best marathi books Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Thu, 09 Jan 2020 05:16:24 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 best marathi books Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 Best Marathi Books of All time | सर्वोत्तम मराठी पुस्तके आणि कादंबऱ्या https://dailymarathinews.com/best-marathi-books/ https://dailymarathinews.com/best-marathi-books/#respond Thu, 09 Jan 2020 05:16:22 +0000 https://dailymarathinews.com/?p=1168 अजरामर मराठी साहित्य किती वेळा जरी वाचले तरी कमीच पडते. अशीच काही Best Marathi books, ग्रंथ आहेत जे तुम्हाला खूप उदात्त करून जातील. ही पुस्तके ...

Read moreBest Marathi Books of All time | सर्वोत्तम मराठी पुस्तके आणि कादंबऱ्या

The post Best Marathi Books of All time | सर्वोत्तम मराठी पुस्तके आणि कादंबऱ्या appeared first on Daily Marathi News.

]]>
अजरामर मराठी साहित्य किती वेळा जरी वाचले तरी कमीच पडते. अशीच काही Best Marathi books, ग्रंथ आहेत जे तुम्हाला खूप उदात्त करून जातील. ही पुस्तके फक्त पुढच्या पिढीपर्यंत गेली की त्याचा अर्थ आणि स्पष्टीकरण बदलत जाते. समाजाला अपेक्षित अशी व्यक्तिमत्त्व आणि विचार या सर्व पुस्तकांतून मांडण्यात आला आहे.

ही पुस्तकं नवीन स्वरूपात, नव्या आवृत्तीत प्रकाशित होत राहतील परंतु त्या शब्दांचा गाभार्थ आणि स्वरूप मात्र कधीच बदलणार नाही. अशाच काही सर्वोत्तम पुस्तकांची आज आम्ही माहिती देणार आहोत. जी मराठी साहित्यात मानाचे स्थान घेऊन उभी आहेत.

Best Marathi Books (सर्वोत्तम मराठी पुस्तके)

१. युगंधर

Image result for yugandhar book

लेखक- शिवाजी सावंत

भगवान श्री कृष्ण यांच्या जीवनात एक भगवत्ता असण्याबरोबरच मानवी जीवनात असणारे सामंजस्य देखील होते. असे शिवाजी सावंत यांचे लिखाण श्री कृष्णाला आपल्यासमोर उभे करते. श्री कृष्णाच्या आयुष्यातील विविध टप्पे व्यवस्थितरीत्या मांडण्यात आलेले आहेत. प्रेम किती व्यापक असू शकते याचा सारासार विचार शिवाजी सावंत यांच्या लेखनातून मिळतो. 

२. श्रीमान योगी

Image result for श्रीमान योगी  book

• लेखक- रणजित देसाई

महाराष्ट्राचा जिवंत इतिहास म्हणजेच मराठ्यांचा इतिहास. जर काही पराक्रम आणि विक्रम प्रस्थापित झाले असतील तर ते शिवाजी महाराजांच्या काळातच झालेले आहेत. महान छत्रपती राजे शिवाजी यांचे कर्तृत्व किती अफाट होते याची जाणीव आपल्याला या ग्रंथातून करून दिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनचरित्र ” श्रीमान योगी ” या ग्रंथात मांडण्यात आले आहे.

३. मृत्युंजय

Image result for मृत्युंजय book

• लेखक- शिवाजी सावंत 

महाभारतातील कर्णाची प्रतिमा आणि व्यक्तिरेखा खूपच विधायक स्वरूपात मांडण्यात आली आहे. कर्ण महापराक्रमी, सर्वोत्तम धनुर्धर कसा बनतो आणि त्याचा महाभारतातील सहभाग हा पूर्णपणे संघर्षमय कसा होता याचे उत्तम शब्दलेखन शिवाजी सावंत यांनी केले आहे.

लहानपणापासूनची अवहेलना, युद्धकला, मित्रप्रेम आणि कुटुंबातील नात्यातील गुंतागुंत यामध्ये घडलेले त्याचे आयुष्य व त्याचा सत्याप्रती असलेला विश्वास ” मृत्युंजय ” कादंबरीत मांडला गेला आहे. असा हा ‘ दानवीर कर्ण ‘ वाचकाला खूपच भावतो. 

४. पानिपत 

Image result for पानिपत  book

• लेखक- विश्वास पाटील

मराठे आणि अफगाणी सम्राट अब्दाली यांच्यातील युद्ध व त्याची कहाणी विश्वास पाटील यांनी “पानिपत” या कादंबरीत मांडली आहे. दिल्लीजवळील पानिपत नावाच्या ठिकाणी झालेले हे युद्ध व त्याची रोचकता ही लेखकाने पूर्णपणे अभ्यास करून मांडली आहे. आपण कादंबरी वाचताना त्या काळाशी समरस होऊ शकतो. 

 ५. राधेय 

Image result for राधेय  book

• लेखक- रणजित देसाई 

कर्ण जरी कर्तव्याचे पालन करण्यात समर्थ असला तरी त्याची निवड आणि निर्णय हेच त्याच्या लयाला कारणीभूत ठरतात. जीवनाचे ध्येय जाणून न घेता कर्तव्यात स्वतःला बांधून घेऊन समतोल जीवन न जगता फक्त महत्वकांक्षी जीवन जगण्याकडे कल असणारा राधेय कर्ण सामंजस्य दाखवण्यात कसा अपयशी ठरतो याचे वर्णन “राधेय” या कादंबरीत करण्यात आले आहे.

आलेले पेचप्रसंग, अडचणी व आपला प्रतिसाद कसा बुद्धिमान पूर्ण असावा व परिणामांना सामोरे जाण्याची कुवत सुद्धा असली पाहिजे. याची जाणीव रणजित देसाई वाचकांना व युद्धकारांना करवून देतात.

६. महानायक

Image result for महानायक book

• लेखक- विश्वास पाटील.

सुभाषचंद्र बोस यांचे जीवन म्हणजे एक संघर्षच होता. नायक आणि महानायक यातील फरक आपल्याला जसा शब्दशः समजतो तसेच आपल्या कादंबरीचा महानायक विश्वास पाटील सुभाषचंद्र बोस यांना बनवतात. भारत स्वतंत्र व्हावा याचा ध्यास एखाद्याला किती असू  शकतो याची प्रचिती आपल्याला या कादंबरीतून येते.

बुद्धीची प्रखरता, संघर्षाची जाणीव, चिकाटी या गुणांचे नेतृत्व म्हणजे सुभाषचंद्र बोस अशी मांडणी आपल्याला विश्वास पाटील यांच्या लेखणीतून आपल्याला जाणवते.

७. कोसला

Image result for कोसला book

• लेखक- भालचंद्र नेमाडे

कथेचा नायक पांडुरंग सांगवीकर याचे आयुष्य कसे काळानुरूप बदलत जाते. याचे ज्वलंत कथन भालचंद्र नेमाडे यांनी आपल्या “कोसला” या कादंबरीत केलेले आहे. एक युवक आपली स्वप्ने आणि आदर्श घेऊन बाहेर पडतो आणि वास्तववादी दुनियेचा त्याचा सामना होतो. याचे दीर्घ लेखन या कादंबरीत आहे. वाचनाचा एक अमूर्त अनुभव आपल्याला या कादंबरीतून मिळतो.

८. उपरा 

Image result for उपरा  book

• लेखक- लक्ष्मण माने

भटक्या विमुक्त जातींचे प्रश्न व त्यांचा दाह किती असतो याची जाणीव लक्ष्मण माने ” उपरा ” या पुस्तकातून आपल्याला करवून देतात. माणूस असूनदेखील फक्त जातीमुळे आणि परंपरेमुळे कष्टाचे जीवन जगणारे काही लोक एक विशिष्ट मर्म देऊन जातात. या पुस्तकाचे वाचन झाल्यावर अनेक प्रश्न सोडवले गेले आहेत. अनेक सामाजिक संस्थांनी यामध्ये पुढाकार घेतला.

९. दासबोध 

Image result for दासबोध book

• लेखक- समर्थ रामदास स्वामी

“दासबोध” हा ग्रंथ समर्थ रामदासांनी रचला. त्याचे लिखाण त्यांचे शिष्य कल्याण स्वामींनी केले. दासबोध या ग्रंथाचा एकूण २० दशकांमध्ये विस्तार आहे, प्रत्येक दशकात १० समास आहेत. समर्थांनी सांसारिकांच्या, साधूंच्या, सर्व मानवजातीच्या मनाला उपदेश केला आहे. मानवी जीवन कसे उन्नत प्राप्त करू शकते याचे अपूर्व वर्णन या ग्रंथात आहे. या ग्रंथाचे पारायण देखील महाराष्ट्रात होत असते. 

१०. गीता रहस्य 

Image result for गीता रहस्य  book

• लेखक- बाळ गंगाधर टिळक

गीता हा धर्मग्रंथ आयुष्याच्या शेवटी अभ्यासायचा असतो अशी समजूत खोडून काढत ” गीता रहस्य ” या ग्रंथात लोकमान्य टिळकांनी “निष्काम कर्म” हा मुद्दा पटवून सांगितला आहे. आयुष्याला कंटाळून आणि जबाबदारीला झटकून टाकून काहीजण वैराग्य निवडतात मात्र आधी कर्म करा आणि मग संन्यास घ्या असे परखड मत लोकमान्य टिळक यांचे आहे.

११. ग्रामगीता

Image result for ग्रामगीता book

लेखक- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

खूप नैसर्गिक, अध्यात्मिक आणि साधे जीवन हे गावाकडचे असते. भारत हा गावागावात वसलेला आहे. त्याची नाळ ओळखून भौतिक सुखांच्या मागे न लागता व नुसती उठाठेव न करता ग्रामीण जीवन हे कितीतरी पटीने चांगले आहे. याचेच कथन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या ” ग्रामगीता ” या ग्रंथात केले आहे.

१२. श्यामची आई

Image result for श्यामची आई book

लेखक- साने गुरुजी

स्वतःचे जीवन घडवण्यामागे आईचा किती मोलाचा वाटा होता याचे कथन साने गुरुजी आपल्या लहानपणीच्या प्रसंगातून करतात. श्यामचे निखळ जीवन वाईट प्रवृत्तींपासून अलिप्त राहावे यासाठी आईचे एक वेगळेच संस्करण होते. वेगवेगळे प्रसंग वाचकांना भावनात्मक बनवतात.” श्यामची आई ” पुस्तकातून मानवी गुण व संस्कार यांचे महत्त्व कळून येते. 

तर हि Best Marathi books of all time ची पोस्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा.

हे सुद्धा वाचा- 151+ Famous Marathi Quotes | मराठी सुविचार संग्रह

The post Best Marathi Books of All time | सर्वोत्तम मराठी पुस्तके आणि कादंबऱ्या appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/best-marathi-books/feed/ 0 1168
मराठी वाचता येतं? मग ही ५ पुस्तके तुम्हाला वाचायलाच हवीत… https://dailymarathinews.com/5-best-marathi-books/ https://dailymarathinews.com/5-best-marathi-books/#respond Wed, 21 Aug 2019 10:44:42 +0000 https://dailymarathinews.com/?p=834 “काही पुस्तके भलतीच छंद देऊन जातात. आज या तंत्रज्ञानाच्या युगात नक्कीच खूप कमी लोक वाचनाचा छंद जोपासून असतील. तरीही जर पुढच्या पिढीला वाचनाचा अभिजात अनुभव ...

Read moreमराठी वाचता येतं? मग ही ५ पुस्तके तुम्हाला वाचायलाच हवीत…

The post मराठी वाचता येतं? मग ही ५ पुस्तके तुम्हाला वाचायलाच हवीत… appeared first on Daily Marathi News.

]]>
काही पुस्तके भलतीच छंद देऊन जातात. आज या तंत्रज्ञानाच्या युगात नक्कीच खूप कमी लोक वाचनाचा छंद जोपासून असतील. तरीही जर पुढच्या पिढीला वाचनाचा अभिजात अनुभव जाणून घ्यायचा असेल आणि रोजच्या जीवनापेक्षा उदात्त अशा काही संकल्पना अनुभवायच्या असतील तर मराठी साहित्य आणि काही पुस्तके त्यासाठी खूपच उपयुक्त ठरतील

आज आम्ही अशाच प्रकारच्या ५ पुस्तकांबद्दल माहिती सांगणार आहोत जी तुम्हांला एक वेगळेच विश्व देऊन जातील. जीवनातल्या विविध पैलुंवर विचार करायला लावणारी अशी ही पुस्तके आहेत. 

१.श्यामची आई- 

Image result for shyamchi aai

आपला आईबद्दल रोजचा अनुभव तसा कुरकुर करण्यातच जात असतो. आईलाच खूप साऱ्या गोष्टी आपण समजवत असतो. आपण फक्त बुद्धीच्या पातळीवर विचार करत असतो पण तिचे काम व तिची कुटुंबात,आपल्या मुलांत असणारी समरसता आपण जाणून घेत नाही. श्याम, त्याची परिस्थिती, जीवनाची उत्सुकता, गुरुस्थानी असणारी त्याची आई,आणि मानवी संवेदनशील मन या सर्वांचे कथन “श्यामची आई ” या पुस्तकात केलेले आहे.

साने गुरुजी कसे घडले असतील याचं उत्तर या पुस्तकात सापडतं. आईने वेळोवेळी केलेले संस्कार साने गुरुजींच्या आयुष्यात कसे उपयोगी आले हे काही प्रसंगाच्या माध्यमातून योग्यरित्या मांडण्यात आले आहे. आज आपण मुलांना फक्त वरचेवर संस्कार देत असतो पण त्याचे प्रात्यक्षिक आपल्या आयुष्यात दिसत नाही, असे न करता लहान मुलांसाठी योग्य जडणघडण कशी असू शकते हे “श्यामची आई ” पुस्तक वाचल्यावरच कळते.

२.मृत्युंजय

Image result for mrutyunjay book in marathi

महाभारत म्हणजे सामाजिक, आध्यात्मिक, व राजकीय समीकरण. या तिन्ही गोष्टींचा एकत्रित मिलाप. भगवान कृष्ण केंद्रबिंदु बनून जरी उपस्थित असले तरी एकाच कुटुंबातला संघर्ष फक्त लालसेने कसा उद्भवला व कृष्णाची लीला या सर्वांना कुठल्या धार्मिक दिशेला घेऊन गेली याबद्दल आपण सर्वजण जाणतो पण ‘शिवाजी सावंत’ यांनी कर्ण या व्यक्तिरेखेला एक वेगळीच छटा देण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे.    

कर्ण महाभारतात कसा घडत गेला, जन्मतः मिळालेली दिव्यशक्ती, स्वतःचे खरे कूळ काय याची त्याला माहिती न होणे, त्याचा वेळोवेळी होणारा अपमान , त्याची सर्वोत्तम धनुर्धर होण्याची दुर्दम इच्छाशक्ती, उत्तरोत्तर आयुष्यात घेतले गेलेले निर्णय हे सर्व  त्याला कोणकोणत्या मार्गाने घेऊन जाते व त्याचे परिणाम म्हणून त्याचा झालेला अंत या सर्व घटना एकत्रितपणे “मृत्युंजय” या पुस्तकात मांडलेल्या आहेत. या कथेचा नायक कर्ण हा अनेक मानवी श्रेष्ठ गुणांचा अधिपती म्हणून वर्णिला गेला आहे.

३. कोसला-

Image result for kosala  book in marathi

खानदेशातील एका खेड्यातून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या पांडुरंग सांगवीकर या तरुणाची ही कथा आहे. शिक्षण, लग्न, अध्यात्म, राजकारण या सर्व पैलूंवर त्याचे विचार कसे बदलत जातात याचे ज्वलंत व मार्मिक कथन ‘कोसला’ या पुस्तकात भालचंद्र नेमाडे यांनी केले आहे.

सर्व स्तरांवर कार्यरत असलेल्या लोकांचा खोटेपणा, जीवनाबद्दल असलेली उदासीनता, नीतिमत्तेच्या नावाखाली असणारा भंपकपणा अशा अनेक गोष्टी कथेतल्या तरुणाला समाजापासून तोडत जातात किंबहुना तोच तुटत जातो. संवेदनशील मन असलेल्या लोकांसाठी ‘कोसला’ म्हणजे वास्तववादी समाजातील जगण शिकवून जाते.

४. छावा

Image result for chhava  book in marathi

स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे भोसले हे व्यक्तिमत्व म्हणजे अखंड ज्ञानाची गंगा, साहित्यप्रेमी, संवेदनशील तितकेच पराक्रमी, शूरवीर. दातृत्वात मिळालेली कर्तृत्वाची धार तशीच अविरत चालू ठेवत आपल्या पराक्रमाने पुरते मोगल साम्राज्य हादरवून सोडणारे संभाजी महाराज यांचे वर्णन शिवाजी सावंत यांनी ‘छावा’ या कादंबरीत केलेलं आहे.    

उद्दम पराक्रमाने शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केले ते तसेच अबाधित राखण्यासाठी त्यांच्यानंतर केले गेलेले प्रयत्न, राणी सोयराबाई व त्यांचे पुत्र राजाराम यांची स्वराज्य हाताळण्यासाठीची भूमिका, संभाजी राजांचा त्याला असलेला अजाणता विरोध, एकही युद्ध न हरता वाढवलेल स्वराज्य, ऐन  तारुण्यात आलेला भयावह मृत्यु या सर्व घटनांचे ज्वलंत कथन शिवाजी सावंत यांनी केले आहे. भाषेचा कणखरपणा आणि इतिहासाची पुनरावृत्ती मांडण्यात शिवाजी सावंत पुरेपूर यशस्वी झालेले आहेत.

५. ययाती- 

Image result for yayati  book in marathi

ययाती नामक राजा महाभारत काळात होऊन गेला. त्याच्याकडे सर्व वैभव असूनदेखील त्याची न पूर्ण होणारी कामवासना , त्या वासनेसाठी त्याने घेतलेले निर्णय त्याला खूप कष्टदायी कसे ठरतात व कर्तृत्व असूनदेखील आयुष्य कसे नर्क बनत जाते याचे सादरीकरण वि.स.खांडेकर यांनी आपल्या ‘ययाती’ या कादंबरीत केले आहे.   

स्वतः वारंवार कामवासनेकडे आकर्षित होऊन स्वतःच्या मुलाचेदेखील आयुष्य जगणाऱ्या या राजाची कथा खूपच रंजक स्वरूपात मांडली गेली आहे. या पुस्तकातून जीवन, त्यातले उपभोग व मृत्यू यांची स्पष्टोक्त अशी माहिती मिळते.   

तस बघायला गेलं तर मराठी साहित्य हे अजरामर आहे. या पाच पुस्तकांव्यतिरिक्त देखील खूप सारी पुस्तके आहेत जी तुम्हाला मराठी म्हणून जन्माला आल्यावर वाचलीच पाहिजेत.

तुमच्यामते अशी कोणती पुस्तके आहेत, ती आम्हाला कंमेंट करून जरूर कळवा. तुमचा अभिप्राय आमच्यासाठी मौल्यवान आहे.

The post मराठी वाचता येतं? मग ही ५ पुस्तके तुम्हाला वाचायलाच हवीत… appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/5-best-marathi-books/feed/ 0 834