gopalkala festival Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Sat, 24 Aug 2019 06:25:39 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 gopalkala festival Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 गोपाळकाला- एक चोरीचा डाव पण कसा बनला उत्सवाचे कारण https://dailymarathinews.com/gopalkala-festival/ https://dailymarathinews.com/gopalkala-festival/#respond Sat, 24 Aug 2019 01:44:25 +0000 https://dailymarathinews.com/?p=866 “कृष्ण लीला” हे आपण फक्त दिलेले नाव आहे. जेव्हा विमुक्तपणे जगण्याची कल्पना अंतरंगात रुजू लागते तेव्हा लीला घडत जाते. कुठल्याही गोष्टीत आनंद शोधणे आणि कुठल्याही ...

Read moreगोपाळकाला- एक चोरीचा डाव पण कसा बनला उत्सवाचे कारण

The post गोपाळकाला- एक चोरीचा डाव पण कसा बनला उत्सवाचे कारण appeared first on Daily Marathi News.

]]>
“कृष्ण लीला” हे आपण फक्त दिलेले नाव आहे. जेव्हा विमुक्तपणे जगण्याची कल्पना अंतरंगात रुजू लागते तेव्हा लीला घडत जाते. कुठल्याही गोष्टीत आनंद शोधणे आणि कुठल्याही परिस्थितीला हसत सामोरे जाणे म्हणजेच लीला होय. अशा लीलेचा प्रकार म्हणून आपण दहीहंडी साजरी करतो. 

काय असेल हा खेळ?       

हा प्रश्न सगळ्याना पडू शकतो. लहानपणापासून आपण ऐकत आलेलो असतो की कृष्ण आपल्या सवंगड्यासोबत हा खेळ खेळायचे. पण खरी स्थिती म्हणजे ती एक चोरी असायची. कृष्ण स्वतः जगण्याची कला जगण्यातूनच शिकवतात. ते लहान असताना एवढे खोडकर होते की प्रत्येक व्यक्ती त्यांच्यासोबत कोणत्या ना कोणत्या तक्रारीने जोडलेले असायचे. त्या काळी किंवा कृष्ण ज्या कुळी वाढले ते कुळ म्हणजे म्हणजे गोकुळ. गायी, अनेक पाळीव जनावरे प्रत्येकाच्या घरी असणे म्हणजे प्रतिष्ठेचे समजले जायचे आणि तो त्या कुळाचा धर्मच समजला जायचा. त्यामुळे दूध, दही याची कधी कमतरताच नसायची. कृष्णाच्या घरीसुद्धा कशाची कमी नव्हती पण गप्प बसेल तो कृष्ण कसला?       

प्रत्येकाला स्वतःच्या चर्चेत गुंतवून ठेवणे आणि काहीतरी विलक्षण करत जाणे हेच लहानपणी कृष्णाचे काम. अशाच एका कामाची भर म्हणून दह्याची चोरी करणे. त्या काळी दही मडक्यात ठेऊन टांगले जायचे. लहान मुलांच्या हाती लागणार नाही याचीसुद्धा काळजी घेतली जायची. कृष्ण आणि त्याचे सवंगडी रात्री घराची कौले काढून किंवा जसे शक्य होईल तसे घरात घुसून दही चोरत असत. दही चोरताना ते मडके हाती येण्यासाठी एकावर एक थर अशा प्रकारे रचना करून कृष्ण स्वतः ते दही चोरी करून सर्व सवंगड्यांसोबत खात असत.

हे हि जरूर वाचासांगलीतील पुरामुळे त्या निष्पाप मुलीला मिळालं नवं जीवन…

एक मजेशीर खेळ किंवा एक साहस म्हणून ते हा प्रकार करत असत. दही सर्वांच्याच घरी असायचे त्यामुळे त्याची चोरी करताना काही हेतू वगैरे नसायचा तर निखळ आनंद आणि मनमुराद खट्याळपणा हेच प्रत्येक क्षणी उद्देश्य असायचे. याचीच पुनरावृत्ती पुढील पिढ्यांतील लहान मुलांनी केलेली दिसते व त्याची परिणीती आज एका सामाजिक उत्सवात झालेली आहे…दहीहंडी!  

The post गोपाळकाला- एक चोरीचा डाव पण कसा बनला उत्सवाचे कारण appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/gopalkala-festival/feed/ 0 866