Tea medicinal benefits Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Fri, 18 Dec 2020 02:37:05 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 Tea medicinal benefits Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 चहा पिण्याचे फायदे आणि तोटे | Tea Benefits and Losses In Marathi | https://dailymarathinews.com/%e0%a4%9a%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a6%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%a4%e0%a5%8b/ https://dailymarathinews.com/%e0%a4%9a%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a6%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%a4%e0%a5%8b/#respond Fri, 18 Dec 2020 02:37:01 +0000 https://dailymarathinews.com/?p=1870 चहाचा शोध लागल्यापासून सर्व मानवजात चहावर विविध संशोधन करत आहे. चहा पिण्यास किती योग्य आणि अयोग्य याचा विचार न करता पाहुणचार, आदरातिथ्य, समारंभ अशा सर्व ...

Read moreचहा पिण्याचे फायदे आणि तोटे | Tea Benefits and Losses In Marathi |

The post चहा पिण्याचे फायदे आणि तोटे | Tea Benefits and Losses In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
चहाचा शोध लागल्यापासून सर्व मानवजात चहावर विविध संशोधन करत आहे. चहा पिण्यास किती योग्य आणि अयोग्य याचा विचार न करता पाहुणचार, आदरातिथ्य, समारंभ अशा सर्व प्रसंगी चहाचे नियोजन असतेच. चहाला पर्याय कॉफी आहे परंतु चहाच पूर्ण जगभरात खूप प्रसिध्द आहे. अशा या चहाचे फायदे आणि तोटे (Benefits and Losses of Tea) आज आपण सविस्तर जाणून घेऊयात!

Tea Benefits | चहा पिण्याचे फायदे

चहा पिल्याने तरतरी आणि उत्साह निर्माण होतो या बाबीला कोणीही नाकारणार नाही. चहाची ही तरतरी एक ते दीड तास टिकून असते. जॉबवर असताना किंवा कष्टाचे काम करताना नेहमी चहाला प्राधान्य असतेच.

काळा चहा किंवा कोरा चहा हा ऊर्जा प्रदान करणारा असतो. अति कष्टाळू आणि चंचल माणसे नेहमी कोरा चहाच पितात. कोरा चहा हा रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित करतो. तसेच हृदयविकार असणारे लोक नेहमी याचे सेवन करतात कारण कोरा चहा पिल्याने रक्तप्रवाह सुधारतो. अतिसार किंवा उलट्या होत असल्यास कोरा चहा प्यावा. कर्करोगात सुद्धा कोरा चहा गुणकारी आहे. काळजी घेण्यासारखी बाब म्हणजे कोऱ्या चहामध्ये साखरेचा वापर कमी करावा.

चहामध्ये कॅफिन असते पण प्रमाणात सेवन केल्यास शारीरिक त्रास उद्भवत नाही.

आज चहाचे अनेक प्रकार पडले आहेत. ग्रीन टी तर खूपच प्रसिद्ध होत आहे. ग्रीन टी नियमित पिल्याने वजन कमी झाल्याचा अनेकांचा अनुभव आहे.

चहा पावडरचा प्रसार होण्यापूर्वी गुळाचा चहा सर्वत्र पिला जायचा. गुळाच्या चहामुळे रक्तातील लोहाचे प्रमाण वाढते. चयापचय संस्था व्यवस्थित काम करते तसेच गुळाचा चहा हा कफनाशक देखील आहे.

संपूर्ण भारतात दुधाचा चहा सर्रास पिला जातो. दुधामुळे चहात पौष्टिक मूल्यांची वाढ होते. कॅल्शिअम, प्रथिने चांगल्या प्रमाणात शरीराला मिळून शरीराची वाढ होते.

Tea Losses | चहा पिण्याचे तोटे / दुष्परिणाम –

उपाशी पोटी चहा पिणे टाळावे. उपाशी पोटी चहा पिल्याने प्रोस्टेट कॅन्सर सारखा आजार संभवतो तसेच एसिडिटीचा त्रास जाणवतो. उपाशी पोटी चहा पिल्याने तेवढ्यापुरती तरतरी जाणवते पण दिवसभर पुन्हा थकवा येऊ लागतो. मळमळ सुरू होते.

अति चहा पिल्याने हृदय आणि आतड्याचे आरोग्य बिघडते. अति चहामुळे निद्रानाश जाणवतो तसेच रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका असतो.

वाचकांशी संवाद –

चहाबद्दल माहिती वाचताना तुम्हाला खूप आनंद झाला असेलच परंतु इतर keywords वापरून तुम्ही इंटरनेटवर चहाबद्दल आणखी माहिती मिळवू शकता. त्यासाठी खाली दिलेले keywords वापरून पाहा.

  • Tea History in Marathi
  • Tea Information in Marathi
  • Tea Benefits and Losses
  • Tea advantages and disadvantages
  • Green Tea Information in Marathi
  • Tea history
  • Tea medicinal benefits
  • Morning Tea Benefits
  • How to make Tea?
  • Tea festival

The post चहा पिण्याचे फायदे आणि तोटे | Tea Benefits and Losses In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%9a%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a6%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%a4%e0%a5%8b/feed/ 0 1870