Foods high in iron Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Sat, 21 Dec 2019 04:58:12 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 Foods high in iron Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 थकवा जाणवतो? मग या पदार्थांचा करा आहारात समावेश… https://dailymarathinews.com/foods-high-in-iron/ https://dailymarathinews.com/foods-high-in-iron/#respond Sat, 21 Dec 2019 04:58:03 +0000 https://dailymarathinews.com/?p=1094 शरीरात फक्त योग्य रक्तप्रवाह आणि रक्तदाब यांची पूर्तता झाली की शरीरात ऊर्जा असल्याची जाणीव होते. परंतु रक्त, हिमोग्लोबिन कमी असल्यास आपल्याला अनेक प्रकारच्या समस्या निर्माण ...

Read moreथकवा जाणवतो? मग या पदार्थांचा करा आहारात समावेश…

The post थकवा जाणवतो? मग या पदार्थांचा करा आहारात समावेश… appeared first on Daily Marathi News.

]]>
शरीरात फक्त योग्य रक्तप्रवाह आणि रक्तदाब यांची पूर्तता झाली की शरीरात ऊर्जा असल्याची जाणीव होते. परंतु रक्त, हिमोग्लोबिन कमी असल्यास आपल्याला अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. रक्त शुद्ध आणि प्रमाणात असणे अत्यावश्यक आहे.

काही वेळा शरीरातील रक्तामधील लोहाचे प्रमाण योग्य असले तरी रक्त कमी असते अशा वेळी व्यक्ती ॲनिमियाने त्रस्त असू शकतो. शरीरातील उर्जा आणि रक्ताचे प्रमाण कमी असणे हे काही हितावह नसते. रक्तातील काही घटक कमी झाल्याने थकवा जाणवू शकतो. फक्त चौरस आहार घेतल्याने या समस्यांचा सामना आपण सहजरीत्या करू शकतो.      

रक्तवाढ आणि रक्तातील घटकांची पूर्तता करण्यासाठी खालील पदार्थांचा आहारात नक्की समावेश केला पाहिजे.

१. खजूर- याच्या दररोज सेवनाने आपण रक्तातील लोहाचे प्रमाण वाढवू शकतो. खजूर हा शक्तिवर्धक असल्याने आपल्याला आवश्यक ऊर्जेचा पुरवठा याद्वारे पूर्ण होऊ शकतो.

२. अंडी- नाश्त्यामध्ये दोन उकडलेल्या अंड्याचा समावेश हा नक्कीच लाभदायक असतो. अंड्यामध्ये प्रोटीनचे आणि लोहाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे शरीरातील जीवनसत्वांची कमतरता भरून निघते. अंड्यांचा आहारात समावेश करताना योग्य प्रकारचा व्यायाम देखील आवश्यक आहे.

३. डाळिंब- काहीजण डाळिंब खाण्याचा खूप आळस करतात परंतु एक डाळिंब खाल्ल्याने तुमच्या शरीरात आवश्यक त्या सर्व रक्त घटकांचा समावेश होत असतो. डाळिंबात अ, क आणि ई जीवनसत्त्वांचा समावेश असतो. त्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.

४. बीट- आपल्या आहारात बीट असलेच पाहिजे. कच्चे सेवन केल्यास त्याचा परिणाम शरीरावर लगेच होतो. याच्या सेवनाने रक्तातील हिमोग्लोबिन खूप प्रमाणात वाढू शकते. बीटाची कोशिंबीर किंवा बीट उकडून देखील खाल्ले जाते.

५. हिरव्या पालेभाज्या- शरीरात आवश्यक ती ऊर्जा आणि सर्व प्रकारची जीवनसत्वे ही भाज्यांमार्फत पुरवली जाऊ शकतात. लोह आणि क जीवनसत्व यांचे प्रमाण भाज्यांमध्ये अधिक असते. शरीरातील कॅल्शिअम आणि फायबर ची कमतरता भाज्यांच्या सेवनाने भरून निघू शकते.

६. सोयाबीन- सोयाबीनमध्ये जास्त प्रमाणात प्रथिने, लोह आणि फॅट भेटते. त्यामुळे शरीरात ऊर्जा आणि ताकद मिळवण्यासाठी याचे सेवन लाभदायक ठरते. सोयाबीन भाजून किंवा भिजवून खाल्ले जातात.

७. कोबी – फ्लॉवर- कोबी, फ्लॉवर आपल्याकडे खूप आवडीने खाल्ला जात नाही परंतु कोबीमुळे शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण होते. शरीरातील हाडांना मजबुती देण्याचे काम कोबी करते. कोबी हा कच्चा, शिजवून आणि सॅलडमध्ये  वापरला जातो.

हे सुद्धा वाचा- फक्त याच्या थोड्या सेवनाने होणार नाहीत कोणतेही दुर्धर आजार…

The post थकवा जाणवतो? मग या पदार्थांचा करा आहारात समावेश… appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/foods-high-in-iron/feed/ 0 1094