उध्दव ठाकरे Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Sat, 24 Aug 2019 06:10:54 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 उध्दव ठाकरे Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 उध्दव ठाकरे यांनी केली राज ठाकरे यांची पाठराखण…ईडी च्या नोटीसीवर अशी मांडली शिवसेनेची भूमिका. https://dailymarathinews.com/shivsena-stand-on-raj-thakres-ed-notice/ https://dailymarathinews.com/shivsena-stand-on-raj-thakres-ed-notice/#respond Wed, 21 Aug 2019 14:16:44 +0000 https://dailymarathinews.com/?p=839 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचालनालयान (ईडी) ने नोटीस पाठवल्यापासून त्याचे परिणाम महाराष्ट्रभर दिसत आहेत. राज्यातील प्रत्येक ठाकरे घराण्यावर प्रेम करणारा व मनसेसैनिक हा ...

Read moreउध्दव ठाकरे यांनी केली राज ठाकरे यांची पाठराखण…ईडी च्या नोटीसीवर अशी मांडली शिवसेनेची भूमिका.

The post उध्दव ठाकरे यांनी केली राज ठाकरे यांची पाठराखण…ईडी च्या नोटीसीवर अशी मांडली शिवसेनेची भूमिका. appeared first on Daily Marathi News.

]]>
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचालनालयान (ईडी) ने नोटीस पाठवल्यापासून त्याचे परिणाम महाराष्ट्रभर दिसत आहेत. राज्यातील प्रत्येक ठाकरे घराण्यावर प्रेम करणारा व मनसेसैनिक हा या प्रकारांमुळे संतापला असून त्याचा रोष २२ ऑगस्ट रोजी निघण्याची चिन्हे दिसत आहेत.

भाजपप्रणीत सरकार हे एक प्रकारचे सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप याठिकाणी केला जात आहे. अशातच मातोश्रीवर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी या सगळ्या प्रकाराबद्दल मत व्यक्त केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, राज ठाकरे यांच्या ईडी च्या चौकशीत काहीही सापडणार नाही. त्याबरोबरच याविषयाबद्दल जास्त काही बोलण्यास त्यांनी नकार दिला.

राज ठाकरे यांना २२ ऑगस्ट रोजी हजर राहण्यासाठी ईडी ने नोटीस बजावली असून २२ ऑगस्ट रोजी शांतता पाळण्याचे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. दरम्यान मुंबई व ठाण्यातील कार्यकर्त्यांनी दोन्ही शहरे बंद ठेवण्याचे आवाहन केले होते पण राज ठाकरे यांनी त्यासाठी मज्जाव केला असून नागरिकांना त्रास होईल असा कोणताही प्रकार न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

त्यासाठी त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून जाहीर आवाहन केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडी ची नोटीस पाठवल्यापसून मनसे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले असून पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी मनसेच्या २०-२५ जणांना नोटीस पाठवली आहे.

मी योग्य वेळी बोलेनच, तुम्ही शांत रहा…राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

The post उध्दव ठाकरे यांनी केली राज ठाकरे यांची पाठराखण…ईडी च्या नोटीसीवर अशी मांडली शिवसेनेची भूमिका. appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/shivsena-stand-on-raj-thakres-ed-notice/feed/ 0 839