Mutual Fund Information In Marathi Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Mon, 02 Jan 2023 06:46:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 Mutual Fund Information In Marathi Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 म्युच्युअल फंड थोडक्यात माहिती | Mutual Fund Marathi Mahiti | https://dailymarathinews.com/mutual-fund-brief-information-mutual-fund-marathi-mahiti/ https://dailymarathinews.com/mutual-fund-brief-information-mutual-fund-marathi-mahiti/#respond Mon, 02 Jan 2023 06:45:35 +0000 https://dailymarathinews.com/?p=5271 म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे एक प्रकारचे साधन आहे जे अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे एकत्र करते

The post म्युच्युअल फंड थोडक्यात माहिती | Mutual Fund Marathi Mahiti | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा म्युच्युअल फंड (Mutual Fund Marathi Mahiti) याविषयी माहिती देणारा लेख आहे. म्युच्युअल फंडची संकल्पना आणि महत्त्व या लेखात स्पष्ट करण्यात आलेले आहे.

म्युच्युअल फंड म्हणजे काय | Mutual Fund Mhanje Kay

म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे एक प्रकारचे साधन आहे जे अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे एकत्र करते आणि त्या पैशांचा वापर स्टॉक, बाँड किंवा इतर सिक्युरिटीजचा वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ खरेदी करण्यासाठी करते.

प्रत्येक म्युच्युअल फंड व्यावसायिक फंड व्यवस्थापकाद्वारे व्यवस्थापित केला जातो, जो निधीच्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने सिक्युरिटीज खरेदी करण्यासाठी जमा केलेला पैसा वापरतो.

म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यासाठी आणि वैयक्तिक सिक्युरिटीज खरेदी न करता व्यावसायिकरित्या व्यवस्थापित गुंतवणुकीत प्रवेश करण्याचा एक सोयीस्कर मार्ग देतात.

स्टॉक फंड, बाँड फंड, मनी मार्केट फंड आणि इंडेक्स फंड यासह अनेक प्रकारचे म्युच्युअल फंड आहेत. स्टॉक फंड स्टॉकच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करतात आणि गुंतवणूकदारांना दीर्घकालीन भांडवल प्रशंसा प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवतात.

बाँड फंड बॉण्ड्सच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करतात आणि गुंतवणूकदारांना उत्पन्न आणि स्थिरता प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवतात.

मनी मार्केट फंड अल्पकालीन, उच्च-गुणवत्तेच्या कर्ज सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात आणि गुंतवणूकदारांना स्थिर परतावा आणि कमी जोखीम प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवतात.

इंडेक्स फंड S&P 500 सारख्या विशिष्ट बाजार निर्देशांकाच्या कामगिरीचा मागोवा घेतात आणि गुंतवणूकदारांना बाजाराशी जुळणारे परतावा प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवतात.

म्युच्युअल फंड सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन (SEC) द्वारे नियंत्रित केले जातात आणि गुंतवणूकदारांना व्यावसायिक व्यवस्थापन, विविधीकरण आणि समभाग सहज खरेदी आणि विक्री करण्याची क्षमता यासह अनेक फायदे देतात.

तथापि, म्युच्युअल फंडांमध्ये काही जोखीम देखील असतात, ज्यात फंडाच्या होल्डिंग्सचे मूल्य कमी होण्याची जोखीम आणि फंडाच्या खर्चामुळे गुंतवणूकदाराने मिळविलेला एकूण परतावा कमी होण्याचा धोका असतो.

तुम्हाला म्युच्युअल फंड – मराठी माहिती (Mutual Fund Marathi Mahiti) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post म्युच्युअल फंड थोडक्यात माहिती | Mutual Fund Marathi Mahiti | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/mutual-fund-brief-information-mutual-fund-marathi-mahiti/feed/ 0 5271
म्युच्युअल फंड संपूर्ण माहिती | Mutual Fund Information In Marathi https://dailymarathinews.com/mutual-fund-information-in-marathi/ https://dailymarathinews.com/mutual-fund-information-in-marathi/#respond Sun, 02 May 2021 08:21:00 +0000 https://dailymarathinews.com/?p=2229 प्रस्तुत लेखात म्युच्युअल फंड संपूर्ण माहिती (Mutual Fund Information In Marathi) देण्यात आलेली आहे. स्वतःचे पैसे योग्य पद्धतीने म्युचुअल फंडात गुंतवून आपण आपली कमाई वाढवू ...

Read moreम्युच्युअल फंड संपूर्ण माहिती | Mutual Fund Information In Marathi

The post म्युच्युअल फंड संपूर्ण माहिती | Mutual Fund Information In Marathi appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेखात म्युच्युअल फंड संपूर्ण माहिती (Mutual Fund Information In Marathi) देण्यात आलेली आहे. स्वतःचे पैसे योग्य पद्धतीने म्युचुअल फंडात गुंतवून आपण आपली कमाई वाढवू शकतो. त्याचे फायदे, तोटे आणि धोका काय असू शकतो त्याबद्दल सगळी माहिती या लेखात आहे.

म्युचुअल फंड म्हणजे काय? What Is Mutual Fund?

आपण स्वतःहून जर गुंतवणूक केली तर त्यामध्ये काहीवेळा नुकसान होऊ शकते. हीच समस्या ओळखून mutual Funds निर्माण झाले. अनुभवी गुंतवणूक करणारे व्यवस्थापक निर्माण झाले जे गुंतवणूकदारांचे पैसे वेगवेगळ्या शेअर्स आणि बॉण्डमध्ये गुंतवतात. अशा गुंतवणुकीमुळे नुकसान होण्याच्या संधी फार कमी असतात आणि जास्तीत जास्त नफा होतो.

म्युचुअल फंड सुरुवातीला गुंतवलेल्या पैशांवर एन्ट्री लोड म्हणून वसुली करतात. राहिलेली रक्कम गुंतवली जाते आणि ग्राहकांना फंड युनिट दिले जातात.

फंड व्यवस्थापक ती रक्कम विविध शेअर्समध्ये गुंतवतो. शेअर्समध्ये गुंतवणुकीची किंमत वाढली की फंड युनिटची पण किंमत वाढते. एखाद्या शेअर्सची किंमत कमी झाली तरी गुंतवणूकदाराला एकदम नुकसान सोसावे लागत नाही.

म्युचुअल फंडचा इतिहास | History Of Mutual Funds

भारत सरकार आणि भारतीय रिझर्व बॅंक यांनी एकत्रितपणे १९६३ साली “युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया” या भारतातील पहिल्या म्युचुअल फंडाची स्थापना केली.

१९८७ मध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळ तसेच इतर बॅंकांनी म्युच्युअल फंडात प्रवेश केला.

१९९३ साली म्युच्युअल फंडांसाठीचे अधिकृत नियम बनवण्यात आले.

खाजगी म्युचुअल फंडांना मान्यता देऊन नोंदणीकृत करण्यात आले.

२२ ऑगस्ट १९९५ साली ॲंम्फी (The Association of Mutual Funds in India) या म्युचुअल फंड संस्थेची स्थापना करण्यात आली.

शेअर्स आणि म्युचुअल फंडमधील फरक –
Difference Between Shares and Mutual Funds

शेअर्समधील गुंतवणूक म्हणजे आपल्याला एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करावे लागतात.
आणि म्युचुअल फंड गुंतवणुकीत आपल्याला गुंतवणुकीचे युनिट मिळतात. आपण गुंतवलेले पैसे हे वेगवेगळ्या शेअर्समधील हिस्सा असतो.

म्युचुअल फंडचे प्रकार?

म्युचुअल फंडाचे मुख्यत्वे संरचना आणि गुंतवणूक असे दोन प्रकार पडतात.

• संरचना –

संरचनेनुसार खुला (Open Ended), मर्यादित (Close Ended) आणि विनिमित (Exchange Traded) असे वर्गीकरण केले जाते.

• गुंतवणूक –

गुंतवणुकीनुसार म्युचुअल फंडाचे इक्विटी फंड (Equity Fund), डेट फंड (Debt Fund), हायब्रिड फंड (Hybrid Fund), कमोडिटी फंड (Commodity Fund) असे वर्गीकरण केले जाते.

(गुंतवणूक आणि त्याचा परतावा हा वेगवेगळ्या प्रकारे असू शकतो, त्या पद्धतीत म्युचुअल फंडाचे प्रकार पडतात. त्यामुळे म्युचुअल फंडाचे आणखी काही उपप्रकार आहेत.)

म्युचुअल फंड निगडित बाबी –

NAV (नेट एसेट वैल्यू) म्हणजे काय?

म्युचुअल फंडची किंमत म्हणजे नेट एसेट वैल्यू. ती किंमत प्रति युनिटमध्ये असते. म्युचुअल फंड त्याच्या वर्तमान नेट एसेट वैल्यू वर खरेदी केला जातो किंवा विकला जातो.

SIP (Systematic Investment Plan) म्हणजे काय?

SIP म्हणजे सिस्टीमैटिक इन्वेस्टमेंट प्लान. प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम जास्त कालावधीसाठी म्युचुअल फंडात गुंतवली जाते. अशा गुंतवणुकीला SIP म्हणतात.

म्युचुअल फंड फायदे – Mutual Fund Advantages

म्युचुअल फंडातील भांडवल वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या प्रकारे गुंतवले गेल्यामुळे नुकसानीची जोखीम कमी असते.

रक्कम काढताना गुंतवणूकदाराला त्या दिवशीच्या युनिटच्या दरानुसार रक्कम मिळते.

सामान्य गुंतवणूकदार कधीकधी नुकसान सहन करतो परंतु म्युचुअल फंड व्यवस्थापक हे अनुभवी गुंतवणूकदार असल्याने नुकसानीची शक्यता कमी असते.

म्युचुअल फंड संस्थांना सेवा, सुविधा आणि पारदर्शकता जपावीच लागते. गुंतवणूकदारांचा विश्वास वाढणे हे अशा संस्थांपुढील मुख्य उद्दिष्ट असते.

म्युचुअल फंड तोटे – Mutual Funds Disadvantages

म्युचुअल फंड सुरुवातीला गुंतवलेल्या रकमेपैकी काही रक्कम वसुली (फी) म्हणून कापून घेते. त्यामुळे गुंतवणूकदाराला मिळणारा नफा हा उरलेल्या रकमेवर असतो.

फंडातील रक्कम कोठे गुंतवली जावी यावर गुंतवणूकदाराचे नियंत्रण नसते.

म्युचुअल फंड नफा हा युनिटचा बाजारभाव जसा असेल तसा मिळत असतो त्यामुळे काहीवेळा तोटाही सहन करावा लागू शकतो.

तुम्हाला म्युच्युअल फंड संपूर्ण माहिती (Mutual Fund Information In Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की कमेंट करून कळवा…

The post म्युच्युअल फंड संपूर्ण माहिती | Mutual Fund Information In Marathi appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/mutual-fund-information-in-marathi/feed/ 0 2229