fastag Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Thu, 17 Oct 2019 05:20:44 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 fastag Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 आता १ डिसेंबरपासून सर्व टोलनाक्यावर येईल “फास-टॅग” https://dailymarathinews.com/fas-tag/ https://dailymarathinews.com/fas-tag/#respond Thu, 17 Oct 2019 05:20:39 +0000 https://dailymarathinews.com/?p=992 टोलनाका हा कायमच रहदारीचा असल्याचे जाणवत आले आहे. यामुळे वेळेचा होणारा अपव्यय लोकांना सतत त्रास देत आलेला आहे. यावर निर्णय म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण “लेन ...

Read moreआता १ डिसेंबरपासून सर्व टोलनाक्यावर येईल “फास-टॅग”

The post आता १ डिसेंबरपासून सर्व टोलनाक्यावर येईल “फास-टॅग” appeared first on Daily Marathi News.

]]>
टोलनाका हा कायमच रहदारीचा असल्याचे जाणवत आले आहे. यामुळे वेळेचा होणारा अपव्यय लोकांना सतत त्रास देत आलेला आहे. यावर निर्णय म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण “लेन फास टॅग” ही यंत्रणा सर्व टोलनाक्यावर राबवणार आहे. ही यंत्रणा १ डिसेंबरपासून लागू होईल. यासंदर्भात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी “एक देश एक फास टॅग” या कार्यक्रमात माहिती दिली.

महत्वाचे मुद्दे

१. देशातील ५२७ पैकी ३८० टोलनाक्यांवर फास टॅग यंत्रणा सज्ज.

२. फास टॅग ला जी एस टी नेटवर्क संलग्न.

३. कारच्या समोरील काचेवर फास टॅग लावला जाणार.

४. हा टॅग ५ वर्षापर्यंत वैध.

५. वाहनाबद्दलची संपूर्ण माहिती या फास टॅग मध्ये समाविष्ट.

कसा करणार काम हा टॅग?

“फास टॅग” सज्जित नाक्यावरील सेन्सर च्या संपर्कात गाडी येताच फास-टॅग अकाउंट वरून टोल शुल्क आपोआप भरले जाणार आहे. हे अकाउंट आपण रिचार्ज करू शकतो. याची मुदत ५ वर्षांची असून त्यानंतर नवीन फास-टॅग आपल्या गाडीच्या काचेवर लावला जाणार आहे.

फायदे

१. गर्दीच्या त्रासातून सुटका.

२. वेळेची बचत होणार.

३. एकप्रकारे गाडीचे आधारकार्ड असणार हा फास टॅग.

४. टोलनाक्यावर गर्दी होणार नाही.

५. गुन्हेगारी नियंत्रणात आणली जाऊ शकते. कोणत्या गाडीत कोण बसले आहे याची माहिती मिळू शकते.

६. एसएमएसद्वारे शुल्क भरल्याची माहिती मिळणार. कॅशबॅक ही शक्य.

हे हि वाचा- सरकारचा हा नवीन कॉम्प्युटर कोर्स नक्कीच आहे परिपूर्ण

The post आता १ डिसेंबरपासून सर्व टोलनाक्यावर येईल “फास-टॅग” appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/fas-tag/feed/ 0 992