्थितीत ते व्हिडिओ कॉलद्वारे कनेक्ट केले जातील. फिल सिमन्स यांच्या दाव्याबद्दलची माहिती प्रथमच सार्वजनिक करण्यात आली आहे. ते वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तानचे प्रशिक्षक आहेत. या दोन्ही संघांनी त्यांच्या प्रशिक्षक कालखंडात बरेच यश मिळवले आहे.

तसेच अहवालानुसार मंडळाला कोचिंग पदांच्या वेगवेगळ्या पदांसाठी 2000 अर्ज प्राप्त झाले आहेत. परंतु मुख्य प्रशिक्षकासाठी केवळ काही मोठ्या नावांनी अर्ज केला आहे. तसेच शॉर्टलिस्ट केलेली नावांची यादी क्रिकेट सल्लागार समितीच्या सदस्यांना ईमेल केली गेली आहे. समितीचे सदस्य 15 ऑगस्टला मुंबईला पोहोचतील आणि योग्य उमेदवार निवडतील.

रवी शास्त्री यांची स्काईपद्वारे मुलाखत घेण्यात येणार आहे. कारण सध्या ते टीम इंडियासह वेस्ट इंडीज दौर्‍यावर आहेत. वेस्ट इंडीज आणि भारताच्या टाइम झोनमध्ये बरेच फरक आहेत, त्यामुळे रवि शास्त्री यांची मुलाखत अखेर घेण्यात येईल.

प्रशिक्षकांची निवड करण्यासाठी नेमलेल्या क्रिकेट सल्लागार समितीत विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव, माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड आणि महिला क्रिकेट संघाची पहिली कर्णधार शांता रंगस्वामी यांचा समावेश आहे. त्याचबरोबर टीम इंडियाचे मुख्य निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद आणि निवड समिती कोचिंग स्टाफच्या सदस्यांची निवड करतील.

सांगू इच्छितो की, टीम इंडियाच्या सध्याच्या कोचिंग स्टाफचा कार्यकाळ फक्त वेस्ट इंडिज दौर्‍यापर्यंतचा आहे. विश्वचषकानंतर सध्याच्या कर्मचार्‍यांना 45 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती.

परिणीती चोप्राला करायचंय मराठी चित्रपटात काम…

The post ही सहा नावे आहेत टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत… appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/names-shortlisted-for-indian-team-coach/feed/ 2 797