शेवगा Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Thu, 23 Jan 2020 08:28:59 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 शेवगा Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 शेवगा औषधी गुणधर्म आणि फायदे – https://dailymarathinews.com/shevga-medicinal-benefits/ https://dailymarathinews.com/shevga-medicinal-benefits/#respond Thu, 23 Jan 2020 08:28:56 +0000 https://dailymarathinews.com/?p=1215 शेवगा ही एक शेंग भाजी आहे. दक्षिण भारतात आढळणारी ही वनस्पती खूप औषधी देखील आहे. या शेवग्याचे फायदे आणि गुणधर्म आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

Read moreशेवगा औषधी गुणधर्म आणि फायदे –

The post शेवगा औषधी गुणधर्म आणि फायदे – appeared first on Daily Marathi News.

]]>
शेवगा ही एक शेंग भाजी आहे. दक्षिण भारतात आढळणारी ही वनस्पती खूप औषधी देखील आहे. या शेवग्याचे फायदे आणि गुणधर्म आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

• शास्त्रीय नाव: मॉरिंगा ओलेफेरा
• हवामान – या झाडासाठी समशीतोष्ण आणि दमट वातावरण आवश्यक असते.
• उंची – साधारण उंची १० मी. असते.

• प्रमुख उपयोग –

  • शेवग्याच्या शेंगा कालवण, कढी, आमटी किंवा सुकी भाजीत शिजवून खाल्ल्या जातात.
  • या झाडाची पाने, फुले, फळं, साल, आणि मुळे या सर्वांचा उपयोग आयुर्वेदिक औषधे आणि नैसर्गिक उपचारात केला जातो. बियांपासून तेल सुद्धा काढले जाते आणि पानांपासून आपण भाजी बनवू शकतो.
  • शेवगा हा हाडांसाठी वरदान आहे. यामध्ये कॅल्शिअम आणि प्रथिने जास्त प्रमाणात आढळतात.तसेच कार्बोहायड्रेट, पोटॅशिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन ए, सी आणि बी अशी भरपूर जीवनसत्त्वे शेवग्यामध्ये आढळतात.
  • कोवळ्या पानांची भाजी महाराष्ट्रात मृग नक्षत्रात केली जाते. पावसाळ्याच्या सुरुवातीला शरीरातील वातदोष वाढलेला असतो म्हणून ही भाजी तेव्हा आवर्जून खाल्ली जाते.

• शेवग्याचे आयुर्वेदिक गुणधर्म –

१. हाडे मजबूत आणि निरोगी राहण्याकरिता शेवग्याची भाजी नियमित सेवन करावी.

२. वजन जास्त वाढले असल्यास शेवग्याच्या शेंगेचे सूप बनवून प्यावे. नियमित पिल्यास चरबीचे प्रमाण कमी झालेले दिसेल. याबरोबरच नियमित व्यायाम देखील करावा.

३. शारीरिक दौर्बल्य असल्यास शेवग्याच्या शेंगा नियमित आहारात घ्याव्यात.

४. तसेच संधिवात, नेत्ररोग, स्नायूंची कमजोरी या व्याधी देखील बऱ्या होतात.

५. शेवगा हा उष्ण आहे म्हणून त्याचा वात आणि कफ या प्रकारच्या विकारांवर उत्तम उपयोग होतो.

६. शेवगा हा उत्तम पाचक आहे. पोटातील पचनक्रिया व्यवस्थित होऊन रक्तप्रवाह सुधारतो.

७. शरीरावर किंवा शरीराच्या आतील भागात आलेली सूज शेवग्याच्या सालीच्या काढ्याने कमी होते.

८. डोकेदुखी व जडपणा यावर शेवगा अत्यंत गुणकारी आहे.

९. शेवगा जंतनाशक असल्याने पोटातील कृमी विष्ठेवाटे बाहेर पडतात.

१०. रक्तदोष, मुतखडा, उच्च रक्तदाब, मधुमेह या आजारांमध्ये शेवगा गुणकारी आहे.

• सौंदर्य खुलवण्यासाठी उपयोग –

अनेक जीवनसत्त्वांची कमतरता शेवगा भरून काढतो. जसे अन्न तसे मन आणि शरीर, या उक्तीप्रमाणे तुम्ही शेवगा नियमित सेवन करत असाल तर तुमचे साैंदर्य खुलवण्यात नक्कीच सहयोग होईल. त्वचाविकार, थकवा, आणि डोळ्यांचे विकार यामध्ये शेवगा नियमित सेवन करा. नक्कीच लाभ होईल व शारीरिक कांती उजळेल.

हे देखील वाचा – Indurikar Maharaj Information | निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ “इंदुरीकर”

The post शेवगा औषधी गुणधर्म आणि फायदे – appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/shevga-medicinal-benefits/feed/ 0 1215
Shevga information in Marathi | शेवगा झाड माहिती आणि लागवड. https://dailymarathinews.com/shevga-information-in-marathi/ https://dailymarathinews.com/shevga-information-in-marathi/#comments Tue, 21 Jan 2020 01:19:34 +0000 https://dailymarathinews.com/?p=1212 शेवगा लागवड महाराष्ट्रात आता रुजू लागली आहे. व्यापारी दृष्टीने शेवग्याची लागवड मागील काही वर्षात शेतकऱ्यांना फायदेशीर ठरली आहे. अनेक दृष्टिकोन तपासल्यावर केली जाणारी ही लागवड ...

Read moreShevga information in Marathi | शेवगा झाड माहिती आणि लागवड.

The post Shevga information in Marathi | शेवगा झाड माहिती आणि लागवड. appeared first on Daily Marathi News.

]]>
शेवगा लागवड महाराष्ट्रात आता रुजू लागली आहे. व्यापारी दृष्टीने शेवग्याची लागवड मागील काही वर्षात शेतकऱ्यांना फायदेशीर ठरली आहे. अनेक दृष्टिकोन तपासल्यावर केली जाणारी ही लागवड कशी फायदेशीर आहे आणि शेवगा झाडाबद्दल सर्व माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. या पिकाची लागवड दक्षिण भारतात प्रामुख्याने केली जाते.

शेवगा जर तुम्ही विकत घ्यायला गेला तर त्याचे दर सुद्धा तरकारी भाजी प्रमाणे स्थिर असतात किंवा वाढतात. शेवगा हा स्थिर उत्पन्न देणारा एक मार्ग बनला आहे. आता तंत्रज्ञान आणि दळणवळण वाढल्याने तुम्ही तुमचा शेवगा मोठ्या बाजारपेठेत देखील विकू शकता.

सुधारित शेवग्याच्या जाती :

ओडिसी –
शेंगा जाड असतात. या शेंगांना बाजारभाव देखील चांगला आहे. शेंगांचे उत्पन्न तसे कमी आहे परंतु वर्षातून दोनदा बहर येतो. वर्षाला एका झाडापासून ३० किलो पर्यंत शेंगा मिळतात.

पी के एम-१ (कोईमतूर-१) आणि
पी के एम-२ (कोईमतूर-२) –
या जातीच्या शेंगा पौष्टिक असतात आणि काढणीचा काळ देखील लवकर असतो. या शेंगा तामिळनाडू कृषी विद्यापीठातर्फे प्रसारित केल्या जातात.

भाग्या (के. डी. एम.- ०१) –
या शेंगांची चव उत्तम असून २५० शेंगा प्रती झाड एका वर्षात मिळतात.कर्नाटकातील बागलकोट कृषी विद्यापीठातर्फे ही जात प्रसारित केली जाते.

कोकण रुचिरा – उत्पादन भरपूर मिळते. एका झाडापासून एका वर्षात ४० किलोपर्यंत उत्पन्न मिळते. या शेंगा कोकण कृषी विद्यापीठा तर्फे प्रसारित केल्या जातात.

• शेवगा लागवड प्रकल्प –

हा प्रकल्प तुम्हाला योग्य उत्पन्न मिळवून देईलच शिवाय शेवग्याची पाने, फुले सतत गळत असल्याने जमिनीचा कस आणि पोत टिकून रहण्यासाठी राहते. जास्त रासायनिक खते, कीटकनाशके मारायची गरज नसते. खालील मुद्दे तुम्हाला लागवडी दरम्यान उपयोगी पडतील.

१. हवामान –

तापमान ४० अंश सेल्सिअस पेक्षा जास्त नसले पाहिजे. नाहीतर फुलांची गळ मोठ्या प्रमाणात होते. या झाडास लागणाऱ्या फुलांची संख्या जास्त असते. परंतु गळण्याचे प्रमाण जास्त असल्याने तुम्हाला याची लागवड समशीतोष्ण किंवा दमट हवामानात करावी लागेल. तापमान ३५ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त नसले पाहिजे तसेच अतिथंड प्रदेशात देखील हे झाड लावू नये.

• जमीन व लागवडीचा काळ –

जमीन निवडताना जास्त काळवट जमीन निवडू नये. पाण्याचा योग्य निचरा होईल अशा प्रकारची जमीन निवडावी. जून – जुलै महिन्यात कोरडवाहू जमीन किंवा कमी पावसाच्या क्षेत्रात शेवग्याची लागवड उत्तम ठरते.

अति पावसाच्या क्षेत्रात तुम्ही ही लागवड पुढे ढकलू शकता. साधारणतः ऑगस्ट – सप्टेंबर मध्ये लागवड करून घ्यावी. उत्पन्नाच्या दृष्टीने लागवड करावयाची
असल्यास २ फूट खोल खड्डे खणावे. त्यामध्ये शेणखत आणि अन्य रासायनिक खत ( कृषी माल विक्रेता मार्गदर्शनानुसार ) टाकावे. दोन झाडांतील अंतर २.५ × २.५ मी. ठेवावे. जमिनीचा पोत चांगला असल्यास हे अंतर वाढवावे. ३.० × ३.० मी. ठेवावे.

• काढणीचा काळ

शेवगा जातीनुसार जास्तीत जास्त ५ – ६ महिन्यांत झाडाला शेंगा येतात. त्यानंतर तोडणी ३ ते ४ महिने असते. शेंगा मांसल, हिरव्यागार आणि मध्यम अवस्थेत तोडव्या. त्यांना कोवळा शेवगा म्हटले जाते. याला बाजारात मागणी देखील असते. शेंगा टिकवण्यासाठी ओल्या कापडात, पोत्यात गुंडाळून ठेवाव्या. एका वर्षात एका झाडापासून साधारणतः ३० किलोपर्यंत शेंगा मिळतात. जमीन पोषक असेल तर जास्त प्रमाणात पण शेंगा मिळू शकतात.

• घ्यावयाची काळजी – शेवगा बियाणे मिळाल्यानंतर १ महिन्याच्या आत लागवड झाली पाहिजे. प्रथमतः बियाणे छोट्या पिशवीत लावावी. रोपे छोटी असतानाच शेतात लावावी.

The post Shevga information in Marathi | शेवगा झाड माहिती आणि लागवड. appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/shevga-information-in-marathi/feed/ 1 1212