Pasaydan Marathi bol Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Thu, 24 Nov 2022 04:50:16 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 Pasaydan Marathi bol Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 पसायदान – मराठी बोल • Pasaydan in Marathi • https://dailymarathinews.com/pasaydan-marathi-lyrics-pasaydan-in-marathi/ https://dailymarathinews.com/pasaydan-marathi-lyrics-pasaydan-in-marathi/#respond Thu, 24 Nov 2022 04:44:45 +0000 https://dailymarathinews.com/?p=5139 प्रस्तुत लेख हा पसायदान (Pasaydan) या ज्ञानेश्वरांच्या रचनेचे बोल आहेत. ज्ञानेश्वरांनी आपल्या या रचनेत संपूर्ण सजीवसृष्टीसाठी प्रार्थना केलेली आहे.

The post पसायदान – मराठी बोल • Pasaydan in Marathi • appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा पसायदान (Pasaydan) या ज्ञानेश्वरांच्या रचनेचे बोल आहेत. ज्ञानेश्वरांनी आपल्या या रचनेत संपूर्ण सजीवसृष्टीसाठी प्रार्थना केलेली आहे.

पसायदान – संत ज्ञानेश्र्वर

आता विश्वात्मकें देवें। येणे वाग्यज्ञें तोषावें।

तोषोनिं मज द्यावे। पसायदान हें॥

जें खळांची व्यंकटी सांडो।

तया सत्कर्मी- रती वाढो।

भूतां परस्परे पडो। मैत्र जिवाचें॥

दुरितांचे तिमिर जावो।

विश्व स्वधर्म सूर्यें पाहो।

जो जे वांच्छिल तो तें लाहो। प्राणिजात॥

वर्षत सकळ मंगळी।

ईश्वरनिष्ठांची मांदियाळी।

अनवरत भूमंडळी। भेटतु भूतां॥

चलां कल्पतरूंचे आरव।

चेतना चिंतामणींचें गाव।

बोलते जे अर्णव। पीयूषाचे॥

चंद्रमे जे अलांछन।

मार्तंड जे तापहीन।

ते सर्वांही सदा सज्जन। सोयरे होतु॥

किंबहुना सर्व सुखी। पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी।

भजिजो आदिपुरुखी। अखंडित॥

आणि ग्रंथोपजीविये। विशेषीं लोकीं इयें।

दृष्टादृष्ट विजयें। होआवे जी।

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ। हा होईल दान पसावो।

येणें वरें ज्ञानदेवो। सुखिया जाला॥

तुम्हाला पसायदान – मराठी बोल (Pasaydan Bol Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post पसायदान – मराठी बोल • Pasaydan in Marathi • appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/pasaydan-marathi-lyrics-pasaydan-in-marathi/feed/ 0 5139