Integrity Essay Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Fri, 31 Jul 2020 07:52:22 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 Integrity Essay Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 Integrity Essay In Marathi | अखंडता जगण्याचा मार्ग मराठी निबंध | https://dailymarathinews.com/integrity-essay-in-marathi/ https://dailymarathinews.com/integrity-essay-in-marathi/#respond Sun, 02 Aug 2020 07:51:00 +0000 https://dailymarathinews.com/?p=1773 अखंडता हा जगण्याचा उत्तम मार्ग आहे, याची प्रचिती येण्यासाठी प्रत्येकाने त्या दिशेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. अखंडता ही संकल्पना अनुभवात आली तरच आपण व्यवस्थित जगू ...

Read moreIntegrity Essay In Marathi | अखंडता जगण्याचा मार्ग मराठी निबंध |

The post Integrity Essay In Marathi | अखंडता जगण्याचा मार्ग मराठी निबंध | appeared first on Daily Marathi News.

]]>
अखंडता हा जगण्याचा उत्तम मार्ग आहे, याची प्रचिती येण्यासाठी प्रत्येकाने त्या दिशेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. अखंडता ही संकल्पना अनुभवात आली तरच आपण व्यवस्थित जगू शकतो नाहीतर एक प्रकारचा कलह आणि मानसिक संघर्ष आयुष्यभर चालू असतो. ही अखंडता कशी काय जीवनात उतरू शकते किंवा अनुभवात येऊ शकते याची चर्चा आपण “अखंडता – एक जगण्याचा मार्ग” (Integrity Essay In Marathi) या निबंधात करणार आहोत.

विद्यार्थ्यांना या विषयाची माहिती असणे खूप गरजेचे आहे त्याशिवाय हा निबंध पूर्ण करणे अशक्य आहे. अतिशयोक्ती आणि भावपूर्ण विस्तार न करता योग्य आणि मुद्देसूद वाक्य रचना येथे अपेक्षित आहे. हा विषय थोडा आंतरिक आणि मानसिक संरचनेचा असल्याने जगण्याची थोडी वेगळी दृष्टी येथे स्पष्ट करणे गरजेचे असते. चला तर मग पाहुयात कसा लिहायचा, “अखंडता – एक जगण्याचा मार्ग” हा निबंध !

अखंडता – एक जगण्याचा मार्ग निबंध ! Integrity A Way Of Life Marathi Nibandh |

आपण जे पाहतो त्यामध्ये आपल्याला दोन असल्याची जाणीव होत राहते. आपण स्वतः आपल्याला दुसऱ्यापासून वेगळे मानत राहतो. तेथेच खरी चूक होते. आपल्याला आयुष्यात मिळणारे यश आणि अपयश याची व्याख्या आपण कशा पद्धतीने करू शकतो याचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. सर्व समाज जर एका कारणामुळे सुखी होत असेल तर ते कारण यशासाठी पुरेसे आहे. याउलट एकटा व्यक्ती ज्या कारणांनी सुखी होतो ती कारणे जर समाजाला घातक ठरणारी असतील तर असा व्यक्ती अपयशी मानला जातो.

स्वतःचा विचार करणे आणि भौतिक सुखासाठी प्रयत्नशील राहणे हे मनुष्याच्या स्वभावात आहे. परंतु ते सुख दुसऱ्यांना त्रास देऊन प्राप्त होत असेल तर असे जीवन हे दुःखमय होतेच. यावर पर्याय म्हणून असा निष्कर्ष दिला जातो की दुसऱ्याचे भले करा. परंतु दुसऱ्यांचे भले करण्याच्या नादात मग आपण दुःखी होतो. या दोन्ही विपरीत परिस्थितीवर एकच पर्याय आहे तो म्हणजे अखंडता!

अखंडता म्हणजे काय? अखंडता कशी काय साधली जाऊ शकते? याचा विचार करताना जीवनात कुठल्या प्रकारचे सुख तुम्हाला अपेक्षित आहे हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. तुम्ही सुख म्हणजे स्वार्थाच्या पाठीमागे तर लागला नाही ना? हे देखील लक्षात ठेवा. सुख आणि समाधान हे सर्वांच्या भल्यात समाविष्ट आहे असे कळल्यावर जी दृष्टी प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातो ती दृष्टी म्हणजे अखंडता!

तुम्ही जे काही पाहता त्याला स्वतःपासून भिन्न समजता, त्यामुळे जे काही कर्म तुमच्याकडून केले जाते ते दुसऱ्यासाठी एकप्रकारे हिंसाच ठरते. अशी हिंसा ही व्यक्त स्वरूपात नसते पण तिचे दूरगामी परिणाम हे मात्र त्रासदायक ठरतात. असेच सर्व समाज आणि सर्व लोकांबद्दल देखील आहे. मी म्हणजेच सर्व समाज आणि समाज म्हणजेच मी, अशी एकनिष्ठ वृत्ती आणि दृष्टी ज्याला प्राप्त होते तो खऱ्या अर्थाने अखंडतेचे महत्त्व जाणतो.

आपला स्वभाव हा खंडित स्वरूपाचा असेल तर स्वतःमध्ये भ्रष्टाचार निर्माण होतो. सर्वांना तोडून अहंकारी वृत्ती वाढीस लागते. मग मी म्हणजे महान आणि बाकीचे सर्वजण तुच्छ अशी भावना देखील निर्माण होते. असा व्यक्ती संवेदनशील नसतो. त्यामुळे निसर्गाची, कुटुंबाची आणि पर्यायाने समाजाची हानीच त्याच्या हातून घडते. तो व्यक्ती काही चांगले काम करायला गेला तरी त्याचा परिणाम हा मात्र दुःख देणारा असतो.

अखंडितपणा ही जर जीवनाची वृत्ती नसेल तर मग आपला स्वभाव हा दुसऱ्या कारणांवर सोपवला जातो आणि स्वतःचा स्वार्थ साधला जातो. उदाहरण म्हणून घ्या, जेव्हा आपण मांस खातो तेव्हा कोणाचा तरी आपल्या अन्नासाठी जीव गेलेला आहे याची जाणीव आपल्याला होते का? एखादे झाड कापल्यावर त्याचा जीव आपण घेत आहोत असे आपल्याला कळते का? समाजाचा विकास आणि प्रगती अशी नावे देऊन आपण निसर्गाचे प्रदूषण आणि हानी करत असतो याची जाणीव आपल्याला असते का? या सर्वांची जाणिव फक्त संवेदनशील मनाला होत असते. असे मन हे अखंडित दृष्टी ठेवून जगू शकते.

भौतिक विकास हा तर संपूर्णतः निसर्गाचा नाश करूनच झालेला आहे. विज्ञानाच्या आणि शांततेच्या नावाखाली आज अणुबॉम्ब, शस्त्रे तयार केली जात आहेत. युद्धे केली जातात. एक देश दुसऱ्या देशाचा शत्रू मानून आक्रमण केली जातात. लोकांचे प्राण घेतले जातात. हे सर्व काय आहे? ही फक्त खंडित वृत्तीमुळे तयार झालेली विकृत मानसिकता आहे. सर्व प्रकारची हिंसा आणि दुष्कृत्ये टाळायची असतील तर आपल्याला अखंडता विकसित केली पाहिजे.

अखंडता विकसित करण्यासाठी सकारात्मक ऊर्जेचा संचार सर्व लोकांत झाला पाहिजे. लहानपणापासून कुठलाही व्यक्ती वेगळा म्हणून अहंकारात जगता कामा नये. तसे शिक्षण त्याला देणे अपेक्षित आहे. ध्यान, आनंद, समाधान अशा उदात्त गोष्टी त्यासाठी मनुष्यात घडवून आणणे गरजेचे आहे. निष्काम कर्म आणि दुसऱ्या जीवाचा आदर हा मनुष्याचा सहज स्वभाव बनला पाहिजे.

तुम्हाला अखंडता मराठी निबंध ( Integrity Essay In Marathi ) कसा वाटला? याबद्दलचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा….

The post Integrity Essay In Marathi | अखंडता जगण्याचा मार्ग मराठी निबंध | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/integrity-essay-in-marathi/feed/ 0 1773