Kolapyache Prakar Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Fri, 02 Jul 2021 16:38:05 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 Kolapyache Prakar Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 कोळपणी म्हणजे काय? Kolapani Information In Marathi | https://dailymarathinews.com/kolapani-information-in-marathi/ https://dailymarathinews.com/kolapani-information-in-marathi/#comments Tue, 06 Jul 2021 16:22:00 +0000 https://dailymarathinews.com/?p=2375 प्रस्तुत लेखात कोळपणी या शेती निगडित कामाविषयी माहिती (Kolapani Information In Marathi) देण्यात आलेली आहे. तसेच कोळपणी कशी केली जाते आणि त्यासाठी वापरण्यात येणारे कोळपे ...

Read moreकोळपणी म्हणजे काय? Kolapani Information In Marathi |

The post कोळपणी म्हणजे काय? Kolapani Information In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेखात कोळपणी या शेती निगडित कामाविषयी माहिती (Kolapani Information In Marathi) देण्यात आलेली आहे. तसेच कोळपणी कशी केली जाते आणि त्यासाठी वापरण्यात येणारे कोळपे या अवजाराविषयी सांगण्यात आलेले आहे.

कोळपणी – मराठी माहिती | Kolapani Marathi Mahiti |

• कोळपणी हे काम शेतीतील तण नियंत्रणासाठी केले जाते. शेतातील तण नियंत्रण जर झाले तर पीक उत्पन्नात वाढ होते.

• कोळपणी करण्यासाठी कोळपे हे यंत्र (अवजार) अत्यावश्यक आहे. कोळप्याचा वापर करून तुम्ही शेतातील तण लहान असतानाच काढू शकता.

• पेरणी केल्यानंतर तीन, सहा आणि नऊ आठवड्यांनी शेतात कोळपणी केली जाते. तण वाढ ही पिकांपेक्षा जास्त असते. त्यामुळे त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांना मुळासकट शेतातून दूर करणे आवश्यक असते.

• कोळपणी केल्याने पिकांची वाढ अत्यंत जोमात होते. त्यामुळे नांगरणी, पेरणी प्रमाणेच कोळपणीला देखील शेतीत अत्यंत महत्त्वाचे काम मानले गेले आहे.

• पेरणी झाल्यानंतर काही दिवसांत पावसाचे वातावरण नियंत्रणात आले की कोळपणी सुरू केली जाते. बैलांच्या साहाय्याने कोळपणी शक्य नसल्यास हात कोळपे वापरून कोळपणी केली जाते.

• कोळपणी ही एक प्रकारची आंतर मशागत आहे ज्याद्वारे अत्यंत कलापूर्ण पद्धतीत शेतातील तण काढले जाते.

• ग्रामीण भागात पेरणी झाल्यानंतर कोळपणीचे काम अत्यंत लगबगीने केले जाते कारण पाऊस उघडला की अत्यंत कमी वेळात हे काम उरकून घ्यावे लागते.

कोळपे मराठी माहिती | Kolape Information In Marathi |

पिकांतील आंतर मशागतीसाठी एक चाक आणि त्यासोबत मजबूत धारदार पाते अशी संरचना असलेले यंत्र म्हणजे कोळपे. कोळप्याच्या नियंत्रणासाठी आणि चालवण्यासाठी त्याला धरायला दोन दांडे असतात.

दोन्ही दांड्यांना धरून स्वतःच्या ताकतीवर त्याला शेतात चालवायचे असते जेणेकरून गवत आणि तण मुळासकट उपटून बाहेर येऊ शकेल.

कोळपणीसाठी आपण बैलांचा उपयोग देखील करू शकतो. बैलांना आपण कोळपणी अवजारे जोडून कोळपणी पूर्ण करू शकतो.

ग्रामीण भागातील लोक कोळपणी खूप व्यवस्थितरित्या पार पाडतात. पिके लहान असल्याने काळजीपूर्वक कोळपणी करावी लागते.

कोळप्याचे प्रकार – Kolapyache Prakar

ग्रामीण भागात कोळप्याचे अनेक प्रकार पाहायला मिळतात ते खालीलप्रमाणे…..
• मोगी एकचाकी कोळपे
• अखंड फासेचे कोळपे.
• फटीचे कोळपे
• अकोला कोळपे

शेतातील पिकांच्या रचनेनुसार आणि पेरणी प्रकारानुसार कोळपणीसाठी योग्य प्रकारचे कोळपे वापरले जाते ज्यानुसार सर्वात उपयुक्त कोळपणी होऊ शकेल.

तुम्हाला कोळपणी मराठी माहिती (Kolapani Information In Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post कोळपणी म्हणजे काय? Kolapani Information In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/kolapani-information-in-marathi/feed/ 1 2375