Aditya thakre Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Sat, 24 Aug 2019 06:10:41 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 Aditya thakre Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 या गोष्टीमुळे आदित्य ठाकरे यांनी जिंकली पूरग्रस्तांची मने ! https://dailymarathinews.com/aditya-thakre-meet-flood-affected-people/ https://dailymarathinews.com/aditya-thakre-meet-flood-affected-people/#respond Thu, 22 Aug 2019 02:57:03 +0000 https://dailymarathinews.com/?p=842 युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी सिंधूदुर्ग जिल्ह्यातील पूरग्रस्तांची भेट घेतली तसेच त्यांच्या पर्यंत मदत पोचली आहे की नाही याची चौकशी केली व पूरग्रस्त भागांमध्ये ...

Read moreया गोष्टीमुळे आदित्य ठाकरे यांनी जिंकली पूरग्रस्तांची मने !

The post या गोष्टीमुळे आदित्य ठाकरे यांनी जिंकली पूरग्रस्तांची मने ! appeared first on Daily Marathi News.

]]>
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी सिंधूदुर्ग जिल्ह्यातील पूरग्रस्तांची भेट घेतली तसेच त्यांच्या पर्यंत मदत पोचली आहे की नाही याची चौकशी केली व पूरग्रस्त भागांमध्ये जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूंचे वाटप झाल्यानंतर शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी कोल्हापूर तर बुधवारी सांगली व सातारा जिल्ह्यात पूरग्रस्त भागांमध्ये भेट दिली.

या चार जिल्ह्याच्या भेटीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पूरग्रस्तांची मने जिंकली. त्यांनी या आपल्या दौऱ्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. कुठे कसली कमतरता निर्माण झाली असेल तर त्याच्यावर निर्णय घेऊन ती कमतरता पूर्ण केली. त्यांनी ग्रामीण व शहरी भागात जाऊन लोकांशी चर्चा केली.

त्यांनी लोकांना आश्वस्त केले की हे सरकार आपले आहे व ही शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणें उभी आहे असेही लोकांना सांगितले. महापुराच्या आपत्तीने आपण उभे राहिलात! गणपती बाप्पा चा आशीर्वाद आपल्या पाठीशी असून तुम्ही कधीही हाक मारा शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. धर्म, जात, भाषा न पाहता प्रत्येकाला घरोघरी जाऊन मदत करू, अशा शब्दात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांची मने जिंकली.

aditya thakre

शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्त भागात शिवसहाय्य कीट चे वाटप करण्यात आले व त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे सुध्दा यावेळी वाटप करण्यात आले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसेनेच्या खासदार व आमदारांनी ज्या 22 मागण्या केल्या होत्या त्या मागण्या मुख्यमंत्री यांच्याकडून मंजूर करण्यात आल्या आहेत तसेच त्या सगळ्या मागण्यांची लवकरच पूर्तता केली जाईल असेही ते म्हणाले.

उध्दव ठाकरे यांनी केली राज ठाकरे यांची पाठराखण…ईडी च्या नोटीसीवर अशी मांडली शिवसेनेची भूमिका.

लोकांमध्ये जाऊन लोकांना मदत करणे, त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, त्यांना दिलासा देणे, त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्या साठी काय करता येईल यासाठी प्रयत्न करणे या सगळ्या गोष्टींमुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पूरग्रस्तांची मने जिंकली.

The post या गोष्टीमुळे आदित्य ठाकरे यांनी जिंकली पूरग्रस्तांची मने ! appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/aditya-thakre-meet-flood-affected-people/feed/ 0 842