Ind vs Eng 1st Test Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Fri, 26 Jan 2024 14:26:51 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 Ind vs Eng 1st Test Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 Ind vs Eng : भारताची सामन्यावर मजबूत पकड – दिवसाखेर १७५ धावांची… https://dailymarathinews.com/ind-vs-eng-bharatachi-samanyawar-strong-catch-diwasakher-175-runs/ https://dailymarathinews.com/ind-vs-eng-bharatachi-samanyawar-strong-catch-diwasakher-175-runs/#respond Fri, 26 Jan 2024 14:26:49 +0000 https://dailymarathinews.com/?p=6195 के.एल. राहुल आणि रवींद्र जडेजाने अर्धशतकं ठोकून भारताला पहिल्या डावात १७५ धावांची आघाडी मिळवून दिली.

The post Ind vs Eng : भारताची सामन्यावर मजबूत पकड – दिवसाखेर १७५ धावांची… appeared first on Daily Marathi News.

]]>
के.एल. राहुल आणि रवींद्र जडेजाने अर्धशतकं ठोकून भारताला पहिल्या डावात १७५ धावांची आघाडी मिळवून दिली. पहिल्या डावाचा दुसरा दिवस ११० षटकांत ४२१/७ असा संपला. पहिल्या दिवशी ११९/१ अशी धावसंख्या उभारली होती आणि भारत हा इंग्लंड पेक्षा १२७ धावांनी पिछाडीवर होता. २४६ धावा इंग्लंडने पहिल्या डावात बनवल्या होत्या.

दुसऱ्या दिवशी पहिल्याच ओव्हरमध्ये यशस्वी जैस्वालला ८० धावांवर गमावले. त्यानंतर सुरुवात मिळूनही श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल मोठी खेळी साकारण्यात अयशस्वी ठरले. त्यानंतर राहुल आणि जडेजाने भारताचा डाव सावरला. राहुलने 123 चेंडूत 86 धावा करत आपले 14 वे कसोटी अर्धशतक झळकावले.

त्यानंतर जडेजाने आपले 20 वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. त्याने नाबाद राहत 155 चेंडूत 81 धावा केल्या. त्याने अक्षर पटेल (62 चेंडूत नाबाद 35) याच्यासोबत आठव्या विकेटसाठी 117 चेंडूत 63 धावांची अखंड भागीदारी केली. या डावात आश्विन दुर्दैवीरित्या धावचीत झाला.

इंग्लंडचे फिरकी गोलंदाज म्हणावे तेवढे प्रभाव टाकू शकले नाहीत. हार्टली आणि रूट यांनी प्रत्येकी दोन बळी तर अहमद आणि लिच यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. उद्याच्या दिवशी भारताचा मोठी आघाडी मिळवण्याचा प्रयत्न असेल.

संक्षिप्त धावफलक –

इंग्लंड २४६/१०

भारत ४२१/७ (१७५ धावांची आघाडी)

The post Ind vs Eng : भारताची सामन्यावर मजबूत पकड – दिवसाखेर १७५ धावांची… appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/ind-vs-eng-bharatachi-samanyawar-strong-catch-diwasakher-175-runs/feed/ 0 6195