arun jetali death news Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Sat, 24 Aug 2019 09:04:30 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 arun jetali death news Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन, या दुर्धर आजारांशी देत होते लढ़ा… https://dailymarathinews.com/arun-jaitley-passes-away/ https://dailymarathinews.com/arun-jaitley-passes-away/#respond Sat, 24 Aug 2019 08:35:49 +0000 https://dailymarathinews.com/?p=879 देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अरुण जेटली यांचे आज दिल्लीच्या एम्समध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. दुपारच्या १२.०७ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ...

Read moreमाजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन, या दुर्धर आजारांशी देत होते लढ़ा…

The post माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन, या दुर्धर आजारांशी देत होते लढ़ा… appeared first on Daily Marathi News.

]]>
देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अरुण जेटली यांचे आज दिल्लीच्या एम्समध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. दुपारच्या १२.०७ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६६ वर्षांचे होते.

अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते, प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी होते. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं ९ ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले गेले, पण त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

जेटली यांच्या मृत्यूची बातमी समजताच गृहमंत्री अमित शहा यांनी हैदराबाद दौरा रद्द केला आणि ते हैदराबादहून दिल्लीला रवाना झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या संयुक्त अरब अमिराती (युएई) परदेशी दौर्‍यावर आहेत. त्यांनी ट्विटर वरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या दुर्धर आजारांशी देत होते लढ़ा

जेटलींच्या फुफ्फुसात पाणी साचत होते, त्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. यामुळेच डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते. त्यांना सॉफ्ट टिशू सारकोमा होता, हा कर्करोगाचा एक प्रकार आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की जेटली आधीच मधुमेहाचे रुग्ण होते. त्यांची याआधी मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. तसेच कर्करोगाच्या आजाराची माहिती मिळताच ते अमेरिकेत उपचारासाठी गेले होते. लठ्ठपणापासून मुक्त होण्यासाठी त्यांनी बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया देखील केली होती.

वकील ते राजकारणी असा थक्क करणारा प्रवास

दिल्ली विद्यापीठातून विद्यार्थी नेता म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरुवात करणारे जेटली हे सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकीलही होते. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी अर्थ मंत्रालयाची सूत्रे आपल्या हाती घेतली होती आणि हि जबाबदारी त्यांनी चांगल्या प्रकारे पार पाडली. जेटली आरोग्याच्या कारणास्तव मोदी-२ सरकारमध्ये सामील झाले नाहीत. अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये ते केंद्रीय मंत्री देखील होते. देशातील एक उत्तम वकील म्हणून त्यांची गणना केली जाते.

80 च्या दशकात जेटली यांनी सर्वोच्च न्यायालय आणि देशातील अनेक उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण प्रकरणे लढली होती. १९९० मध्ये त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने वरिष्ठ अधिवक्ताचा दर्जा दिला होता. व्ही.पी. सिंग यांच्या सरकारमध्ये त्यांना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल हे पद मिळाले होते.

अशाच या एका महान नेत्याला आणि भारताच्या सुपुत्राला आमचा सलाम आणि देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

*भावपूर्ण श्रद्धांजली*

The post माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन, या दुर्धर आजारांशी देत होते लढ़ा… appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/arun-jaitley-passes-away/feed/ 0 879