My Diwali homework Essay In Marathi Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Mon, 24 Oct 2022 07:29:38 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 My Diwali homework Essay In Marathi Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 माझा दिवाळीचा अभ्यास – मराठी निबंध | Diwalicha Abhyas Nibandh Marathi | https://dailymarathinews.com/majha-diwalicha-practice-marathi-essay-diwalicha-abhyas-nibandh-marathi/ https://dailymarathinews.com/majha-diwalicha-practice-marathi-essay-diwalicha-abhyas-nibandh-marathi/#respond Mon, 24 Oct 2022 07:26:51 +0000 https://dailymarathinews.com/?p=5082 दिवाळीच्या सुट्टीत दिल्या जाणाऱ्या अभ्यासाचा अनुभव आणि त्यानिमित्ताने घडणाऱ्या विविध प्रसंगांचे वर्णन या निबंधात केलेले आहे.

The post माझा दिवाळीचा अभ्यास – मराठी निबंध | Diwalicha Abhyas Nibandh Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा माझा दिवाळीचा अभ्यास (Majha Diwalicha Abhyas Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. दिवाळीच्या सुट्टीत दिल्या जाणाऱ्या अभ्यासाचा अनुभव आणि त्यानिमित्ताने घडणाऱ्या विविध प्रसंगांचे वर्णन या निबंधात केलेले आहे.

दिवाळीचा अभ्यास – मराठी निबंध | My Diwali Homework Essay In Marathi

आम्हाला दिवाळीची सुट्टी कालच लागली. सुट्टी लागली परंतु मी आजही वह्या पुस्तके उघडूनच बसलेलो आहे. कारण एकच; शाळेतून दिलेला दिवाळीचा अतिरिक्त अभ्यास! दरवर्षी दिवाळीमध्ये सुट्टीचा आनंद आणि अभ्यासाची गडबड अशा दोन्ही परिस्थिती अनुभवत असताना माझी नुसती धमाल उडून जाते.

मी प्रतिक भोसले, इयत्ता सातवीत शिकतो. आम्हाला प्रत्येक वर्षीच तसा दिवाळीचा अभ्यास असतो. परंतु यावर्षी आम्हाला कडक शिस्तीचे, अगदी कठोर स्वभावाचे पी. एस. कदम सर हे एक नवीन वर्गशिक्षक आल्याने त्यांनी आमच्या अभ्यासू वृत्तीला भरघोस असा प्रतिसाद देऊन भरगच्च असा अभ्यास दिलेला आहे.

सुट्टी संपल्या संपल्या उड्या मारत घरी येण्यापेक्षा मी थेट दुकानात जाऊन पेन आणि वही घेऊन घरी आलो. शिक्षकांच्या दृष्टीने आम्ही नेहमीच अभ्यास करत असलो पाहिजे. त्यामुळे अभ्यास एके अभ्यास, असा आमचा उपक्रम शाळेत चालूच असतो. यावेळी तर सुट्टीत देखील आमचे वाचन आणि लिखाण चालूच आहे.

दिवाळीत किल्ला बनवणे, त्यासाठी माती – दगड – विटा गोळा करणे, विजेच्या दिव्यांच्या माळा व आकाशकंदील विकत आणणे, त्यांचे भिंतीवर सुशोभीकरण करणे अशी कामे असताना अभ्यासाची आठवणच होत नाही. असे असतानाही मी मागच्या वर्षी पहिल्या दहा दिवसांतच अभ्यास पूर्ण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता.

अभ्यास लगेच पूर्ण करण्याचा अनुभव असल्याने मी यावर्षीही शाळा सुरू होण्याअगोदर आठवडाभर तरी सर्व अभ्यास पूर्ण करणार आहे. माझे अनेक मित्र दरवर्षी दिवाळी सण झाल्यावरच अभ्यासाला सुरुवात करत असतात, मग त्यांचा अभ्यास काहीवेळा पूर्णच होत नाही.

दिवाळीच्या अभ्यासाची गरज मला योग्य वाटते. एकेका विषयाचा अभ्यास पूर्ण झाल्यावर तर खूप मज्जा येते. त्यामुळे दररोज अभ्यासाची लागलेली सवय सुटत नाही. मी यावर्षी अभ्यासाचे आणि दिवाळीच्या सणात करावयाच्या कामांचे वेळापत्रक तयार केलेले आहे. त्यामुळे माझा दिवस अगदी आनंदी व्यतित होतो.

इयत्ता चौथीत असताना माझा दिवाळीचा अभ्यास पूर्ण नव्हता. तेव्हा मी एका दुसऱ्या विद्यार्थ्याची वही माझा अभ्यास म्हणून दाखवली होती, परंतु ते शिक्षकांना लगेच समजले. त्यांनी त्यावेळी मला असा चोप दिला होता की मला तो प्रसंग आठवला तरी अंगावर काटा उभा राहतो. त्यानंतर मी कधीही तसे केले नाही.

दिवाळीला फक्त दोनच दिवस बाकी आहेत. त्यामुळे सध्या आमच्या घरी आणि इतर सर्वच ठिकाणी दिवाळीची साफसफाई करणे, फराळ बनवणे, नवीन कपड्यांची व फटाक्यांची खरेदी करणे अशी लगबग सुरू झालेली आहे. ही लगबग मला खूप आवडते पण माझ्यासमोर अभ्यास पूर्ण करण्याचेही आव्हान आहे.

तुम्हाला माझा दिवाळीचा अभ्यास हा मराठी निबंध (Majha Diwalicha Abhyas Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post माझा दिवाळीचा अभ्यास – मराठी निबंध | Diwalicha Abhyas Nibandh Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/majha-diwalicha-practice-marathi-essay-diwalicha-abhyas-nibandh-marathi/feed/ 0 5082