विद्या राजू Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Thu, 19 Dec 2019 08:33:41 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 विद्या राजू Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 ही सर्पमैत्रीण महिला चक्क वासावरून साप पकडते… https://dailymarathinews.com/vidya-raju/ https://dailymarathinews.com/vidya-raju/#respond Thu, 19 Dec 2019 08:33:39 +0000 https://dailymarathinews.com/?p=1089 साप शोधणे व पकडणे ही एक कलाच आहे. या कलेत अनेक निपुण असतात. त्याबाबत त्यांनी प्रशिक्षण सुद्धा घेतलेले असते. साप पकडताना अनेक प्रकारची काळजी घ्यावी ...

Read moreही सर्पमैत्रीण महिला चक्क वासावरून साप पकडते…

The post ही सर्पमैत्रीण महिला चक्क वासावरून साप पकडते… appeared first on Daily Marathi News.

]]>
साप शोधणे व पकडणे ही एक कलाच आहे. या कलेत अनेक निपुण असतात. त्याबाबत त्यांनी प्रशिक्षण सुद्धा घेतलेले असते. साप पकडताना अनेक प्रकारची काळजी घ्यावी लागते. परंतु ती काळजी घेऊन चक्क वासावरून साप पकडणारी ‘सर्पमैत्रीण’ म्हणजे केरळमधील विद्या राजू.

सापांना पकडण्यासाठी घेतलेले प्रशिक्षण हे सर्पमित्रांना वास्तविकरीत्या साप पकडताना उपयोगी येते, परंतु यासाठी ते स्वतःचा जीव धोक्यात घालत असतात. साप पकडताना त्याला शोधणेदेखील तेवढेच महत्त्वाचे असते. लोकांच्या माहितीनुसार साप इथे गेला, तिथे गेला, यावरून साप शोधावा लागतो. साप काही एकाच जागेवर थांबत नाही व लोक सांगतात तसे सर्पमित्राला अंदाज लावून साप शोधावा लागतो मात्र विद्या राजू हि सर्पमैत्रीण थोड्या वेगळ्या पद्धतीने साप पकडते तीदेखील चक्क वास घेत!

या वर्षी पावसामुळे केरळमध्ये अनेक प्रकारची नैसर्गिक हानी झालेली आहे. त्यातच वन्यजीवांचे अस्तित्व हे स्थलांतरित झाले आहे. त्यामुळे अनेक सापांनी छोट्या मोठ्या घरात आश्रय घेतला आहे. यामुळे विद्या राजू यांचे काम खूपच वाढले आहे. त्यांना दिवसातून जवळजवळ पाच तरी कॉल येतात. विद्या राजू असल्यामुळे तेथील स्थानिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. साप आहे असे कळताच विद्या राजू यांना बोलावले जाते, त्या मग वासावरून सापाच्या जागेचा माग घेतात. त्यांनी अलीकडेच एका अजगराची देखील सुटका केलेली आहे. तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. साप पकडण्याची पद्धत त्यांना नैसर्गिक मिळाल्याची त्यांचे म्हणणे आहे.

हि सर्पमैत्रीण साप पकडल्यानंतर त्याला सुरक्षित ठिकाणी सोडून देते. साप पकडण्यात विद्या राजू यांना चांगलेच कौशल्य प्राप्त झाले आहे. विद्या राजू यांचे सर्व स्थानिक खूपच आदर करतात. “एक महिला साप पकडते आणि तीदेखील वासावरून” ही बातमीच खूप विशेष आहे.

हे हि वाचा- ॲमेझॉन च्या जंगलांना वनवा, हे होतील जगावर त्याचे परिणाम…

The post ही सर्पमैत्रीण महिला चक्क वासावरून साप पकडते… appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/vidya-raju/feed/ 0 1089