स्वागत भाषण म्हणजे काय Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Mon, 05 Apr 2021 00:44:10 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 स्वागत भाषण म्हणजे काय Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 उद्घाटन भाषण / स्वागत भाषण | Inaugural Speech In Marathi | https://dailymarathinews.com/inaugural-speech-in-marathi/ https://dailymarathinews.com/inaugural-speech-in-marathi/#comments Mon, 05 Apr 2021 00:44:07 +0000 https://dailymarathinews.com/?p=2108 प्रस्तुत लेखात स्वागत भाषण किंवा उद्घाटन भाषण (Inaugural/Welcome Speech In Marathi) म्हणजे काय, याचे विश्लेषण करण्यात आलेले आहे. कोणत्याही कार्यक्रमाची किंवा समारंभाची सुरुवात ही स्वागत ...

Read moreउद्घाटन भाषण / स्वागत भाषण | Inaugural Speech In Marathi |

The post उद्घाटन भाषण / स्वागत भाषण | Inaugural Speech In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेखात स्वागत भाषण किंवा उद्घाटन भाषण (Inaugural/Welcome Speech In Marathi) म्हणजे काय, याचे विश्लेषण करण्यात आलेले आहे. कोणत्याही कार्यक्रमाची किंवा समारंभाची सुरुवात ही स्वागत भाषणाने होत असते.

उद्घाटनाची रूपरेखा पाहता त्यावेळी केले जाणारे भाषण हा अतिशय महत्त्वाचा विषय ठरतो. तुम्हाला हा लेख वाचल्यावर नक्कीच स्वागत भाषण कसे करावे किंवा कसे असावे याबद्दल माहिती मिळेल.

स्वागत भाषण म्हणजे काय! Welcome Speech |

स्वागत भाषण म्हणजे एखाद्या कार्यक्रमावेळी सुरुवातीला एका व्यक्तीने दिलेले कृतज्ञतापूर्ण अथवा नियोजित व्यक्तींचे स्वागत करणारे भाषण!

जेथे मेळावा असतो, सांस्कृतिक कार्यक्रम असतो, नेत्याचे भाषण असते, सामाजिक, शालेय किंवा घरगुती कार्यक्रम असेल तर स्वागत भाषण हा अतिशय उत्सुकतेचा आणि महत्त्वपूर्ण विषय असतो.

कार्यक्रम किंवा समारंभाचा विषय वेगळा असतो परंतु त्यामध्ये त्याची सुरुवात अगदी आकर्षक पद्धतीने करावी लागते तरच प्रेक्षक आणि जनसमुदाय भारावून जात असतो.

स्वागत भाषण देणारा व्यक्ती आणि सर्व कार्यक्रमाचा सूत्रसंचालक हा काहीवेळा वेगवेगळा व्यक्ती असू शकतो किंवा एकच व्यक्ती असू शकतो. ज्या पद्धतीचा कार्यक्रम असेल त्याला शोभेल असे सूत्रसंचालनाचे काम केले जाते.

त्यासाठी सूत्रसंचालक हा हुशार आणि वक्तृत्व कलेत पटाईत असणे आवश्यक असते. तो व्यवस्थित स्वागत भाषण देतो आणि समारंभाचे मुद्दे स्पष्ट करत जातो.

स्वागत भाषण का असावे ?

कार्यक्रमाचा उत्साह हा स्वागत भाषणाने वाढू शकतो. प्रमुख पाहुणे आणि इतर मान्यवर यांची ओळख करून देणे आणि संपूर्ण कार्यक्रम कसा असेल त्याची थोडक्यात माहिती सुरुवातीला जर दिली तर नक्कीच कार्यक्रमाला आकर्षण प्राप्त होते.

सूत्रसंचालक हा थोडा विनोदी स्वभावाचा असेल तर मग कार्यक्रमाला वेगळीच छटा लाभते. मुख्य कार्यक्रम तर पार पडतच असतो परंतु सूत्रसंचालक कायम लक्षात राहतो. त्यामुळे स्वागत भाषण करणे किंवा सूत्रसंचालन करणे ही देखील एक कलाच आहे.

स्वागत भाषण (Welcome Speech) कोठे दिले जाऊ शकते?

• शालेय समारंभ अथवा सत्कार कार्यक्रम

• वार्षिक स्नेहसंमेलन

• उद्घाटन समारंभ

• सामाजिक / राजकीय मेळावा

• कौटुंबिक कार्यक्रम (लग्नसोहळा, वाढदिवस)

• स्वातंत्र्यदिन / प्रजासत्ताक दिन

The post उद्घाटन भाषण / स्वागत भाषण | Inaugural Speech In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/inaugural-speech-in-marathi/feed/ 9 2108