floods affects in kolhapur Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Sat, 24 Aug 2019 06:10:41 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 floods affects in kolhapur Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 या गोष्टीमुळे आदित्य ठाकरे यांनी जिंकली पूरग्रस्तांची मने ! https://dailymarathinews.com/aditya-thakre-meet-flood-affected-people/ https://dailymarathinews.com/aditya-thakre-meet-flood-affected-people/#respond Thu, 22 Aug 2019 02:57:03 +0000 https://dailymarathinews.com/?p=842 युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी सिंधूदुर्ग जिल्ह्यातील पूरग्रस्तांची भेट घेतली तसेच त्यांच्या पर्यंत मदत पोचली आहे की नाही याची चौकशी केली व पूरग्रस्त भागांमध्ये ...

Read moreया गोष्टीमुळे आदित्य ठाकरे यांनी जिंकली पूरग्रस्तांची मने !

The post या गोष्टीमुळे आदित्य ठाकरे यांनी जिंकली पूरग्रस्तांची मने ! appeared first on Daily Marathi News.

]]>
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी सिंधूदुर्ग जिल्ह्यातील पूरग्रस्तांची भेट घेतली तसेच त्यांच्या पर्यंत मदत पोचली आहे की नाही याची चौकशी केली व पूरग्रस्त भागांमध्ये जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूंचे वाटप झाल्यानंतर शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी कोल्हापूर तर बुधवारी सांगली व सातारा जिल्ह्यात पूरग्रस्त भागांमध्ये भेट दिली.

या चार जिल्ह्याच्या भेटीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पूरग्रस्तांची मने जिंकली. त्यांनी या आपल्या दौऱ्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. कुठे कसली कमतरता निर्माण झाली असेल तर त्याच्यावर निर्णय घेऊन ती कमतरता पूर्ण केली. त्यांनी ग्रामीण व शहरी भागात जाऊन लोकांशी चर्चा केली.

त्यांनी लोकांना आश्वस्त केले की हे सरकार आपले आहे व ही शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणें उभी आहे असेही लोकांना सांगितले. महापुराच्या आपत्तीने आपण उभे राहिलात! गणपती बाप्पा चा आशीर्वाद आपल्या पाठीशी असून तुम्ही कधीही हाक मारा शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. धर्म, जात, भाषा न पाहता प्रत्येकाला घरोघरी जाऊन मदत करू, अशा शब्दात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांची मने जिंकली.

aditya thakre

शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्त भागात शिवसहाय्य कीट चे वाटप करण्यात आले व त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे सुध्दा यावेळी वाटप करण्यात आले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसेनेच्या खासदार व आमदारांनी ज्या 22 मागण्या केल्या होत्या त्या मागण्या मुख्यमंत्री यांच्याकडून मंजूर करण्यात आल्या आहेत तसेच त्या सगळ्या मागण्यांची लवकरच पूर्तता केली जाईल असेही ते म्हणाले.

उध्दव ठाकरे यांनी केली राज ठाकरे यांची पाठराखण…ईडी च्या नोटीसीवर अशी मांडली शिवसेनेची भूमिका.

लोकांमध्ये जाऊन लोकांना मदत करणे, त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, त्यांना दिलासा देणे, त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्या साठी काय करता येईल यासाठी प्रयत्न करणे या सगळ्या गोष्टींमुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पूरग्रस्तांची मने जिंकली.

The post या गोष्टीमुळे आदित्य ठाकरे यांनी जिंकली पूरग्रस्तांची मने ! appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/aditya-thakre-meet-flood-affected-people/feed/ 0 842
कोल्हापूर,सातारा,सांगलीत महापुराने हाहाकार! https://dailymarathinews.com/floods-affects-in-kolhapursatara-and-sangali/ https://dailymarathinews.com/floods-affects-in-kolhapursatara-and-sangali/#respond Fri, 09 Aug 2019 05:28:49 +0000 https://dailymarathinews.com/?p=774 सातारा, सांगली, कोल्हापुरात अतिवृष्टी झाली असून बहुसंख्य भागात पाणी साठलेले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील बऱ्यापैकी सर्वच तालुक्यांना अतिवृष्टी चा फटका बसला असून तिथे जनजीवन विस्कळित झाले ...

Read moreकोल्हापूर,सातारा,सांगलीत महापुराने हाहाकार!

The post कोल्हापूर,सातारा,सांगलीत महापुराने हाहाकार! appeared first on Daily Marathi News.

]]>
सातारा, सांगली, कोल्हापुरात अतिवृष्टी झाली असून बहुसंख्य भागात पाणी साठलेले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील बऱ्यापैकी सर्वच तालुक्यांना अतिवृष्टी चा फटका बसला असून तिथे जनजीवन विस्कळित झाले आहे. यामध्ये कोल्हापूर शहराचा सुध्दा समावेश आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील मिरज, वाळवा, शिराळा,पलूस तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे, तर सातारा जिल्ह्यातील कराड,पाटण, महाबळेश्वर तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.

कोल्हापुरात महापूराने हाहाकार माजविला आहे. लोकांच्या घरात पाणी गेल आहे. संपूर्ण गावे ही पाण्याखाली आली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या कमतरतेमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. पुणे-बेंगलोर हायवे सुध्दा पाण्याखाली आला असून त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

शहराचा बाहेरच्या लोकांशी संपर्क तुटला आहे व पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी प्रशासन सर्वतरीने प्रयत्न करत आहे. सांगली मधील ज्या चार तालुक्यात अतिवृष्टीमुळे महापूर आला आहे त्याठिकाणी प्रशासन लोकांना सुरक्षित स्थळी हलवत आहे तसेच लोकांना जीवनावश्यक वस्तू पुरवल्या जात आहेत. याठिकाणी आज सकाळी बोट बुडून १४ नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यासाठी सरकारने प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

पाकिस्तानात गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार! असे आहे अजित डोभाल यांचें रोमांचित करणारे जीवन.

सातारा जिल्ह्यात प्रामुख्याने कराड व पाटण तालुक्यात अतिवृष्टीमुळे लोकांचे जनजीवन विस्कळित झाले आहे. पण सातारा जिल्ह्यातील परिस्थिती जरा वेगळी आहे इथे पुराबरोबरच डोंगर खचने, घरे पडणे, घरांना चिरा पडणे, भिंती पडणे, रस्ता खचणे, दरड कोसळणे, शेतजमिनीचे नुकसान होणे अशा परिस्थितीनं लोक सामोरे जात आहेत. प्रशासनाकडून यासाठी मदत पुरवण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील १२००० कुटुंबातील ५१ हजार लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले असून सांगली जिल्ह्यातील ११००० कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व बंधारे व धरणे १०० टक्के भरली असून सांगलीतील सगळे मिळून अंदाजे २५ रस्ते पाण्याखाली आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात ६ NDRF ची पथके , १ इंडियन नेव्ही चे पथक, टेरिटोरियल आर्मी ची ४ पथके, तसेच इंडियन अर्मीची काही पथके इथे बाचव कार्य करीत असून महापुरामुळे लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रशासनाला करत करावी लागत आहे. कोल्हापूर प्रमाणे सांगली जिल्ह्यातील तालुक्यात सुध्दा ही सर्व पथके तैनात करण्यात आली आहेत. सातारा जिल्ह्यातील कराड व पाटण तालुक्यात NDRF ची पथके तैनात करण्यात आली असून लोकांना सुरक्षित स्थळी हलविणे सुरू आहे.

महापूर नियंत्रित करण्यासाठी कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या मधून पाणी विसर्ग करण्यासंबंधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येदुरप्पा यांच्याशी चर्चा केली व त्यामुळे ५ लाख क्युसेस पाणी सोडण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला असून भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी सुध्दा या दोन्ही मुख्यमत्र्यांसोबत फोन वर चर्चा केली आहे व लागेल ती मदत पुरवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

The post कोल्हापूर,सातारा,सांगलीत महापुराने हाहाकार! appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/floods-affects-in-kolhapursatara-and-sangali/feed/ 0 774