Indira Gandhi 10 Lines Essay in Marathi Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Fri, 22 Oct 2021 08:03:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 Indira Gandhi 10 Lines Essay in Marathi Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 इंदिरा गांधी 10 ओळी निबंध | 10 Lines Essay On Indira Gandhi In Marathi | https://dailymarathinews.com/%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%80-10-%e0%a4%93%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf/ https://dailymarathinews.com/%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%80-10-%e0%a4%93%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf/#respond Fri, 22 Oct 2021 08:00:09 +0000 https://dailymarathinews.com/?p=2729 प्रस्तुत निबंध हा इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित 10 ओळींचा मराठी निबंध आहे. या निबंधात त्यांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण प्रसंग

The post इंदिरा गांधी 10 ओळी निबंध | 10 Lines Essay On Indira Gandhi In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत निबंध हा इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित 10 ओळींचा मराठी निबंध (Indira Gandhi 10 Lines Essay In Marathi) आहे. या निबंधात त्यांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण प्रसंग आणि घटना यांचे मुद्देसूद विश्लेषण करण्यात आलेले आहे.

इंदिरा गांधी – 10 ओळींचा मराठी निबंध | Indira Gandhi 10 Oli Marathi Nibandh |

1) भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान आणि पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधीजींचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद या शहरात झाला.

2) इंदिरा गांधी यांच्या वडिलांचे नाव जवाहरलाल नेहरू तर आईचे नाव कमला नेहरू होते.

3) इंदिराजींचे कुटुंब राजकीय घडामोडींनी वेढलेले असायचे त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वावर राजकारणाचा जोरदार प्रभाव पडला.

4) इंदिरा गांधी यांच्या पतीचे नाव फिरोजशहा गांधी असे होते तर त्यांना राजीव आणि संजय अशी दोन मुले होती.

5) लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असताना इंदिरा गांधी यांनी माहिती व नभोवाणी मंत्री हे पद सांभाळले.

6) लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर इंदिरा गांधी या भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान झाल्या.

7) शेती-उद्योग, अंतराळ संशोधन, अणुशक्ती या क्षेत्रांत भारताला पुढे नेण्यासाठी इंदिरा गांधी यांना अनेक कठोर निर्णय घ्यावे लागले.

8) इंदिरा गांधी हे एक महान महिला नेतृत्व होते. त्यांची हुशारी आणि राजकीय कार्यक्षमता याचे सर्वजण कौतुक करत असत.

9) १४ प्रमुख व्यापारी बॅंकांचे राष्ट्रीयीकरण, पोखरण येथे पहिली अणुचाचणी, ऑपरेशन ब्लू स्टार या त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना होत्या.

10) इंदिरा गांधी यांना 1971 साली भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला. 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांची हत्या करण्यात आली.

तुम्हाला इंदिरा गांधी 10 ओळींचा मराठी निबंध (Indira Gandhi 10 Lines Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post इंदिरा गांधी 10 ओळी निबंध | 10 Lines Essay On Indira Gandhi In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%80-10-%e0%a4%93%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf/feed/ 0 2729