मास वडी कशी बनवावी । Mas vadi recipe in marathi

मास वडी रेसिपी

मास वडी हि एक पारंपरिक डिश आहे जी आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो. त्यासाठी लागणारे साहित्य आणि त्याची कृती खाली दिलेली आहे. तर जास्त वेळ न करता आपण पाहुया mas vadi recipe in marathi

साहित्य:

सारणासाठी लागणारे साहित्य:

  • छोटी वाटी सुकं खोबरं-
  • खसखस- तीळ २ चमचे
  • अर्धा लसूण सोलून
  • गरम मसाला अर्धा चमचा
  • १ कांदा
  • १ चमचा लाल तिखट,
  • चिमूटभर हळद,
  • हिंग
  • ३ हिरव्या मिरच्या पेस्ट
  • २ चमचे तेल
  • चवीपुरते मीठ.

आवरणासाठी लागणारे साहित्य:

  • १ कप बेसन
  • २ चमचे तेल
  • थोडी हळद,
  • हिंग,
  • १ चमचा लाल तिखट,
  • अर्धा चमचा जिरं
  • २ चमचे लसूण पेस्ट
  • चवीपुरते मीठ

कृती:

१) सारण बनवण्यासाठी तीळ, सुकं खोबरं आणि हवी असल्यास खसखस वेगवेगळी भाजून घ्यावी. नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी.
२) कढईत तेल गरम करावे.
३) त्यात हिंग व हळद घालावे. कांदा आणि बारीक चिरलेली लसूण घालून परतावे.
४) कांदा चांगला परतून झाल्यावर काढून ठेवावा.
५) थोड्या वेळाने मिक्सरमध्ये बारीक करावा. ६) बारीक करताना लाल तिखट, गरम मसाला आणि मीठही घालावे.
७) कांद्याचे मिश्रण, तीळ, सुकं खोबऱ्याचे मिश्रण एकत्र करावे. आता आपले सारण तयार झाले.
८) आता आवरण बनवायला घ्यावे. कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरं, हिंग, हळद, लसूण पेस्ट घालून परतून घ्यावे.
९) त्यात १ कप पाणी घालावे. पाण्यात मीठ आणि लाल तिखटही घालावे. पाण्याला उकळी आली कि त्यात बेसन घालून भरभर घोटावे. गुठळ्या होवू देउ नयेत. मध्यम आचेवर २-३ वाफा झाल्या पाहिजेत. पीठ शिजले गेले पाहिजे. पिठाची चवही अधूनमधून पाहू शकता.
१०) पीठ शिजले कि थोड्यावेळाने हातानेच प्लास्टीकच्या पेपरवर मध्यमसर थापावे. यावर तयार सारणाचा पातळ थर द्यावा आणि घट्ट सुरळी करावी. शेवटचे टोक नीट चिकटवावे. वड्या कराव्यात.
११) ह्या वड्या रश्श्याबरोबर खूप छान लागतात. रस्सा हा लसूण खोबऱ्याच्या मसाल्यातला असावा.

मास वडी
मासवडी रेसिपी

Leave a Comment