flood Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Sat, 24 Aug 2019 06:12:44 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 flood Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 या गोष्टीमुळे आदित्य ठाकरे यांनी जिंकली पूरग्रस्तांची मने ! https://dailymarathinews.com/aditya-thakre-meet-flood-affected-people/ https://dailymarathinews.com/aditya-thakre-meet-flood-affected-people/#respond Thu, 22 Aug 2019 02:57:03 +0000 https://dailymarathinews.com/?p=842 युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी सिंधूदुर्ग जिल्ह्यातील पूरग्रस्तांची भेट घेतली तसेच त्यांच्या पर्यंत मदत पोचली आहे की नाही याची चौकशी केली व पूरग्रस्त भागांमध्ये ...

Read moreया गोष्टीमुळे आदित्य ठाकरे यांनी जिंकली पूरग्रस्तांची मने !

The post या गोष्टीमुळे आदित्य ठाकरे यांनी जिंकली पूरग्रस्तांची मने ! appeared first on Daily Marathi News.

]]>
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी सिंधूदुर्ग जिल्ह्यातील पूरग्रस्तांची भेट घेतली तसेच त्यांच्या पर्यंत मदत पोचली आहे की नाही याची चौकशी केली व पूरग्रस्त भागांमध्ये जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूंचे वाटप झाल्यानंतर शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी कोल्हापूर तर बुधवारी सांगली व सातारा जिल्ह्यात पूरग्रस्त भागांमध्ये भेट दिली.

या चार जिल्ह्याच्या भेटीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पूरग्रस्तांची मने जिंकली. त्यांनी या आपल्या दौऱ्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. कुठे कसली कमतरता निर्माण झाली असेल तर त्याच्यावर निर्णय घेऊन ती कमतरता पूर्ण केली. त्यांनी ग्रामीण व शहरी भागात जाऊन लोकांशी चर्चा केली.

त्यांनी लोकांना आश्वस्त केले की हे सरकार आपले आहे व ही शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणें उभी आहे असेही लोकांना सांगितले. महापुराच्या आपत्तीने आपण उभे राहिलात! गणपती बाप्पा चा आशीर्वाद आपल्या पाठीशी असून तुम्ही कधीही हाक मारा शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. धर्म, जात, भाषा न पाहता प्रत्येकाला घरोघरी जाऊन मदत करू, अशा शब्दात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांची मने जिंकली.

aditya thakre

शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्त भागात शिवसहाय्य कीट चे वाटप करण्यात आले व त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे सुध्दा यावेळी वाटप करण्यात आले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसेनेच्या खासदार व आमदारांनी ज्या 22 मागण्या केल्या होत्या त्या मागण्या मुख्यमंत्री यांच्याकडून मंजूर करण्यात आल्या आहेत तसेच त्या सगळ्या मागण्यांची लवकरच पूर्तता केली जाईल असेही ते म्हणाले.

उध्दव ठाकरे यांनी केली राज ठाकरे यांची पाठराखण…ईडी च्या नोटीसीवर अशी मांडली शिवसेनेची भूमिका.

लोकांमध्ये जाऊन लोकांना मदत करणे, त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, त्यांना दिलासा देणे, त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्या साठी काय करता येईल यासाठी प्रयत्न करणे या सगळ्या गोष्टींमुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पूरग्रस्तांची मने जिंकली.

The post या गोष्टीमुळे आदित्य ठाकरे यांनी जिंकली पूरग्रस्तांची मने ! appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/aditya-thakre-meet-flood-affected-people/feed/ 0 842
सांगलीतील पुरामुळे त्या निष्पाप मुलीला मिळालं नवं जीवन… https://dailymarathinews.com/2-months-old-girl-gets-new-life-due-to-flood-in-sangli/ https://dailymarathinews.com/2-months-old-girl-gets-new-life-due-to-flood-in-sangli/#respond Sat, 17 Aug 2019 04:30:47 +0000 https://dailymarathinews.com/?p=818 जेव्हा पूर, वादळे येतात तेव्हा लोकांची घरे नष्ट होतात. लोक प्रियजनांपासून विभक्त होतात, परंतु महाराष्ट्रातील सांगलीमध्ये आलेल्या पुरामुळे दोन महिन्यांच्या मुलीला नवीन जीवन मिळाले आहे. ...

Read moreसांगलीतील पुरामुळे त्या निष्पाप मुलीला मिळालं नवं जीवन…

The post सांगलीतील पुरामुळे त्या निष्पाप मुलीला मिळालं नवं जीवन… appeared first on Daily Marathi News.

]]>
जेव्हा पूर, वादळे येतात तेव्हा लोकांची घरे नष्ट होतात. लोक प्रियजनांपासून विभक्त होतात, परंतु महाराष्ट्रातील सांगलीमध्ये आलेल्या पुरामुळे दोन महिन्यांच्या मुलीला नवीन जीवन मिळाले आहे. खरंतर, पूरातून बचावल्यानंतर मुलीला उपचारासाठी दवाखान्यात नेलं गेलं तेव्हा तिला हृदयविकाराचा गंभीर आजार असल्याचे समजले आणि त्वरित शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे हे देखील निष्पन्न झाले.

कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार पूरामुळे त्यांचे संपूर्ण घर जवळजवळ बुडाले होते. एनडीआरएफने रहिवाशांना यातून वाचवले आणि सर्वांना जवळच्या आश्रय गृहात नेले. त्यांची मुलगी खूप लहान असल्याने तिला संसर्ग झाला आणि स्थानिक रुग्णालयात दाखल करावे लागले. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून निमोनियाच्या संशयावरून मुलीला मुंबईतील वाडिया रुग्णालयात हलविण्यात आले. येथे तपासणीत केवळ न्यूमोनिया ग्रस्त मुलगीच आढळली नाही तर आकस्मिक हॉर्ट (हृदयाच्या छिद्रातील समस्या) देखील आढळली.

वाडिया रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, या मुलीवर लवकरच शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे. न्यूमोनियावर उपचार सुरू असून त्याची स्थिती सामान्य आहे. एकदा तिची प्रकृती स्थिर झाल्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया होईल. तुम्हाला सांगू इच्छितो की मुलीचे वडील संदीप शिंदे भाजी विकतात. पावसामुळे त्यांचे घर उध्वस्त झाले नाही तर उदरनिर्वाहाचे साधन जवळजवळ नाहीसे झाले आहे. अशा परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली आहे.

रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालक डॉ. शकुंतला प्रभू म्हणाल्या की, मुलीच्या हृदयविकाराविषयी कुटुंबीयाना काहीच ठाऊक नव्हतं. मुलीच्या आरोग्यासाठी हे खूप धोकादायक ठरू शकलं असतं. जर वेळेत हृदयविकाराचा शोध लागला नसता तर मुलीच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकला असता. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खराब असल्याने रुग्णालयाकडून बालिकेच्या उपचाराचा खर्च उचलला जात आहे.

शस्त्रक्रियेसाठी सुमारे अडीच लाख रुपये खर्च येणार आहे. मुलाचे वडील संदीप शिंदे यांनी सांगितले की ते न्यूमोनियाच्या उपचारांसाठी आले होते. मुंबईत आल्यावर हृदयविकाराची माहिती मिळाली. जर ते मुंबईत आले नसते तर कदाचित हा आजार माहित पडला नसता.

आता होईल क्षयरोगाचा १००% उपचार, भारतीय वैज्ञानिकांचा शोध.

The post सांगलीतील पुरामुळे त्या निष्पाप मुलीला मिळालं नवं जीवन… appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/2-months-old-girl-gets-new-life-due-to-flood-in-sangli/feed/ 0 818