Dr. Babasaheb ambedkar information Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Thu, 05 Dec 2019 11:21:30 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 Dr. Babasaheb ambedkar information Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महानिर्वाण दिवस तथ्य https://dailymarathinews.com/mahanirvan-diwas/ https://dailymarathinews.com/mahanirvan-diwas/#respond Thu, 05 Dec 2019 11:21:27 +0000 https://dailymarathinews.com/?p=1078 भारतीय संविधानाचे जनक, बोधिसत्व, भारतरत्न, महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा ६ डिसेंबर हा “महानिर्वाण दिन” आहे. त्यांचे बौद्ध धम्म परिवर्तन आणि त्यासाठी केलेले कार्य ...

Read moreमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महानिर्वाण दिवस तथ्य

The post महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महानिर्वाण दिवस तथ्य appeared first on Daily Marathi News.

]]>
भारतीय संविधानाचे जनक, बोधिसत्व, भारतरत्न, महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा ६ डिसेंबर हा “महानिर्वाण दिन” आहे. त्यांचे बौद्ध धम्म परिवर्तन आणि त्यासाठी केलेले कार्य हे वाखाणण्याजोगे असेच आहे.     

बुद्ध धर्म हा समानतेची वागणूक देणारा धर्म आहे आणि तो सर्व लोकांना समाविष्ट करून घेऊ शकतो अशा विचारसरणीत धम्मपरीवर्तन चक्र सुरू झाले होते. २० नोव्हेंबर १९५६ रोजी नेपाळमधील काठमांडू येथील ” वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट” च्या चौथ्या परिषदेस बाबासाहेब हजर राहिले. तेथील प्रतिनिधींसमोर त्यांनी “बुद्ध की कार्ल मार्क्स” या विषयावर मार्गदर्शन केले. भगवान बुद्धांचा मार्गच शोषण समाप्त करून एक नवी दिशा प्राप्त करून देऊ शकतो आणि या मार्गात न्याय, प्रेम, विज्ञानवाद, बंधुत्ववाद समाविष्ट आहे अशी संकल्पना या परिषदेत त्यांनी मांडली.   

काठमांडूहून मायदेशी परत येताना त्यांनी बनारस मध्ये देखील भाषणे केली. दिल्लीत विविध बौद्ध समारंभात सहभागी झाले. नंतरच्या काळात राज्यसभेच्या अधिवेशनात देखील त्यांचा सहभाग होता. ‘बुध्द आणि कार्ल मार्क्स” या पुस्तकाचा शेवटचा भाग लिहून त्यांनी पूर्ण केला. ५ डिसेंबरला त्यांनी “बुध्द आणि त्यांचा धम्म” या ग्रंथाची प्रास्ताविक आणि परिचय ही दोन प्रकरणे आणून त्याची तपासणी केली.   

६ डिसेंबर १९५६ रोजी रात्री १२:१५ वाजता दिल्लीतील निवासस्थानी त्यांचे निधन झाले. या दिवसाला “महानिर्वाण दिवस” म्हटले जाते. त्यांचे वय ६४ वर्षे व ७ महिने एवढे होते. त्यांचे पार्थिव विशेष विमानाने मुंबईला आणण्यात आले. अंत्यविधीसाठी निघालेली यात्रा ही जवळजवळ १५ लाख लोकांची होती. दादर वरून निघालेली ही यात्रा स्मशानभूमीत पोहचण्यासाठी ४ तास लागले होते. ७ डिसेंबर १९५६ रोजी ७ वा. ५० मि. त्यांच्यावर बौद्ध पद्धतींनी अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिक्षा समारंभ– उपस्थित १० लाख लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला. 

– महापंडित बौद्ध भिक्खू डॉ.आनंद कौशल्यायन यांनी त्रिशरण व पंचशील देऊन उपस्थितांना बौध्द धर्माची दिक्षा दिली.

हे सुद्धा वाचा- “विसंगाशी घडो संग…” असच काहीसं झालय भाषेचंही आपल्या.

The post महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महानिर्वाण दिवस तथ्य appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/mahanirvan-diwas/feed/ 0 1078