Majha Avadta Vishay - Marathi Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Fri, 03 Jun 2022 05:36:56 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 Majha Avadta Vishay - Marathi Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 माझा आवडता विषय – मराठी (निबंध लेखन) | Majha Avadta Vishay – Marathi https://dailymarathinews.com/majha-avadta-vishay-marathi-nibandh/ https://dailymarathinews.com/majha-avadta-vishay-marathi-nibandh/#respond Fri, 03 Jun 2022 05:34:23 +0000 https://dailymarathinews.com/?p=4062 या निबंधात मराठी हा विषय का आवडतो, मराठी विषयाचे महत्त्व आणि मराठी विषयाचे भवितव्य अशा बाबी स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत.

The post माझा आवडता विषय – मराठी (निबंध लेखन) | Majha Avadta Vishay – Marathi appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा माझा आवडता विषय – मराठी (Majha Avadta Vishay – Marathi – Nibandh Marathi) या विषयावर आधारित मराठी निबंध आहे. या निबंधात मराठी हा विषय का आवडतो, मराठी विषयाचे महत्त्व आणि मराठी विषयाचे भवितव्य अशा बाबी स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत.

माझा आवडता विषय – मराठी | My Favourite Subject Essay In Marathi |

आमच्या शाळेत विविध विषय शिकवले जातात परंतु त्यापैकी मराठी हा माझा आवडता विषय आहे. मला नेहमीच मराठी या विषयात चांगले गुण मिळतात. लहानपणी आम्हाला मराठी हा विषय पी. व्ही. देसाई सर खूपच छान शिकवायचे. तेव्हापासून मराठी हा विषय मला आवडू लागला.

सध्या मी इयत्ता आठवीत शिकत आहे. आमच्या वर्गात आमचे वर्गशिक्षक बी. आर. मोरे हेच आम्हाला मराठी विषय शिकवतात. त्यांची शिकवण्याची पद्धत देखील अगदी उत्तम आहे. प्रत्येक पाठाची प्रस्तावना तसेच लेखकाची ओळख अशी उपयुक्त अतिरिक्त माहिती ते आम्हाला सांगतात.

मराठी विषयानेच आमच्या वर्गातील दिवसाची सुरुवात होते. त्यामुळे माझा आवडता विषयच सुरुवातीला शिकवला जात असल्याने माझा संपूर्ण दिवस छान जातो. मराठी व्याकरण, मराठी कविता, मराठी धडे, मराठी साहित्य लेखन असे विविध प्रकार मराठी विषयाच्या तासाला मी अत्यंत आवडीने शिकतो.

मराठी विषय आवडण्यामागे माझ्या कुटुंबातील वातावरणाचा खूप मोठा हात आहे. माझे बाबा व काका यांना वाचनाची खूप आवड असल्याने ते घरी नेहमीच वर्तमानपत्र व नवनवीन पुस्तके आणतात. त्यांच्यामुळे मलादेखील वाचनाची सवय लहानपणापासून जडलेली आहे.

वाचनाचा छंद असल्याने गोष्टींची व प्रेरणादायक पुस्तके मी नेहमीच वाचतो. त्यामुळे शाळेत मराठी हा विषय मला अतिशय सोप्पा वाटतो. मराठी विषय शिकताना माझे लक्ष कधीच विचलित होत नाही. मी आत्तापर्यंत सर्व इयत्तेतील पाठ व्यवस्थित समजून घेतलेले आहेत.

मराठी ही आपली मातृभाषा असल्याने मराठीचा अभ्यास नियमित आवडीने केला जातो. शाळेतील मराठी भाषेच्या विविध उपक्रमांत जसे की निबंध व वक्तृत्व स्पर्धेत मी नेहमी सहभाग घेतो. तसेच घरी असताना मी कविता वाचन व पाठांतर करतच असतो. मराठी विषयाच्या गोडीमुळे मला लेखक बनण्याची इच्छा निर्माण झालेली आहे.

मराठी भाषेचे भवितव्य विचारात घेता उदयोन्मुख लेखक व कथाकारांनी मराठी भाषेचे महत्त्व टिकवून ठेवणे गरजेचे आहे. मराठी विषयात अमाप लेखन होणे त्यासाठी गरजेचे आहे. तरच मराठी हा विषय आपण अगदी अभिमानाने शिक्षणाच्या माध्यमातून पुढच्या पिढीत संक्रमित करू शकू.

आपल्याला जी भाषा ज्ञात असते त्यातून आपण आपल्या भावना व विचार व्यक्त करत असतो. तसेच विविध प्रकारच्या पुस्तकांच्या वाचनातून ज्ञान प्राप्त करत असतो. त्यामुळे आपल्या जीवनाला गती व दिशा देण्याचे काम एखादी भाषा करू शकते याची जाणीव मला झालेली आहे. त्यामुळे मराठी हा भाषेचा विषय माझा अत्यंत आवडता विषय आहे.

तुम्हाला माझा आवडता विषय – मराठी हा मराठी निबंध (Majha Avadta Vishay – Marathi – Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post माझा आवडता विषय – मराठी (निबंध लेखन) | Majha Avadta Vishay – Marathi appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/majha-avadta-vishay-marathi-nibandh/feed/ 0 4062