pohe recipe Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Tue, 24 Dec 2019 05:38:24 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 pohe recipe Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 कांदा पोहे रेसिपी: अस्सल महाराष्ट्री पोहे कसे बनवाल? https://dailymarathinews.com/kanda-pohe-recipe/ https://dailymarathinews.com/kanda-pohe-recipe/#respond Tue, 24 Dec 2019 05:38:22 +0000 https://dailymarathinews.com/?p=1109 कांदा पोहे हा महाराष्ट्रातील एक उत्तम नाश्त्याचा पदार्थ आहे. कुठलाही सण किंवा कार्यक्रम असल्यास हमखास पोहे केले आणि खाल्ले जातात. पोहे खूप प्रकारे बनवता येतात. ...

Read moreकांदा पोहे रेसिपी: अस्सल महाराष्ट्री पोहे कसे बनवाल?

The post कांदा पोहे रेसिपी: अस्सल महाराष्ट्री पोहे कसे बनवाल? appeared first on Daily Marathi News.

]]>
कांदा पोहे हा महाराष्ट्रातील एक उत्तम नाश्त्याचा पदार्थ आहे. कुठलाही सण किंवा कार्यक्रम असल्यास हमखास पोहे केले आणि खाल्ले जातात. पोहे खूप प्रकारे बनवता येतात. त्यातला एक अस्सल प्रकार कांदा पोहे रेसिपी आपल्या भेटीस घेऊन येत आहोत.

कांदा पोहे रेसिपी

पोहे बनवण्यासाठी टिप्स:

• योग्य प्रमाणात तेलाचा वापर करावा.

• पोह्यात भाजलेले शेंगदाणे टाकू शकता. 

• किसलेले नारळ किंवा शेव पोह्यावरून सर्व्ह करताना सजवू शकता.

• हमखास लिंबूची फोड सोबत देऊन सर्व्ह करू शकता.

लागणारे साहित्य:

१. पोहे. 

२. दीड चमचे हळद.

३. ४ मिरच्या.( बारीक तुकडे)

४. चिमूटभर मोहरी.

५. २ बारीक चमचे तेल.

६. १ कांदा बारीक चिरून.

७. कोथिंबीर बारीक करून.

८. कढीपत्ता. ( हवा असल्यास )

९. भाजलेले शेंगदाणे.

अस्सल महाराष्ट्री पोहे कसे बनवायचे?

कृती:

१. पोहे पाण्यात स्वच्छ धुवून घ्या. कोमट पाण्यात भिजत ठेवा. मऊ झाल्यानंतर एका भांड्यात नितळून घ्या.

२. शेंगदाणे भाजून घ्या.

३. आता गॅसवर कढईत तेल गरम करा. त्यात हळद, मोहरी, कांदा, मिरच्या परतून घ्या. नंतर शेंगदाणे, कढीपत्ता टाका.

४. आता मऊ झालेले पोहे कढईत टाका. परतून घेतलेल्या मसाल्यासोबत चांगले एकजीव करा. शेवटी कोथिंबीर टाका.

५. पोहे तयार झाल्यानंतर २ – ३ मिनिटांनी ओल्या किसलेल्या खोबऱ्यासोबत किंवा शेव सोबत सर्व्ह करा. लिंबुची फोड देखील देऊ शकता.

*महत्त्वाची टीप- सर्व साहित्य जवळ असल्यावर हा पदार्थ केवळ १० मिनिटात बनतो. जास्त परतणे टाळावे.

तर हि कांदा पोहे रेसिपी घरी नक्की ट्राय करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा.

The post कांदा पोहे रेसिपी: अस्सल महाराष्ट्री पोहे कसे बनवाल? appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/kanda-pohe-recipe/feed/ 0 1109