Mahatma Gandhi Essay In Marathi Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Wed, 08 Sep 2021 06:42:16 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 Mahatma Gandhi Essay In Marathi Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 महात्मा गांधी 10 ओळी निबंध मराठी | 10 Lines Essay On Mahatma Gandhi https://dailymarathinews.com/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%80-10-%e0%a4%93%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7-%e0%a4%ae/ https://dailymarathinews.com/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%80-10-%e0%a4%93%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7-%e0%a4%ae/#respond Wed, 08 Sep 2021 05:34:45 +0000 https://dailymarathinews.com/?p=2475 प्रस्तुत निबंध हा महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित 10 ओळी आहेत. अत्यंत सोप्या आणि समर्पक शब्दांत या निबंधाचे लेखन दिलेले आहे.

The post महात्मा गांधी 10 ओळी निबंध मराठी | 10 Lines Essay On Mahatma Gandhi appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत निबंध हा महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित 10 ओळी आहेत. अत्यंत समर्पक आणि मोजक्या शब्दांत त्यांचे जीवनकार्य महात्मा गांधी या मराठी निबंधात (10 Lines Essay On Mahatma Gandhi In Marathi) वर्णिलेले आहे.

महात्मा गांधी मराठी निबंध – 10 ओळी | 10 Lines Essay On Mahatma Gandhi In Marathi |

1. महात्मा गांधींचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. लोक आदराने त्यांना बापू म्हणत असत.

2. महात्मा गांधीजींचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी पोरबंदर, गुजरात येथे झाला.

3. गांधीजींच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळीबाई होते. त्यांच्या पत्नीचे नाव कस्तुरबा होते.

4. स्वातंत्र्य लढ्यात उपोषण आणि असहकार असे मार्ग निवडले होते. महात्मा गांधी हे सत्यवादी आणि अहिंसावादी नेते होते.

5. इंग्रजांनी लादलेल्या मीठ कराविरोधात गांधीजींनी पायी चालत दांडी यात्रा काढली.

6. महात्मा गांधीजींनी इ.स. १९४२ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारत छोडो म्हणजेच “चले जाव” हे आंदोलन सुरू केले.

7. सर्व भारतीय जनता, सर्वधर्मी लोक तसेच पक्ष विपक्षातील नेत्यांच्या मनात गांधीजींबद्दल कमालीचा आदर होता.

8. गांधीजींनी मोठ्या कारखान्यांपेक्षा कुटिर उद्योगांना महत्त्व दिले. स्वदेशीचा पुरस्कार म्हणून त्यांनी साधी राहणी स्वीकारली.

9. गांधीजी हे उत्तरोत्तर शरीरशुद्धी आणि आत्मशुद्धीसाठी प्रयत्नशील होते.

10. ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधीजींचे निधन झाले.

लहान विद्यार्थी नेहमी मुद्देसूद निबंध शोधत असतात. त्यांना जास्त विस्तारपूर्वक वर्णन नको असते. त्यामुळे महात्मा गांधी 10 ओळी मराठी निबंध (10 Lines Essay On Mahatma Gandhi In Marathi) हा नक्कीच मुलांना आवडेल. निबंध आवडल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post महात्मा गांधी 10 ओळी निबंध मराठी | 10 Lines Essay On Mahatma Gandhi appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%80-10-%e0%a4%93%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7-%e0%a4%ae/feed/ 0 2475
महात्मा गांधी मराठी निबंध | Mahatma Gandhi Essay In Marathi | https://dailymarathinews.com/mahatma-gandhi-essay-in-marathi/ https://dailymarathinews.com/mahatma-gandhi-essay-in-marathi/#respond Mon, 11 May 2020 15:21:01 +0000 https://dailymarathinews.com/?p=1641 महात्मा गांधी हे एक थोर पुरुष होते. महामा गांधी यांच्या जीवनावरील मराठी निबंध अत्यंत समर्पक शब्दांत लिहायचा असतो.

The post महात्मा गांधी मराठी निबंध | Mahatma Gandhi Essay In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
महात्मा गांधी हे एक थोर पुरुष होते. त्यांनी देशभक्तीला अहिंसेचे स्वरूप दिले होते. त्यामुळे समाजसेवा, राजकारण, तसेच अध्यात्म, मानवी गुण संपन्नता या क्षेत्रात आपले जीवन समर्पित करणाऱ्या महात्मा गांधी यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांना निबंध लिहायला लावतात.

व्यक्तीविषयी निबंध लेखन हा प्रकार विद्यार्थ्यांना हाताळावा लागतो. त्यासाठी व्यक्तीच्या संपूर्ण जीवनाबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या निबंधात जास्त कल्पना विस्तार आवश्यक नसतो. मुद्देसूद वाक्यरचना आणि मांडणी आवश्यक ठरते. चला तर मग बघुया, कसा लिहाल महात्मा गांधी मराठी निबंध! (Mahatma Gandhi Essay in Marathi).

महात्मा गांधी निबंध | Mahatma Gandhi Marathi Nibandh |

महात्मा गांधीजी यांना सर्वजण आदराने बापू म्हणत असत. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर अहिंसावादी नेते म्हणून बापूंची ओळख होती. गुरु रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम बापूंना ‘महात्मा’ ही उपाधी दिली तर सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना ‘राष्ट्रपिता’ म्हणून प्रथमतः संबोधले.

महात्मा गांधी यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर हा “जागतिक अहिंसा दिन” म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या संपूर्ण जीवनावर अध्यात्मिकतेचा पगडा दिसून येतो. विविध धर्मग्रंथांचा अभ्यास हा त्यांच्यासाठी आणि समाजासाठी उपयुक्त ठरला होता.

मोहनदास करमचंद गांधी असे बापूंचे संपूर्ण नाव होते. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी पोरबंदर, गुजरात येथे झाला. गांधीजींच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळीबाई होते. लहानपणापासूनच त्यांच्या घरातले वातावरण अध्यात्मिक होते. त्या अध्यात्माचा प्रभाव त्यांच्या पूर्ण जीवनावर दिसून येतो.

गांधीजींचे प्राथमिक शिक्षण पोरबंदरमध्ये तर माध्यमिक शिक्षण राजकोटमध्ये झाले. शैक्षणिक जीवनात ते हुशार विद्यार्थी होते. मॅट्रिकची परीक्षा ते भावनगरमधील शामळदास कॉलेजमधून पास झाले. मोहनदास गांधी यांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी कस्तुरबा माखनजी यांच्याबरोबर झाला.

महात्मा गांधी हे अहिंसा आणि असहकार या तत्त्वांचे पुरस्कर्ते होते. ते दक्षिण आफ्रिकेत वकिलीचा अभ्यास करत असताना तेथील भारतीयांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी अहिंसा आणि असहकार या मार्गांचा अवलंब केला. आफ्रिकेत असताना कृष्णवर्णीय म्हणून झालेली अवहेलना त्यांना सहन झाली नाही आणि ते इ.स.१९१५ मध्ये भारतात परतले.

गांधीजींनी चंपारणमधील शेतकऱ्यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. पुढे इ.स. १९२१ मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर देशव्यापी चळवळी त्यांनी उभ्या केल्या. यामध्ये सर्वधर्म समभाव, आर्थिक स्वावलंबन, खेड्यांचा विकास, स्त्रियांचे हक्क, गरिबी निर्मूलन अशी महत्त्वाची धोरणे होती.

पुढे इ.स. १९३० मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मीठ कराविरोधात पायी चालत सुमारे चारशे किलोमीटर दांडी यात्रा काढली. या यात्रेत हजारो भारतीयांचा सहभाग होता. हरिजनांच्या उद्धारासाठी ते नेहमीच प्रयत्नशील होते. साबरमती आश्रमात त्यांनी हरिजन, आदिवासी, कुष्ठपीडित या सर्वांची सेवा केली.

मोठ्या कारखान्यांपेक्षा ‘कुटिर उदयोग’ त्यांना महत्वाचे वाटत असत. स्वदेशीचा पुरस्कार म्हणून त्यांनी साधी राहणी स्वीकारली. स्वतःच्या वस्त्रांत आणि आहारात त्यांनी बदल केला. स्वच्छता आणि साधेपणा त्यांना आवडत असे.

इ.स. १९४२ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारत छोडो म्हणजेच “चले जाव” हे आंदोलन सुरू केले. त्यांच्या प्रत्येक आंदोलनाचे स्वरूप हे अहिंसात्मक असायचे. त्यामुळे ते अनेकवेळा उपोषणालाही बसले. संपूर्ण भारत देश, सर्वधर्मी लोक व नेते हे त्यांचे अनुयायी होते.

गांधीजींनी जीवनात अनेकवेळा तुरुंगवास सहन केला. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर झालेले अन्याय त्यांना सलत होते. गांधीजी हे उत्तरोत्तर आत्मशुद्धी आणि शरीरशुद्धीसाठी प्रयत्नशील होते. त्यांनी सत्य आणि अहिंसा या दोन तत्वांचा आयुष्यभर निष्ठेने अवलंब केला. ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधीजींचे निधन झाले.

तुम्हाला महात्मा गांधी हा मराठी निबंध (Mahatma Gandhi Essay in Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post महात्मा गांधी मराठी निबंध | Mahatma Gandhi Essay In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/mahatma-gandhi-essay-in-marathi/feed/ 0 1641