sawarkar Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Mon, 16 Sep 2019 11:13:01 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 sawarkar Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल च्या या काही गोष्टींचा आपल्याला आजही अभिमान वाटतो ! https://dailymarathinews.com/swatantryaveer-sawarkar-biography/ https://dailymarathinews.com/swatantryaveer-sawarkar-biography/#respond Fri, 30 Aug 2019 03:53:53 +0000 https://dailymarathinews.com/?p=906 “हे मातृभूमी तुजसाठी मरण ते जनन ! तुजविण जनन ते मरण” असा संदेश संपूर्ण जगाला देणारे व आपल्या मातृभूमीसाठी आपण आपले सर्वस्व अर्पण करायला हवे ...

Read moreस्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल च्या या काही गोष्टींचा आपल्याला आजही अभिमान वाटतो !

The post स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल च्या या काही गोष्टींचा आपल्याला आजही अभिमान वाटतो ! appeared first on Daily Marathi News.

]]>
“हे मातृभूमी तुजसाठी मरण ते जनन ! तुजविण जनन ते मरण” असा संदेश संपूर्ण जगाला देणारे व आपल्या मातृभूमीसाठी आपण आपले सर्वस्व अर्पण करायला हवे असा संदेश देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आज आम्ही आपल्याला त्यांच्या जीवनातील अशा सात गोष्टी सांगणार आहोत ज्या वाचून आपल्याला त्यांच्याबद्दल अभिमान आजही अभिमान वाटतो.

१) स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे खरे नाव “विनायक दामोदर सावरकर” असे होते. त्यांचा जन्म सन १८८३ मध्ये झाला. ते भारताचे स्वतंत्र सेनानी, प्रख्यात वकील, कवी, लेखक, राजकारणी तसेच हिंदुत्ववादी विचारांचा पुरस्कार करणारे होते.

२) वीर सावरकरांचे शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज येथे झाले. तरुण वयात त्यांच्यावर त्या काळातील स्वातंत्र्य चळवळीत काम करणारे सामाजिक कामात असणारे बाळ गंगाधर टिळक, बिपिन चंद्र पाल, लाला लजपतराय यांचा प्रभाव होता.

3) कॉलेजच्या दिवसांमध्ये त्यांनी स्वदेशी चळवळी मध्ये सहभाग घेतला तसेच कॉलेज जीवनामध्ये आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी विदेशी कापड जाळले. आपले पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्याकाळचे राष्ट्रप्रेमी नेते श्यामजी कृष्ण वर्मा यांनी सावरकरांना कायद्याचे शिक्षण इंग्लंडमध्ये जाऊन पूर्ण करण्यासाठी मदत केली.

4) इ.स १८५७ मध्ये भारतात झालेल्या उठावाबद्दल इतिहास सावरकरांनी आपल्या ‘अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर’ या ग्रंथात लिहिला पण हा ग्रंथ ब्रिटिश सरकारने प्रकाशनापूर्वीच जप्त केला. शासनाविरुद्ध लिखाण केल्याबद्दल सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिशांनी जन्मठेपेची शिक्षा दिली.

5) इ.स १९११ मध्ये न्यायाधीश जॅक्सन यांच्या हत्येतील सहभागाच्या आरोपावरून स्वातंत्र्यवीर सावरकरांना पन्नास वर्षाच्या काळ्यापाण्याची जन्मठेपेची शिक्षा ठोठावली गेली.

6) १९२४ मध्ये सावरकरांची अंदमानातून सुटका झाली पण रत्नागिरी जिल्ह्याची हद्द न सोडणे, राजकारणात भाग न घेणे अशी बंधने ब्रिटिश शासनाने त्यांच्यावर लादली. या दरम्यानच्या काळात त्यांनी रत्नागिरीत अनेक समाजसुधारणा केल्या. हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांनी जवळपास 500 मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली.

7) ब्रिटिशांनी अकरा वर्षे त्यांना काळकोठडीत ठेवले. त्यांचे आतोनात हाल केले, तेलाच्या घाण्याला जुंपले, नारळाच्या काथा कुटण्याचे कष्टप्रत काम दिले. मरणप्राय वेदना दिल्या पण स्वातंत्र्यवीर सावरकर सर्व गोष्टी सहन करत राहिले कारण त्यांच्यापुढे ध्येय होते ते फक्त आपल्या मातृभूमीचे स्वातंत्र्य.

क्रांतिकारी सावरकर, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर, हिंदू समाजाला संघटित करणारे सावरकर, हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडणारे सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, अन्यायाविरुद्ध लेखन करणारे सावरकर, समाजसुधारक सावरकर, अशा अनेक रूपात सावरकरांनी आपल्या मातृभूमीसाठी योगदान दिले.

हे जरूर वाचा- गोपाळकाला- एक चोरीचा डाव पण कसा बनला उत्सवाचे कारण

The post स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल च्या या काही गोष्टींचा आपल्याला आजही अभिमान वाटतो ! appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/swatantryaveer-sawarkar-biography/feed/ 0 906