Jagatik Paryavaran Din Nibandh 10 Oli Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Sat, 04 Jun 2022 06:08:51 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 Jagatik Paryavaran Din Nibandh 10 Oli Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 जागतिक पर्यावरण दिन – निबंध १० ओळी | Paryavaran Din Nibandh Marathi 10 Oli | https://dailymarathinews.com/environment-day-10-lines-essay-marathi/ https://dailymarathinews.com/environment-day-10-lines-essay-marathi/#respond Sat, 04 Jun 2022 06:08:40 +0000 https://dailymarathinews.com/?p=4078 या निबंधात पर्यावरण दिनाविषयी सर्व प्रकारची प्राथमिक व मुद्देसूद माहिती देण्यात आलेली आहे.

The post जागतिक पर्यावरण दिन – निबंध १० ओळी | Paryavaran Din Nibandh Marathi 10 Oli | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा जागतिक पर्यावरण दिन (Jagatik Paryavaran Din 10 Oli Nibandh Marathi) या विषयावर आधारित १० ओळींचा मराठी निबंध आहे. या निबंधात पर्यावरण दिनाविषयी सर्व प्रकारची प्राथमिक व मुद्देसूद माहिती देण्यात आलेली आहे.

विज्ञान युग सुरू झाल्यापासून मानवाने आपल्या जीवनशैलीत कमालीचा बदल केलेला आहे. त्यामुळे निसर्ग, पर्यावरण व इतर सजीव सृष्टीवर त्याचा घातक परिणाम झालेला आहे. नैसर्गिक समस्यांची कारणे जाणून घेऊन त्यावर उपाययोजना अंमलात आणणे यासाठी सर्वप्रथम जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे.

जागतिक पर्यावरण दिनी संपूर्ण जगभरात पर्यावरणाविषयी जनजागृती केली जाते आणि वर्षभरात उपाययोजना अंमलात आणली जाते. हा दिन जागतिक स्तरावर साजरा केला जात असल्याने त्याचा परिणाम हा अत्यंत विधायक स्वरूपाचा असतो.

जागतिक पर्यावरण दिन – १० ओळी मराठी निबंध | World Environment Day 10 Lines Essay In Marathi |

१. जागतिक पर्यावरण दिन हा संपूर्ण जगभरात ५ जून रोजी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येतो.

२. भौतिक संसाधनांचा अतिवापर, निसर्गावर आक्रमण, आधुनिक जीवनशैली यांमुळे पर्यावरणामध्ये असंतुलन निर्माण झालेले आहे.

३. पर्यावरण विषयक असंतुलन व समस्यांविषयी जनजागृती होण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्रसंघाने ५ जून रोजी पर्यावरण दिन साजरा करण्याचे ठरवले.

४. दिनांक ५ जून १९७४ रोजी पहिला पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

५. विविध नैसर्गिक आपत्ती व प्रदूषणे अशा पर्यावरणीय समस्यांची कारणे व उपाय यांची जाणिव लोकांना पर्यावरण दिनी करून दिली जाते.

६. प्रत्येक वर्षी पर्यावरण दिनासाठी वेगवेगळी थीम आयोजित केली जाते.

७. पर्यावरणीय थीम म्हणजे एखादी नैसर्गिक समस्या अथवा संकल्पना लोकांसमोर स्पष्ट करून सांगितली जाते.

८. लोकांना एकदा थीमद्वारे समस्या अथवा संकल्पना समजली की ते आपापल्या देशात, प्रदेशात त्यानुसार पर्यावरण पूरक कार्य करू शकतील.

९. सध्या प्रत्येक व्यक्ती स्वतःचे पर्यावरण विषयक विचार व मत सोशल मीडियावर व्यक्त करू शकत असल्याने पर्यावरण दिन हा दिवसेंदिवस खूपच प्रसिद्ध होत चालला आहे.

१०. संपूर्ण वर्षभर पर्यावरणीय समस्येवर उपाययोजना अंमलात आणणे यासाठी पर्यावरण दिन खूप महत्त्वाचा ठरतो.

तुम्हाला जागतिक पर्यावरण दिन हा १० ओळींचा मराठी निबंध (Jagatik Paryavaran Din 10 Oli Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा..

The post जागतिक पर्यावरण दिन – निबंध १० ओळी | Paryavaran Din Nibandh Marathi 10 Oli | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/environment-day-10-lines-essay-marathi/feed/ 0 4078