Chakali Recipe in Marathi Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Sat, 28 Dec 2019 12:15:10 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 Chakali Recipe in Marathi Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 Chakali Recipe in Marathi । स्वादिष्ट चकली कशी बनवाल? https://dailymarathinews.com/chakali-recipe-in-marathi/ https://dailymarathinews.com/chakali-recipe-in-marathi/#respond Sat, 28 Dec 2019 12:15:07 +0000 https://dailymarathinews.com/?p=1146 Chakali Recipe in Marathi महाराष्ट्रात असा एकही जण सापडणार नाही ज्याने कधी चकली खाल्ली नाही. दिवाळीत हमखास चकली बनवली जाते. सर्व पदार्थ गोड असताना चकली ...

Read moreChakali Recipe in Marathi । स्वादिष्ट चकली कशी बनवाल?

The post Chakali Recipe in Marathi । स्वादिष्ट चकली कशी बनवाल? appeared first on Daily Marathi News.

]]>
Chakali Recipe in Marathi

महाराष्ट्रात असा एकही जण सापडणार नाही ज्याने कधी चकली खाल्ली नाही. दिवाळीत हमखास चकली बनवली जाते. सर्व पदार्थ गोड असताना चकली हा थोडासा तिखट पदार्थ खूपच छान लागतो. चकली खूप दिवस चांगली राहत असल्याने बनवताना विशेष चवीकडे लक्ष्य द्यावे. चकलीचे आपण ४-५ प्रकार बनवू शकतो. महाराष्ट्रातील विविध भागात वेगवेगळ्या प्रकारे चकली बनवली जाते. अशी ही Chakali Recipe in Marathi तुम्हीही एकदा करून पहा.

Chakali recipe Ingredients । साहित्य :

१. तांदळाच पीठ – १ वाटी

२. चना व उडीद डाळ पीठ – १ वाटी

३. पाणी.

४. मीठ

५. जिरे १ चमचा

६. मिरची पावडर चमचा

७. हळद १ चमचा

८. तेल

९. हवे असल्यास लोणी.

Chakli Recipe in Marathi process । कृती :

१.  भांड्यात तांदूळ पीठ, चना डाळ पीठ व उडीद डाळ पीठ एकत्र मिसळून त्यात मीठ, मिरची पावडर, हळद, जिरे, आणि लोणी टाकून चांगल्या प्रकारे एकत्र करा.

२. पिठात १ वाटी पाणी टाका.

३. घट्ट पीठ मळून कणिक तयार करून घ्या.

४. कणिक आता बाजूला एका थंड कापडात गुंडाळून अर्धा तास तरी ठेवा.

५. चकली यंत्राला तेल लावून स्वच्छ करून घ्या.

६. कणिक पीठ आता चकली यंत्रात भरा. कच्च्या चकल्या बनवून घ्या. कच्च्या चकल्या बनवताना त्या तुटणार नाहीत याची काळजी घ्या. व्यवस्थित गोल आकारात तळता येतील अशा चकल्या बनवा.

७. गॅसवर किंवा शेगडीवर तेल गरम करा. झाल्यावर त्यात कच्च्या चकल्या हळुवारपणे सोडा.

८. तळताना योग्य प्रकारे काळजी घ्या. पिठाचा रंग थोडासा बदलेपर्यंत तळा.

९. चकली करपू देऊ नका. तळलेल्या चकल्या व्यवस्थित नितळू द्याव्यात जेणेकरून त्यामध्ये तेल राहणार नाही.

१०. आता चकल्या थंड झाल्यावर बंद डब्यात साठवू शकता.

टिप –

१. चना डाळ आणि उडीद डाळ या मुख्यत्वे चकली बनवताना वापरल्या जातात. परंतु चकल्या खुसखुशीत होण्यासाठी तुम्ही तांदळाच्या पिठाचा वापर करू शकता.

२. कच्च्या पिठाची मळल्यावर चव बघावी. मीठ कमी जास्त वाटत असल्यास टाकावे.

३. लाल तिखट किंवा मिरची पावडर योग्य प्रमाणात वापरावा. अती तिखट झाल्यास चकली व्यवस्थित लागत नाही.

४. तुम्ही प्रयोग म्हणून तांदूळ पिठाऐवजी गव्हाचे , नाचणीचे पीठ वापरू शकता. हे पीठ वापरल्यास थोडा सोडा मिक्स करावा.

५. आता तर चकली मसाला रेडीमेड स्वरूपात पॅकिंग केलेला मिळतो. चकलीचे पिठदेखील पॅकिंग मिळते. तुम्ही त्यापद्धतीने देखील चकली बनवू शकता.

तर अशा प्रकारे तुम्ही Chakali Recipe in Marathi बनवू शकता. तर मग घरी try करा आणि आम्हाला कंमेंट करून सांगा.

हे सुद्धा वाचा- मास वडी कशी बनवावी । Mas vadi recipe in marathi

The post Chakali Recipe in Marathi । स्वादिष्ट चकली कशी बनवाल? appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/chakali-recipe-in-marathi/feed/ 0 1146