फक्त याच्या थोड्या सेवनाने होणार नाहीत कोणतेही दुर्धर आजार…

आजारी पडण्याआधी आजारच होऊ नये हे पाहणे कधीही चांगलेच…अशीच एक गोष्ट तुम्हाला आजार होण्यापासून दूर ठेवते, ती म्हणजे कडकनाथ कोंबडीचे मांस. कडकनाथ ही मध्यप्रदेशमधील झाबुआ जिल्ह्यातील काही आदिवासी प्रजातीमध्ये आढळणारी कोंबडीची जात आहे.

रंगाने संपूर्ण काळी असणारी ही कोंबडी आयुर्वेदिक कोंबडी म्हणून ओळखली जाते. या कोंबडीचे मांस व अंडी ही इतकी गुणकारी आहेत की अनेक दुर्धर आजारांवर कडकनाथ प्रभावशाली आहे. नियमित थोड्या थोड्या मांस सेवनाने आपण खूपशा आजारांना आपल्या सभोवती फिरकुदेखील देणार नाही.

बंगळूरू अन्न परीक्षण समितीने कडकनाथवर व अंड्यांवर केलेल्या चाचणीत असे खूप गुणधर्म आढळून आले जे कुठल्याही साधारण मांसाहारात नाहीत.

पुढील आजारांवर आहे गुणकारी

१.चरबीचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने हे चिकन खाल्ल्यावर चरबी वाढत नाही.
२. कोलेस्टेरॉलचे प्रमाण जवळजवळ ३२ mg प्रति १०० mg ( इतर मांस तुलनेत जास्त)
३. प्रोटीनचे प्रमाण २० टक्के जास्त. त्यामुळे दमा अस्थमा व टीबी या रोगात गुणकारी.
४. सर्व चयापचय व रक्ताभिसरण संस्थेचे कार्य सुरळीत चालू ठेवते म्हणून हृदयविकार व मेंदूचे विकार होण्याची शक्यता कमी.
५. रक्तदाब व मधुमेह या विकारात गुणकारी. कडकनाथ सेवनाने हे आजार नियंत्रणात ठेवले जातात.
६. मानवी शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असलेले सर्व अमिनो एसिड जसे की बी-१, बी-२, बी-६, बी-१२ यांचे प्रमाण अधिक प्रमाणात. व्हिटॅमिन ‘ सी ‘ व ‘ ई ‘ ने युक्त असे मांस.
७. मेलेनिन द्रव्य अत्याधिक असल्याने त्वचा विकार व केसांच्या समस्येपासून सुटका.

तसेच कडकनाथ कोंबडीच्या अंड्याला  ‘डायटअंडी ‘ म्हणून ओळखले जाते. असा हा परिपूर्ण आहार असलेला कडकनाथ कोंबडा एकदातरी खाऊन बघाच!

हे सुद्धा वाचा- रुग्णवाहिकेअभावी अभिनेत्रीचा मृत्यू

Leave a Comment