मराठी निबंध १० ओळी Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Tue, 13 Sep 2022 05:06:13 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 मराठी निबंध १० ओळी Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 अभियंता दिन – १० ओळी मराठी निबंध | Engineers Day 10 Lines Essay | https://dailymarathinews.com/engineer-day-10-oi-marathi-essay-engineers-day-10-lines-essay/ https://dailymarathinews.com/engineer-day-10-oi-marathi-essay-engineers-day-10-lines-essay/#respond Tue, 13 Sep 2022 05:06:10 +0000 https://dailymarathinews.com/?p=4995 या निबंधात अभियंता दिनाचे महत्त्व सांगण्यात आलेले आहे तसेच तो कधी व कसा साजरा केला जातो या मुद्द्यांची चर्चा करण्यात आलेली आहे.

The post अभियंता दिन – १० ओळी मराठी निबंध | Engineers Day 10 Lines Essay | appeared first on Daily Marathi News.

]]>
विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा मानवी जीवनात उपयोग होण्यामागे अभियंता हा एक खूप महत्त्वाचा घटक आहे. अभियंता या पदाचा पुरस्कार व्हावा आणि त्याचे महत्त्व सर्वांना समजावे यासाठी अभियंता दिन साजरा केला जातो.

प्रस्तुत लेख हा अभियंता दिन (Engineers Day Marathi Nibandh 10 Oli) या विषयावर आधारित १० ओळींचा मराठी निबंध आहे. या निबंधात अभियंता दिनाचे महत्त्व सांगण्यात आलेले आहे तसेच तो कधी व कसा साजरा केला जातो या मुद्द्यांची चर्चा करण्यात आलेली आहे.

अभियंता दिन – १० ओळी मराठी निबंध | Abhiyanta Din 10 Oli Nibandh Marathi |

१. महान भारतीय अभियंता मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनानिमित्त म्हणजे १५ सप्टेंबर या दिवशी अभियंता दिवस साजरा केला जातो.

२. जलविकास क्षेत्रातील अभियंता म्हणून एम. विश्वेश्वरय्या यांची कामगिरी ही असाधारण स्वरूपाची होती.

३. जलसिंचन, नदी – बंधारे, धरण अशा विविध प्रकारच्या प्रकल्पांतील एम. विश्वेश्वरय्या यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते.

४. कोणताही वैज्ञानिक नियम किंवा तांत्रिक शोध हा दैनंदिन जीवनात उपयोगात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अभियंते करत असतात.

५. औद्योगिक क्षेत्रात अभियंता कार्यरत असल्यामुळे तंत्रज्ञान विकास शक्य झालेला आहे.

६. अभियंत्याचे महत्त्व जाणून अभियंता दिनादिवशी सर्व अभियंत्यांचे अभिनंदन केले जाते व त्यांच्या कार्याचा पुरस्कार केला जातो.

७. अभियंता दिनादिवशी औद्योगिक क्षेत्रात सर्व अभियंत्यांना त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करून देऊन त्यांचा सन्मान केला जातो.

८. शैक्षणिक संस्था, औद्योगिक संस्था तसेच अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमध्ये अभियंता दिन हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

९. अभियंता दिनादिवशी एम. विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते आणि त्यांच्या
जीवनकार्याबद्दल विद्यार्थी भाषण व निबंध सादर करतात.

१०. अभियंता दिनादिवशी विविध सांस्कृतिक व अभियांत्रिकी उपक्रम देखील साजरे केले जातात.

तुम्हाला अभियंता दिन हा १० ओळींचा मराठी निबंध (Engineers Day 10 Lines Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post अभियंता दिन – १० ओळी मराठी निबंध | Engineers Day 10 Lines Essay | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/engineer-day-10-oi-marathi-essay-engineers-day-10-lines-essay/feed/ 0 4995
माझी आई – १० ओळी मराठी निबंध | Majhi Aai 10 Oli Nibandh Marathi | https://dailymarathinews.com/majhi-aai-10-oli-nibandh/ https://dailymarathinews.com/majhi-aai-10-oli-nibandh/#respond Sun, 05 Jun 2022 09:20:53 +0000 https://dailymarathinews.com/?p=4084 प्रत्येक लहान मुलासाठी आई म्हणजेच सर्वस्व असते. तिचा जिव्हाळा आणि आपुलकी ही प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर टिकून राहते.

The post माझी आई – १० ओळी मराठी निबंध | Majhi Aai 10 Oli Nibandh Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा माझी आई (Majhi Aai 10 Oli Nibandh Marathi) या विषयावर आधारित १० ओळींचा मराठी निबंध आहे. या निबंधात आईची महती वर्णिलेली आहे. त्याग, प्रेम, स्नेहभाव, काळजी असे अनेक गुण आईमध्ये अनुभवायला मिळतात.

प्रत्येक स्त्री ही आई झाल्यानंतर तिचे व्यक्तिमत्त्व हळूहळू असे काही बनत जाते की ती वात्सल्याचे मूर्तिमंत रूप बनते. प्रत्येक लहान मुलासाठी आई म्हणजेच सर्वस्व असते. तिचा जिव्हाळा आणि आपुलकी ही प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर टिकून राहते.

माझी आई या निबंधात तुम्हाला १० ओळींमध्ये आईचे गुणात्मक वर्णन अत्यंत स्पष्टपणे समजेल. चला तर मग पाहुयात माझी आई हा निबंध!

माझी आई निबंध मराठी १० ओळी | My Mother 10 Lines Essay In Marathi |

१. आई ही प्रत्येक व्यक्तीसाठी सर्वस्व असल्याने तिला ईश्वराचे दुसरे रूप मानले जाते.

२. माझी आई माझा खूप लाड करते, त्यामुळे माझी आई मला खूप आवडते.

३. मी, माझी बहीण आणि माझे बाबा, तिघांच्याही आवडीनिवडी आईला माहीत असल्याने ती आमच्या तिघांचा व्यवस्थित सांभाळ करते.

४. बाबा कामावर तर मी आणि माझी बहीण सकाळी शाळेत जात असल्याने आई तिघांचेही जेवण लवकर बनवते.

५. आम्ही शाळेत गेल्यावर आई घरातील व बाहेरील अशी सर्व कामे आटोपते.

६. माझ्या आईला बागकाम व शिवणकाम खूप आवडते.

७. आईच्या मेहनतीमुळे आमची बाग सदाहरित असते. सुट्टी दिवशी आम्हीही बागकामात आईची मदत करतो.

८. माझी आई समंजस आणि हसतमुख असल्याने घरी जास्त वादविवाद होतच नाहीत.

९. आमच्या भविष्याची काळजी असल्याने माझी आई नियमितपणे आमचा अभ्यास घेत असते.

१०. माझी आई ही कुटुंबात एक महत्त्वपूर्ण, प्रेमळ व सर्वांची काळजी करणारी व्यक्ती आहे.

तुम्हाला माझी आई हा १० ओळींचा मराठी निबंध (Majhi Aai 10 Oli Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post माझी आई – १० ओळी मराठी निबंध | Majhi Aai 10 Oli Nibandh Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/majhi-aai-10-oli-nibandh/feed/ 0 4084
जागतिक पर्यावरण दिन – निबंध १० ओळी | Paryavaran Din Nibandh Marathi 10 Oli | https://dailymarathinews.com/environment-day-10-lines-essay-marathi/ https://dailymarathinews.com/environment-day-10-lines-essay-marathi/#respond Sat, 04 Jun 2022 06:08:40 +0000 https://dailymarathinews.com/?p=4078 या निबंधात पर्यावरण दिनाविषयी सर्व प्रकारची प्राथमिक व मुद्देसूद माहिती देण्यात आलेली आहे.

The post जागतिक पर्यावरण दिन – निबंध १० ओळी | Paryavaran Din Nibandh Marathi 10 Oli | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा जागतिक पर्यावरण दिन (Jagatik Paryavaran Din 10 Oli Nibandh Marathi) या विषयावर आधारित १० ओळींचा मराठी निबंध आहे. या निबंधात पर्यावरण दिनाविषयी सर्व प्रकारची प्राथमिक व मुद्देसूद माहिती देण्यात आलेली आहे.

विज्ञान युग सुरू झाल्यापासून मानवाने आपल्या जीवनशैलीत कमालीचा बदल केलेला आहे. त्यामुळे निसर्ग, पर्यावरण व इतर सजीव सृष्टीवर त्याचा घातक परिणाम झालेला आहे. नैसर्गिक समस्यांची कारणे जाणून घेऊन त्यावर उपाययोजना अंमलात आणणे यासाठी सर्वप्रथम जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे.

जागतिक पर्यावरण दिनी संपूर्ण जगभरात पर्यावरणाविषयी जनजागृती केली जाते आणि वर्षभरात उपाययोजना अंमलात आणली जाते. हा दिन जागतिक स्तरावर साजरा केला जात असल्याने त्याचा परिणाम हा अत्यंत विधायक स्वरूपाचा असतो.

जागतिक पर्यावरण दिन – १० ओळी मराठी निबंध | World Environment Day 10 Lines Essay In Marathi |

१. जागतिक पर्यावरण दिन हा संपूर्ण जगभरात ५ जून रोजी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येतो.

२. भौतिक संसाधनांचा अतिवापर, निसर्गावर आक्रमण, आधुनिक जीवनशैली यांमुळे पर्यावरणामध्ये असंतुलन निर्माण झालेले आहे.

३. पर्यावरण विषयक असंतुलन व समस्यांविषयी जनजागृती होण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्रसंघाने ५ जून रोजी पर्यावरण दिन साजरा करण्याचे ठरवले.

४. दिनांक ५ जून १९७४ रोजी पहिला पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

५. विविध नैसर्गिक आपत्ती व प्रदूषणे अशा पर्यावरणीय समस्यांची कारणे व उपाय यांची जाणिव लोकांना पर्यावरण दिनी करून दिली जाते.

६. प्रत्येक वर्षी पर्यावरण दिनासाठी वेगवेगळी थीम आयोजित केली जाते.

७. पर्यावरणीय थीम म्हणजे एखादी नैसर्गिक समस्या अथवा संकल्पना लोकांसमोर स्पष्ट करून सांगितली जाते.

८. लोकांना एकदा थीमद्वारे समस्या अथवा संकल्पना समजली की ते आपापल्या देशात, प्रदेशात त्यानुसार पर्यावरण पूरक कार्य करू शकतील.

९. सध्या प्रत्येक व्यक्ती स्वतःचे पर्यावरण विषयक विचार व मत सोशल मीडियावर व्यक्त करू शकत असल्याने पर्यावरण दिन हा दिवसेंदिवस खूपच प्रसिद्ध होत चालला आहे.

१०. संपूर्ण वर्षभर पर्यावरणीय समस्येवर उपाययोजना अंमलात आणणे यासाठी पर्यावरण दिन खूप महत्त्वाचा ठरतो.

तुम्हाला जागतिक पर्यावरण दिन हा १० ओळींचा मराठी निबंध (Jagatik Paryavaran Din 10 Oli Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा..

The post जागतिक पर्यावरण दिन – निबंध १० ओळी | Paryavaran Din Nibandh Marathi 10 Oli | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/environment-day-10-lines-essay-marathi/feed/ 0 4078
मृदा प्रदूषण १० ओळी निबंध | Mruda Pradushan 10 Oli Nibandh | https://dailymarathinews.com/mruda-pradushan-10-oli-nibandh/ https://dailymarathinews.com/mruda-pradushan-10-oli-nibandh/#respond Thu, 12 May 2022 09:56:18 +0000 https://dailymarathinews.com/?p=3718 मृदा प्रदूषण (Soil Pollution) ही मागील काही वर्षांत उद्भवलेली खूपच गंभीर अशा स्वरूपाची समस्या आहे. मृदा प्रदूषण होत असल्याने जमिनीचा

The post मृदा प्रदूषण १० ओळी निबंध | Mruda Pradushan 10 Oli Nibandh | appeared first on Daily Marathi News.

]]>
मृदा प्रदूषण (Soil Pollution) ही मागील काही वर्षांत उद्भवलेली खूपच गंभीर अशा स्वरूपाची समस्या आहे. मृदा प्रदूषण होत असल्याने जमिनीचा कस हरवत चाललेला आहे. जमिनी नापीक बनत चालल्या आहेत.

मृदा प्रदूषण या १० ओळींच्या निबंधात (Mruda Pradushan 10 Oli Nibandh) मृदा प्रदूषण म्हणजे काय, मृदा प्रदूषणाची कारणे, मृदा प्रदूषण टाळण्यासाठी कोणते उपाय असू शकतील अशा विविध बाबींची चर्चा अत्यंत मुद्देसूद स्वरूपात करण्यात आलेली आहे.

मृदा प्रदूषण १० ओळी मराठी निबंध | Soil Pollution 10 Lines Essay In Marathi |

१. मृदा प्रदूषण हे जमीन व मातीचे होणारे अत्यंत गंभीर असे प्रदूषण आहे.

२. शेतजमिनीत रासायनिक खतांचा वापर आणि औद्योगिक व सार्वजनिक कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट यांमुळे मृदा प्रदूषण होत असते.

३. मृदा प्रदूषणास जलप्रदूषण व वायुप्रदूषण हे देखील अप्रत्यक्षरित्या जबाबदार आहेत.

४. मृदा प्रदूषित झाल्याने जमीन हळूहळू तिची पोषकतत्त्वे गमावून नापीक बनत जाते.

५. प्रदूषित जमिनीतून उत्पादित केलेले अन्न हे प्रदूषितच असते.

६. जमीन नापीक झाल्याने वृक्षलागवड व शेती या बाबी जवळजवळ अशक्य बनून जातात.

७. मृदा प्रदूषणामुळे जमिनीतील जीवजंतू व कीटक यांचे आयुष्य धोक्यात येते.

८. मृदा प्रदूषण रोखण्यासाठी आपल्याला जल, वायू, प्रकाश अशा प्रत्येक प्रकारच्या प्रदूषणावर आळा घालावा लागेल.

९. रासायनिक पदार्थ व कचरा यांची विल्हेवाट अत्यंत योग्य पद्धतीने करावी लागेल जेणेकरून जमिनीचे कोणतेही नुकसान होणार नाही.

१०. मृदा प्रदूषण रोखण्यासाठी सामाजिक व वैयक्तिक पातळीवर जनजागृती व सहकार्य अत्यंत आवश्यक आहे.

मृदा प्रदूषण १० ओळी निबंध (Mruda Pradushan 10 Oli Nibandh) हा लेख वाचण्यासाठी आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद…

The post मृदा प्रदूषण १० ओळी निबंध | Mruda Pradushan 10 Oli Nibandh | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/mruda-pradushan-10-oli-nibandh/feed/ 0 3718
डॉ. बाबासाहेब आंबेडकर – १० ओळी निबंध | Dr. Ambedkar 10 Oli Nibandh | https://dailymarathinews.com/dr-ambedkar-10-oli-nibandh/ https://dailymarathinews.com/dr-ambedkar-10-oli-nibandh/#respond Wed, 01 Dec 2021 09:05:36 +0000 https://dailymarathinews.com/?p=2901 प्रस्तुत लेख हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित 10 ओळींचा मराठी निबंध आहे. या निबंधात त्यांच्या जीवन कार्याविषयी अत्यंत

The post डॉ. बाबासाहेब आंबेडकर – १० ओळी निबंध | Dr. Ambedkar 10 Oli Nibandh | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Bababsaheb Ambedkar 10 Oli Nibandh) यांच्या जीवनावर आधारित 10 ओळींचा मराठी निबंध आहे. या निबंधात त्यांच्या जीवन कार्याविषयी अत्यंत मुद्देसूद पद्धतीने माहिती देण्यात आलेली आहे.

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर – १० ओळी मराठी निबंध | Dr. B. R. Ambedkar 10 Lines Essay In Marathi |

१. भारतीय संविधानाचे शिल्पकार, दलितांचे नेते, कायदेपंडित, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक थोर व्यक्तिमत्व होते.

२. डॉ. आंबेडकरांचे संपूर्ण नाव भिमराव रामजी सकपाळ असे होते. त्यांचे वडील रामजी सकपाळ हे लष्करात सुभेदार होते.

३. मध्यप्रदेशमधील महू या ठिकाणी १४ एप्रिल १८९१ रोजी आंबेडकरांचा जन्म झाला. आंबेडकर सहा वर्षांचे असताना त्यांची आई भीमाबाई यांचे निधन झाले.

४. आंबेडकरांचे माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये झाले. याच काळात त्यांचा विवाह रमाबाई यांच्याशी झाला.

५. १९१३ मध्ये आंबेडकर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेस गेले. त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात एम. ए. व पीएच. डी. ह्या पदव्या प्राप्त केल्या.

६. १९२३ साली आंबेडकर यांनी लंडन विद्यापीठाची डी. एससी. ही पदवी प्राप्त केली. भारतात माघारी आल्यानंतर त्यांनी मुंबईत वकीली सुरू केली.

७. १९२४ मध्ये दलितांच्या हक्कांसाठी डॉ. आंबेडकर यांनी ‘बहिष्कृत हितकारिणी’ ही संस्था स्थापन केली.

८. स्वतंत्र भारताच्या संविधान समितीत सभासद आणि अध्यक्षपदी राहून आंबेडकर यांनी सुमारे तीन वर्षांच्या मेहनतीनंतर संविधानाचा मसुदा तयार केला.

९. अस्पृश्यांच्या समस्या कायमच्या दूर करण्यासाठी धर्मांतर करणे आवश्यक आहे हे आंबेडकर यांनी जाणले होते. आपल्या हजारो अनुयायांसह त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला.

१०. संपूर्ण आयुष्य दलितांच्या आणि पीडितांच्या प्रश्नांसाठी लढणारा हा महामानव ६ डिसेंबर १९५६ रोजी अनंतात विलीन झाला.

तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा 10 ओळींचा मराठी निबंध (Dr. Bababsaheb Ambedkar 10 Oli Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post डॉ. बाबासाहेब आंबेडकर – १० ओळी निबंध | Dr. Ambedkar 10 Oli Nibandh | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/dr-ambedkar-10-oli-nibandh/feed/ 0 2901
दिवाळी – 10 ओळी मराठी निबंध | Diwali 10 Oli Marathi Nibandh | https://dailymarathinews.com/%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80-10-%e0%a4%93%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7/ https://dailymarathinews.com/%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80-10-%e0%a4%93%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7/#respond Wed, 27 Oct 2021 09:13:50 +0000 https://dailymarathinews.com/?p=2784 प्रस्तुत लेख हा दिवाळी 10 ओळी मराठी निबंध आहे. दिवाळी या सणाबद्दल माहिती सांगणारा हा निबंध अत्यंत मुद्देसूद वाक्यरचनेत मांडलेला आहे.

The post दिवाळी – 10 ओळी मराठी निबंध | Diwali 10 Oli Marathi Nibandh | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा दिवाळी 10 ओळी मराठी निबंध (Diwali 10 Oli Marathi Nibandh) आहे. दिवाळी या सणाबद्दल माहिती सांगणारा हा निबंध अत्यंत मुद्देसूद वाक्यरचनेत मांडलेला आहे.

दिवाळी निबंध 10 ओळी | Diwali 10 Lines Essay In Marathi |

1) भारतात सर्वच सण खूप उत्साहात आणि आनंदात साजरे केले जातात. त्यापैकीच एक प्रमुख सण म्हणजे दिवाळी!

2) दिवाळीला “दिपावली” असे देखील म्हणतात. हा सण म्हणजे दिव्यांची रोषणाई असते.

3) आश्विन महिन्याचा शेवट आणि कार्तिक महिन्याची सुरुवात, असे या सणाचे दिवस असतात.

4) धनत्रयोदशी, नरक चतुर्थी, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज असे दिवाळीचे प्रमुख दिवस साजरे केले जातात.

5) दिवाळीसाठी खाद्यपदार्थ, आकाशकंदील, रांगोळी, फटाके, सुगंधित उटणे, साबण, पणत्या इत्यादी वस्तूंची खरेदी केली जाते.

6) दिवाळी अगोदर तिखट-गोड खाद्यपदार्थ बनवले जातात. त्यामध्ये लाडू, चकल्या, शंकरपाळी, करंज्या, चिवडा असे काही मुख्य पदार्थ असतातच.

7) दिवाळीत भल्या पहाटे लवकर उठून सुगंधी उटणे लावून अभ्यंगस्नान केले जाते.

8) दिवाळीत नवीन कपडे परिधान करून फटाके वाजवणे आणि नाश्त्याला गोड-तिखट असा फराळ करणे हे सर्वांनाच आवडते.

9) घरातील मुली आणि स्त्रिया घरापुढे छानशी रांगोळी काढतात.

10) दिवाळीचा सण भरपूर आनंद, रोषणाई, सुख आणि समाधान घेऊन येत असतो.

तुम्हाला दिवाळी हा 10 ओळींचा मराठी निबंध (Diwali 10 Oli Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post दिवाळी – 10 ओळी मराठी निबंध | Diwali 10 Oli Marathi Nibandh | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80-10-%e0%a4%93%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7/feed/ 0 2784
कोरोना – १० ओळी मराठी निबंध | 10 lines Essay on Corona In Marathi https://dailymarathinews.com/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%be-10-%e0%a4%93%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7/ https://dailymarathinews.com/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%be-10-%e0%a4%93%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7/#respond Sun, 24 Oct 2021 06:33:40 +0000 https://dailymarathinews.com/?p=2741 प्रस्तुत लेख हा कोरोना 10 ओळी मराठी निबंध आहे. या निबंधात कोरोना विषाणू विषयी अत्यंत मुद्देसूद पद्धतीने माहिती दिलेली आहे.

The post कोरोना – १० ओळी मराठी निबंध | 10 lines Essay on Corona In Marathi appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा कोरोना 10 ओळी मराठी निबंध (10 lines Essay on Corona In Marathi) आहे. या निबंधात कोरोना विषाणू विषयी अत्यंत मुद्देसूद पद्धतीने माहिती दिलेली आहे.

कोरोना निबंध 10 ओळी | Corona 10 Oli Marathi Nibandh |

१. कोरोना व्हायरस हा असा विषाणू आहे ज्यामुळे कोविड – १९ हा संसर्गजन्य रोग होतो.

२. कोरोना विषाणू डिसेंबर २०१९ मध्ये चीन देशातील वुहान या शहरात आढळून आला.

३. ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होणे अशी काही कोरोनाची प्रमुख लक्षणे आहेत.

४. कोरोना विषाणूमुळे मानवी शरीरावर घातक परिणाम होऊ शकतात त्यामुळे कोरोनाची लक्षणे आढळल्यास लगेच कोरोना चाचणी करून घ्यावी.

५. कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगभरात बहुसंख्य लोक मरण पावले. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला महामारी म्हणून घोषित केले.

६. कोरोना संसर्गजन्य असल्याने तो सहज स्पर्शातून अथवा हवेतून पसरू शकतो.

७. मास्क वापरणे, सुरक्षित अंतर पाळणे आणि  वारंवार हात धुणे अशा काही सवयींनी आपण कोरोनाचा धोका कमी करू शकतो.

८. जगभरात कोरोना संक्रमित देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते.

९. लॉकडाऊन जाहीर झाले तेव्हा पोलिस, डॉक्टर आणि कोरोना स्वयंसेवक यांची कोरोना विरोधी लढाईत बहुमूल्य मदत झाली.

१०. कोरोना विषाणू अत्यंत घातक असला तरी त्यावर आता लस शोधण्यात यश आलेले आहे.

तुम्हाला कोरोना – १० ओळी मराठी निबंध (10 lines Essay on Corona In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post कोरोना – १० ओळी मराठी निबंध | 10 lines Essay on Corona In Marathi appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%be-10-%e0%a4%93%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7/feed/ 0 2741
सरदार वल्लभभाई पटेल 10 ओळी निबंध | 10 lines Marathi Essay On Vallabh Bhai | https://dailymarathinews.com/%e0%a4%b5%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%ad-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%88-%e0%a4%aa%e0%a4%9f%e0%a5%87%e0%a4%b2-10-%e0%a4%93%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7/ https://dailymarathinews.com/%e0%a4%b5%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%ad-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%88-%e0%a4%aa%e0%a4%9f%e0%a5%87%e0%a4%b2-10-%e0%a4%93%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7/#respond Fri, 22 Oct 2021 08:11:42 +0000 https://dailymarathinews.com/?p=2732 प्रस्तुत निबंध हा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित 10 ओळींचा मराठी निबंध आहे. या निबंधात त्यांच्या आयुष्यातील

The post सरदार वल्लभभाई पटेल 10 ओळी निबंध | 10 lines Marathi Essay On Vallabh Bhai | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत निबंध हा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित 10 ओळींचा मराठी निबंध (Sardar Vallabhbhai Patel 10 Lines Essay In Marathi) आहे. या निबंधात त्यांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण प्रसंग आणि घटना यांचे मुद्देसूद विश्लेषण करण्यात आलेले आहे.

सरदार वल्लभभाई पटेल 10 ओळी मराठी निबंध | Sardar Vallabh bhai Patel 10 Oli Nibandh Marathi |

1) भारतीय स्वातंत्र्य सेनानी, राजकीय नेते, समाजसेवक सरदार वल्लभ भाई पटेल यांना सर्वजण भारताचे लोहपुरुष म्हणून देखील ओळखतात.

2) वल्लभ भाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी गुजरातमधील नडियाद या ठिकाणी झाला.

3) वल्लभ भाई यांच्या वडिलांचे नाव झवेरभाई तर आईचे नाव लाडबा असे होते.

4) अगम्य कर्तुत्वाने आपला ठसा उमटविणारे वल्लभभाई हे पेशाने वकील होते.

5) गुजरातमधील खेड्यांतील लोकांना संघटित करून ब्रिटिश सत्तेविरुद्ध सत्याग्रह केला, तेव्हा ते पूर्ण राज्यात प्रसिध्द झाले.

6) वकिली करत असताना त्यांच्या जीवनावर महात्मा गांधी यांचा खूप मोठा प्रभाव पडला.

7) सरदार वल्लभभाई पटेल हे राष्ट्रीय काँग्रेसचे अग्रगण्य नेते होते. भारत छोडो आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता.

8) गृहमंत्री आणि उपपंतप्रधान असताना त्यांनी  पाकिस्तानमधून भारतात आलेल्या निर्वासितांना मोठे सहकार्य केले.

9) भारतातील पाचशेहून अधिक अर्धस्वायत्त संस्थानांचे एकसंध भारत देशात विलीनीकरण करून घेतले.

10) अशा या महान लोहपुरुषाचे १५ डिसेंबर १९५० रोजी निधन झाले. त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय एकता दिन म्हणून भारतात साजरा केला जातो.

तुम्हाला सरदार वल्लभभाई पटेल 10 ओळी मराठी निबंध (10 lines Marathi Essay On Vallabh Bhai Patel) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post सरदार वल्लभभाई पटेल 10 ओळी निबंध | 10 lines Marathi Essay On Vallabh Bhai | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%b5%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%ad-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%88-%e0%a4%aa%e0%a4%9f%e0%a5%87%e0%a4%b2-10-%e0%a4%93%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7/feed/ 0 2732
इंदिरा गांधी 10 ओळी निबंध | 10 Lines Essay On Indira Gandhi In Marathi | https://dailymarathinews.com/%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%80-10-%e0%a4%93%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf/ https://dailymarathinews.com/%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%80-10-%e0%a4%93%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf/#respond Fri, 22 Oct 2021 08:00:09 +0000 https://dailymarathinews.com/?p=2729 प्रस्तुत निबंध हा इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित 10 ओळींचा मराठी निबंध आहे. या निबंधात त्यांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण प्रसंग

The post इंदिरा गांधी 10 ओळी निबंध | 10 Lines Essay On Indira Gandhi In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत निबंध हा इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित 10 ओळींचा मराठी निबंध (Indira Gandhi 10 Lines Essay In Marathi) आहे. या निबंधात त्यांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण प्रसंग आणि घटना यांचे मुद्देसूद विश्लेषण करण्यात आलेले आहे.

इंदिरा गांधी – 10 ओळींचा मराठी निबंध | Indira Gandhi 10 Oli Marathi Nibandh |

1) भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान आणि पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधीजींचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद या शहरात झाला.

2) इंदिरा गांधी यांच्या वडिलांचे नाव जवाहरलाल नेहरू तर आईचे नाव कमला नेहरू होते.

3) इंदिराजींचे कुटुंब राजकीय घडामोडींनी वेढलेले असायचे त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वावर राजकारणाचा जोरदार प्रभाव पडला.

4) इंदिरा गांधी यांच्या पतीचे नाव फिरोजशहा गांधी असे होते तर त्यांना राजीव आणि संजय अशी दोन मुले होती.

5) लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असताना इंदिरा गांधी यांनी माहिती व नभोवाणी मंत्री हे पद सांभाळले.

6) लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर इंदिरा गांधी या भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान झाल्या.

7) शेती-उद्योग, अंतराळ संशोधन, अणुशक्ती या क्षेत्रांत भारताला पुढे नेण्यासाठी इंदिरा गांधी यांना अनेक कठोर निर्णय घ्यावे लागले.

8) इंदिरा गांधी हे एक महान महिला नेतृत्व होते. त्यांची हुशारी आणि राजकीय कार्यक्षमता याचे सर्वजण कौतुक करत असत.

9) १४ प्रमुख व्यापारी बॅंकांचे राष्ट्रीयीकरण, पोखरण येथे पहिली अणुचाचणी, ऑपरेशन ब्लू स्टार या त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना होत्या.

10) इंदिरा गांधी यांना 1971 साली भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला. 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांची हत्या करण्यात आली.

तुम्हाला इंदिरा गांधी 10 ओळींचा मराठी निबंध (Indira Gandhi 10 Lines Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post इंदिरा गांधी 10 ओळी निबंध | 10 Lines Essay On Indira Gandhi In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%80-10-%e0%a4%93%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf/feed/ 0 2729
पाण्याचे महत्त्व १० ओळी मराठी निबंध | Panyache Mahattv 10 Oli Marathi Nibandh | https://dailymarathinews.com/%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5-10-%e0%a4%93%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ac/ https://dailymarathinews.com/%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5-10-%e0%a4%93%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ac/#respond Tue, 05 Oct 2021 10:47:31 +0000 https://dailymarathinews.com/?p=2621 प्रस्तुत लेख हा पाण्याचे महत्त्व स्पष्ट करणारा १० ओळी मराठी निबंध आहे. अत्यंत मुद्देसूद आणि मोजक्या शब्दांत हा निबंध मांडलेला आहे.

The post पाण्याचे महत्त्व १० ओळी मराठी निबंध | Panyache Mahattv 10 Oli Marathi Nibandh | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा पाण्याचे महत्त्व स्पष्ट करणारा १० ओळी मराठी निबंध (Panyache Mahattv 10 Oli Marathi Nibandh) आहे. अत्यंत मुद्देसूद आणि मोजक्या शब्दांत हा निबंध मांडलेला आहे.

पाण्याचे महत्त्व – १० ओळी मराठी निबंध | 10 Lines Essay on Importance Of Water in Marathi |

१. मानवी जीवनात आणि संपूर्ण सजीव सृष्टीसाठी पाण्याचे महत्त्व अपरंपार आहे.

२. वृक्ष, पशुपक्षी आणि मानव अशा सर्व प्रकारच्या सजीवांसाठी पाण्याचा उपयोग होत असतो.

३. पाणी हे पंचमहाभूतांपैकी एक तत्त्व आहे. निसर्गात त्याचे अस्तित्व विपुल प्रमाणात आहे.

४. आपण अन्न ग्रहण न करता काही दिवस जगू शकतो पण पाण्याशिवाय जगू शकत नाही.

५. शरीरशुद्धी आणि इतर शारीरिक प्रक्रिया पाण्यामुळे सुरळीत पार पडतात.

६. माणूस अन्ननिर्मिती करण्यासाठी शेती करत असतो. संपूर्ण शेतीची कामे पाण्यावरच अवलंबून आहेत.

७. गरम, कोमट आणि थंड अशा विविध तापमान असणाऱ्या पाण्याचा उपयोग माणूस आवश्यकतेनुसार करत असतो.

८. दैनंदिन कामे जसे की कपडे धुणे, जेवण बनवणे, घर व परिसर स्वच्छ करणे यासाठी पाण्याचा उपयोग होत असतो.

९. पाण्याचा उपयोग अत्यंत काळजीपूर्वक करावा. अनेक रोग पाण्यामुळे बरे होऊ शकतात तर अनेक रोगांची लागण देखील पाण्यामुळेच होत असते.

१०. पाण्याचे उपयोग आणि महत्त्व समजून घेऊन पाणी हेच जीवन आहे असे आपण म्हणू शकतो.

तुम्हाला पाण्याचे महत्त्व – १० ओळी मराठी निबंध (Panyache Mahattv 10 Oli Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

वरील निबंध खालील keywords वापरून देखील सर्च होत असतो.

• Essay on water 10 lines in Marathi
• Marathi Nibandh Pani 10 Oli
• पाणी मराठी निबंध – १० ओळी
• पाणी १० ओळी निबंध
• Water Essay In Marathi 10 lines
• पाण्याचे महत्त्व 10 ओळी मराठी माहिती
• Importance Of Water 10 lines Essay in Marathi

The post पाण्याचे महत्त्व १० ओळी मराठी निबंध | Panyache Mahattv 10 Oli Marathi Nibandh | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5-10-%e0%a4%93%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ac/feed/ 0 2621