mahatma Gandhi speech in Marathi Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Tue, 21 Sep 2021 07:42:41 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 mahatma Gandhi speech in Marathi Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 महात्मा गांधी मराठी भाषण | Mahatma Gandhi Speech In Marathi | https://dailymarathinews.com/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a4%a3/ https://dailymarathinews.com/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a4%a3/#respond Tue, 21 Sep 2021 07:32:47 +0000 https://dailymarathinews.com/?p=2522 प्रस्तुत लेख हा महात्मा गांधी मराठी भाषण आहे. महात्मा गांधीजींच्या जीवनावर भाषण करणे, हा उपक्रम शालेय जीवनात विद्यार्थ्यांना असतो.

The post महात्मा गांधी मराठी भाषण | Mahatma Gandhi Speech In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा महात्मा गांधी मराठी भाषण (Mahatma Gandhi Speech In Marathi) आहे. महात्मा गांधीजींच्या जीवनावर भाषण करणे, हा उपक्रम शालेय जीवनात विद्यार्थ्यांना असतो. विद्यार्थी अत्यंत मुद्देसूद आणि विस्तारपूर्वक प्रस्तुत भाषण सादर करू शकतील, असा आम्हाला विश्वास वाटतो.

महात्मा गांधी भाषण मराठी | Mahatma Gandhi Marathi Bhashan |

“नमन स्वीकारा आमुचे
बापू तुम्ही महात्मा
भारताच्या भवितव्यासाठी
तुमचा अमर आत्मा”

महात्मा गांधी हा शब्द कानावर पडताच आपल्याला आठवते ते म्हणजे डोळ्यावर चष्मा, हातात काठी ,आणि अंगावर परिधान केलेले ते पांढरे शुभ्र वस्त्र! महात्मा गांधी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते होते. रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना “महात्मा” ही उपाधी दिली.

महात्मा या संस्कृत भाषेतील शब्दाचा अर्थ “महान आत्मा” असा आहे. महात्मा गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 या दिवशी सध्याच्या गुजरातमधील पोरबंदर शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळीबाई असे होते.

त्यांची आई अत्यंत धार्मिक प्रवृत्तीच्या स्त्री होत्या. त्यांच्या या स्वभावाचा परिणाम गांधीजींवर पडला आणि त्यांच्या मूल्यांनी पुढे चालूनच गांधीजींच्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट होत गेल्या. सन 1883 मध्ये साडे तेरा वर्षाच्या वयात त्यांचे लग्न कस्तुरबा यांच्याशी करण्यात आले.

महात्मा गांधींनी स्वतःचे जीवन हे सत्याच्या प्रयोगासाठी खर्ची घातले. गांधीजी आफ्रिकेत वकिली करण्यासाठी गेले पण तेथे हिंदू बांधवांवर अन्याय दूर करण्यासाठी धडपडले. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले. शेतकरी, कामगार यांच्यासाठी त्यांनी संघर्ष केला. ते नेहमी अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करत असत.

गांधीजींनी चंपारणमधील शेतकऱ्यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. इ.स. १९२१ मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर देशव्यापी चळवळी उभ्या केल्या. इ.स. १९३० मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मीठ कराविरोधात पायी चालत दांडी यात्रा काढली. या यात्रेत हजारो भारतीय जनतेचा सहभाग होता.

अहिंसा… जेव्हा आपण अहिंसेबाबत बोलतो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला “बापू” हे नाव आठवते. महात्मा गांधी यांनी केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला स्वतःच्या जीवनातून अहिंसेचा अर्थ समजावून सांगितला.

आपल्या समाजात एका मोठ्या समूहाला अस्पृश्य म्हटले जात होते. गांधीजींनी या समूहाला “हरीजन” असे संबोधून त्यांचा मान वाढीस लावला. असे हे थोर अहिंसावादी व्यक्तिमत्त्व ३० जानेवारी १९४८ रोजी अनंतात विलीन झाले. महात्मा गांधींबद्दल शेवटी एवढेच बोलू इच्छितो की,
       
एक महात्मा होऊनी गेला,
आयुष्य अपुले देऊन गेला…
या भूमीच्या सेवेसाठी,
बलिदान प्राणाचे देऊनी गेला…
आक्रंदिते ही भारत भूमी,
सुपुत्र भूमीचा हरवूनी गेला…
आठवा त्याला, जागवा स्मृती,
कोहिनूर तो हरपुनी गेला…

लेखन सौजन्य – निकिता पवार (सातारा)

तुम्हाला महात्मा गांधी मराठी भाषण (Mahatma Gandhi Speech In Marathi) आवडले असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post महात्मा गांधी मराठी भाषण | Mahatma Gandhi Speech In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a4%a3/feed/ 0 2522