samosa recipe Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Mon, 02 Mar 2020 09:35:41 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 samosa recipe Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 Samosa Recipe in Marathi । गरमागरम खमंग समोसा ! एकदा नक्की करून पहा. https://dailymarathinews.com/samosa-recipe-in-marathi/ https://dailymarathinews.com/samosa-recipe-in-marathi/#comments Mon, 02 Mar 2020 09:35:38 +0000 https://dailymarathinews.com/?p=1263 एखाद्या स्वीट मार्ट मध्ये गेल्यावर समोसा खाणे म्हणजे एक पर्वणीच असते. भजी आणि वडापाव यांच्या तुलनेत जरी प्रसिद्ध नसला तरी समोसा वारंवार खाल्लाच जातो. एखाद्या ...

Read moreSamosa Recipe in Marathi । गरमागरम खमंग समोसा ! एकदा नक्की करून पहा.

The post Samosa Recipe in Marathi । गरमागरम खमंग समोसा ! एकदा नक्की करून पहा. appeared first on Daily Marathi News.

]]>
एखाद्या स्वीट मार्ट मध्ये गेल्यावर समोसा खाणे म्हणजे एक पर्वणीच असते. भजी आणि वडापाव यांच्या तुलनेत जरी प्रसिद्ध नसला तरी समोसा वारंवार खाल्लाच जातो. एखाद्या दिवशी जर तुम्ही घरीच समोसा बनवला तर? चला तर मग जाणून घेऊ खूप विशिष्ट कष्ट न घेता सोप्या पद्धतीने समोसा कसा बनवायचा.

Samosa Recipe in Marathi ingredients.
साहित्य :

समोसा आवरण बनवण्यासाठी साहित्य –

१. मैदा – २०० ग्रॅम

२. तेल – २ चमचे

३. मीठ

४. जिरे – अर्धा चमचा

बटाटा सारणासाठी लागणारे साहित्य –

१. बटाटे उकडलेले – ५

२. कांदा बारीक चिरून – २

३. आले बारीक करून ( पेस्ट ) – १ चमचा

४. कोथिंबीर

५. हळद अर्धा चमचा

६. हिरव्या मिरच्या बारीक चिरून -४

७. धणे – जिरे – मोहरी पूड

८. तळण्यासाठी आवश्यक तेवढे तेल.

Samosa recipe in Marathi process
समोसा बनवण्याची कृती :

आवरण –
१. प्रथमतः समोस्याचे आवरण बनवून घेऊ. मैदा, मीठ व तेल घेऊन भांड्यात चांगले मिसळून घ्या.त्यात पाणी घाला व त्याची कडक कणिक बनवा.
२. बेकिंग सोडा कणिक मध्ये मिसळा व त्याच्या पुऱ्या लाटा. पुऱ्या खूप पातळ होणार नाहीत याची काळजी घ्या.

बटाटा सारण –
१. उकडलेल्या बटाट्याची साल काढून चांगले बारीक करून घ्या.
२. कढईत १ चमचा तेल गरम करा. त्यात कांदा, जिरे, आल्याची पेस्ट, हिरव्या मिरच्या चांगल्या परतून घ्या.
३. आता त्यात बटाटा घाला. त्यात हळद, मीठ, जिरे – धणे – मोहरी पूड टाका.
४. सारण/ मिश्रण मस्तपैकी एकजीव केल्यानंतर थोडे थंड होऊ द्या.

समोसा –
१. आता लाटलेल्या पुऱ्या घ्या. त्यात एकदम थोडेसे सारण घाला.
२. समोस्याचा त्रिकोणी आकार देऊन तेलात तळून घ्या. थोडेसे लालसर होईपर्यंत तळून घ्या.
३. समोसा चटणीसोबत मस्तपैकी सर्व्ह करा.

टीप –
मैद्याच्या पुऱ्या लाटताना विशेष काळजी घ्या.

The post Samosa Recipe in Marathi । गरमागरम खमंग समोसा ! एकदा नक्की करून पहा. appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/samosa-recipe-in-marathi/feed/ 1 1263