Rangpanchami Information In Marathi Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Fri, 01 Apr 2022 05:31:18 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 Rangpanchami Information In Marathi Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 रंगपंचमी – मराठी निबंध | Rangpanchami Marathi Nibandh | https://dailymarathinews.com/rangpanchami-marathi-nibandh/ https://dailymarathinews.com/rangpanchami-marathi-nibandh/#respond Sun, 11 Apr 2021 01:51:00 +0000 https://dailymarathinews.com/?p=2128 रंगपंचमी हा सण साजरा करताना लहान मुलांसह मोठ्यांनाही मज्जा येते. रंगांची उधळण करताना मुक्त क्षणांची जाणीव होत राहते.

The post रंगपंचमी – मराठी निबंध | Rangpanchami Marathi Nibandh | appeared first on Daily Marathi News.

]]>
रंगपंचमी हा सण साजरा करताना लहान मुलांसह मोठ्यांनाही मज्जा येते. रंगांची उधळण करताना मुक्त क्षणांची जाणीव होत राहते. अशा रंगपंचमी सणाबद्दल विद्यार्थ्यांना रंगपंचमी हा मराठी निबंध (Rangpanchami Marathi Nibandh) लिहावा लागतो.

रंगपंचमी मराठी निबंध क्र. १ (३०० शब्द) | Rangpanchami Essay In Marathi |

होळी, धुलवड आणि रंगपंचमी हे सण महाराष्ट्रात विविध दिवशी साजरे केले जातात. त्यातील रंगपंचमी हा दिवस म्हणजे रंगांचे, विविधरंगी जीवनाचे आणि आनंदाचे प्रतिकच आहे. या दिवशी सर्वजण पिचकारी, रंगांनी भरलेले फुगे, कोरडे रंग आणि रासायनिक रंग वापरून रंगपंचमी साजरी करतात.

रंगपंचमीला खूप पौराणिक संदर्भ आहे. भगवान श्री कृष्ण हे स्वतः रंगपंचमी खेळतात, असे वर्णन आहे. गोपिकांना रंग लावणे आणि त्यांना त्रास देणे हा एक प्रकारे खेळच त्यांनी खेळला होता. राधा व कृष्ण हे प्रतिक स्वरूप म्हणूनच रंगपंचमीला पुजले जातात.

हिंदी आणि मराठी चित्रपटात अनेकवेळा होळीची, रंगपंचमीची दृश्ये दाखवली जातात. त्यावर नृत्यसंगीताचा आविष्कार दाखवला जातो. प्रत्येक पिढीत एखादे तरी गाणे सुप्रसिद्ध होत असते. ऐन रंगपंचमीला एखादा चित्रपट प्रदर्शित होणार असेल तर अशी गाणी हमखास चित्रित केली जातात.

प्रत्येक पिढीसाठी रंगपंचमी हा सण वेगवेगळा असू शकतो. शाळेतील मुले, लहान मुले ही धावत पळत, पिचकारी घेऊन, रंग संपले तर पाणी देखील एकमेकांवर ओतून हा सण साजरा करतात. महाविद्यालयीन मुले-मुली कोरड्या रंगांचा वापर करणे जास्त पसंत करतात.

आज मोबाईल आणि सोशल मीडियाचा वाढता वापर पाहता रंगपंचमी हा सण देखील सोशल झाला आहे. वास्तविक खेळण्याचा आनंद मिळेल की नाही ते माहीत नाही पण स्टेटस मात्र महत्त्वपूर्ण झाला आहे. त्यासाठी रंगांची दोन बोटे गालावर उठवून खूप लोक मस्तपैकी फोटो अपलोड करत राहतात.

रासायनिक रंग हे त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात त्यासाठी आपण कोणत्या प्रकारचा रंग वापरतो, त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. बाजारात खूप प्रकारचे रंग उपलब्ध असतात. नैसर्गिक पद्धतीने, कोणतेही रसायन न वापरता बनवलेले रंग सर्वांनाच उपयुक्त ठरतील आणि त्यांचा मानवी आरोग्यावर काहीही परिणाम होणार नाही.

रंगपंचमी हा खेळ महाराष्ट्रात होळीनंतर पाचव्या दिवशी खेळला जातो. काही ठिकाणी याची पहिल्या दिवसापासूनच सुरुवात होते. असे असले तरी सर्वत्र मांगल्याचे, उत्सवाचे वातावरण मात्र असते. रंग खेळणे हा अति संवेदनशील मनाला भुरळ घालणारा सण आहे.

रंगपंचमी दिवशी कोणीही कोणाला रंग लावला तरी चालते. त्या दिवशी वाईट वाटून घ्यायचे नसते. एकमेकांचा रंग प्रिय व्यक्तींवर बरसला पाहिजे आणि त्यामुळे आनंद व उल्हास हा प्रत्येक वर्षी वाढत गेला पाहिजे अशी त्यामागची भावना असते.

रंगपंचमी मराठी निबंध क्र. २ (२०० शब्द) | Rangpanchami Nibandh Marathi |

होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे भारतीय परंपरेनुसार उत्सवाचे दिवस आहेत. सध्या रंगपंचमी व होळी हे सण एकत्रच साजरे केले जात आहेत परंतु महाराष्ट्रात रंगपंचमी हा प्रत्येक वर्षी होळीच्या पाचव्या दिवशी म्हणजेच फाल्गुन वद्य पंचमीला साजरा केला जाणारा उत्सव आहे. उत्तर भारतात आणि मोठमोठ्या शहरांत होळीच्या दुसऱ्या दिवसापासून रंगपंचमी खेळायला सुरुवात केली जाते.

भारतात रंगपंचमी हा सण अत्यंत प्राचीन काळापासून खेळत असल्याची अनेक ठिकाणी नोंद आहे. रूढी परंपरेनुसार रंगपंचमी हा सण रंगांनी खेळला जातो आणि त्याची परंपरा पूर्वीपासून अखंडपणे सुरू आहे. रंगपंचमी हा सण जवळ येताच प्रत्येकाला रंगांची आणि रंगांच्या खेळातून मिळणाऱ्या आनंदाची उत्सुकता लागून राहते.

रंगपंचमीला प्रत्येकाचे नातेवाईक आणि मित्रमंडळी असे सर्वजण मिळून रंग खेळतात. लहान मुले तर रंगपंचमी येण्याअगोदरच विविध रंग, छोट्या मोठ्या पिचकाऱ्या, फुगे इत्यादी बाबी जमवून ठेवतात आणि रंगपंचमी दिवशी धावत – पळत, लपत – छपत एकमेकांना रंग लावतात.

लहान मुलांना ओल्या रंगांनी खेळायला खूप आवडते तर तरुण मुले-मुली कोरड्या आणि नैसर्गिक रंगाने रंग खेळतात. सध्या मोबाईल आणि इंटरनेट उपलब्ध असल्याने सर्वत्र सोशल मीडियावरून रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या जातात. सर्व लोक स्टेटस ठेवून रंगपंचमी खेळल्याचे सर्व मित्रपरिवारात कळवतात.

सध्या काही ठिकाणी रासायनिक रंग वापरले जातात. ते शरीरास आणि डोळ्यांस घातक असल्याने तशा रंगांचा वापर टाळायला हवा. तसेच ओले रंग खेळताना पाण्याचा अतिवापर देखील टाळणे गरजेचे आहे. कोणालाही ईजा होईल अथवा त्रास होईल अशा अयोग्य रितीने रंगपंचमी खेळणे टाळावे.

रंगपंचमीला सर्व भेदभाव विसरून देऊन आपण सर्व एकच आहोत अशा भावनेने एकमेकांना रंग लावला जातो. प्रत्येकाच्या रंगाला आपण आपल्या अंगावर लावून घेणे म्हणजेच आपण त्याला आपलेसे मानले असल्याची प्रचिती होत असते. त्यामुळे सर्वांनी उदासी बाजूला ठेवून अत्यंत उत्साहीपणे रंगपंचमी साजरी करायला हवी.

संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला रंगपंचमी हा मराठी निबंध (Rangpanchami Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post रंगपंचमी – मराठी निबंध | Rangpanchami Marathi Nibandh | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/rangpanchami-marathi-nibandh/feed/ 0 2128