Small businesses Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Sat, 25 Jan 2020 10:02:08 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 Small businesses Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 Best Small businesses in Marathi | सर्वोत्तम ११ व्यवसाय ! कमवा लाखो रुपये ! https://dailymarathinews.com/best-small-businesses-in-marathi/ https://dailymarathinews.com/best-small-businesses-in-marathi/#respond Sat, 25 Jan 2020 10:01:29 +0000 https://dailymarathinews.com/?p=1336 व्यवसाय पैसे कमावण्यासाठी अनेक संधी उपलब्ध करून देत आहे. आजच्या इंटरनेटच्या जगात तुम्ही एखादे कौशल्य आत्मसात केले कि घरबसल्या किंवा छोट्याशा भांडवलातून एक चांगला उद्योग ...

Read moreBest Small businesses in Marathi | सर्वोत्तम ११ व्यवसाय ! कमवा लाखो रुपये !

The post Best Small businesses in Marathi | सर्वोत्तम ११ व्यवसाय ! कमवा लाखो रुपये ! appeared first on Daily Marathi News.

]]>
व्यवसाय पैसे कमावण्यासाठी अनेक संधी उपलब्ध करून देत आहे. आजच्या इंटरनेटच्या जगात तुम्ही एखादे कौशल्य आत्मसात केले कि घरबसल्या किंवा छोट्याशा भांडवलातून एक चांगला उद्योग उभा करू शकता.

१. कार्यक्रम नियोजन

कोणताही घरगुती अथवा सामाजिक कार्यक्रम असल्यास सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांची व लोकांची जमवाजमव करावी लागते. लग्न, वाढदिवस, कंपनी प्रमोशन, जाहिरात लावणे, सभा आयोजन असे मोठे कार्यक्रम कोणी एक कुटुंब करू शकत नाही आणि केलेच तर होणारी धावपळ आणि खर्च खूप असतो. अशा विविध कार्यक्रमांचे नियोजन जर तुम्ही केले तर एक उत्तम व्यवसायाची संधी तुम्हाला मिळेल. यालाच इंग्लिशमध्ये इव्हेंट मॅनेजमेंट देखील म्हणतात. यासाठी तुम्हाला विविध लोक , कलाकार, संस्था यांचा संपर्क वाढवावा लागेल. थोड्याशा मनुष्यबळात तुम्ही इव्हेंट मॅनेजर बनू शकता.

२. मोबाईल रिपेअर

स्मार्टफोन आज कोणाकडे नाही. त्याची दुरुस्ती व विक्री आणि साहित्य तुम्ही विकायला ठेऊ शकता. एखादी छोटी जागा भाड्याने घेऊन हा व्यवसाय सुरू करू शकता. स्मार्टफोन बरोबर लागणारे साहित्य, मोबाईल रिचार्ज देखील तुम्ही ठेऊ शकता. मोबाईल रिपेअरिंग चा कोर्स करून लगेच कामाला सुरुवात करा. इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात आवड असली की झाले. तुम्हाला मग हा व्यवसाय भरपूर कमाई करून देईल.

३. ई – सेवा

फक्त ऑनलाईन रिचार्ज आणि ई – सेवा देऊन तुम्ही हजारो रुपये कमवू शकता. विविध डीटीएच, गॅस, लाईट बिल, तसेच ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करणे अशी विविध नेटवर्क आणि इंटरनेट संबंधित कामे तुम्ही सुरू करून व्यवसाय उभारू शकता. शालेय, कॉलेज विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणे, त्यांचे फोटो काढणे, प्रिंट, झेरॉक्स काढणे अशा नानाविध सेवा तुम्ही स्वतः देऊ शकता. छोट्याशा जागेत हा व्यवसाय सुरू करून भरघोस कमाई करा.

४. ट्रॅव्हल एजन्सी

एखादा लॅपटॉप असेल तर तुम्ही हा उद्योग घरच्या घरी सुरू करू शकता. अनेक मोठ्या ट्रॅव्हल एजन्सी यावर तुम्हाला कमिशन मिळवून देतात. तुमच्या भागात जर तुम्ही अशी सब – एजन्सी सुरू केली आणि बुकिंग सुरू केले तर प्रतिसाद कसा मिळतो यावर तुम्ही पुढचे पाऊल उचलू शकता. थोडेसे इंटरनेटचे ज्ञान असले की झाले. ऑनलाईन बुकींग करवून तुम्ही अनेक जणांना फिरायला पाठवू शकता.

५. जेवणाचे डब्बे पुरवणे / खानावळ

शहरी किंवा निमशहरी भागात नोकरदार वर्ग खूप असतो. अशांना दुपारी किंवा रात्री डबा पोचवणे हा उत्तम उद्योग पर्याय ठरू शकतो. तुम्ही एखादी खानावळ संपर्कात ठेऊन किंवा स्वतःच्या घरी डबे बनवून विविध ठिकाणी डबे पोचवण्याचे काम करू शकता. कॉलेज हॉस्टेल किंवा शालेय परिसर विभागात जर हे काम सुरू केले तर कमाईला सीमा उरणार नाही.

सकाळी उठून डबा बनवणे व धुणे अनेक जणांना जमत नाही किंवा तर काम कंटाळवाणे वाटते. जर तुम्ही अशी खानावळ उघडली तर अनेक लोकांना तुम्ही त्यांची गरज पूर्ण करून द्याल.

६. शिकवणी ( क्लासेस )

भांडवल काहीच नसल्याने तुम्ही हे क्षेत्र व्यवसाय म्हणून बघू शकता. शिकवण्याची आवड, आणि प्रत्येक विषयातले ज्ञान असणे आवश्यक आहे. मग कोणत्याही शैक्षणिक वर्गाला तुम्ही शिकवणी देऊ शकता. लहान मुले किंवा शालेय, कॉलेजचे विद्यार्थी यांपैकी कोणतीही मुले तुम्ही शिकवणीसाठी घेऊ शकता. तुमचे ज्ञान आणि समज चांगली असेल तर शिक्षण दानाचे चांगले काम तुम्ही करू शकता शिवाय तुमची कमाई देखील होईल.

७. फॅशन डिझायनिंग आणि टेलरिंग

टेलरचे दुकान म्हटले की आपल्याला ते गल्लीबोळातील दुकान आठवते. पण आज तसे राहिले नाही. तुम्ही एखादा टेलरिंगचा कोर्स करून त्यामध्ये विविध फॅशन घेऊन येऊ शकता. फॅशन डिझायनिंग आणि टेलरिंग जर शिकला तर तुम्ही तुमचे कपडे ऑनलाईन / ऑफलाईन देखील विकू शकता. कामात सातत्य राखण्याचा कल असेल तर तुम्ही हे करिअर नक्की निवडा. घरबसल्या तुम्ही लाखो रुपये कमवू शकता.

८. फोटोग्राफर

अनेक जणांनी पार्ट टाईम फोटोग्राफी करता करता प्रोफेशनल फोटोग्राफी करायला सुरुवात केली आहे. प्रत्येक कार्यक्रमाला फोटोग्राफरची आवश्यकता असते. अशा वेळी तुम्ही एखादा छोटासा फोटोग्राफी कोर्स करून या क्षेत्राकडे वळू शकता. खूप संयम आणि शिकण्याची इच्छा जर तुमच्याकडे असेल तर या क्षेत्राला आज मरण नाही. एखादा व्यवस्थित कॅमेरा, लॅपटॉप घेऊन घरच्या घरी हा व्यवसाय सुरू करा.

९. ब्लॉगिंग

डिजिटल मार्केटिंग आणि इंटरनेट क्षेत्रात ब्लॉगिंग हे करिअर खूपच प्रसिद्ध आहे. तुम्ही जर चांगले लिखाण करत असाल आणि इंटरनेट वेबसाईटबद्दल तुम्हाला ज्ञान असेल तर तुम्ही एखादा विषय घेऊन माहिती लिहायला सुरू करू शकता. इंटरनेटवर माहिती मिळवणे खूपच सोपे झाले आहे ते ब्लॉगिंग मुळेच ! अनेक ब्लॉगर्स आपले लेख , माहिती दररोज अपलोड करत असतात. हे क्षेत्र संपूर्ण डिजिटल असल्याने, लॅपटॉप व मोबाईल ची आवश्यकता भासेल. परंतु अत्यंत कमी खर्चात फक्त वेळेची गुंतवणूक करून भरघोस कमाईची संधी सोडू नका.

१०. युट्युब चॅनेल

आज प्रोफेशनल युट्यूबचा वापर करणारे खूपच प्रसिद्ध आहेत. दिवसातून एकदा तरी प्रत्येक जण युट्यूब उघडतोच याचाच फायदा तुम्ही देखील घ्या. तुमचा युट्यूब चॅनल सुरू करून घरबसल्या प्रसिद्ध व्हा. तुमच्यात असलेले कलागुण जर तुम्ही व्हिडिओच्या स्वरूपात युट्यूबवर टाकले आणि जर प्रसिध्द झाले तर तुम्ही त्याद्वारे पैसेही मिळवाल.

११. स्क्रिप्ट लेखन

मोबाईल, टीव्ही आणि युट्यूबसारख्या माध्यमांमुळे अनेक कथांना लेखकाची गरज असते. तुम्ही लेखक म्हणून काम करू शकता. स्वतंत्र विचारशैली, लेखनाची आवड आणि काल्पनिक विस्तार यासारखे गुण जर तुमच्यात असतील तर तुम्ही नक्कीच स्क्रिप्ट लेखन करू शकता. आताच्या युगात अनेक
जण प्रोडक्शन हाऊस उघडून बसलेत. फक्त सर्व कलाकारांची जमवाजमव करून एखादी शॉर्ट फिल्म, व्हिडिओज बनवले जातात. अशा प्रोडक्शन हाऊसशी तुम्ही संलग्न होऊन स्वतःचे काम सुरू करू शकता.

The post Best Small businesses in Marathi | सर्वोत्तम ११ व्यवसाय ! कमवा लाखो रुपये ! appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/best-small-businesses-in-marathi/feed/ 0 1336