Maharashtra exit poll Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Wed, 23 Oct 2019 11:36:20 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 Maharashtra exit poll Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 एक्झिट पोल सध्या तरी विरोधकांच्या विरोधात..! https://dailymarathinews.com/maharashtra-exit-poll/ https://dailymarathinews.com/maharashtra-exit-poll/#respond Wed, 23 Oct 2019 11:36:17 +0000 https://dailymarathinews.com/?p=1014 ‘एक्झिट पोल’ हा भाजप – शिवसेना युतीला सहाय्यक असा दाखवला गेला आहे. महायुतीला दोनशेपेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचे चित्र दाखवले जात आहे. अशातच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या ...

Read moreएक्झिट पोल सध्या तरी विरोधकांच्या विरोधात..!

The post एक्झिट पोल सध्या तरी विरोधकांच्या विरोधात..! appeared first on Daily Marathi News.

]]>
‘एक्झिट पोल’ हा भाजप – शिवसेना युतीला सहाय्यक असा दाखवला गेला आहे. महायुतीला दोनशेपेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचे चित्र दाखवले जात आहे. अशातच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांची मात्र ‘दिल की धडकन’ तेज होऊ लागली आहे.राज्यात विविध ठिकाणी मातब्बर नेतेमंडळी पडण्याचे आसार आहेत.   

यावेळची निवडणूक म्हणजे दिवाळीअगोदर एक पर्वणीच होती. २१ तारखेला झालेल्या मतदानानंतर विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी एक्झिट पोल दाखवले होते. सर्वच पोल आघाडी विरोधात असल्याने अनेक मातब्बर मंडळींचा विरोध निश्चित मानला जात आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला सुरुंग लागण्याची शक्यता आहे. अनेक विरोधीपक्षनेते जसे की धनंजय मुंडे, बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या जागा धोक्यात असल्याची चिन्हे आहेत. परंतु एक्झिट पोल म्हणजे एक अंदाज असतो त्यामुळे जनमाणसात महायुतीचे सरकार येईल परंतु एवढे मताधिक्य मिळणार नाही अशी चर्चा आहे.

स्ट्राँग रूम व जामरची मागणी

ईव्हीएम टेम्परिंग ची शक्यता असल्याने ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूम आणि मतमोजणी परिसरात ‘जामर’ बसवावेत अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच मोजणीसाठी मतदान यंत्र निवडीची मुभा उमेदवारांना द्यावी व मतदान यंत्राबाबत संकट निर्माण झाल्यास मतमोजणी चार वेळा करावी व 50 टक्के व्हीव्हीपॅटची मोजणी करावी अशा मागण्याही त्यांनी यावेळी केल्या.     

साताऱ्याच्या नवलेवाडी येथे ईव्हीएम बिघाडाची घटना धक्कादायक स्वरूपाची आहे. प्रत्येक मत भाजपलाच जात होते. ही घटना समोर आल्याने ईव्हीएम मशीनबद्दल शंका निर्माण झाली आहे. तरी मतमोजणीसाठी मतदारसंघनिहाय व बुथनिहाय निकाल जाहीर करावेत अशी मागणीही त्यांनी केली.

The post एक्झिट पोल सध्या तरी विरोधकांच्या विरोधात..! appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/maharashtra-exit-poll/feed/ 0 1014