early morning Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Sat, 19 Oct 2019 04:11:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 early morning Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 दिवसाची एक विधायक सुरुवात पहाटेच..! https://dailymarathinews.com/start-your-with-early-morning/ https://dailymarathinews.com/start-your-with-early-morning/#respond Sat, 19 Oct 2019 04:11:24 +0000 https://dailymarathinews.com/?p=1002 पहाटे लवकर उठणे आणि कामास लागणे याचे महत्त्व खूप आहे. तुम्ही तुमच्या जीवनात काहीही लक्ष्य ठरवले असेल त्याची सुरुवात पहाटेच करावी. सकाळची स्वच्छ व निखळ वातावरण, ...

Read moreदिवसाची एक विधायक सुरुवात पहाटेच..!

The post दिवसाची एक विधायक सुरुवात पहाटेच..! appeared first on Daily Marathi News.

]]>
पहाटे लवकर उठणे आणि कामास लागणे याचे महत्त्व खूप आहे. तुम्ही तुमच्या जीवनात काहीही लक्ष्य ठरवले असेल त्याची सुरुवात पहाटेच करावी. सकाळची स्वच्छ व निखळ वातावरण, तुमचं त्याबरोबरचं अस्तित्व हे एकरूप होणार असतं. आरोग्यात सुधारणा होते. तुमच्या कार्यात एक विधायक स्पर्श येऊ लागतो.

का उठावं पहाटे?

– तुम्ही दिवसभर ज्या लोकांच्या आणि परिस्थितीच्या संपर्कात येता, त्याचा परिणाम तुमच्यावर होत असतो. त्याची पूर्वतयारी पहाटेच करावी.

– दिवसानंतर तुम्ही तुमची ऊर्जा तपासू शकता. काम करण्याची मानसिकता नसते. पहाटेपासूनच सुरुवात केल्यास अशी समस्या जाणवणार नाही.

– रात्रीचा विश्राम आणि त्यानंतरची जाग ही सजग असते. पूर्ण अस्तित्व व पूर्ण मनाच्या शक्तिनिशी तुम्ही स्वतःला एखाद्या कार्यात झोकून देऊ शकता.

– किती विधायक तुमचा स्वभाव आहे यावरून तुम्ही ऊर्जा संचित करू शकता त्यावेळी थोडा सुद्धा व्यत्यय पहाटे नसतो.

– तुम्ही जर चालायला किंवा पळायला गेलात तर अधिकच उत्तम.

– आरोग्याची काळजी ही ज्याने त्यानेच घ्यावी. पहाटेच सुरुवात झाली तर दिवसभर वेगळा वेळ काढावा लागणार नाही.

पहाटे उठल्यावर काय करावे?

१. लिंबू पाणी (कोमट), मध प्यावे.

२. फळांचे सेवन करावे.

३. पहाटे उठल्यापासून ३ तास तरी पोटभरून न्याहरी करू नये.

४. थोडा व्यायाम, प्राणायाम, चालणे, पळणे कोणतीही शारीरिक हालचाल करू शकता.

तुमचा दिनक्रम असा पहाटे सुरू केल्यास काही दिवसातच तुम्हाला शरीरात विधायक ऊर्जेचा समावेश झालेला दिसेल. आळस दूर ठेवावा लागेल. सुरुवातीला मन स्थिर राहणार नाही पण प्रयत्न करावाच लागेल. तुम्ही जर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या जर सक्षम बनलात तर येणारे उज्ज्वल भविष्य तुमचेच असेल. 

हे सुद्धा वाचा- “विसंगाशी घडो संग…” असच काहीसं झालय भाषेचंही आपल्या.

The post दिवसाची एक विधायक सुरुवात पहाटेच..! appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/start-your-with-early-morning/feed/ 0 1002