Mogara Nibandh Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Wed, 03 Jun 2020 05:34:15 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 Mogara Nibandh Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 Essay on Jasmine in Marathi, Mogara Nibandh | माझे आवडते फूल – मोगरा | https://dailymarathinews.com/essay-on-jasmine-in-marathi/ https://dailymarathinews.com/essay-on-jasmine-in-marathi/#respond Fri, 20 Mar 2020 09:17:24 +0000 https://dailymarathinews.com/?p=1542 फुल ही निसर्गाने निर्मिलेली एक सुंदर कलाकृती आहे. एक ते दोन दिवस आयुष्यात त्यांचे दान म्हणजे अपेक्षेविना जगलेले आयुष्य असते. कुठलाही समारंभ, सण किंवा कार्यक्रम ...

Read moreEssay on Jasmine in Marathi, Mogara Nibandh | माझे आवडते फूल – मोगरा |

The post Essay on Jasmine in Marathi, Mogara Nibandh | माझे आवडते फूल – मोगरा | appeared first on Daily Marathi News.

]]>
फुल ही निसर्गाने निर्मिलेली एक सुंदर कलाकृती आहे. एक ते दोन दिवस आयुष्यात त्यांचे दान म्हणजे अपेक्षेविना जगलेले आयुष्य असते. कुठलाही समारंभ, सण किंवा कार्यक्रम असला की फुलांची सजावट असणे आवश्यकच आहे. अशा फुलांची लागवड प्रत्येकाच्या दारी असतेच. 

माणसाच्या जीवनात अगदी मोफत पण महत्वपूर्ण स्थान बजावणाऱ्या अशा फुलांबद्दल ‘माझे आवडते फुल’ या विषयावर शालेय जीवनात निबंध लिहावा लागतो. चला तर मग बघू निबंध लिहताना लक्षात ठेवावयाचे मुद्दे –
• प्रस्तावना• फुलाचे जीवनातील महत्त्व• फुलाचा उपयोग • फुलाची काळजी• फुलाची लागवड

Essay on Mogara in Marathi | मोगरा 

मला सगळीच फुले आकर्षित करतात. गुलाब, जास्वंद, कमळ, शेवंती, जाई, चाफा अशी काही त्यापैकीच फुले आहेत. परंतु मला सर्वात जास्त आवडते ते म्हणजे मोगऱ्याचे फुल. मोगऱ्याचा सुगंध म्हणजे माझ्या दिवसाची सुरुवात असते. ज्या दिवशी मला तो सुगंध येत नाही, मला पूर्ण दिवस काहीतरी चुकल्यागत वाटत राहते. 

आमच्या घरी सकाळी उठल्यावर कुठला सुगंध दरवळत असेल तर तो म्हणजे मोगऱ्याचा! माझी आई रोज सकाळी पहाटे उठून देवपूजा करताना अंगणातील मोगऱ्याची फुले देवाला वाहते. मी सकाळी उठून बाहेर पडताना अंगणातील त्याचा सुगंध घेऊनच बाहेर पडतो. त्यामुळे दिवसभर मला खूपच प्रसन्न असा अनुभव येतो. 

मोगऱ्याच्या फुलांचे झाड छोटे असते. फुलाचा रंग पांढरा असतो. पाने हिरवी आणि छोटी असतात. संपूर्ण बहरलेले झाड खूपच सुंदर दिसते. मोगऱ्याच्या फुलाचा सुगंध अवर्णनीय असा आहे. दिसायला साधारण पण हे फुल त्याच्या सुगंधामुळे प्रसिद्ध आहे. या फुलाच्या सुगंधाची अनेक अत्तरे, साैंदर्य प्रसाधने तसेच अगरबत्ती बाजारात उपलब्ध आहेत. 

आमच्या रानात परसबाग आहे. त्याच्या सभोवताली मी मोगऱ्याची झाडे लावली आहेत. बागेत जातानाच अगदी मन प्रसन्न होतं.आमच्या शाळेतील पाठ्यपुस्तकात मोगऱ्याची कविता होती. ती कविता मी आवर्जून पाठ केली होती. मी नेहमी घरी आल्यावर आईला ती कविता म्हणून दाखवायचो.

भारतातील संस्कृती विशिष्ट प्रकारे निसर्गाशी बांधली गेली आहे. या संस्कृतीत कुठलेही कर्म करा त्यामध्ये फुलांचा समावेश असतोच विशेषकरून मोगऱ्याचा. मोगरा हे फुल देवांना वाहतात. बेलाच्या पानांबरोबर हे फुल शंकराच्या पिंडीवर वाहिले जाते. 

लहान मुली आणि स्त्रिया देवपूजा करताना, कुठल्याही घरगुती किंवा सामाजिक कार्यक्रमात मोगऱ्याच्या फुलांचा गजरा माळतात. अबोली आणि पांढरा रंग या दोन रंगांचा मिलाप असलेला मोगऱ्याचा गजरा अतिसुंदर दिसतो. असे हे छोटेसे परंतु सुंदर फुल माझेच काय तर सर्वांचे आवडते फूल आहे. 

The post Essay on Jasmine in Marathi, Mogara Nibandh | माझे आवडते फूल – मोगरा | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/essay-on-jasmine-in-marathi/feed/ 0 1542