Majha Avadta Prani Gaay Marathi Nibandh Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Wed, 09 Feb 2022 07:35:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 Majha Avadta Prani Gaay Marathi Nibandh Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 माझा आवडता प्राणी – गाय मराठी निबंध | Cow Essay In Marathi | https://dailymarathinews.com/cow-essay-in-marathi/ https://dailymarathinews.com/cow-essay-in-marathi/#respond Fri, 28 Jan 2022 23:20:00 +0000 https://dailymarathinews.com/?p=3162 प्रस्तुत लेख हा माझा आवडता प्राणी - गाय या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. या निबंधात गाईचे फायदे, उपयोग आणि अध्यात्मिक महत्त्व स्पष्ट

The post माझा आवडता प्राणी – गाय मराठी निबंध | Cow Essay In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा माझा आवडता प्राणी – गाय (My Favourite Animal – Cow Essay In Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. या निबंधात गाईचे फायदे, उपयोग आणि अध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करण्यात आलेले आहे.

गाय निबंध मराठी | Majha Avadta Prani Gaay Marathi Nibandh |

भारतीय संस्कृतीत गाईला अत्यंत पवित्र मानले जाते. पूर्वीपासून घरी गाय असणे म्हणजे उत्तम संस्कारांचे लक्षण मानले गेले आहे. गाईला गोमाता, गोदेवी असे देखील म्हणतात म्हणजेच आपण तिला आई आणि देवीसमान मानतो. प्रत्येक सण समारंभाला देवदेवतांसोबत गाईचे सुद्धा पूजन केले जाते.

संपूर्ण जगभरात गाईच्या विविध प्रजाती आढळतात. गाय हा सर्वत्र आढळणारा मादी प्राणी आहे. भारतीय संस्कृतीत शेतीला अनन्य साधारण महत्त्व असल्याने शेतीच्या कामांसाठी बैलांचा उपयोग अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे गाय – बैल अशी जोडी घरी असणे हे संपत्ती आणि सधनतेचे लक्षण असते.

गाईचे दूध अत्यंत पवित्र आणि सात्विक मानले जाते. पूर्वीच्या काळी जेव्हा यांत्रिक आणि तंत्रज्ञान विकास झाला नव्हता तेव्हा घरी गाय असणे गरजेचेच होते. गाईच्या दुधावर लहान मुले आणि इतर लोक देखील सांभाळले जायचे. शारिरीक विकासासाठी गाईचे पौष्टिक दूध आजही आवडीने पिले जाते.

गायीला चार पाय, एक शेपूट, दोन छोटी शिंगे, दोन कान, मोठे डोके, नाक आणि डोळे असतात. गाय हा शांत स्वभावाचा शाकाहारी प्राणी आहे. गाईच्या पिल्लाला वासरू म्हटले जाते. गाय आणि वासरू अशी जोडी घरी असेल तर त्या घरी आनंद भरभरून वाहतो अशी समज आहे.

पृथ्वीवर गाय वेगवेगळ्या आकारात आणि रंगात आढळते. भारतात मध्यम आकाराची तांबडी, काळी आणि पांढरी गाय असते. हिरवे गवत, पिकांची ताटे, पाला व इतर शाकाहारी अन्न असा तिचा आहार असतो. गायीला रानात चरण्यासाठी नेले जाते त्यामुळे तिचा विहार होतो आणि स्वच्छ ताजे गवत तिला खायला मिळते.

गायीचे दूध हे खूप लाभदायक आहे. तिच्या दुधापासून बनवलेले तूप हे सात्विक तूप मानले जाते. गायीच्या दुधापासून खूप सारे पदार्थ जसे की दही, तूप, लोणी, ताक, पनीर, मावा इत्यादी बनवता येतात. गोमूत्र हे देखील अनेक रोग उपचारांत गुणकारी समजले जाते. गायीचे शेण आपण आपले घर-परिसर सारवण्यासाठी वापरतो.

भारतात एकवेळ लोक उपाशी राहतील पण गाईला उपाशी ठेवत नाहीत. मानवी उत्क्रांतीत गाय अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे. तिचा मानवाशी खूप जवळचा संबंध असल्याचे दिसून येते. गाई संवेदनशील प्राणी असून तिला सुद्धा भावना असतात. त्यामुळे इतर प्राण्यांपेक्षा गाईला अत्यंत महत्त्व दिले जाते.

आपल्या घरी मंगल प्रसंगी गोडधोड जेवण बनवल्यास त्याचा नैवेद्य म्हणून गाईला सर्वप्रथम दिला जातो. गाय अत्यंत वंदनीय आणि पूजनीय आहे. तिचा निरागस चेहरा, शांत स्वभाव आणि तिच्या असण्यातील सहजता ही सर्वांना प्रिय वाटते. अशा अनेक कारणांमुळे माझा आवडता प्राणी हा गाय आहे.

तुम्हाला माझा आवडता प्राणी – गाय हा मराठी निबंध (My Favourite Animal – Cow Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post माझा आवडता प्राणी – गाय मराठी निबंध | Cow Essay In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/cow-essay-in-marathi/feed/ 0 3162